ads
ads
काँग्रेससाठी राष्ट्रीय सुरक्षा म्हणजे आर्थिक स्रोत

काँग्रेससाठी राष्ट्रीय सुरक्षा म्हणजे आर्थिक स्रोत

►पंतप्रधान मोदी यांचा जोरदार हल्ला, नवी दिल्ली, १५ डिसेंबर…

गप्पा तरुणाईच्या, संधी वृद्धांना!

गप्पा तरुणाईच्या, संधी वृद्धांना!

►राहुल गांधींच्या ‘गप्पां’चा फुगा फुटला, नवी दिल्ली, १५ डिसेंबर…

हिजबुलच्या तीन अतिरेक्यांचा खातमा

हिजबुलच्या तीन अतिरेक्यांचा खातमा

►स्थानिक नागरिकांचा जवानांसोबत संघर्ष ►दगडफेक करणारे आठ नागरिक गोळीबारात…

महिंद राजपक्षे यांचा राजीनामा

महिंद राजपक्षे यांचा राजीनामा

►विक्रमासिंघे यांचा आज शपथविधी, कोलंबो, १५ डिसेंबर – वादग्रस्त…

अनिवासी भारतीयांमुळे वाढला परकीय चलनाचा ओघ

अनिवासी भारतीयांमुळे वाढला परकीय चलनाचा ओघ

वॉशिंग्टन, १३ डिसेंबर – विदेशी चलन भारतात पाठविण्यामध्ये पुन्हा…

मध्यम पल्ल्याच्या क्षेपणास्त्र चाचणीबाबत इराणचा दुजोरा

मध्यम पल्ल्याच्या क्षेपणास्त्र चाचणीबाबत इराणचा दुजोरा

तेहरान, ११ डिसेंबर – पाश्‍चात्त्य देशांनी व्यक्त केलेल्या तीव्र…

राज्यात जानेवारीमध्ये शिक्षक मेगाभरती

राज्यात जानेवारीमध्ये शिक्षक मेगाभरती

►सरकारी हालचालींना वेग, मुंबई, १३ डिसेंबर – राज्यात येत्या…

कोल्हापूरच्या अंबाबाईची मूर्ती बदला

कोल्हापूरच्या अंबाबाईची मूर्ती बदला

►भाविकांचे जिल्हाधिकार्‍यांना निवेदन, कोल्हापूर,१३ डिसेंबर – करवीर निवासिनी श्री…

राज्यात गृहनिर्माण विकास महामंडळाची स्थापना

राज्यात गृहनिर्माण विकास महामंडळाची स्थापना

►३८४ शहरात १९.४० लाख घरकुलांचे निर्माण, मुंबई, १३ डिसेंबर…

काय हुकले; कोण चुकले?

काय हुकले; कोण चुकले?

॥ कटाक्ष : गजानन निमदेव | देशाचा पुढला पंतप्रधान…

बूँद से जो गयी, वह कभी नहीं आयेगी

बूँद से जो गयी, वह कभी नहीं आयेगी

॥ मानसरंग : मयुरेश डंके | एखाद्या गोष्टीचा दूरवर…

गांधी, उपाध्याय, लोहियांचे स्वप्न साकार करणारे गडकरी

गांधी, उपाध्याय, लोहियांचे स्वप्न साकार करणारे गडकरी

॥ विशेष : धनंजय बापट | नितीनजींचा देशात, जगात…

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

‘फोर्ब्स’ने नुकतीच सर्वाधिक कमाई करणार्‍या अभिनेत्यांच्या नावाची यादी जाहीर…

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

बॉलिवूडची बेबी डॉल म्हणजेच सनी लिओनीचे नाव इंटरनेटवर सर्वाधिक…

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

‘रेस- ३’ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये कमबॅक करणारा अभिनेता बॉबी देओल…

पंचांग
वार: | तिथी:
नक्षत्र: | राशी:
करण: | योग:
सूर्योदय: 06:52 | सूर्यास्त: 17:54
अयनांश:
Home » महाराष्ट्र » सरकारी कर्मचार्‍यांचा आजपासून संप

सरकारी कर्मचार्‍यांचा आजपासून संप

राजपत्रित अधिकारी संपात नाही,
तभा वृत्तसेवा
मुंबई, ६ ऑगस्ट –

Maharashtra Gov1

Maharashtra Gov1

राज्य सरकारी कर्मचार्‍यांना जानेवारी महिन्यापासून सातवा वेतन आयोग लागू करण्याची घोषणा मुख्यमंत्र्यांनी केली असली तरी दिवाळीपासूनच सातवा वेतन आयोग लागू करा, अशी मागणी करत राज्यातील १७ लाख सरकारी कर्मचारी ७, ८ व ९ ऑगस्ट असे सलग तीन दिवस संपावर जाणार आहेत. राज्य सरकार तातडीने शासननिर्णय जारी करणार असल्यामुळे राजपत्रित कर्मचार्‍यांनी आपला संप मागे घेतला आहे. या संपात रुग्णालये, डेअरी अशा अत्यावश्यक सेवांमधील कर्मचारी, शिक्षक, प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी नगर परिषद, जिल्हा परिषद कर्मचारी सहभागी होत आहेत.
सातव्या वेतन आयोगाच्या मागणीसह जानेवारी २०१७ पासून महागाई भत्त्याची चौदा महिन्यांची थकबाकी, जानेवारी २०१८ पासूनचा महागाई भत्ता, पाच दिवसांचा आठवडा, निवृत्तीचे वय ६० वर्षे आदी मागण्यांसाठी हा संप पुकारण्यात येणार असल्याचे बृहन्मुंबई राज्य सरकारी कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष मिलिंद सरदेशमुख व सरचिटणीस अविनाश दौंड यांनी आज एक पत्रकार परिषदेत सांगितले.
या मागण्यांसाठी सरकारी कर्मचार्‍यांनी यापूर्वी दोनदा संप पुकारण्याचा इशारा दिला होता. पण सातवा वेतन आयोग लागू करण्याचे आश्‍वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिल्यामुळे संप स्थगित केला होता. पण आता संप निश्‍चितपणे होईल, असे सरदेशमुख म्हणाले. चौदा महिन्यांची महागाई भत्त्याची थकबाकी देण्याचा शासन आदेशही जारी केला आहे. पण त्याची अंमलबजावणी सरकारने केलेली नाही. आमच्या मागण्या वेळीच मान्य करून अंमलबजावणी केली असती तर संपाची वेळ आली नसती. या संपाला सरकारच जबाबदार असल्याचा आरोप त्यांनी केला.
सरकारी कर्मचार्‍यांची १ लाख ८५ हजार पदे रिक्त आहेत. अनुकंपा तत्त्वावरील ३० हजार पदे भरण्यात आलेली नाही. केंद्राच्या धर्तीवर बाल संगोपन रजा दोन वर्षांची करण्याची मागणी होती. पण बाल संगोपन रजा सहा महिन्यांची करून कर्मचार्‍यांच्या तोंडाला पाने पुसली असे सरदेशमुख म्हणाले. भारतीय कामगार सेना महासंघाशी सलग्न महाराष्ट्र राज्य कर्मचारी महासंघ, महाराष्ट्र राज्य औद्योगिक औद्योगिकेतर कर्मचारी कामगार संघ या संपात सहभागी होणार नाही, असे महासंघाचे अध्यक्ष अ. द. कुलकर्णी, भारतीय कामगार सेनेचे सचिव तसेच महासंघाचे प्रमुख सल्लागार शंकरराव मोरे यांनी पत्रकार परिषदेत जाहीर केले.

Posted by : | on : 7 Aug 2018
Filed under : महाराष्ट्र.
You can follow any responses to this entry through the RSS 2.0You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Change Language: press Ctrl+g

    छायाचित्रातून

  • भारताचा ऑस्ट्रेलियात विक्रमी विजय भारताचा ऑस्ट्रेलियात विक्रमी विजय
  • पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक
  • कोहली, मीराबाईला खेलरत्न कोहली, मीराबाईला खेलरत्न
  • अमित पांघळला बॉक्सिंगचे सुवर्ण अमित पांघळला बॉक्सिंगचे सुवर्ण
  • तेजिंदरपालला सुवर्णपदक तेजिंदरपालला सुवर्णपदक

हवामान

दृष्टीक्षेपात

व्हिडीओ संग्रह

More in महाराष्ट्र (119 of 435 articles)


वैधानिक कारवाई नोव्हेंबरअखेर पूर्ण ►शांतता राखण्याचे पुन्हा एकदा जाहीर आवाहन, वृत्तसंस्था मुंबई, ५ ऑगस्ट - उशिरात उशिरा मराठा समाजाला आरक्षण ...

×