ads
ads
विद्यापीठांमध्ये २५ टक्के जागा वाढविणार; सवर्ण आरक्षणासाठी तरतूद

विद्यापीठांमध्ये २५ टक्के जागा वाढविणार; सवर्ण आरक्षणासाठी तरतूद

►जावडेकर यांची घोषणा, नवी दिल्ली, १५ जानेवारी – आगामी…

९० हजार कोटींची चोरी वाचविल्याने मला हटविण्याचा कट

९० हजार कोटींची चोरी वाचविल्याने मला हटविण्याचा कट

•पंतप्रधान मोदी यांचा विरोधकांवर हल्ला, बालनगिर, १५ जानेवारी –…

सामूहिक धर्मांतर थांबायलाच हवे

सामूहिक धर्मांतर थांबायलाच हवे

•ख्रिश्‍चनांच्या कार्यक्रमातच राजनाथसिंह यांनी सुनावले, नवी दिल्ली, १५ जानेवारी…

आणिबाणी जाहीर करण्याची ट्रम्प यांची धमकी

आणिबाणी जाहीर करण्याची ट्रम्प यांची धमकी

►मेक्सिको सीमेवरील भिंतीचा वाद पेटणार, वॉशिंग्टन, १० जानेवारी –…

विक्रम मिस्री चीनमधील नवे राजदूत

विक्रम मिस्री चीनमधील नवे राजदूत

►पदभार स्वीकारताच केली द्विपक्षीय मुद्यांवर चर्चा, बीजिंग, ८ जानेवारी…

शटडाऊन सुरूच ठेवेन, आणिबाणीचाही पर्याय खुला

शटडाऊन सुरूच ठेवेन, आणिबाणीचाही पर्याय खुला

►डोनाल्ड ट्रम्प यांचा काँगे्रस सभागृहाला इशारा ►मेक्सिकोच्या सीमेवर भिंत…

ओबीसी महामंडळांसाठी ७३६ कोटी!

ओबीसी महामंडळांसाठी ७३६ कोटी!

•तरुणांना मिळणार १० ते ५० लाखांचे कर्ज •सावित्रीबाई फुले…

स्वायत्त संस्थांमध्ये राजकीय हस्तक्षेप नको

स्वायत्त संस्थांमध्ये राजकीय हस्तक्षेप नको

►नितीन गडकरी यांचे प्रतिपादन ►साहित्य संमेलनाचे सूप वाजले, यवतमाळ/…

ज्येष्ठ विनोदी अभिनेते किशोर प्रधान यांचे निधन

ज्येष्ठ विनोदी अभिनेते किशोर प्रधान यांचे निधन

मुंबई, १२ जानेवारी – मराठी रंगभूमी आणि चित्रपटातून आपल्या…

श्री सिद्धरामेश्‍वरांची सोलापूरची अभेदयात्रा

श्री सिद्धरामेश्‍वरांची सोलापूरची अभेदयात्रा

॥ तरंग : दीपक कलढोणे | चित्तशुद्धीचे प्रतिक असणारा…

भव्य कुंभ, दिव्य कुंभ!

भव्य कुंभ, दिव्य कुंभ!

॥ विशेष : श्रीनिवास वैद्य | तीर्थराज प्रयागमध्ये माघ…

तर्कशास्त्राची ऐशीतैशी

तर्कशास्त्राची ऐशीतैशी

॥ जागता पहारा : भाऊ तोरसेकर | कालपरवाच सोहराबुद्दीन…

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

‘फोर्ब्स’ने नुकतीच सर्वाधिक कमाई करणार्‍या अभिनेत्यांच्या नावाची यादी जाहीर…

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

बॉलिवूडची बेबी डॉल म्हणजेच सनी लिओनीचे नाव इंटरनेटवर सर्वाधिक…

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

‘रेस- ३’ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये कमबॅक करणारा अभिनेता बॉबी देओल…

पंचांग
वार: | तिथी:
नक्षत्र: | राशी:
करण: | योग:
सूर्योदय: 07:02 | सूर्यास्त: 18:10
अयनांश:
Home » दिल्ली, राज्य » केजरीवाल यांच्या रीट्विटवर ठरते नेत्यांचे पक्षातील स्थान

केजरीवाल यांच्या रीट्विटवर ठरते नेत्यांचे पक्षातील स्थान

►ट्विटवरील उपेक्षेमुळे खेतान, आशुतोष यांचे राजीनामे,
तभा वृत्तसेवा
नवी दिल्ली, २४ ऑगस्ट –

Kejriwal

Kejriwal

दिल्लीचे मुख्यमंत्री व आम आदमी पार्टीचे सर्वेसर्वा अरविंद केजरीवाल दुर्लक्ष करीत असल्यामुळे, तसेच त्यांनी रीट्विट करणे थांबविल्यामुळे आशिष खेतान आणि आशुतोष यांना पक्षाचा राजीनामा द्यावा लागला असल्याचे समजते. केजरीवाल आता आपच्या कोणत्या नेत्याच्या ट्विटला रीट्विट करणे थांबवतात आणि त्याच्यावर राजीनाम्याची वेळ येते, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.
आम आदमी पार्टीच्या राजकारणात तुमचा नेता तुमच्या किती ट्विटला रीट्विटला करतो, त्यावरून तुमचे पक्षातील स्थान आणि नेत्याशी असलेली जवळीक दिसून येते, असे आता समजले पाहिजे. या दोन्ही आघाड्यांवर गेल्या काही महिन्यांपासून आशिष खेतान आणि आशुतोष माघारले होते. त्यामुळे त्यांना राजीनामा देण्याचा निर्णय घ्यावा लागला असे दिसते. काही मुद्यांवर या दोघांचे केजरीवाल यांच्याशी मतभेद झाले होते त्यानंतर केजरीवाल यांनी या दोघांकडे दुर्लक्ष करायला, तसेच त्यांचे ट्विट रीट्विट करायचे थांबवले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यानंतर केजरीवाल यांचे ट्विटरवर सर्वाधिक म्हणजे १ कोटी ४० लाख फॉलोअर्स आहेत. केजरीवाल ट्विटरचा उपयोग आपली भूमिका मांडण्यासाठी अतिशय प्रभावीपणे करतात. सामान्यपणे आप सरकारच्या कामाची केलेली तारिफ, तसेच भाजपावर केलेली टीका याबाबतचे कोणाचेही ट्विट केजरीवाल रीट्विट करतात. १८ जून ते १५ ऑगस्ट या जवळपास दोन महिन्यांच्या काळात केजरीवाल यांनी आप नेत्यांची १०२ ट्विट्स रीट्विट केले. यात आशुतोष यांचे ट्विट फक्त दोन वेळा, तर खेतान यांचे ट्विट तीन वेळा रीट्विट केले.
उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांचे ट्विट ३१ वेळा, तर आपचे प्रवक्ते सौरभ भारद्वाज यांचे ट्विट १९ वेळा रीट्विट केले.विशेष म्हणजे काही पत्रकारांचे ट्विटही केजरीवाल यांनी ८० वेळा रीट्विट केले. रीट्विट करताना केजरीवाल यांनी अन्य पक्षांच्या नेत्यांनाही सोडले नाही. अन्य पक्षाच्या नेत्यांचे ट्विट केजरीवाल यांनी ११ वेळा रीट्विट केले आहे.
विशेष म्हणजे ज्या नेत्याशी मतभेद होतात, त्याचे ट्विट रीट्विट करणे केजरीवाल थांबवतात, असा अनुभव आहे. केजरीवाल यांचे जेव्हा आपचे संस्थापक सदस्य कुमार विश्‍वास यांच्याशी मतभेद वाढले, तेव्हा केजरीवाल यांनी त्यांचे ट्विट रीट्विट करणे थांबवले होते. त्यानंतर काही दिवसातच कुमार विश्‍वास यांना आपचा राजीनामा द्यावा लागला होता.
आशिष खेतान आणि आशुतोष या दोन्ही नेत्यांनी १५ ऑगस्टला आपचा राजीनामा दिला. आपल्या राजीनाम्याची घोषणा आशुतोष यांनी त्याच दिवशी केली, तर खेतान यांनी नंतर केली. या दोघांचे राजीनामे केजरीवाल यांनी अद्याप स्वीकारले नसले तरी या दोघांचे पक्षातील स्थान आणि उपयुक्तता आता केजरीवाल यांच्यासाठी संपली आहे, यात शंका नाही. खेतान आणि आशुतोष हे कधीकाळी केजरीवाल यांचे अतिशय विश्‍वासू होते. केजरीवाल यांच्यासाठी संकटमोचक म्हणून ते काम करीत होते.

Posted by : | on : 25 Aug 2018
Filed under : दिल्ली, राज्य.
You can follow any responses to this entry through the RSS 2.0You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Change Language: press Ctrl+g

    छायाचित्रातून

  • हार्दिक पंड्या, लोकेश राहुलला बीसीसीआयची नोटीस हार्दिक पंड्या, लोकेश राहुलला बीसीसीआयची नोटीस
  • भारताचा ऑस्ट्रेलियात विक्रमी विजय भारताचा ऑस्ट्रेलियात विक्रमी विजय
  • पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक
  • कोहली, मीराबाईला खेलरत्न कोहली, मीराबाईला खेलरत्न
  • अमित पांघळला बॉक्सिंगचे सुवर्ण अमित पांघळला बॉक्सिंगचे सुवर्ण

हवामान

दृष्टीक्षेपात

व्हिडीओ संग्रह

More in दिल्ली, राज्य (238 of 635 articles)


मुदत वाढविण्यास हायकोर्टाचा नकार, वृत्तसंस्था रांची, २४ ऑगस्ट - कोट्यवधी रुपयांच्या चारा घोटाळ्यात दोषी असलेले राजदचे अध्यक्ष आणि बिहारचे माजी ...

×