ads
ads
संघ सर्वाधिक लोकशाही संघटना

संघ सर्वाधिक लोकशाही संघटना

►सरसंघचालक डॉ. मोहनजी भागवत यांचे स्पष्ट प्रतिपादन, वृत्तसंस्था नवी…

पंतप्रधान मोदींवर अभिनंदनाचा वर्षाव

पंतप्रधान मोदींवर अभिनंदनाचा वर्षाव

वृत्तसंस्था नवी दिल्ली, १७ सप्टेंबर – पक्षभेद आणि राजकीय…

फुकटात काहीच मिळत नाही

फुकटात काहीच मिळत नाही

►चीनची मदत घेणार्‍या देशांना लष्करप्रमुखांचा इशारा, वृत्तसंस्था पुणे, १७…

पाकिस्तान व्यापारासाठी देणार भारत-अफगाणला भूमी

पाकिस्तान व्यापारासाठी देणार भारत-अफगाणला भूमी

वृत्तसंस्था मुंबई, १५ सप्टेंबर – भारत-अफगाणिस्तानने व्यापारासाठी पाकिस्तानची भूमी…

भारताचा सीपीईसीला कडाडून विरोध

भारताचा सीपीईसीला कडाडून विरोध

►चीनसह पाकला खडे बोल!, वृत्तसंस्था जीनिव्हा (स्वित्झर्लंड), १५ सप्टेंबर…

चिनी मालावर जास्तीचा कर लावण्याचे ट्रम्प यांचे निर्देश

चिनी मालावर जास्तीचा कर लावण्याचे ट्रम्प यांचे निर्देश

वृत्तसंस्था वॉशिंग्टन, १५ सप्टेंबर – अमेरिका आणि चीन या…

शेळ्या चारण्यासाठी गेलेल्या ३ भावंडाचा बंधाऱ्यात बुडून मृत्यू

शेळ्या चारण्यासाठी गेलेल्या ३ भावंडाचा बंधाऱ्यात बुडून मृत्यू

►मराठवाड्यातील उमरज येथील घटना, प्रतिनिधी कंधार, १७ सप्टेंबर –…

महाराष्ट्रात वेगाने भरणाऱ्या ट्रेन्स

महाराष्ट्रात वेगाने भरणाऱ्या ट्रेन्स

मुंबई, १८ सप्टेंबर – ट्रेनने दररोज २३ दशलक्षांहून अधिक…

विसर्जन मिरवणुकीत डीजे, डॉल्बीला परवानगी नाही

विसर्जन मिरवणुकीत डीजे, डॉल्बीला परवानगी नाही

►मुंबई उच्च न्यायालयाची तात्पुरती बंदी, मुंबई, १४ सप्टेंबर –…

रा.स्व.संघ : हिंदुबंधुत्वापासून विश्‍वबंधुत्वापर्यंत

रा.स्व.संघ : हिंदुबंधुत्वापासून विश्‍वबंधुत्वापर्यंत

॥ सारांश : ल.त्र्यं. जोशी | संघस्थापनेपासूनचा हा धावता…

साद समाजपुरुषाची!

साद समाजपुरुषाची!

॥ संवाद : सोमनाथ देशमाने | स्वातंत्र्यदिनाच्या दिवशी लाल…

गॉड आणि सैतान

गॉड आणि सैतान

॥ जागता पहारा : भाऊ तोरसेकर | कठुआ, उन्नाव…

मोरूच्या मावशीची ‘एक्झिट’

मोरूच्या मावशीची ‘एक्झिट’

मुंबईच्या गिरणगावाने अनेक कलाकार रंगभूमी आणि रुपेरी पडद्याला दिले,…

‘सिमरन’मधील नवीन गाणे प्रदर्शित

‘सिमरन’मधील नवीन गाणे प्रदर्शित

अभिनेत्री कंगना राणावत लवकरच सिमरन या चित्रपटाद्वारे प्रेक्षकांच्या भेटीला…

चिरंजीवीसोबत सिनेमा करण्यास ऐश्‍वर्याचा नकार?

चिरंजीवीसोबत सिनेमा करण्यास ऐश्‍वर्याचा नकार?

ऐश्‍वर्या राय बच्चनची सध्या बॉलीवूडमध्ये सेकंड इनिंग सुरू आहे.…

पंचांग
वार: | तिथी:
नक्षत्र: | राशी:
करण: | योग:
सूर्योदय: 06:15 | सूर्यास्त: 18:24
अयनांश:
Home » केरळ, राज्य » केरळला ५०० कोटींची तत्काळ मदत

केरळला ५०० कोटींची तत्काळ मदत

पंतप्रधानांनी केली पूरग्रस्त केरळची पाहणी,
तिरुअनंतपुरम्, १८ ऑगस्ट –

Pm Modi Visit Kerala Flood

Pm Modi Visit Kerala Flood

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज शनिवारी शतकातील भीषण पुराच्या विळख्यात अडकलेल्या केरळची हवाई पाहणी केली. यानंतर पंतप्रधानांनी लगेच केरळला ५०० कोटी रुपयांची तातडीची मदत जाहीर केली. याशिवाय, पूरपीडित नागरिकांसाठीही त्यांनी आर्थिक मदतीची घोषणा केली.
पंतप्रधान मोदी शुक्रवारी रात्रीच केरळच्या भेटीवर आले होते. आज सकाळी कोची येथे एका उच्चस्तरीय बैठकीत त्यांनी पूरस्थितीचा आढावा घेतला. यानंतर त्यांनी विशेष हेलिकॉप्टरमधून पूरस्थितीची पाहणी केली. केरळला तातडीने ५०० कोटी रुपयांची मदत दिली जात आहे. तसेच, पुरात मृत्युमुखी पडलेल्यांच्या कुटुंबीयांना पंतप्रधान राष्ट्रीय मदत निधीतून प्रत्येकी दोन लाख रुपये आणि जखमी झालेल्यांना प्रत्येकी ५० हजार रुपये देण्यात येत आहे, असे पंतप्रधानांनी सांगितले. केंद्रीय गृहमंत्री राजनाथसिंह यांनी १२ ऑगस्ट रोजी केरळसाठी शंभर कोटी रुपयांची मदत जाहीर केली होती.
पूरग्रस्त जिल्ह्यांची हवाई पाहणी करताना पंतप्रधानांसोबत केरळचे राज्यपाल पी. सदाशिवम्, मुख्यमंत्री पी. विजयन्, केंद्रीय मंत्री के. जे. अल्फोन्स आणि वरिष्ठ अधिकारी होते.
अतिवृष्टी आणि भीषण पुरामुळे केरळचे फार मोठे नुकसान झाले आहे. अजूनही हजारो लोक पुराच्या विळख्यात अडकले असून, त्यांना सुखरूप बाहेर काढण्यास प्राधान्य देण्यात येत आहे, असे पंतप्रधान म्हणाले.
विजयन् यांचे ट्विट
पंतप्रधान मोदी यांनी केरळला ५०० कोटी रुपयांची तातडीची मदत केली आहे. मुसळधार पाऊस आणि पुरामुळे राज्याला १९,५१२ कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे. तथापि, पूरस्थिती निवळल्यानंतरच प्रत्यक्ष नुकसान स्पष्ट होणार आहे. आम्ही केंद्र सरकारने दोन हजार कोटी रुपयांची तातडीची मदत मागितली होती. आवश्यकतेनुसार आणखी मदत देण्याची ग्वाही मोदी यांनी दिली आहे, असे ट्विट विजयन् यांनी केले.
बळीसंख्या ३०० वर
केरळातील मुसळधार पाऊस आणि पुरामुळे आतापर्यंत ३०० पेक्षा जास्त नागरिकांचा मृत्यू झाला असून, अडीच लाखांपेक्षा जास्त लोक बेघर झाले आहेत. अनेक गावांना अजूनही पुराचा विळखा कायम असून, त्यांना वाचविण्यासाठी एनडीआरएफसोबतच लष्कर, हवाई दल आणि नौदलाचे जवान व अधिकारी युद्धपातळीवर काम करीत आहेत.
विविध राज्यांकडून मदतीचा हात
विविध राज्यांनी केरळला मदतीचा हात दिला आहे. स्टेट बँकेनेही दोन कोटी रुपयांची मदत मुख्यमंत्री सहायता निधीला दिली आहे. हरयाणाचे मुख्यमंत्री मनोहरलाल खट्टर यांनी केरळसाठी १० कोटी रुपयांची मदत जाहीर केली. तर, संयुक्त अरब अमिरातचे राजे शेख खलिफा यांनी पूरग्रस्तांच्या मदतीसाठी राष्ट्रीय आपात्कालीन समिती नेमण्याची सूचना केली आहे.
हेलिकॉप्टर घराच्या गच्चीवर उतरले
झाडांनी वेढलेल्या एका ठिकाणी अडकलेल्या २६ लोकांना वाचविण्यासाठी हेलिकॉप्टर घराच्या छतावर उतरविण्यात आले. हवाई दलाचे कॅप्टन पी. राजकुमार यांनी घरावर हेलिकॉप्टर उतरवत तिथे अडकलेल्या २६ जणांना वाचविले. या घटनेचे छायाचित्र प्रसिद्ध करण्यात आले आहे. हा भाग झाडांनी वेढलेला आहे. सध्याच्या पूरस्थितीत तिथे माणसांचे पोहोचणे कठीण होते. अशाच काही अवघड ठिकाणी दोरीच्या साह्याने महिलांना बाहेर काढून सुरक्षित ठिकाणी नेण्यात आले.
कर्नाटकातही थैमान
कर्नाटकमध्येही पावसाने थैमान घातले असून, कोडगू जिल्ह्यात काही नागरिकांचा मृत्यू झाला असून, ११ हजार घरांचे नुकसान झाले आहे. शुक्रवारी झालेल्या मुसळधार पावसामुळे कोडगू जिल्ह्यात पूरस्थिती निर्माण झाली. पुरात अडकलेल्या लोकांना बाहेर काढण्यासाठी एनडीआरएफ, लष्कर व नौदलाच्या सुमारे एक हजार जवानांना तैनात करण्यात आले आहे.
राज्य सरकारांची मदत
दरम्यान, महाराष्ट्र सरकारतर्फे २० कोटी रुपयांची, गुजरात सरकारकडून १० कोटी, बिहार सरकारतर्फे १० कोटी, ओडिशा सरकारतर्फे पाच कोटी, झारखंडतर्फे पाच कोटी रुपयांची मदत केरळमधील पूरग्रस्तांसाठी जाहीर करण्यात आली आहे. त्याचप्रमाणे काँगे्रस व आम आदमी पार्टीचे सर्व खासदार केरळला आपले एक महिन्याचे वेतन देणार आहेत.

Posted by : | on : Aug 19 2018
Filed under : केरळ, राज्य.
You can follow any responses to this entry through the RSS 2.0You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Change Language: press Ctrl+g

हवामान

दृष्टीक्षेपात

व्हिडीओ संग्रह

More in केरळ, राज्य (41 of 779 articles)

Floods In Kerala
►मुसळधार पावसाचा कहर पूरस्थिती गंभीर, वृत्तसंस्था तिरुवनंतपुरम्, १७ ऑगस्ट - [caption id="attachment_59984" align="alignleft" width="300"] Floods In Kerala[/caption] केरळातील मुसळधार पावसामुळे ...

×