हज सबसिडी बंद

हज सबसिडी बंद

►मुस्लिमांना प्रतिष्ठेने जगण्याचा अधिकार देणार ►नकवी यांची घोषणा, नवी…

चकमकीत मला ठार करण्याचा कट : तोगडिया

चकमकीत मला ठार करण्याचा कट : तोगडिया

►लवकरच पुराव्यांसह समोर येणार, अहमदाबाद, १६ जानेवारी – १०…

न्या. लोयांच्या मृत्यूसंबंधी दस्तावेज याचिकाकर्त्याला द्या

न्या. लोयांच्या मृत्यूसंबंधी दस्तावेज याचिकाकर्त्याला द्या

►सुप्रीम कोर्टाचे महाराष्ट्र सरकारला निर्देश, नवी दिल्ली, १६ जानेवारी…

क्षेपणास्त्र डागल्याच्या संदेशामुळे गोंधळ

क्षेपणास्त्र डागल्याच्या संदेशामुळे गोंधळ

वॉशिंग्टन, १४ जानेवारी – अमेरिकेच्या हवाईक्षेत्रातील हवाई बेटावर क्षेपणास्त्र…

‘जम्मू-काश्मीरला जाणे टाळा’

‘जम्मू-काश्मीरला जाणे टाळा’

►अमेरिकेची पर्यटकांना सूचना, वॉशिंग्टन, ११ जानेवारी – अमेरिकेने भारतात…

ममतांच्या दौर्‍यातील संपादक ‘चमचे-चोर’?

ममतांच्या दौर्‍यातील संपादक ‘चमचे-चोर’?

लंडन, १० जानेवारी – पश्‍चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी…

भाजपाची तिरंगा रॅली

भाजपाची तिरंगा रॅली

►संविधान बचाव रॅलीला प्रत्युत्तर ►•रावसाहेब दानवे यांची घोषणा, मुंबई,…

ना. स. फरांदे कालवश

ना. स. फरांदे कालवश

पुणे, १६ जानेवारी – भाजपाचे ज्येष्ठ नेते आणि विधान…

बापू बिरू वाटेगावकर यांचे निधन

बापू बिरू वाटेगावकर यांचे निधन

सांगली, १६ जानेवारी – पश्‍चिम महाराष्ट्रात ‘रॉबिनहूड’ प्रमाणे आयुष्य…

श्री सिद्धरामेश्‍वर यात्रा : सामाजिक सप्तरंगांचे एक आकाश

श्री सिद्धरामेश्‍वर यात्रा : सामाजिक सप्तरंगांचे एक आकाश

॥ तरंग : दीपक कलढोणे | ‘हर्र बोला हर्र’…

विवेकानंदांचे परखड हिंदुत्व!

विवेकानंदांचे परखड हिंदुत्व!

॥ विशेष : मुकुल कानिटकर | एकीकडे जग भारताकडे…

संभाजी ब्रिगेडचा खरा चेहरा

संभाजी ब्रिगेडचा खरा चेहरा

॥ उलट तपासणी : भाऊ तोरसेकर | हा वारस…

‘सिमरन’मधील नवीन गाणे प्रदर्शित

‘सिमरन’मधील नवीन गाणे प्रदर्शित

अभिनेत्री कंगना राणावत लवकरच सिमरन या चित्रपटाद्वारे प्रेक्षकांच्या भेटीला…

चिरंजीवीसोबत सिनेमा करण्यास ऐश्‍वर्याचा नकार?

चिरंजीवीसोबत सिनेमा करण्यास ऐश्‍वर्याचा नकार?

ऐश्‍वर्या राय बच्चनची सध्या बॉलीवूडमध्ये सेकंड इनिंग सुरू आहे.…

रणबीरच्या फिरण्यावर बंदी

रणबीरच्या फिरण्यावर बंदी

संजय दत्तच्या आयुष्यावर आधारित चित्रपटात रणबीर कपूर ६ वेगवेगळ्या…

पंचांग
वार: | तिथी:
नक्षत्र: | राशी:
करण: | योग:
सूर्योदय: 07:02 | सूर्यास्त: 18:12
अयनांश:
Home » सोलापूर » सिमीच्या ८ अतिरेक्यात सोलापूरचा खलीद मुच्छाले

सिमीच्या ८ अतिरेक्यात सोलापूरचा खलीद मुच्छाले

♦पलायनापूर्वी सुरक्षारक्षकाला केले ठार
मालीखेडा येथे भीषण चकमक
खलिदला एटीएसने केली होती अटक,
khalid-muchhaleप्रतिनिधी
सोलापूर, दि. [१ नोव्हेंबर] – मध्यप्रदेशची राजधानी भोपाळ येथील मध्यवर्ती कारागृहातील एका सुरक्षा रक्षकाला ठार करून सोमवारी पहाटेच्या सुमारास पळ काढणार्‍या सिमी या पाकधार्जिण्या संघटनेच्या आठ अतिरेक्यांना सुरक्षा दलाचे जवान व पोलिसांनी भीषण चकमकीत ठार मारले. त्यामध्ये सोलापूरच्या खलीद मुच्छालेचा समावेश आहे. त्यामुळे सोलापूर शहर पोलिसांनी दक्षता घेऊन त्याच्या मृतदेहाबाबत त्याच्या कुटुंबाकडे विचारणा केली असता, त्याच्या आईने खलीदचा मृतदेह सोलापूरला आणणार नसल्याचे स्पष्ट केले.
महाराष्ट्र शासनाने धर्मांध आणि देशविघातक कृत्य करणार्‍या सिमी या दहशतवादी संघटनेवर बंदी घातल्यानंतर महाराष्ट्र आणि देशातील विविध भागातून सिमीच्या कार्यकर्त्यांना अटक करण्यात आली. डिसेंबर 2013 मध्ये मध्य प्रदेशातील इंदौरचे एटीएस अधीक्षक मनिष खत्री आणि महाराष्ट्रातील संभाजीनगरातील  एटीएसचे अधीक्षक नवीनचंद्र रेड्डी यांनी त्यांच्या 10 ते 12 पोलीस अधिकारी कर्मचार्‍यांसह सोलापुरात येऊन  घरकुल आणि नई जिंदगी तसेच जेलरोड हद्दीतून काहीजणांना अटक केली. त्यामध्ये मोहम्मद खलीद अहमद मोहम्मद सलीम मुच्छाले आणि लुंजे या दोघांना ताब्यात घेऊन त्यांच्या घराची झडती घेतली असता मुच्छालेच्या घरात डिटोनेटर आणि काही महत्त्वाचे कागदपत्रे तसेच सिमीच्या कार्यकर्त्यांचे बनावट आधार कार्ड मिळून आले होते. त्यामुळे  इंदौरच्या एटीएस पथकाने मुच्छालेसह दोघांना मध्यप्रदेशकडे घेऊन गेले होते. त्या दिवसापासून खलीद मुच्छाले हा भोपाळ तुरुंगामध्ये होता. त्याच्यासोबत त्याचा भाऊ इरफान मुच्छाले हाही पूर्वीपासून जेलमध्ये आहे.
सिमीच्या 8 अतिरेक्यांनी पहाटे साडेतीनच्या सुमारास भोपाळ मध्यवर्ती कारागृहातून पळ काढला होता. पोलिस रक्षक रमा शंकर याने त्यांचा पळण्याचा कट हाणून पाडण्याचा प्रयत्न केला असता, अतिरेक्यांनी धारदार शस्त्राने त्याचा गळा चिरला. यात हा सुरक्षा रक्षक जागीच ठार झाला. त्यानंतर अतिरेक्यांनी अनेक चादरी एकमेकांना बांधल्या आणि कारागृहाच्या भिंतीवर चढून पळ काढला. या घटनेची माहिती वार्‍यासारखी पसरताच संपूर्ण सुरक्षा यंत्रणेला सतर्कतेचा इशारा देण्यात आला. भोपाळ आणि राज्यातील काही शहरांमध्ये पोलिस व सुरक्षा जवानांना सतर्क करण्यात आले. पळून जाणार्‍या सर्वच मार्गांची नाकेबंदी करण्यात आली आणि प्रत्येक वाहनाची कसून तपासणी सुरू झाली. सिमीचे अतिरेकी कोणत्या मार्गाने पळाले, याबाबतची माहिती काही गावकर्‍यांकडून पोलिसांना मिळाली आणि पोलिस व सुरक्षा जवानांनी श्‍वानपथकाच्या मदतीने त्यांचा मागोवा घेतला. भोपाळला अगदी लागून असलेल्या मालीखेडा येथे या अतिरेक्यांना पोलिस व जवानांनी चहूबाजूंनी घेतले आणि शरण येण्याचे आदेश दिले. पण, अतिरेक्यांनी गोळीबार केला असता त्यांना गोळीबारानेच प्रत्युत्तर देण्यात आले आणि या चकमकीत सर्व आठही अतिरेक्यांना ठार मारण्यात आले. अमजद, झाकिर हुसैन सिद्दिकी, मोहम्मद सालिक, मुजीब शेख, मेहबूब गुड्डू, मोहम्मद खालिद, अकील व माजिद अशी या अतिरेक्यांची नावे आहेत. या मृत आठ अतिरेक्यांमध्ये सोलापूरच्या खलीद मुच्छालेचाही समावेश असल्याची माहिती मध्यप्रदेश पोलिसांनी शहर पोलिसांना दिली. त्यामुळे शहर पोलिसांनी तातडीने मुच्छाले याच्या घरी जावून माहिती घेतली असता त्यांच्या घरी कोणीच नव्हते. परंतु पोलिसांनी अनुचित प्रकार घडू नये याची खबरदारी घेतली आहे.
खलीदचा मृतदेह सोलापूरला

आणणार नाही : आई मेहमुदा
वर्षातून दोनवेळा कैद्यांना त्यांच्या नातेवाईकांना भेटण्याची संधी असते म्हणून भाऊबीजेच्या दिवशी भेट होईल म्हणून आम्ही कर्नाटक एक्प्रेसने निघालो असता, बेलापूर रेल्वे स्टेशनवर आम्हाला समजले की भोपाळच्या तुरुंगात काहीतरी गडबड झाली आहे. त्यावर आम्ही परत सोलापूरला येत असतानाच वाटेत समजले की खलीद पोलीस चकमकीत मारला गेला आहे. सोलापूर हे शांत शहर आहे. माझ्या मुलाची अशी दशा झाली आहे. त्यामुळे त्याचा मृतदेह सोलापुरात आणला आणि काही अनुचित प्रकार घडला तर नाहक इतरांचे नुकसान होईल म्हणूनच माझ्या मुलाचा मृतदेह सोलापूरला न आणण्याचा निर्णय घेतला आहे, असे मृत खलीद मुच्छाले याची आई मेहमुदा मुच्छाले यांनी प्रसारमाध्यमांना सांगितले.

शेअर करा

Posted by on Nov 2 2016. Filed under सोलापूर. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

प्रतिक्रिया नोंदवा

Marathi/English, press Ctrl+g  

हवामान

दृष्टीक्षेपात

व्हिडीओ संग्रह

मागील बातम्या, लेख शोध

Search by Date
Search by Category
Search with Google
More in सोलापूर (107 of 123 articles)


=इच्छुक उमेदवारांची प्रभागात अशीही स्वारी = =दिवाळीत साधली  प्रचाराची प्राथमिक फेरी= विशेष प्रतिनिधी, सोलापूर [१ नोव्हेंबर -] दसरा, दिवाळीची पर्वणी ...