ads
ads
हिंदुत्वाचा विचार प्राचीन काळापासून

हिंदुत्वाचा विचार प्राचीन काळापासून

►संघाचा कुणीही शत्रू नाही • : सरसंघचालक मोहनजी भागवत…

अमित शाह यांचे नावही घेतले नव्हते

अमित शाह यांचे नावही घेतले नव्हते

►सीबीआयने घुसविल्याचा सोहराबुद्दिनच्या भावाचा दावा, वृत्तसंस्था नवी दिल्ली, १८…

संघ सर्वाधिक लोकशाही संघटना

संघ सर्वाधिक लोकशाही संघटना

►सरसंघचालक डॉ. मोहनजी भागवत यांचे स्पष्ट प्रतिपादन, वृत्तसंस्था नवी…

वैमानिकाने कौशल्याने ३७० प्रवाशांना वाचविले

वैमानिकाने कौशल्याने ३७० प्रवाशांना वाचविले

►एअर इंडियाच्या विमानातील इंधन आले होते संपत ►अमेरिकेच्या वादळाचाही…

रुपयातील घसरण किमान सात टक्के

रुपयातील घसरण किमान सात टक्के

►नाणेनिधीचा अंदाज ►नोटबंदी, जीएसटीमुळे विकासाला वेग, वृत्तसंस्था वॉशिंग्टन, १८…

पाकिस्तान व्यापारासाठी देणार भारत-अफगाणला भूमी

पाकिस्तान व्यापारासाठी देणार भारत-अफगाणला भूमी

वृत्तसंस्था मुंबई, १५ सप्टेंबर – भारत-अफगाणिस्तानने व्यापारासाठी पाकिस्तानची भूमी…

काँग्रेस, राकाँ नेत्यांच्या कारखान्यांकडे १२२४ कोटींचे थकित कर्ज

काँग्रेस, राकाँ नेत्यांच्या कारखान्यांकडे १२२४ कोटींचे थकित कर्ज

►सहकारी बँका अडचणीत ►नेत्यांना बजावली नोटिस, वृत्तसंस्था मुंबई, १८…

वित्त आयोगाचा निष्कर्ष सकारात्मक असेल

वित्त आयोगाचा निष्कर्ष सकारात्मक असेल

►अर्थमंत्री मुनगंटीवार यांना विश्‍वास, तभा वृत्तसेवा मुंबई, १८ सप्टेंबर…

जीएसटी कौन्सिलकडून राजकीय हेतूने निर्णय

जीएसटी कौन्सिलकडून राजकीय हेतूने निर्णय

►राष्ट्रवादी काँग्रेसची वित्त आयोगाकडे कैफीयत, तभा वृत्तसेवा मुंबई, १८…

रा.स्व.संघ : हिंदुबंधुत्वापासून विश्‍वबंधुत्वापर्यंत

रा.स्व.संघ : हिंदुबंधुत्वापासून विश्‍वबंधुत्वापर्यंत

॥ सारांश : ल.त्र्यं. जोशी | संघस्थापनेपासूनचा हा धावता…

साद समाजपुरुषाची!

साद समाजपुरुषाची!

॥ संवाद : सोमनाथ देशमाने | स्वातंत्र्यदिनाच्या दिवशी लाल…

गॉड आणि सैतान

गॉड आणि सैतान

॥ जागता पहारा : भाऊ तोरसेकर | कठुआ, उन्नाव…

मोरूच्या मावशीची ‘एक्झिट’

मोरूच्या मावशीची ‘एक्झिट’

मुंबईच्या गिरणगावाने अनेक कलाकार रंगभूमी आणि रुपेरी पडद्याला दिले,…

‘सिमरन’मधील नवीन गाणे प्रदर्शित

‘सिमरन’मधील नवीन गाणे प्रदर्शित

अभिनेत्री कंगना राणावत लवकरच सिमरन या चित्रपटाद्वारे प्रेक्षकांच्या भेटीला…

चिरंजीवीसोबत सिनेमा करण्यास ऐश्‍वर्याचा नकार?

चिरंजीवीसोबत सिनेमा करण्यास ऐश्‍वर्याचा नकार?

ऐश्‍वर्या राय बच्चनची सध्या बॉलीवूडमध्ये सेकंड इनिंग सुरू आहे.…

पंचांग
वार: | तिथी:
नक्षत्र: | राशी:
करण: | योग:
सूर्योदय: 06:15 | सूर्यास्त: 18:23
अयनांश:
Home » दिल्ली, राज्य » उमर खालिदवर गोळीबार

उमर खालिदवर गोळीबार

►बनाव असल्याचा आरोप,
तभा वृत्तसेवा
नवी दिल्ली, १३ ऑगस्ट –

Umar Khalid

Umar Khalid

जवाहरलाल नेहरू विद्यापीठातील माजी विद्यार्थी नेता उमर खालिद याच्यावर आज सोमवारी अतिसुरक्षेच्या संसद भवन परिसरातील कॉन्स्टिट्युशन क्लब परिसरात गोळीबार करण्यात आला, सुदैवाने या गोळीबारातून खालिद बचावला. पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला असून आरोपींचा शोध घेतला जात आहे.
‘युनायटेड अगेन्स्ट हेट’ या संघटनेतर्फे कॉन्स्टिट्युशन क्लबमध्ये ‘खौफसे आझादी’ या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. मॉब लिचिंगच्या घटनांमध्ये बळी पडलेल्यांच्या कुटुंबातील लोक या कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी आले होते. या कार्यक्रमात अ‍ॅड. प्रशांत भूषण, राजद नेता मनोज झा, माजी खासदार अली अन्वर यांच्यासह जवाहरलाल नेहरू विद्यापीठातील बेपत्ता विद्यार्थी नजीब अहमदची आई फातिमा नफिस, हैदराबाद विद्यापीठातील आत्महत्या केलेल्या रोहित वेमुलाची आई राधिका वेमुला यांच्यासह अनेक जण सहभागी झाले होते. उमर खालिदही या कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी आला होता.
उमर खालिद आपल्या काही सहकार्‍यांसोबत चहा पिण्यासाठी कॉन्स्टिट्युशन क्लबच्या बाहेर असलेल्या चहा टपरीवर आला होता. आम्ही चहा पित असताना पाठीमागून आलेल्या एकाने खालिदला पकडण्याचा प्रयत्न केला. खालिदने त्याच्या तावडीतून सुटण्याचा प्रयत्न केला, एवढ्यात त्या व्यक्तीने खालिदच्या दिशेने गोळीबार केला. सुदैवाने गोळी खालिदला लागली नाही, ती त्याला चाटून गेली, या गोंधळात खालिद खाली पडला, असे खालिदच्या एका सहकार्‍याने सांगितले. खालिदसोबत असलेल्या त्याच्या मित्रांनी हल्लेखोरांना पकडण्याचा प्रयत्न केला. पण तो पळून गेला. पळताना हल्लेखोराच्या हातातील पिस्तूल खाली पडले. पोलिसांनी ते ताब्यात घेतले. या घटनेत किती जण सहभागी झाले होते, ते तत्काळ समजू शकले नाही. या घटनेनंतर परिसरात खळबळ उडाली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन चौकशी सुरू केली. या देशात भीतीचे आणि दहशतीचे वातावरण असून सरकारविरुद्ध बोलणार्‍याला घाबरवले जात असल्याचा आरोप उमर खालिद याने नंतर केला. आपल्याला जिवे मारण्याच्या धमक्या मिळत असल्याची तक्रार खालिदने जून महिन्यात केली होती.
बनाव असल्याचा आरोप
उमर खालिदवर गोळीबार झाल्याच्या घटनेबाबत वेगवेगळी वक्तव्ये समोर येत असल्यामुळे ही घटना खरी होती की एक बनाव होता, असा संशय व्यक्त होत आहे. दैनिक भास्करचे वार्ताहर संतोष कुमार, जे तिथे घटनेच्यावेळी उपस्थित होते, यांनी सांगितले की, उमर खालिद घटनेच्यावेळी तिथे उपस्थित नव्हता. गोळी झाडल्याचा आवाज आल्यानंतर आसपासचे लोक धावून आले, त्यात तो होता.
या भागातील उप पोलिस आयुक्त मधुर वर्मा यांनी सांगितले की, उमर खालिदने पोलिसांना जे बयाण दिले त्यात त्याने त्याच्यावर गोळी झाडली गेली नसल्याच म्हटले आहे. हल्लेखोराने हवेत गोळी झाडल्याचे त्याचे म्हणणे आहे.

Posted by : | on : Aug 14 2018
Filed under : दिल्ली, राज्य.
You can follow any responses to this entry through the RSS 2.0You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Change Language: press Ctrl+g

हवामान

दृष्टीक्षेपात

व्हिडीओ संग्रह

More in दिल्ली, राज्य (47 of 781 articles)

Jayant Jigyasu
►सर्वाधिक विश्‍वासू सहकार्‍याचा आरोप ►भाकपच्या सदस्यत्वाचा दिला राजीनामा, वृत्तसंस्था नवी दिल्ली, १३ ऑगस्ट - [caption id="attachment_59781" align="alignleft" width="291"] Jayant Jigyasu[/caption] ...

×