ads
ads
जो बंदूक उचलेल, त्याचा खातमाच!

जो बंदूक उचलेल, त्याचा खातमाच!

•भारतीय लष्कराचा कठोर संदेश •पुलवामा हल्ल्यामागे पाक लष्कर, आयएसआयच,…

जगाच्या इतिहासात शिवाजी महाराजांसारखी महान व्यक्ती सापडणे कठीण : मोदी

जगाच्या इतिहासात शिवाजी महाराजांसारखी महान व्यक्ती सापडणे कठीण : मोदी

नवी दिल्ली, १९ फेब्रुवारी – महाराष्ट्राच्या कडे-कपारीत ज्यांच्या नावाचा…

सूर्यकिरण विमानांची आकाशात धडक

सूर्यकिरण विमानांची आकाशात धडक

•एका वैमानिकाचा मृत्यू, दोन सुरक्षित •एअर शो सरावादरम्यान दुर्दैवी…

भारताने हल्ला केल्यास चोख प्रत्युत्तर

भारताने हल्ला केल्यास चोख प्रत्युत्तर

•इम्रान खानची धमकी, इस्लामाबाद, १९ फेब्रुवारी – पुलवामा दहशतवादी…

अमेरिकेतील १६ राज्यांचा ट्रम्प प्रशासनावर खटला

अमेरिकेतील १६ राज्यांचा ट्रम्प प्रशासनावर खटला

सॅन फ्रान्सिस्को, १९ फेब्रुवारी – मेक्सिको सीमेवर भिंत बांधण्यासाठी…

कुलभूषणवरील खटला बेकायदेशीर ठरवा

कुलभूषणवरील खटला बेकायदेशीर ठरवा

•सर्व आरोप काल्पनिक, आंतरराष्ट्रीय तत्त्वांचीही पायमल्ली •हरीश साळवे यांचा…

‘मातोश्री’च्या स्वार्थासाठी केलेली युती

‘मातोश्री’च्या स्वार्थासाठी केलेली युती

•नारायण राणे यांचा आरोप, मुंबई, १९ फेब्रुवारी – शिवसेनेने…

भाजपा-सेना सगळ्या निवडणुका एकत्र लढणार

भाजपा-सेना सगळ्या निवडणुका एकत्र लढणार

•लोकसभेसाठी २५-२३ आणि विधानसभेसाठी समसमान जागावाटप •अखेर शिवसेना-भाजपा युतीवर…

पाकी कलाकार, गायकांना भारताचे दार बंद

पाकी कलाकार, गायकांना भारताचे दार बंद

मुंबई, १७ फेब्रुवारी – यापुढे पाकिस्तानी कलाकार आणि गायकांसोबत…

राष्ट्रविकासाचा अर्थपूर्ण संकल्प

राष्ट्रविकासाचा अर्थपूर्ण संकल्प

॥ मानसरंग : मयुरेश डंके | २०१९ सालचा अर्थसंकल्प…

शककर्ते शिवराय

शककर्ते शिवराय

॥ प्रासंगिक : कुणाल नरसापूरकर | ‘स्वभावो दुरतिक्रम:’ असे…

मांजराची मुलायम पावले

मांजराची मुलायम पावले

॥ जागता पहारा : भाऊ तोरसेकर | भाजपाची मदत…

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

‘फोर्ब्स’ने नुकतीच सर्वाधिक कमाई करणार्‍या अभिनेत्यांच्या नावाची यादी जाहीर…

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

बॉलिवूडची बेबी डॉल म्हणजेच सनी लिओनीचे नाव इंटरनेटवर सर्वाधिक…

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

‘रेस- ३’ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये कमबॅक करणारा अभिनेता बॉबी देओल…

पंचांग
वार: | तिथी:
नक्षत्र: | राशी:
करण: | योग:
सूर्योदय: 06:51 | सूर्यास्त: 18:28
अयनांश:
Home » दिल्ली, राज्य » कन्हैयाकुमार जातीयवादी!

कन्हैयाकुमार जातीयवादी!

►सर्वाधिक विश्‍वासू सहकार्‍याचा आरोप
►भाकपच्या सदस्यत्वाचा दिला राजीनामा,
वृत्तसंस्था
नवी दिल्ली, १३ ऑगस्ट –

Jayant Jigyasu

Jayant Jigyasu

जेएनयूचा माजी विद्यार्थी कन्हैयाकुमार हा सर्वाधिक जातीयवादी असून, तो खोटारडा आणि विश्‍वासघातकी आहे. जेएनयूमधील विद्यार्थी संघटना त्यानेच उद्ध्वस्त केली आहे, असा आरोप आजवर कन्हैयाच्या सर्वाधिक जवळचा समजला जाणारा जयंत जिज्ञासू या विद्यार्थ्याने केला आहे.
जयंत जिज्ञासू याने आपल्या फेसबूक पोस्टवर कन्हैयावर गंभीर आरोप करणारे पत्र जारी केले आहे. यात त्याने अखिल भारतीय विद्यार्थी महासंघ आणि भारतीय कम्युनिस्ट पार्टीवरही गंभीर आरोप केले आहेत. भाकपचे महासचिव सुधाकर रेड्डी यांना त्याने हे पत्र लिहिले आहे.
या पत्राच्या दुसर्‍या परिच्छेदात तो लिहितो की, संघटना आणि पक्षात शोषित, दुर्लक्षित आणि वंचित लोकांना वेठबिगार समजून, त्यांना राबविणारा एक फार मोठा वर्गच असल्याचे दिसून येते. पक्ष व संघटनेचा झेंडा एकाच्या हातात असतो आणि नेतेपद मात्र दुसर्‍याच कुणालातरी मिळते, असेच एकूण चित्र आहे. एखाद्या दलित व्यक्तीला भाकपच्या महासचिवपदी नियुक्त करण्यासाठी आजही कुणीच पुढाकार घेत नाही. कदाचित या नेत्यांना दलितांची लाज वाटत असावी. प्रत्येक महत्त्वाच्या कार्यक्रमात, सर्वपक्षीय बैठकीत आणि विरोधकांच्या एकत्रीकरणात पक्षाचे राष्ट्रीय सचिव डी. राजाच दिसतात, पण त्यांच्यात पक्षाचा कारभार चालविण्याची क्षमता खरोखरच आहे काय आणि असेल तर ते त्याचे प्रदर्शन का करीत नाही, असा सवालही जिज्ञासूने पत्रात केला आहे.
कन्हैयाबाबत तो लिहितो की, कन्हैया हा माणूस अतिशय जातीयवादी, खोटारडा आणि विश्‍वासघातकी आहे. भाकपसमर्थित अ. भा. विद्यार्थी महासंघ उद्ध्वस्त करण्यात त्याचा सर्वात मोठा हात आहे.
या पक्षात दलित, मागासवर्गीय आणि आदिवासी लोक कुणाच्याही नेतृत्वात हसतपणे काम करतात, पण पक्षातील तथाकथित उच्चवर्गीयांना दलित, आदिवासींचे नेतृत्व मान्य नाही. या उपक्षित समाजातील लोकांना अपमानित करण्यासाठी ही नेतेमंडळी एकही संधी सोडत नसतात, असा आरोपही त्याने केला.
कन्हैयासोबत जेव्हा अन्याय झाला होता, तेव्हा देशातील न्यायप्रिय वर्ग त्याच्या पाठीशी उभा झाला होता, पण याच कन्हैयाने जेएनयूमधील विद्यार्थी संघटनांना धोका दिला, असा आरोप करताना जिज्ञासूने पत्राच्या शेवटी अतिशय धक्कादायक मजकूर लिहिला आहे. कन्हैयाने संपूर्ण संघटनच हायजॅक केले आहे. त्याची सध्या एकछत्री सत्ता आहे. आपल्या शक्तीचे प्रदर्शन करताना त्याने मला गुंडांकडून धमक्या दिल्या. आता माझ्या जीवाला गंभीर धोका निर्माण झाला आहे. या संघटनेत मला गुदमरल्यासारखे वाटत आहे, असे जिज्ञासूने लिहिले आहे.

Posted by : | on : 14 Aug 2018
Filed under : दिल्ली, राज्य.
You can follow any responses to this entry through the RSS 2.0You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Change Language: press Ctrl+g

    छायाचित्रातून

  • भारताने ऑस्ट्रेलियात रचला इतिहास भारताने ऑस्ट्रेलियात रचला इतिहास
  • हार्दिक पंड्या, लोकेश राहुलला बीसीसीआयची नोटीस हार्दिक पंड्या, लोकेश राहुलला बीसीसीआयची नोटीस
  • भारताचा ऑस्ट्रेलियात विक्रमी विजय भारताचा ऑस्ट्रेलियात विक्रमी विजय
  • पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक
  • कोहली, मीराबाईला खेलरत्न कोहली, मीराबाईला खेलरत्न

हवामान

दृष्टीक्षेपात

व्हिडीओ संग्रह

More in दिल्ली, राज्य (297 of 679 articles)

Shivrajsingh Chouhan
काँग्रेसला सुनावले, वृत्तसंस्था भोपाळ, १३ ऑगस्ट - मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान एखाद्या वेश्येप्रमाणे वागतात, अशी टीका करणारे काँगे्रस नेते सुंदरलाल ...

×