ads
ads
दहशतवादाचा पाडाव करण्यास भारतीय नेतृत्व सक्षम

दहशतवादाचा पाडाव करण्यास भारतीय नेतृत्व सक्षम

•अजित डोवाल यांचे प्रतिपादन •पुलवामा हल्ला कधीच विसरणार नाही,…

सात अतिरेक्यांच्या १३ मालमत्ता जप्त

सात अतिरेक्यांच्या १३ मालमत्ता जप्त

•टेरर फंडिंगप्रकरणी ईडीची धडक कारवाई, नवी दिल्ली, १९ मार्च…

इतरांना त्रास होत असल्यास पक्ष्यांसाठी दाणे ठेवणे चूकच

इतरांना त्रास होत असल्यास पक्ष्यांसाठी दाणे ठेवणे चूकच

•सर्वोच्च न्यायालयाचा निर्वाळा, नवी दिल्ली, १९ मार्च – इमारतीच्या…

दलाई लामांचा उत्तराधिकारी चीनच्या मंजुरीनेच

दलाई लामांचा उत्तराधिकारी चीनच्या मंजुरीनेच

•चिनी परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाची माहिती, बीजिंग, १९ मार्च –…

नीरव मोदीविरोधात अटक वॉरंट जारी

नीरव मोदीविरोधात अटक वॉरंट जारी

लंडन, १८ मार्च – पंजाब नॅशनल बँकेत सुमारे १४…

डेटा चोरी प्रकरणी झुकेरबर्ग यांचा खोटारडेपणा उघड

डेटा चोरी प्रकरणी झुकेरबर्ग यांचा खोटारडेपणा उघड

•फेसबूकला होती संपूर्ण माहिती, लंडन, १८ मार्च – कॅम्ब्रिज…

दाऊद शरण यायला तयार होता, पवारांनी दुर्लक्ष केले

दाऊद शरण यायला तयार होता, पवारांनी दुर्लक्ष केले

•प्रकाश आंबेडकरांचा गंभीर आरोप, मुंबई, १९ मार्च – कुख्यात…

शेतकर्‍यांना सर्वाधिक मदत युती सरकारच्या काळात

शेतकर्‍यांना सर्वाधिक मदत युती सरकारच्या काळात

•मुख्यमंत्री फडणवीस यांची स्पष्टोक्ती, औरंगाबाद, १७ मार्च – काँगे्रसप्रणित…

काटोलमध्ये पोटनिवडणूक नको

काटोलमध्ये पोटनिवडणूक नको

•शरद पवार यांची मागणी •कुणीच अर्ज भरू नये, मुंबई,…

१७ व्या लोकसभेचा महाकुंभ!

१७ व्या लोकसभेचा महाकुंभ!

॥ विशेष : सुधीर पाठक | १७ व्या लोकसभेसाठीचा…

निवडणुकीपूर्वीच महागठबंधनाचा बँडबाजा

निवडणुकीपूर्वीच महागठबंधनाचा बँडबाजा

॥ सारांश : ल.त्र्यं. जोशी | महागठबंधन याचा अर्थच…

जबरदस्त तडाखा कसा द्यायचा आम्ही जाणतो!

जबरदस्त तडाखा कसा द्यायचा आम्ही जाणतो!

॥ रोखठोक : हितेश शंकर | पुलवामातील दहशतवादी हल्ल्यात…

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

‘फोर्ब्स’ने नुकतीच सर्वाधिक कमाई करणार्‍या अभिनेत्यांच्या नावाची यादी जाहीर…

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

बॉलिवूडची बेबी डॉल म्हणजेच सनी लिओनीचे नाव इंटरनेटवर सर्वाधिक…

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

‘रेस- ३’ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये कमबॅक करणारा अभिनेता बॉबी देओल…

पंचांग
वार: | तिथी:
नक्षत्र: | राशी:
करण: | योग:
सूर्योदय: 06:31 | सूर्यास्त: 18:35
अयनांश:
Home » केरळ, राज्य » केरळात एकाच दिवशी शंभर बळी

केरळात एकाच दिवशी शंभर बळी

मुसळधार पावसाचा कहर पूरस्थिती गंभीर,
वृत्तसंस्था
तिरुवनंतपुरम्, १७ ऑगस्ट –

Floods In Kerala

Floods In Kerala

केरळातील मुसळधार पावसामुळे झालेल्या विविध घटनांमध्ये एकाच दिवसात शंभर जणांचा बळी गेला आहे.
पूरग्रस्त भागात सैन्याने आज सकाळपासून बचाव अभियानाचा वेग वाढवला आहे, अशी माहिती आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणातील सूत्रांनी दिली.
केरळातील पूरस्थितीमुळे ३० जणांचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती काल देण्यात आली होती. मात्र, ही बळीसंख्या १०६ आहे. ८ ऑगस्टपासून सुरू असलेल्या पावसाच्या कहरामुळे आतापर्यंत १७३ जण ठार झाले आहेत, अशी माहिती सूत्राने दिली.
माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या अंत्यविधीनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी आज सायंकाळी केरळात पोहोचतील व ते उद्या हवाई सर्वेक्षण करून पूरस्थितीचा आढावा घेण्याची शक्यता या सूत्राने व्यक्त केली आहे.
बचाव मोहिमेसाठी आणखी २३ हेलिकॉप्टर्स आणि २०० बोटी मागवण्यात आल्याची माहिती काल शुक्रवारी मुख्यमंत्री पिनराई विजयन् यांनी दिली. एर्नाकुलम् आणि पटनम्तिट्टा जिल्ह्यात काल तीन हजार लोकांना सुरक्षितस्थळी हलवण्यात आले. विविध जिल्ह्यांमध्ये निर्माण झालेल्या पूरस्थितीमुळे इमारतींवर अडकेल्यांपैकी मुलांसह काही जणांना वाचवण्यात आल्याची माहिती सूत्राने दिली. एर्नाकुलम्, पटनम्तिट्टा आणि त्रिचुर जिल्ह्यातील पावसाचा फटका बसलेल्या भागात आज सकाळपासून लष्कर, नौदल आणि वायुदलाने बचावकार्य सुरू केले आहे. सकाळपासून या भागातील वृद्ध, महिला आणि मुलांना सर्वप्रथम बाहेर काढण्यात आल्याची माहिती सूत्राने दिली. बचावकार्यामध्ये स्थानिक मच्छिमार देखील मोलाची भूमिका पार पाडत आहेत. अलुवा, कलादी, पेरुम्बवूर, मवाट्टुपुळा आणि चाल्कुडी भागात मच्छिमारांनी त्यांच्या बोटींसह बचावकार्यात मदत करीत लोकांना सुरक्षितस्थळी हलवले.
केरळमधील काही भागांमध्ये आज वादळी वार्‍यासह मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाने सकाळी वर्तवली आहे. पटनम्तिट्टा, तिरुवनंतपुरम्, कोल्लाम, अलाप्पुळा, कोट्टयम्, इडुक्की, एर्नाकुलम्, त्रिचुर, पलक्कड, मलाप्पुरम्, कोळिकोड आणि वायाड जिल्ह्यामध्ये ६० किलोमीटर प्रती तास वेगाने वारे वाहतील अशी शक्यताही वर्तवण्यात आली आहे.
पंतप्रधानांनी निर्देश दिल्यानंतर संरक्षण मंत्रालयाने तिन्ही सशस्त्र दलातील आणखी सैनिक बचाव कार्यासाठी पाठवले आहेत. केरळमध्ये सध्या बेघर झालेल्या दीड लाख लोकांसाठी शिबिर उभारण्यात आले आहे. एनडीआरएफच्या १२ अतिरिक्त चमूंमधील ५४० सदस्य देखील केरळमध्ये पोहोचले आहे, अशी माहिती सूत्राने दिली.
धावपट्टी पाण्याखाली असल्याने कोची आंतरराष्ट्रीय विमानतळ २६ ऑगस्टपर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला असून, केरळमध्ये जाणार्‍या २५ रेल्वेंपैकी काही गाड्या रद्द करण्यात आल्या, तर काही गाड्यांची वेळ बदलण्यात आली आहे.
सर्वोच्च न्यायालयाची सूचना
मल्लापेरियर धरणातील पाण्याचा स्तर तीन फुटाने कमी करण्याच्या पर्यायावर विचार व्हावा, असे निर्देश सर्वोच्च न्यायालयाने आज दिले आहेत.
पाऊस, पुरामुळे सात राज्यांत ८६८ जणांचा मृत्यू
देशभरातील पाऊस, पूर आणि भूस्खलनामुळे आतापर्यंत सात राज्यांमध्ये ८६८ जणांचा मृत्यू झाला आहे. त्यापैकी २४७ जण केरळातील आहेत, अशी माहिती केंद्रीय गृहमंत्रालयाने आज दिली आहे. पूरग्रस्त राज्यांतील १४ जिल्ह्यांतील २.११ लाख नागरिकांना याचा फटका बसला असून, ३२ हजार ५०० हेक्टर जमिनीवरील पिके उद्ध्वस्त झाली आहेत.

Posted by : | on : 18 Aug 2018
Filed under : केरळ, राज्य.
You can follow any responses to this entry through the RSS 2.0You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Change Language: press Ctrl+g

    छायाचित्रातून

  • भारताने ऑस्ट्रेलियात रचला इतिहास भारताने ऑस्ट्रेलियात रचला इतिहास
  • हार्दिक पंड्या, लोकेश राहुलला बीसीसीआयची नोटीस हार्दिक पंड्या, लोकेश राहुलला बीसीसीआयची नोटीस
  • भारताचा ऑस्ट्रेलियात विक्रमी विजय भारताचा ऑस्ट्रेलियात विक्रमी विजय
  • पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक
  • कोहली, मीराबाईला खेलरत्न कोहली, मीराबाईला खेलरत्न

हवामान

दृष्टीक्षेपात

व्हिडीओ संग्रह

More in केरळ, राज्य (313 of 699 articles)

Kerala Flood
जिल्ह्यात अतिदक्षतेचा इशारा, वृत्तसंस्था तिरुवनंतपुरम्, १६ ऑगस्ट - केरळमध्ये एक आठवड्यापासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे आतापर्यंत ७७ जणांचा मृत्यू झाला ...

×