ads
ads
गोदावरी, कावेरी लवकरच जोडणार

गोदावरी, कावेरी लवकरच जोडणार

•नितीन गडकरी यांची घोषणा, अमरावती, २१ जानेवारी – दक्षिणेतील…

सिद्धगंगा मठाधीश शिवकुमार स्वामीजी यांचे निधन

सिद्धगंगा मठाधीश शिवकुमार स्वामीजी यांचे निधन

बंगळुरू, २१ जानेवारी – प्रख्यात गुरुवर्य आणि कर्नाटकच्या तुमकुरू…

कुंभात १ कोटी भाविकांचे संगम-स्नान

कुंभात १ कोटी भाविकांचे संगम-स्नान

प्रयागराज, २१ जानेवारी – पौष पौर्णिमेच्या पावन पर्वावर सुमारे…

आणिबाणी जाहीर करण्याची ट्रम्प यांची धमकी

आणिबाणी जाहीर करण्याची ट्रम्प यांची धमकी

►मेक्सिको सीमेवरील भिंतीचा वाद पेटणार, वॉशिंग्टन, १० जानेवारी –…

विक्रम मिस्री चीनमधील नवे राजदूत

विक्रम मिस्री चीनमधील नवे राजदूत

►पदभार स्वीकारताच केली द्विपक्षीय मुद्यांवर चर्चा, बीजिंग, ८ जानेवारी…

शटडाऊन सुरूच ठेवेन, आणिबाणीचाही पर्याय खुला

शटडाऊन सुरूच ठेवेन, आणिबाणीचाही पर्याय खुला

►डोनाल्ड ट्रम्प यांचा काँगे्रस सभागृहाला इशारा ►मेक्सिकोच्या सीमेवर भिंत…

डान्सबार बंदीसाठी नवा अध्यादेश

डान्सबार बंदीसाठी नवा अध्यादेश

मुंबई, १८ जानेवारी – राज्यातील डान्सबार पुन्हा सुरू करण्याचा…

समृद्धी महामार्गासाठी स्टेट बँक देणार ८५०० कोटींचे कर्ज

समृद्धी महामार्गासाठी स्टेट बँक देणार ८५०० कोटींचे कर्ज

►९५ टक्के भूसंपादन पूर्ण, मुंबई, १७ जानेवारी – स्टेट…

ओबीसी महामंडळांसाठी ७३६ कोटी!

ओबीसी महामंडळांसाठी ७३६ कोटी!

•तरुणांना मिळणार १० ते ५० लाखांचे कर्ज •सावित्रीबाई फुले…

भारताचा पुरुषार्थ प्रकट होण्यास…

भारताचा पुरुषार्थ प्रकट होण्यास…

॥ विशेष : डॉ. मनमोहन वैद्य | सह सरकार्यवाह,…

ऑगस्टा वेस्टलँड

ऑगस्टा वेस्टलँड

॥ चतुरस्त्र : स्वाती तोरसेकर | ऑगस्टा विषयाला हात…

तिसरी आघाडी की तीन आघाड्या?

तिसरी आघाडी की तीन आघाड्या?

॥ जागता पहारा : भाऊ तोरसेकर | भाजपा वा…

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

‘फोर्ब्स’ने नुकतीच सर्वाधिक कमाई करणार्‍या अभिनेत्यांच्या नावाची यादी जाहीर…

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

बॉलिवूडची बेबी डॉल म्हणजेच सनी लिओनीचे नाव इंटरनेटवर सर्वाधिक…

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

‘रेस- ३’ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये कमबॅक करणारा अभिनेता बॉबी देओल…

पंचांग
वार: | तिथी:
नक्षत्र: | राशी:
करण: | योग:
सूर्योदय: 07:01 | सूर्यास्त: 18:14
अयनांश:
Home » गोवा, राज्य » काँग्रेसला गोव्यात झाली सत्तेची घाई

काँग्रेसला गोव्यात झाली सत्तेची घाई

राज्यपालांकडे सादर केला दावा,
वृत्तसंस्था
पणजी, १७ सप्टेंबर –

Goa Map

Goa Map

स्वादुपिंडाच्या आजाराने ग्रासलेले गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांच्यावर दिल्लीतील एम्समध्ये उपचार सुरू असताना, सत्तेची घाई झालेल्या काँगे्रसने मात्र राज्यात सरकार स्थापन करण्याचा दावा आज सोमवारी सादर केला. पर्रीकर यांच्याबाबत सत्तेसाठी हपाललेल्या काँगे्रसने दाखविलेली ही असंवेदनशीलताच आहे, अशा संतप्त प्रतिक्रिया गोव्यात उमटत आहेत.
राज्य विधानसभेत १६ सदस्य असलेल्या काँगे्रस नेत्यांच्या शिष्टमंडळाने आज राज्यपाल मृदुला सिन्हा यांची राजभवनात भेट घेतली आणि आपले निवेदन सादर केले. विधानसभा बरखास्त करण्यात येऊ नये, त्याऐवजी सर्वात मोठा पक्ष असलेल्या काँगे्रसला सत्तेचे निमंत्रण देण्यात यावे, अशी मागणी यात करण्यात आली आहे. विरोधी पक्षनेते चंद्रकांत कावळेकर यांनी स्वत: राजभवनातून बाहेर आल्यानंतर पत्रकारांना ही माहिती दिली.
पर्रीकर आजारी असल्याने घटक पक्ष पाठिंबा काढण्याच्या तयारीत आहेत आणि तसेही सत्ता हातातून जात असल्याचे पाहून राज्यात राष्ट्रपती राजवट लादण्याची भाजपाची सवय आहे. काँगे्रसला सत्ता मिळायलाच नको, असेच भाजपाचे धोरण आहे. त्यामुळेच आम्ही राज्यपालांकडे निवेदन सादर केले आहे. अशी कोणतीही स्थिती उद्भवल्यास भाजपाच्या शिफारसीवरून विधानसभा बरखास्त न करता, बहुमत सिद्ध करण्याची संधी काँगे्रसला मिळायलाच हवी, असा आग्रह आम्ही केला असल्याचे त्यांनी सांगितले.
काँगे्रसला काही प्रादेशिक पक्षांचा पाठिंबा आहे आणि त्या आधारावर आम्ही सभागृहात बहुमत सिद्ध करू शकतो, असा दावाही त्यांनी यावेळी केला.
भाजपाच्या शिष्टमंडळाने घेतला आढावा
दरम्यान, भाजपाचे तीन सदस्यीय शिष्टमंडळ रविवारी सायंकाळी गोव्यात दाखल झाले. आज या शिष्टमंडळाने भाजपा व अन्य घटक पक्षातील नेत्यांच्या भेटी घेतल्या आणि राज्यातील एकूण स्थितीचा आढावा घेतला. राम लाल, बी. एल. संतोष आणि विनय पुरानिक यांचा शिष्टमंडळात समावेश आहे. पर्रीकर सरकार स्थिर असून, नेतृत्व बदलाची मागणी कुणीही केली नाही, असे राम लाल यांनी स्पष्ट केले.

Posted by : | on : 18 Sep 2018
Filed under : गोवा, राज्य.
You can follow any responses to this entry through the RSS 2.0You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Change Language: press Ctrl+g

    छायाचित्रातून

  • भारताने ऑस्ट्रेलियात रचला इतिहास भारताने ऑस्ट्रेलियात रचला इतिहास
  • हार्दिक पंड्या, लोकेश राहुलला बीसीसीआयची नोटीस हार्दिक पंड्या, लोकेश राहुलला बीसीसीआयची नोटीस
  • भारताचा ऑस्ट्रेलियात विक्रमी विजय भारताचा ऑस्ट्रेलियात विक्रमी विजय
  • पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक
  • कोहली, मीराबाईला खेलरत्न कोहली, मीराबाईला खेलरत्न

हवामान

दृष्टीक्षेपात

व्हिडीओ संग्रह

More in गोवा, राज्य (223 of 650 articles)


वाचविणे हाच अजेंडा, वृत्तसंस्था लखनऊ,१७ सप्टेंबर - देशात भारतीय जनता पार्टीला हरविण्यासाठी समाजवादी महाआघाडी करेल आणि त्यासाठी दोन पावले मागे ...

×