अटलबिहारी वाजपेयी अनंतात विलीन

अटलबिहारी वाजपेयी अनंतात विलीन

►शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार ►मानसकन्या नमिता यांनी दिला पार्थिवाला मुखाग्नी,…

अटलबिहारी वाजपेयींची संपत्ती

अटलबिहारी वाजपेयींची संपत्ती

वृत्तसंस्था नवी दिल्ली, १७ ऑगस्ट – आयुष्यभर जोडलेली माणसे,…

अटल युगान्त

अटल युगान्त

जनसंघाच्या आरंभापासून तर भारतीय जनता पक्ष. सत्ता स्थापन करण्याइतका…

भारत-पाकमध्ये शांतता हाच वाजपेयींचा खरा सन्मान : इम्रान

भारत-पाकमध्ये शांतता हाच वाजपेयींचा खरा सन्मान : इम्रान

वृत्तसंस्था इस्लामाबाद, १७ ऑगस्ट – पाकिस्तानचे भावी पंतप्रधान इम्रान…

स्वातंत्र्यदिनी पाकिस्तान दिवाळखोरीच्या उंबरठ्यावर

स्वातंत्र्यदिनी पाकिस्तान दिवाळखोरीच्या उंबरठ्यावर

►केवळ दहा अब्ज डॉलर्सचे विदेशी चलन ►दोन महिन्यानंतर निर्यात…

नासाची सूर्याकडे झेप

नासाची सूर्याकडे झेप

►पार्कर सोलर प्रोबचे यशस्वी प्रक्षेपण, वृत्तसंस्था वॉशिंग्टन, १२ ऑगस्ट…

कॉसमॉस बँकेवर डिजिटल दरोडा

कॉसमॉस बँकेवर डिजिटल दरोडा

►दोन तासात ९४ कोटी रुपयांवर हात साफ, पुणे, १४…

मुंबई आयआयटीला केंद्राकडून एक हजार कोटी

मुंबई आयआयटीला केंद्राकडून एक हजार कोटी

►५६ व्या दीक्षांत समारंभात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची घोषणा…

राज्यात घातपाताचा कट एटीएसकडून उघड

राज्यात घातपाताचा कट एटीएसकडून उघड

►वैभव राऊतसह तिघांना अटक, संशयास्पद साहित्य जप्त ►पुणे, सोलापूर,…

तेरा वैभव अमर रहे माँ!

तेरा वैभव अमर रहे माँ!

॥ संवाद : सोमनाथ देशमाने | आंतरराष्ट्रीय समुदायाचा भारताकडे…

ममतांच्या उलट्या बोंबा!

ममतांच्या उलट्या बोंबा!

॥ जागता पहारा : भाऊ तोरसेकर | व्यवहारत: ममतांच्या…

हिंदूंच्या अस्तित्वाची लढाई…

हिंदूंच्या अस्तित्वाची लढाई…

॥ विशेष : सृ. गौ. देवधर | ‘‘जे जे…

‘सिमरन’मधील नवीन गाणे प्रदर्शित

‘सिमरन’मधील नवीन गाणे प्रदर्शित

अभिनेत्री कंगना राणावत लवकरच सिमरन या चित्रपटाद्वारे प्रेक्षकांच्या भेटीला…

चिरंजीवीसोबत सिनेमा करण्यास ऐश्‍वर्याचा नकार?

चिरंजीवीसोबत सिनेमा करण्यास ऐश्‍वर्याचा नकार?

ऐश्‍वर्या राय बच्चनची सध्या बॉलीवूडमध्ये सेकंड इनिंग सुरू आहे.…

रणबीरच्या फिरण्यावर बंदी

रणबीरच्या फिरण्यावर बंदी

संजय दत्तच्या आयुष्यावर आधारित चित्रपटात रणबीर कपूर ६ वेगवेगळ्या…

पंचांग
वार: | तिथी:
नक्षत्र: | राशी:
करण: | योग:
सूर्योदय: 06:10 | सूर्यास्त: 18:49
अयनांश:
Home » महाराष्ट्र » सर्वांचे हित जपूनच मेगाभरती : मुख्यमंत्री

सर्वांचे हित जपूनच मेगाभरती : मुख्यमंत्री

►आरक्षणाची वैधानिक कारवाई नोव्हेंबरअखेर पूर्ण
►शांतता राखण्याचे पुन्हा एकदा जाहीर आवाहन,
वृत्तसंस्था
मुंबई, ५ ऑगस्ट –

Devendra Fadnavis 2

Devendra Fadnavis 2

उशिरात उशिरा मराठा समाजाला आरक्षण देण्यासंबंधीची संपूर्ण वैधानिक कारवाई नोव्हेंबर अखेरपर्यंत पूर्ण झाली पाहिजे, अशी भूमिका राज्य सरकारने घेतली आहे. त्यादृष्टीने राज्य सरकारचे प्रयत्न सुरू आहेत. तसेच मेगाभरतीच्या निर्णयामुळे मराठा समाजाला असे वाटते की, आपल्यावर अन्याय झाला. मी पुन्हा एकदा स्पष्ट करतो की, मेगाभरतीची प्रक्रिया आम्ही अजून सुरू केलेली नाही. अनुसूचित जाती, जमाती, ओबीसी, मराठा अशा सर्वांचे हित कायदेशीरपणे जपल्याशिवाय मेगाभरती सुरू केली जाणार नाही, असे स्पष्ट प्रतिपादन महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज केले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ‘मन की बात’ या कार्यक्रमाच्या धर्तीवर आज मुख्यमंत्री फडणवीस यांनी राज्यातील जनतेशी जाहीररीत्या संवाद साधून मराठा आरक्षणांच्या अनेक बाबींचा ऊहापोह केला आणि राज्यात शांतता राखण्याचे आवाहन केले.
महाराष्ट्राच्या स्थापनेला ५७-५८ वर्षे झाली. या वाटचालीत विकासापासून वंचित आणि ज्यांच्यावर अन्याय झाला, अशांचा संघर्ष आपण पाहतो आहोत. आरक्षणाची लढाई ही आजची नाही. काही दशकांपासून ती सुरू आहे. आमचे सरकार येताच मराठा आरक्षणाचा कायदा मंजूर केला. मात्र, न्यायालयाने त्याला स्थगिती दिली. मागासवर्ग आयोग जोवर समाजाच्या मागासलेपणाचा वैज्ञानिक अहवाल देत नाही, तोवर आरक्षण कायद्याच्या चौकटीत टिकणार नाही, असेही फडणवीस यावेळी म्हणाले.
मागासवर्ग आयोगापुढे विविध सर्वेक्षण, सुमारे १,८६,००० निवेदन, ऐतिहासिक पुरावे सादर करण्यात आले. त्यामुळे या आयोगाचा अहवाल हे एक महत्त्वपूर्ण दस्तावेज असणार आहे. तो अहवाल प्राप्त होताच आरक्षणाचा प्रश्‍न निर्णायक टप्प्यात येईल, अशी अपेक्षा व्यक्त करून मुख्यमंत्री म्हणाले की, राज्य मागासवर्ग आयोगाला उच्च न्यायालयाने ७ ऑगस्टपर्यंत आपली भूमिका मांडण्यास सांगितले आहे. त्यामुळे आयोग आपली भूमिका त्या दिवशी मांडेल. यानंतर आयोगाच्या कामकाजाचा एक कालबद्ध कार्यक्रम आपल्यापुढे येणार आहे. आयोगाचा अहवाल येताच एक महिन्याच्या आत विधिमंडळाचे विशेष अधिवेशन घेण्याचा निर्णय सुद्धा सरकारने जाहीर केला आहे. राज्य मागासवर्ग आयोग हा स्वायत्त आहे. त्यामुळे राज्य सरकार त्यांना निर्देश देऊ शकत नाही.
धनगर समाजाच्या आरक्षणासाठीही राज्य सरकारने टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सेसकडून अहवाल मागितला आहे. या संस्थेने अनेक राज्यात, अनेक तालुक्यांमध्ये जाऊन अभ्यासपूर्ण अहवाल तयार करण्याची कारवाई केली आहे. ऑगस्ट अखेरीस त्यांचा अहवाल येणे अपेक्षित असल्याचेही फडणवीस यांनी सांगितले.
ईपीएफओच्या आकडेवारीनुसार, केवळ संघटित क्षेत्रात राज्यात आठ लाखांवर रोजगार निर्मिती आहे. देशातील सर्वाधिक ४२ ते ४७ टक्के विदेशी गुंतवणूक राज्यात आली. ती येण्याचे मुख्य कारण राज्याचे पुरोगामित्त्व, कौशल्ययुक्त मनुष्यबळ, तरुणाई आणि शांततापूर्ण वातावरण असल्याचे सांगून मुख्यमंत्री म्हणाले की, गुंतवणूक, रोजगार निर्मितीसाठी शांतता महत्त्वाची असते. अशात चाकण आणि औरंगाबादमधील घटना अतिशय दुर्दैवी आहेत. याचा गांभीर्याने विचार करण्याची गरज आहे. लोकशाहीने अनेक मार्ग आंदोलनासाठी दिले आहेत. त्यात हिंसेला स्थान नाही. हिंसेमुळे आंदोलन, विचार, संघर्ष बदनाम होतो. कोवळी तरुणाई आत्महत्या करते, यामुळे मनाला अतिशय वेदना होतात.
संवेदनशील नेत्यांनी नेतृत्व करणे सोडले तर संपूर्ण समाज दिशाहीन होईल. कोणत्याही समस्येवर संवादातून मार्ग निघणे शक्य आहे. सरकार संवादासाठी सदैव तयार आहे, कटिबद्ध आहे. हा प्रश्‍न राजकारणात अडकविण्याचा नाही, प्रतिस्पर्धेसाठी वापरण्याचा नाही. असे झाले तर महाराष्ट्र आपल्याला कधीच माफ करणार नाही, असे म्हणत देवेंद्र फडणवीस यांनी, राजकीय कुरघोडी करण्याऐवजी या व्यवस्थेचे एक घटक म्हणून एकत्रित येऊन या प्रश्‍नाला न्याय देण्याची भूमिका प्रत्येकाने स्वीकारली पाहिजे, असे आवाहन केले. हे आवाहन गांभीर्याने घेऊन, संवादाची प्रक्रिया पुढे नेली पाहिजे, असेही ते म्हणाले.
रयतेच्या स्वाभिमानाची, मालमत्तेच्या रक्षणाची भूमिका छत्रपती शिवाजी महाराजांची होती. छत्रपतींच्याच विचारांवर राज्य चालविण्याची आपली परंपरा. आता संघर्ष पुरे झाला. आपण सारे एकत्र येऊन शिवछत्रपतींचा महाराष्ट्र एकसंध ठेवू या! या पुरोगामी महाराष्ट्राला सर्व मिळून पुढे नेऊ, असे आवाहनही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.
सरकारने घेतले निर्णय
याप्रसंगी मुख्यमंत्री फडणवीस यांनी राज्य सरकारने मराठा समाजासाठी घेतलेल्या अनेक निर्णयांची माहिती सादर केली. राजर्षी छत्रपती शाहू महाराज शैक्षणिक शुल्क प्रतिपूर्ती योजना, मराठा विद्यार्थ्यांसाठी वसतीगृह, अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाच्या माध्यमातून युवकांना कर्जपुरवठा, आदी अनेक निर्णयांची माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली.
मुख्यमंत्र्यांच्या भूमिकेचे स्वागत
मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक आबा पाटील यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या भूमिकेचे स्वागत केले आहे. मुख्यमंत्र्यांनी आरक्षणाच्या विषयावर जनतेशी संवाद साधल्यानंतर वृत्तवाहिनीशी बोलताना आबा पाटील म्हणाले की, मुख्यमंत्र्यांच्या सकारात्मक भूमिकेचे मराठा समाजाकडून स्वागत, मात्र आश्‍वासन लेखी लिहून द्यावे, एवढे मागणे आहे.

Posted by : | on : Aug 6 2018
Filed under : महाराष्ट्र.
You can follow any responses to this entry through the RSS 2.0You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Change Language: press Ctrl+g

हवामान

दृष्टीक्षेपात

व्हिडीओ संग्रह

More in महाराष्ट्र (11 of 435 articles)

Bjp Flag
►सांगलीत काँग्रेस-राकाँला, जळगावात सुरेशदादांना झटका, वृत्तसंस्था जळगाव/सांगली, ३ ऑगस्ट - [caption id="attachment_59122" align="alignleft" width="300"] Bjp Flag[/caption] सांगली आणि जळगाव (खान्देश) ...

×