कॉंग्रेसचे सहा खासदार निलंबित

कॉंग्रेसचे सहा खासदार निलंबित

►गोरक्षकांचा हिंसाचार, बोफोर्सवरून लोकसभेत प्रचंड गदारोळ, कामकाज स्थगित ►अध्यक्षांच्या…

रामनाथ कोविंद यांचे आज पदग्रहण

रामनाथ कोविंद यांचे आज पदग्रहण

नवी दिल्ली, २४ जुलै – देशाचे नवे राष्ट्रपती रामनाथ…

मोटरवाहन दुरुस्ती विधेयक या अधिवेशनात तरी पारित होणार का?

मोटरवाहन दुरुस्ती विधेयक या अधिवेशनात तरी पारित होणार का?

नवी दिल्ली, २४ जुलै – मोटरवाहन दुरुस्ती विधेयक संसदेच्या…

एकवेळ पर्वत हलेल, चिनी सैनिकांना हलविणे कठीण!

एकवेळ पर्वत हलेल, चिनी सैनिकांना हलविणे कठीण!

►भारताने चूक सुधारावी, चीनची दर्पोक्ती, बीजिंग, २४ जुलै –…

रशिया भारताला देणार मिग-३५ लढाऊ विमाने

रशिया भारताला देणार मिग-३५ लढाऊ विमाने

झुकोव्हास्की, २३ जुलै – मिग-३५ या जातीची अत्याधुनिक लढाऊ…

गायीतील अँटिबॉडीजमुळे एचआयव्हीचा परिणाम कमी

गायीतील अँटिबॉडीजमुळे एचआयव्हीचा परिणाम कमी

►•‘नेचर’मधील अहवाल • ►गायींचे संवर्धन करण्यावर भर, वॉशिंग्टन, २३…

खासदार उदयनराजे स्वत:हून पोलिसांत हजर

खासदार उदयनराजे स्वत:हून पोलिसांत हजर

►२ आठवड्याची न्यायालयीन कोठडी, सातारा, दि. २५ जुलै –…

कर्जमाफीसाठी १९ हजार कोटींची तरतूद

कर्जमाफीसाठी १९ हजार कोटींची तरतूद

►३३ हजार कोटींच्या पुरवणी मागण्या सादर, मुंबई, २४ जुलै…

अधिवेशनाच्या तोंडावर विरोधकांमध्ये फूट!

अधिवेशनाच्या तोंडावर विरोधकांमध्ये फूट!

►आधी नाव कुणाचे? इंदिरा गांधी की पवार? ►कॉंग्रेस, राष्ट्रवादीची…

काल दुर्गापूर, आज बशिरहाट… उद्या?

काल दुर्गापूर, आज बशिरहाट… उद्या?

डॉ. प्रमोद पाठक | एक काळ असा होता की…

बशिरहाटचे गौडबंगाल

बशिरहाटचे गौडबंगाल

•उलट तपासणी : भाऊ तोरसेकर | एव्हाना ममतांनी मागचे…

मोदीद्वेषाचा वाढता ज्वर – नॉट इन माय नेम

मोदीद्वेषाचा वाढता ज्वर – नॉट इन माय नेम

जयंत कुलकर्णी | स्वातंत्र्यानंतर सत्तर वर्षे आपण ज्या संघ…

रणबीरच्या फिरण्यावर बंदी

रणबीरच्या फिरण्यावर बंदी

संजय दत्तच्या आयुष्यावर आधारित चित्रपटात रणबीर कपूर ६ वेगवेगळ्या…

प्रियांका ठरली जगातील दुसरी सुंदर महिला!

प्रियांका ठरली जगातील दुसरी सुंदर महिला!

जगातील सर्वात सुंदर महिलांमध्ये बॉलिवूडच्या देसी गर्लला म्हणजेच प्रियांका…

रितेश बनला ‘बँक चोर’

रितेश बनला ‘बँक चोर’

यशराज फिल्मच्या ‘बँक चोर’ या चित्रपटाद्वारे मराठमोळा अभिनेता रितेश…

पंचांग
वार: | तिथी:
नक्षत्र: | राशी:
करण: | योग:
सूर्योदय: 06:04 | सूर्यास्त: 19:01
अयनांश:
Home » सोलापूर » दुधनीत भाजपाने घडवला इतिहास

दुधनीत भाजपाने घडवला इतिहास

•जिल्ह्यात भाजपाची आगेकूच
चार नगरपालिकांमध्ये सत्ता
१९६७ नंतर प्रथमच म्हेत्रे गट सत्तेबाहेर
अक्कलकोट, बार्शी, पंढरपूर, सांगोल्यात झाले सत्तांतर
नोटबंदी विरोधातील आक्रोशात काँग्रेस, राष्ट्रवादीच ‘क्रॅश’
विजयकुमार पिसे,
सोलापूर, दि. २८ नोव्हेंबर –
img_7114दुधनी नगरपालिकेच्या इतिहासात १९६७ नंतर प्रथमच म्हेत्रे घराण्याचा आणि गटाचा नगराध्यक्ष दिसणार नाही, असा क्रांतिकारक कौल देताना मतदारांनी भाजपाचा झेंडा फडकवला. संपूर्ण राज्याचे लक्ष वेधून घेतलेल्या या निवडणुकीत भाजपाचे भीमाशंकर इंगळे यांनी काँग्रेसच्या जगदेवी मग्गी यांचा १२९ मतांनी पराभव केला. भाजपा नगराध्यक्षपदाच्या उमेदवाराचा अर्ज बाद करण्यापासून निवडणुकीपयर्ंंतच्या घडामोडी पाहता येथे दहशतीचे वातावरण असूनही दुधनीकरांनी लोकशाही जिवंत ठेवली.
याशिवाय अक्कलकोट, पंढरपूर आणि सांगोला येथे भाजपा, आघाडी व महायुती तर कुर्डुवाडी आणि बार्शीत सेना, करमाळा व मंगळवेढ्यात काँग्रेस, राष्ट्रवादी आणि मैंदगीत स्थानिक आघाडीने सत्ता प्रस्थापित केली. प्रस्थापित काँगेस, राष्ट्रवादी आणि शेकापची जिल्ह्यात प्रथमच पिछेहाट झाली आहे. नगराध्यक्षपद थेट जनतेतून निवडून आणण्याचा फार्म्युला भाजपाला येथेही फायदेशीर ठरला आहे.
सोलापूर जिल्ह्यातील राजकारणात आणि सहकारात काँग्रेस आणि राष्ट्रवादी तसेच शेकापचे अबाधित वर्चस्व आहे. काल झालेल्या निवडणुकीत मतदारांनी भाजपा, आघाडी, महायुती आणि सेना यांच्या बाजूने कौल देताना नोटबंदीच्या विरोधातील आक्रोशात काँग्रेस आणि राष्ट्रवादी यांनाच क्रॅश (चिरडले) केले. एकाअर्थी पंतप्रधान मोदी यांचे सर्जिकल स्ट्राईक, काळ्या पैशाविरोधातील मोहिमेचे समर्थन केले. तसेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा राज्य कारभार जनहिताच्या बाजूने आहे, हे देखील अधोेरेखित केले.
माजी गृहराज्यमंत्री तथा आ. सिध्दाराम म्हेत्रे यांच्या दुधनीत १९६७ पासून म्हेत्रे परिवार आणि काँग्रेसचे एकछत्री अंमल होता, तिथे प्रथमच भाजपाने झेंडा फडकवला. तसेच अक्कलकोटमध्येही काँग्रेस आणि राष्ट्रवादीला चारीमुंड्या चीत केले. दुधनीत काँग्रेसने सर्वाधिक १४ जागा मिळवल्या तरीही नगराध्यक्षपद भाजपाच्या खात्यात जमा झाले आहे. भाजपाचे इंगळे यांचा अर्ज बाद करण्यासाठी म्हेत्रे यांनी साम-दाम-दंड-भेद नीतीचा वापर केला. सरकारी यंत्रणेचा वापरही केला. पण सारा खेळ उघडा पडला. ‘तरुण भारत’मध्ये या घडामोडीचा सर्वप्रथम पर्दाफाश केल्यामुळे भाजपा नेतृत्वही जागे झाले. अखेर इंगळे यांचा अर्ज मंजूर झाला. त्यानंतर पुढची रणनीतीही भाजपाने गमिनी काव्याने हाताळली. पालकमंत्री विजयकुमार देशमुख या प्रकरणात जातीने लक्ष घालून होते शिवाय मतदारांनीही साथ दिली.
अक्कलकोटमध्येही काँग्रेस आणि राष्ट्रवादी आघाडीला मतदारांनी झिडकारले. नगराध्यक्षपदाच्या लढतीत भाजपाच्या शोभा खेडगी यांनी काँगे्रेसच्या सुवर्णा साखरे यांच्यावर मात केली. विशेष म्हणजे यापूर्वी साखरे या भाजपाकडून नगराध्यक्षपदाच्या पोटनिवडणुकीत भाजपाच्या उमेदवार होत्या. तेव्हा काँग्रेसच्या सुवर्णा मलगोंडा यांनी बाजी मारली. साखरे दुसर्‍यांदा काँग्रेसकडून उभ्या होत्या. या लढाईतही त्यांच्या पदरी हार आली. येथे भाजपाचे १५, काँग्रेस ६ आणि राष्ट्रवादी १ याप्रमाणे सदस्य विजयी झाले. पंढरपुरातही आ. परिचारक यांच्या नेतृत्वाखाली भाजपा आणि विकास आघाडीने आ. भालकेंच्या काँग्रेस आणि राष्ट्रवादी आघाडीला सत्तेवरून पायउतार केले. शिवाय नगराध्यक्षपदही खिशात घातले. साधना भोसले पुन्हा विजयी झाल्या. सांगोल्यामध्येही प्रथमच शेकाप, राष्ट्रवादी आणि काँग्रेस आघाडीला महायुतीने हिसका दिला. येथील प्रस्थापित आ. गणपतआबा आणि दीपक आबांचा नगराध्यक्षपदाचा उमेदवार पराभूत झाला. भाजपा, सेना, आरपीआय, रासपा हा महायुतीचा प्रयोग सांगोला नगरपालिकेत यशस्वी झाला. येथे महायुतीच्या राणी आनंदा माने यांनी विजय मिळवला. महायुतीला आठ, तर आघाडीला ११ आणि एक अपक्ष उमेदवार निवडून आला.
करमाळ्यात जगताप यांची सत्ता
करमाळा विधानसभेत सत्ता गमावल्यानंतर जयवंतराव यांनी राष्ट्रवादीशीही आघाडी केली होती. येथे चौरंगी लढत झाली. भाजपा, सेना, विकास आघाडी आणि जयवंतराव व बागल यांची आघाडी होती. यामध्ये जगतापांची खेळी यशस्वी झाली. जगतापांचे पुत्र वैभव नगराध्यक्षपदी निवडून आले. काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीविरोधात महायुतीचा अथवा महाआघाडीचा सांगोला प्रयोग लाभदायी झाला असता. मंगळवेढ्यात आ.भालके-राहुल शहा यांची काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडी विरोधात भाजपा-सेनेचे समाधान आवताडे तसेच परिचारकांची विकास आघाडी अशी तिरंगी लढत झाली. राष्ट्रवादीच्या अरुणा माळी नगराध्यक्षपदी निवडून आल्या. तसेच भालके गटाला ११, आवताडे गटाला पाच तर परिचाारकांना एक जागा मिळाली.
मैंदर्गीत भाजपा दोन नंबरवर
मैंदगीं नगरपालिकेत प्रथमच राष्ट्रीय पक्षाच्या चिन्हावर निवडणूक लढवली गेली. येथे गोब्बूर-केसूर हे स्थानिक गट नेहमी आमनेसामने असतात. यंदा भाजपाने कमळ चिन्हाचा प्रयोग केला. अटीतटीची झुंज दिली. भाजपाने दुसर्‍या क्रमांकावर स्थान राखले. येथे १७ पैकी चार जागा भाजपाने जिंकल्या. विजयी केसूर-बांगी-पाटील गटाने ९, तर गोब्बूर-शावरी गटाला फक्त तीन जागा मिळाल्या. एक अपक्ष उमेदवार निवडून आला. केसूर गटाच्या तरुण उमेदवार दीप्ती केसूर या नगराध्यक्षपदी विजयी झाल्या.

बार्शी, कुर्डुवाडीत शिवसेनेचा भगवा
बार्शी नगरपालिकेत एका दशकानंतर पुन्हा भगवा फडकला. माजी आ. राजेंद्र राऊत पुन्हा सेनेत आल्यानंतरचे फलित आहे. बार्शीत राष्ट्रवादीची सत्ता उलथून टाकली. आ. दिलीप सोपल यांच्या पदरी अपयश आले. अ‍ॅड. आसीफ तांबोळी नगराध्यक्षपदी निवडून आले. राऊत यांनी विधानसभेत गमावले पण नगरपालिकेत कमावले, असा अनुभव आला. असेच चित्र त्यांना जि.प. आणि पं.स.मध्ये निर्माण करता आले तर पुढची आमदारकी दूर नाही. कुर्डुवाडीतही सेनेने भगवा कायम फडकत ठेवला. आ.बबनदादांच्या राष्ट्रवादीला संधी मिळू दिली नाही. येेथे समीर मुलाणी यशस्वी झाले. सेना आणि भाजपाला नेहमी मुस्लिम विरोधक म्हणून हिणवले जाते. पण बार्शी आणि कुर्डुवाडीतील दोन्ही विजयी उमेदवार मुस्लिम समाजाचे आहेत, हे विशेष. येथे भाजपाचे राजेंद्र मिरगणे यांचे नेतृत्व पूर्णत: अपयशी ठरले. हटवादीपणा सोडून सेनेशी युती केली असती तर भाजपाचे खाते उघडणे शक्य होते.

शेअर करा

Posted by on Nov 29 2016. Filed under सोलापूर. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

प्रतिक्रिया नोंदवा

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)

हवामान

दृष्टीक्षेपात

व्हिडीओ संग्रह

मागील बातम्या, लेख शोध

Search by Date
Search by Category
Search with Google
More in सोलापूर (89 of 123 articles)


=सांगोल्यात सर्वाधिक ८४.४१ मतदान= प्रतिनिधी, सोलापूर, दि. २७ नोव्हेंबर - रविवारी झालेल्या नगरपालिका नगराध्यक्ष व नगरसेवक पदासाठी मतदानासाठी सरासरी ७३.२७ ...