ads
ads
जो बंदूक उचलेल, त्याचा खातमाच!

जो बंदूक उचलेल, त्याचा खातमाच!

•भारतीय लष्कराचा कठोर संदेश •पुलवामा हल्ल्यामागे पाक लष्कर, आयएसआयच,…

जगाच्या इतिहासात शिवाजी महाराजांसारखी महान व्यक्ती सापडणे कठीण : मोदी

जगाच्या इतिहासात शिवाजी महाराजांसारखी महान व्यक्ती सापडणे कठीण : मोदी

नवी दिल्ली, १९ फेब्रुवारी – महाराष्ट्राच्या कडे-कपारीत ज्यांच्या नावाचा…

सूर्यकिरण विमानांची आकाशात धडक

सूर्यकिरण विमानांची आकाशात धडक

•एका वैमानिकाचा मृत्यू, दोन सुरक्षित •एअर शो सरावादरम्यान दुर्दैवी…

भारताने हल्ला केल्यास चोख प्रत्युत्तर

भारताने हल्ला केल्यास चोख प्रत्युत्तर

•इम्रान खानची धमकी, इस्लामाबाद, १९ फेब्रुवारी – पुलवामा दहशतवादी…

अमेरिकेतील १६ राज्यांचा ट्रम्प प्रशासनावर खटला

अमेरिकेतील १६ राज्यांचा ट्रम्प प्रशासनावर खटला

सॅन फ्रान्सिस्को, १९ फेब्रुवारी – मेक्सिको सीमेवर भिंत बांधण्यासाठी…

कुलभूषणवरील खटला बेकायदेशीर ठरवा

कुलभूषणवरील खटला बेकायदेशीर ठरवा

•सर्व आरोप काल्पनिक, आंतरराष्ट्रीय तत्त्वांचीही पायमल्ली •हरीश साळवे यांचा…

‘मातोश्री’च्या स्वार्थासाठी केलेली युती

‘मातोश्री’च्या स्वार्थासाठी केलेली युती

•नारायण राणे यांचा आरोप, मुंबई, १९ फेब्रुवारी – शिवसेनेने…

भाजपा-सेना सगळ्या निवडणुका एकत्र लढणार

भाजपा-सेना सगळ्या निवडणुका एकत्र लढणार

•लोकसभेसाठी २५-२३ आणि विधानसभेसाठी समसमान जागावाटप •अखेर शिवसेना-भाजपा युतीवर…

पाकी कलाकार, गायकांना भारताचे दार बंद

पाकी कलाकार, गायकांना भारताचे दार बंद

मुंबई, १७ फेब्रुवारी – यापुढे पाकिस्तानी कलाकार आणि गायकांसोबत…

राष्ट्रविकासाचा अर्थपूर्ण संकल्प

राष्ट्रविकासाचा अर्थपूर्ण संकल्प

॥ मानसरंग : मयुरेश डंके | २०१९ सालचा अर्थसंकल्प…

शककर्ते शिवराय

शककर्ते शिवराय

॥ प्रासंगिक : कुणाल नरसापूरकर | ‘स्वभावो दुरतिक्रम:’ असे…

मांजराची मुलायम पावले

मांजराची मुलायम पावले

॥ जागता पहारा : भाऊ तोरसेकर | भाजपाची मदत…

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

‘फोर्ब्स’ने नुकतीच सर्वाधिक कमाई करणार्‍या अभिनेत्यांच्या नावाची यादी जाहीर…

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

बॉलिवूडची बेबी डॉल म्हणजेच सनी लिओनीचे नाव इंटरनेटवर सर्वाधिक…

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

‘रेस- ३’ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये कमबॅक करणारा अभिनेता बॉबी देओल…

पंचांग
वार: | तिथी:
नक्षत्र: | राशी:
करण: | योग:
सूर्योदय: 06:51 | सूर्यास्त: 18:28
अयनांश:
Home » महाराष्ट्र » सरकारी कर्मचार्‍यांचा संप मागे

सरकारी कर्मचार्‍यांचा संप मागे

१४ महिन्यांची थकबाकी दिवाळीपर्यंत,
तभा वृत्तसेवा
मुंबई, ९ ऑगस्ट –
उरलेल्या सात महिन्यांच्या महागाई भत्त्याची भरपाई दिवाळीपर्यंत करण्याची, तसेच जानेवारीपर्यंत बक्षी समितीचा अहवाल मागवून वेतननिश्‍चितीसह सातवा वेतन आयोग लागू करण्याचे आश्‍वासन मिळाल्यामुळे राज्य सरकारी कर्मचार्‍यांनी सुरू केलेला तीन दिवसांचा संप गुरुवारी तिसर्‍या दिवशी दुपारी साडेबारा वाजता मागे घेण्यात आला.
राज्य सरकारकडून मिळालेले ठोस आश्‍वासन आणि शासकीय रुग्णालयात होणारे रुग्णांचे हाल, तसेच मराठा समाजाने पुकारलेल्या बंदच्या पृष्ठभूमीवर आम्ही हा संप मागे घेत आहोत, असे बृहन्मुंबई राज्य सरकारी कर्मचारी संघटनेचे सरचिटणिस अविनाश दौंड आणि अध्यक्ष मिलिंद सरदेशमुख यांनी गुरुवारी दुपारी एका पत्रकार परिषदेत जाहीर केले.
महागाई भत्त्याची थकबाकी मिळावी, सातवा वेतन आयोग लागू करावा, सेवानिवृत्तीचे वय ६० वर्षे करावे, अनुकंपा तत्त्वावरील नोकरभरती सुरू करावी, रिक्त जागा भराव्यात, जुनी पेंशन योजना लागू करावी, पाच दिवसांचा आठवडा, अशा मागण्यांसाठी राज्यातील १७ लाख कर्मचारी मंगळवारपासून तीन दिवसांच्या संपावर आहेत. चार तारखेपासून शासनाबरोबर आमच्या पाच वेळा चर्चा झाली. तेव्हा आम्ही ठेवलेल्या प्रस्तावावर आम्ही कायम आहोत. बुधवारी वित्तमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या विनंतीवरून आम्ही राजभवनवर त्यांच्याशी दीड तास चर्चा केली. या चर्चेत त्यांनी शासनाकडे पुरेसे पैसे नसल्याचे सांगितले. आम्ही तातडीने पैसे मागत नाही. पण, निश्‍चित असा अंमलबजावणीचा कार्यक्रम द्यावा, असे आमचे म्हणणे होते. ही चर्चा निष्फळ ठरली. संध्याकाळी आम्ही पुन्हा राज्याचे मुख्य सचिव डी. के. जैन यांच्याशी चर्चा केली. त्यांच्याकडेही, आम्ही उरलेल्या सात महिन्यांच्या महागाई भत्त्याची थकबाकी दिवाळीपर्यंत देण्याचे आदेश जारी करावेत, तसेच सातव्या वेतन आयोगाची अंमलबजावणी जानेवारीपासून करताना तो सर्व भत्त्यांसह लागू करावा, असा प्रस्ताव ठेवला, असेही ते म्हणाले.
गुरुवारी सकाळी राज्याच्या मुख्य सचिवांनी आमच्या शिष्टमंडळाशी पुन्हा चर्चा केली. वाढीव महागाई भत्त्याची २१ महिन्यांची थकबाकी कर्मचार्‍यांना मिळायची आहे. त्यातील १४ महिन्यांची थकबाकी ऑगस्टपर्यंत देण्याचे शासनाने एका निर्णयाद्वारे जाहीर केले आहे. आज सरकारने उरलेल्या सात महिन्यांची थकबाकी दिवाळीपर्यंत देण्याचे शासनाने मान्य केले आहे. जानेवारीपर्यंत सातवा वेतन आयोग लागू करण्यापूर्वी यावर अभ्यास करणार्‍या के. पी. बक्षी समितीचा अहवाल मागवून घेण्याचे तसेच वेतननिश्‍चितीसह आयोगाची अंमलबजावणी करण्याचे आश्‍वासनही मुख्य सचिव जैन यांनी दिले. चतुर्थ श्रेणी कर्मचार्‍यांच्या प्रश्‍नावर पुढच्या आठवड्यात बैठक घेण्याचे तसेच शिक्षकांच्या प्रश्‍नांवर लवकरच चर्चा करण्याचे आश्‍वासनही त्यांनी दिले. अंशदायी पेन्शन योजनेवर अभ्यास करण्यासाठी अभ्यासगट नेमण्याचेही शासनाने मान्य केल्याने आम्ही संप मागे घेण्याचा निर्णय घेला असल्याचेही या नेत्यांनी सांगितले.

https://tarunbharat.org/?p=59507
Posted by : | on : 10 Aug 2018
Filed under : महाराष्ट्र.
You can follow any responses to this entry through the RSS 2.0You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Change Language: press Ctrl+g

    छायाचित्रातून

  • भारताने ऑस्ट्रेलियात रचला इतिहास भारताने ऑस्ट्रेलियात रचला इतिहास
  • हार्दिक पंड्या, लोकेश राहुलला बीसीसीआयची नोटीस हार्दिक पंड्या, लोकेश राहुलला बीसीसीआयची नोटीस
  • भारताचा ऑस्ट्रेलियात विक्रमी विजय भारताचा ऑस्ट्रेलियात विक्रमी विजय
  • पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक
  • कोहली, मीराबाईला खेलरत्न कोहली, मीराबाईला खेलरत्न

हवामान

दृष्टीक्षेपात

व्हिडीओ संग्रह

More in महाराष्ट्र (185 of 442 articles)


न्यायालयाने मल्टिप्लेक्सला खडसावले, वृत्तसंस्था मुंबई, ८ ऑगस्ट - तुमचे काम फक्त चित्रपट दाखविण्याचे आहे, खाद्यपदार्थ विकण्याचे नाही. सार्वजनिक ठिकाणीही लोक ...

×