ads
ads
कायद्याने राममंदिर मान्य!

कायद्याने राममंदिर मान्य!

►मुस्लिम पक्षकार अन्सारीची भूमिका, अयोध्या, २० नोव्हेंबर – अयोध्येतील…

एकाला फाशी, दुसर्‍याला जन्मठेप

एकाला फाशी, दुसर्‍याला जन्मठेप

►१९८४ मधील शीखनरसंहार; ३४ वर्षांनंतर निकाल, नवी दिल्ली, २०…

भक्तांची श्रद्धा चिरडू देणार नाही : अमित शाह

भक्तांची श्रद्धा चिरडू देणार नाही : अमित शाह

नवी दिल्ली, २० नोव्हेंबर – स्वामी अय्यप्पांच्या भक्तांशी केरळ…

काश्मीर पाकिस्तानचेच शाहिद आफ्रिदीची सारवासारव

काश्मीर पाकिस्तानचेच शाहिद आफ्रिदीची सारवासारव

इस्लामाबाद, १८ नोव्हेंबर – पाकिस्तानमधील राज्यकर्त्यांना देशाचा भाग असलेले…

अमेरिका भारताला देणार २४ पाणबुडीभेदी हेलिकॉप्टर्स

अमेरिका भारताला देणार २४ पाणबुडीभेदी हेलिकॉप्टर्स

►२०० अब्ज डॉलर्सचा व्यवहार, वॉशिंग्टन, १७ नोव्हेंबर – चीन…

मल्ल्यासाठी तिहारच योग्य

मल्ल्यासाठी तिहारच योग्य

►ब्रिटनच्या न्यायालयाचे शिक्कामोर्तब, लंडन, १७ नोव्हेंबर – सार्वजनिक आणि…

मराठा आरक्षणावरून विरोधकांमध्ये फूट

मराठा आरक्षणावरून विरोधकांमध्ये फूट

मुस्लिम आरक्षणावरून सभागृहात गदारोळ, राजदंड पळवला, मुंबई, २० नोव्हेंबर…

विधानसभा कामकाजास ‘वंदे मातरम’ने सुरुवात

विधानसभा कामकाजास ‘वंदे मातरम’ने सुरुवात

मुंबई, १९ नोव्हेंबर – महाराष्ट्र विधानसभेच्या हिवाळी अधिवेशनाच्या कामकाजास…

मराठा आरक्षणावर उद्या हायकोर्टात सुनावणी

मराठा आरक्षणावर उद्या हायकोर्टात सुनावणी

मुंबई, १९ नोव्हेंबर – मराठा आरक्षणाचा प्रश्‍न तातडीने निघाली…

तापमानवाढीचा धोका वाढतोय

तापमानवाढीचा धोका वाढतोय

॥ विशेष : अ‍ॅड. गिरीश राऊत | विकास पृथ्वीची…

अपनी अकल लगाओ!

अपनी अकल लगाओ!

॥ मानसरंग : मयुरेश डंके | गेटवे ऑफ इंडिया,…

राफेल सुनावणी : अर्धे नुकसान, अर्धा फायदा

राफेल सुनावणी : अर्धे नुकसान, अर्धा फायदा

॥ सारांश : ल.त्र्यं. जोशी | एक बाब मात्र…

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

‘फोर्ब्स’ने नुकतीच सर्वाधिक कमाई करणार्‍या अभिनेत्यांच्या नावाची यादी जाहीर…

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

बॉलिवूडची बेबी डॉल म्हणजेच सनी लिओनीचे नाव इंटरनेटवर सर्वाधिक…

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

‘रेस- ३’ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये कमबॅक करणारा अभिनेता बॉबी देओल…

पंचांग
वार: | तिथी:
नक्षत्र: | राशी:
करण: | योग:
सूर्योदय: 06:36 | सूर्यास्त: 17:48
अयनांश:
Home » सोलापूर » आषाढी महापूजेला न जाण्याचा मुख्यमंत्र्यांचा निर्णय

आषाढी महापूजेला न जाण्याचा मुख्यमंत्र्यांचा निर्णय

►मराठा समाजाचा विरोध
►•१० लाख वारकर्‍यांच्या सुरक्षेचा प्रश्‍न,
सोलापूर, २२ जुलै –
आरक्षणाच्या मागणीसाठी हिंसक आंदोलन करीत असलेल्या मराठा समाजाने, या वर्षी मुख्यमंत्र्यांना विठ्ठलाच्या महापूजेसाठी पंढरपुरात पाय ठेवू देणार नाही, अशी भूमिका घेतल्यानंतर, कोणतीही अप्रिय घटना घडायला नको, हा विचार करून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उद्या सोमवारी आषाढी एकादशीच्या महापूजेत सहभागी न होण्याचा निर्णय घेतला.
पंढरपुरात दरवर्षी आषाढी एकादशीला राज्याच्या मुख्यमंत्र्यांच्या हस्ते शासकीय पूजा केली जाते. यासाठी मुख्यमंत्री आज (रविवारी रात्री उशिरापर्यंत) पंढरपुरात पोहोचणार होते. मात्र, मराठा समाजाला आरक्षण देण्याचे ठोस आश्‍वासन मिळत नाही, तोपर्यंत मुख्यमंत्र्यांना पंढरपुरात पाय ठेवू देणार नाही, असा इशारा मराठा समाजाने दिला. अशा स्थितीतही आपण पंढरपूरला गेलो, तर कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्‍न निर्माण होईल आणि वारकर्‍यांना त्याचा त्रास सहन करावा लागेल. सुमारे १० लाख वारकर्‍यांच्या सुरक्षेचा हा मुद्दा आहे. यामुळे मुख्यमंत्र्यांनी या वर्षी आषाढीची महापूजा न करण्याचे ठरविले आहे, अशी माहिती राज्याचे जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी आज रविवारी दिली.
टाळ-मृदंग आणि विठ्ठलनामाच्या गजराने पंढरपूर दुमदुमले आहे. आषाढीनिमित्त पालख्या आणि दिंड्या पंढरीत दाखल झाल्या आहेत. मात्र या भक्तिरसात बुडालेल्या पंढरपुरात मराठा मोर्चाही सुरू आहे. गेल्या काही दिवसांपासून पंढरपूरसह अनेक शहरांमध्ये मराठा क्रांती मोर्चाच्यावतीने आंदोलन पुकारण्यात आले आहे.
…तर दगडफेक करा
मराठा आरक्षणासंदर्भात केवळ उच्च न्यायालयच निर्णय घेऊ शकते, ही माहिती काही संघटनांना असूनही, मराठा समाजाला उचकवण्याचे काम केले जात आहे. माझ्यावर दगडफेक करून आरक्षण मिळत असेल तर मी त्यासाठी तयार आहे, असे मुख्यमंत्री म्हणाले. महाराष्ट्रात वारीची परंपरा ८०० वर्षांपासून सुरू आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी देखील याला संरक्षण दिले. मुख्यमंत्र्यांनी पूजा करावी ही परंपरा आहे. मी तीन वर्षांपासून जात आहे, मात्र काही संघटनांनी याला विरोध केला. ही भूमिका चुकीची आहे. विठ्ठलाची पूजा करण्यापासून मला कोणीही रोखू शकत नाही. संरक्षणात ती केली जाऊ शकते, पण वारकर्‍यांच्या जीवाला धोका होईल म्हणून मी न जाण्याचा निर्णय घेतला, असे त्यांनी स्पष्ट केले.
आषाढी पूजा व आंदोलनाचा इतिहास
आषाढी यात्रेच्या काळात आंदोलनाची ही पहिली वेळ नाही. या काळात नेहमीच आंदोलक सक्रिय असतात. कारण, या आंदोलनातून राज्याचे लक्ष वेधले जाते. गेल्या अनेक वर्षांपासून ही प्रथा सुरू आहे. या आंदोलनाचा फटका अनेक नेत्यांना बसला आहे. राज्यात १९९६ मध्ये भाजपा-शिवसेना युतीचे सरकार असताना मनोहर जोशी यांना आषाढीची पूजा रद्द करावी लागली होती. मुंबईतील रमाबाई आंबेडकरनगरमध्ये गोळीबार झाला होता. तेव्हा दलित संघटनांनी मोठ्या आंदोलनाची तयारी करीत मनोहर जोशींना पूजा न करू देण्याची भूमिका घेतली. आषाढी यात्रेला गालबोट लागू नये म्हणून मनोहर जोशी यांनी स्वत:च पंढरपूरला न जाण्याचा निर्णय घेतला. राष्ट्रवादी काँग्रेसचे दिवंगत नेते आणि माजी गृहमंत्री आर. आर. पाटील यांना कार्तिकीची पूजा रद्द करावी लागली होती. वारकरी संप्रदायाचे ज्येष्ठ नेते बंडा तात्या कराडकर यांच्या आंदोलननानंतर आर. आर. पाटील यांनी पूजेला जाणे रद्द केले होते. माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनाही कराडकर यांनी अडवले होते. तथापि, ठोस आश्‍वासनानंतर पृथ्वीराज चव्हाण यांच्या पूजेचा मार्ग मोकळा झाला होता.
उदयनराजे भोसले यांचे आवाहन
मुंबई : पंढरपुरात सध्या मराठा मोर्चा सुरू असतानाच राज्यभरातील लाखो भाविकही आषाढी एकादशीसाठी येथे पोहोचले आहेत. विठ्ठलाच्या चरणी त्यांना निर्विघ्नपणे लीन होता यावे, यासाठी आषाढी यात्रा सुरळीतपणे पार पडू द्यावी, असे आवाहन सातार्‍याचे खासदार उदयनराजे भोसले यांनी आंदोलकांना केले आहे.
महाराष्ट्राला छत्रपती शिवाजी महाराज यांच्या सर्वधर्म समभावाची परंपरा लाभण्याबरोबरच संतांची परंपरा लाभलेली आहे. याच परंपरेतून महाराष्ट्राचे आराध्य दैवत, विठुमाऊलीला भेटण्यासाठी लाखो भाविक आणि वारकरी हरिनामाचा जप करीत पंढरीत आषाढी आणि कार्तिकी वारी करतात, असे त्यांनी म्हटले आहे.
आशिया खंडातीलच नव्हे, तर जगातील सर्वात मोठी परंपरा लाभलेला हा महामेळा मोठ्या भक्तिभावाने शेकडो वर्षांपासून सुरू आहे. हा भक्ती मेळावा मोठ्या उत्साहात आणि मंगलमय वातावरणात पार पाडण्याची जबाबदारी सर्वांची असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
काहीही झाले, तरी आपल्या वारीची जाज्वल्य आणि स्फूर्तिदायी परंपरा निर्धोकपणे पार पाडण्यासाठी सर्वांनी सकारात्मक योगदान द्यावे, असे आवाहन त्यांनी केले.
आंदोलकांनी अडवल्या मंत्र्यांच्या गाड्या
सोलापूर : मराठा समाजाच्या आरक्षणाच्या मागणीसाठी आक्रमक झालेल्या आंदोलकांनी पंढरपूरकडे येणार्‍या मंत्र्यांच्या गाड्या अडवल्या. सोलापूरहून मंगळवेढामार्गे पंढरपूरला निघालेल्या सहकारमंत्री सुभाष देशमुख यांचा ताफा आंदोलकांनी माणचूर येथे अडवला. यावेळी देशमुख यांनी आंदोलकांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. तसेच देशमुख यांनी मुख्यमंत्री फडणवीस आणि मणचूर येथील आंदोलकांत फोनवरून चर्चा घडवून आणली. यावेळी कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून आरक्षण देण्याचे आश्‍वासन मुख्यमंत्र्यांनी आंदोलकांना दिल्याचे वृत्त आहे. जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांनाही आंदोलकांनी घेराव घातला. सोलापूर जिल्ह्यातील मंगळवेढा आणि बार्शी तालुक्यात मराठा समाजातील आंदोलकांनी काही एसटी बसेसची तोडफोड केली आहे.

Posted by : | on : 23 Jul 2018
Filed under : सोलापूर.
You can follow any responses to this entry through the RSS 2.0You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Change Language: press Ctrl+g

    छायाचित्रातून

  • पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक
  • कोहली, मीराबाईला खेलरत्न कोहली, मीराबाईला खेलरत्न
  • अमित पांघळला बॉक्सिंगचे सुवर्ण अमित पांघळला बॉक्सिंगचे सुवर्ण
  • तेजिंदरपालला सुवर्णपदक तेजिंदरपालला सुवर्णपदक
  • महाराष्ट्राच्या राहीचा सुवर्णभेद महाराष्ट्राच्या राहीचा सुवर्णभेद

हवामान

दृष्टीक्षेपात

व्हिडीओ संग्रह

More in सोलापूर (3 of 14 articles)


वारकरी करणार शासकीय महापूजा; ►पंढरीत १० लाख वैष्णवांचा महापूर, अतुल बडवे पंढरपूर, २२ जुलै - ‘चला पंढरीशी जावू । रुक्मादेवी ...

×