ads
ads
महाआघाडी देशविरोधी

महाआघाडी देशविरोधी

►पंतप्रधान मोदी यांचा विरोधकांवर हल्लाबोल, सिलवासा, १९ जानेवारी –…

भाजपाच दलितांचा उद्धारकर्ता

भाजपाच दलितांचा उद्धारकर्ता

►६० वर्षांत काँग्रेसने दलितांना काय दिले? ►नितीन गडकरी यांचा…

दिल्लीतील सरकार बदलवा

दिल्लीतील सरकार बदलवा

►विरोधकांच्या महारॅलीत ममता बॅनर्जींचा आक्रोश ►पंतप्रधानपदी कोण, निवडणुकीनंतर निर्णय,…

आणिबाणी जाहीर करण्याची ट्रम्प यांची धमकी

आणिबाणी जाहीर करण्याची ट्रम्प यांची धमकी

►मेक्सिको सीमेवरील भिंतीचा वाद पेटणार, वॉशिंग्टन, १० जानेवारी –…

विक्रम मिस्री चीनमधील नवे राजदूत

विक्रम मिस्री चीनमधील नवे राजदूत

►पदभार स्वीकारताच केली द्विपक्षीय मुद्यांवर चर्चा, बीजिंग, ८ जानेवारी…

शटडाऊन सुरूच ठेवेन, आणिबाणीचाही पर्याय खुला

शटडाऊन सुरूच ठेवेन, आणिबाणीचाही पर्याय खुला

►डोनाल्ड ट्रम्प यांचा काँगे्रस सभागृहाला इशारा ►मेक्सिकोच्या सीमेवर भिंत…

डान्सबार बंदीसाठी नवा अध्यादेश

डान्सबार बंदीसाठी नवा अध्यादेश

मुंबई, १८ जानेवारी – राज्यातील डान्सबार पुन्हा सुरू करण्याचा…

समृद्धी महामार्गासाठी स्टेट बँक देणार ८५०० कोटींचे कर्ज

समृद्धी महामार्गासाठी स्टेट बँक देणार ८५०० कोटींचे कर्ज

►९५ टक्के भूसंपादन पूर्ण, मुंबई, १७ जानेवारी – स्टेट…

ओबीसी महामंडळांसाठी ७३६ कोटी!

ओबीसी महामंडळांसाठी ७३६ कोटी!

•तरुणांना मिळणार १० ते ५० लाखांचे कर्ज •सावित्रीबाई फुले…

भारताचा पुरुषार्थ प्रकट होण्यास…

भारताचा पुरुषार्थ प्रकट होण्यास…

॥ विशेष : डॉ. मनमोहन वैद्य | सह सरकार्यवाह,…

ऑगस्टा वेस्टलँड

ऑगस्टा वेस्टलँड

॥ चतुरस्त्र : स्वाती तोरसेकर | ऑगस्टा विषयाला हात…

तिसरी आघाडी की तीन आघाड्या?

तिसरी आघाडी की तीन आघाड्या?

॥ जागता पहारा : भाऊ तोरसेकर | भाजपा वा…

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

‘फोर्ब्स’ने नुकतीच सर्वाधिक कमाई करणार्‍या अभिनेत्यांच्या नावाची यादी जाहीर…

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

बॉलिवूडची बेबी डॉल म्हणजेच सनी लिओनीचे नाव इंटरनेटवर सर्वाधिक…

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

‘रेस- ३’ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये कमबॅक करणारा अभिनेता बॉबी देओल…

पंचांग
वार: | तिथी:
नक्षत्र: | राशी:
करण: | योग:
सूर्योदय: 07:02 | सूर्यास्त: 18:13
अयनांश:
Home » उत्तर प्रदेश, राज्य » अत्याधुनिक सुविधांच्या क्रूझमधून आता घेता येणार गंगा आरतीचा आनंद

अत्याधुनिक सुविधांच्या क्रूझमधून आता घेता येणार गंगा आरतीचा आनंद

वृत्तसंस्था
वाराणसी, २ सप्टेंबर –

Cruise

Cruise

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे लोकसभा क्षेत्र असलेल्या वाराणसीला आणखी एक भेट मिळाली आहे. गंगा नदीतील प्रवास आणि गंगा आरतीचा आनंद घेण्यासाठी येथे अत्याधुनिक क्रूझ दाखल झाले आहे. या क्रूझचे लोकार्पण नुकतेच मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आले.
या क्रूझची निर्मिती कोलकाता येथे करण्यात आली असून गंगा नदीतील प्रवासाचे संचालन एका खाजगी कंपनीकडे देण्यात आले आहे. अस्सी ते राजघाट असा प्रवास करणार्‍या या क्रूझमुळे पर्यटकांना गंगा नदीचा प्रवास करताना वेगळाच आनंद मिळणार आहे. दोन हजार चौरस फूट असलेल्या या अत्याधुनिक क्रूझमध्ये मोठा हॉटेल्समध्ये असलेल्या सुविधांकडेच लक्ष देऊन व्यवस्था करण्यात आली आहे. या क्रूझच्या सुरक्षेकडे विशेष लक्ष देण्यात आले आहे. त्याचे इंजन ४५० अश्‍वशक्तीचे असून ते पर्यावरणपूरक आहे. त्याच्यासोबत एक सर्व्हिस बोटही आहे. ही सर्व्हिस बोट आकस्मिक परिस्थितीत लाईफ बोट म्हणून काम करेल. याशिवाय क्रूझमध्ये पर्याप्त संख्येत लाईफ जॅकेट्स आणि लाईफ गार्डस्ही उपलब्ध राहणार आहेत.
साऊंड प्रुफ असलेल्या या क्रूझचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे यात असलेल्या दोन हजार चौरस फुटाच्या जागेमुळे त्यावर चर्चासत्र किंवा पार्टीही आयोजित केली जाऊ शकते. वाराणसी म्हणजे काशीचे धार्मिक महत्त्व लक्षात घेता या क्रूझमध्ये त्याच्या अनुरूपच खाद्यपदार्थ उपलब्ध करून दिले जाणार आहेत. या दोन मजली क्रूझचा तळमजला वातानुकलित मोठा हॉल आहे. या हॉलसोबतच पँट्रीची व्यवस्था असून पर्यटकांना ब्रेकफास्ट, स्नॅक्स आणि लंच उपलब्ध करून दिला जाणार आहे. याशिवाय त्यात बायो टॉयलेटची व्यवस्था करण्यात आली आहे, जेणेकरून घाण गंगा नदीत जाणार नाही.
आत बसलेल्या व्यक्तीला बाहेरच्या सौंदर्याचा पूर्ण आनंद घेता यावा म्हणून क्रूझच्या खिडक्या मोठा ठेवण्यात आल्या आहेत. या क्रूझवरून पर्यटकांना सकाळी अस्सी घाटावरील सुबह-ए-बनारस आणि सायंकाळी दशाश्‍वमेध घाटावरील गंगा आरती पाहण्याचा लाभ घेता येणार आहे. सध्या प्रायोगिक तत्त्वावर हे क्रूझ अस्सी घाट ते राजघाट असाच प्रवास करणार आहे.
या क्रूझच्या प्रवासाचे पॅकेटज तीन भागांमध्ये विभागण्यात आले आहे. पहिले सकाळी सूर्योदयाच्या वेळी, दुसरे सायंकाळी सूर्यास्ताच्या वेळी गंगा आरतीसह संपविले जाईल. दुपारच्या काळात या क्रूझचा वापर कार्पोरेट्स मीटिंग, पार्टी आदींच्या बुकिंगसाठी केला जाईल.
या क्रूझच्या ऑनलाईन बुकिंगसाठी एका व्यक्तीला जीएसटीसह ७५० रुपये मोजावे लागणार आहेत. या क्रूझच्या तळमजल्यावर ६० आणि पहिल्या मजल्यावर ३० जणांच्या बसण्याची व्यवस्था आहे. या शिवाय या क्रूझमध्ये महादेवावर आस्था असणार्‍या भाविकांसाठी विशेषत्वाने रुद्राभिषेकाचीही सोय उपलब्ध करून दिली जाणार आहे. मात्र, त्यासाठी एका कुटुंबाला ७५ हजार रुपये शुल्क भरावे लागणार आहे.

Posted by : | on : 3 Sep 2018
Filed under : उत्तर प्रदेश, राज्य.
You can follow any responses to this entry through the RSS 2.0You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Change Language: press Ctrl+g

    छायाचित्रातून

  • भारताने ऑस्ट्रेलियात रचला इतिहास भारताने ऑस्ट्रेलियात रचला इतिहास
  • हार्दिक पंड्या, लोकेश राहुलला बीसीसीआयची नोटीस हार्दिक पंड्या, लोकेश राहुलला बीसीसीआयची नोटीस
  • भारताचा ऑस्ट्रेलियात विक्रमी विजय भारताचा ऑस्ट्रेलियात विक्रमी विजय
  • पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक
  • कोहली, मीराबाईला खेलरत्न कोहली, मीराबाईला खेलरत्न

हवामान

दृष्टीक्षेपात

व्हिडीओ संग्रह

More in उत्तर प्रदेश, राज्य (232 of 644 articles)

Cow Goseva
बहुराष्ट्रीय कंपन्यांच्या कर्मचार्‍यांची धाव, कोलकाता, २ सप्टेंबर - गोहत्येचा मुद्दा देशभरात संवेदनशील झाला असतानाच, बंगालमधील बहुराष्ट्रीय कंपन्यांचे अनेक कर्मचारी गोरक्षणाच्या ...

×