ads
ads
हिंदुत्वाचा विचार प्राचीन काळापासून

हिंदुत्वाचा विचार प्राचीन काळापासून

►संघाचा कुणीही शत्रू नाही • : सरसंघचालक मोहनजी भागवत…

अमित शाह यांचे नावही घेतले नव्हते

अमित शाह यांचे नावही घेतले नव्हते

►सीबीआयने घुसविल्याचा सोहराबुद्दिनच्या भावाचा दावा, वृत्तसंस्था नवी दिल्ली, १८…

संघ सर्वाधिक लोकशाही संघटना

संघ सर्वाधिक लोकशाही संघटना

►सरसंघचालक डॉ. मोहनजी भागवत यांचे स्पष्ट प्रतिपादन, वृत्तसंस्था नवी…

वैमानिकाने कौशल्याने ३७० प्रवाशांना वाचविले

वैमानिकाने कौशल्याने ३७० प्रवाशांना वाचविले

►एअर इंडियाच्या विमानातील इंधन आले होते संपत ►अमेरिकेच्या वादळाचाही…

रुपयातील घसरण किमान सात टक्के

रुपयातील घसरण किमान सात टक्के

►नाणेनिधीचा अंदाज ►नोटबंदी, जीएसटीमुळे विकासाला वेग, वृत्तसंस्था वॉशिंग्टन, १८…

पाकिस्तान व्यापारासाठी देणार भारत-अफगाणला भूमी

पाकिस्तान व्यापारासाठी देणार भारत-अफगाणला भूमी

वृत्तसंस्था मुंबई, १५ सप्टेंबर – भारत-अफगाणिस्तानने व्यापारासाठी पाकिस्तानची भूमी…

काँग्रेस, राकाँ नेत्यांच्या कारखान्यांकडे १२२४ कोटींचे थकित कर्ज

काँग्रेस, राकाँ नेत्यांच्या कारखान्यांकडे १२२४ कोटींचे थकित कर्ज

►सहकारी बँका अडचणीत ►नेत्यांना बजावली नोटिस, वृत्तसंस्था मुंबई, १८…

वित्त आयोगाचा निष्कर्ष सकारात्मक असेल

वित्त आयोगाचा निष्कर्ष सकारात्मक असेल

►अर्थमंत्री मुनगंटीवार यांना विश्‍वास, तभा वृत्तसेवा मुंबई, १८ सप्टेंबर…

जीएसटी कौन्सिलकडून राजकीय हेतूने निर्णय

जीएसटी कौन्सिलकडून राजकीय हेतूने निर्णय

►राष्ट्रवादी काँग्रेसची वित्त आयोगाकडे कैफीयत, तभा वृत्तसेवा मुंबई, १८…

रा.स्व.संघ : हिंदुबंधुत्वापासून विश्‍वबंधुत्वापर्यंत

रा.स्व.संघ : हिंदुबंधुत्वापासून विश्‍वबंधुत्वापर्यंत

॥ सारांश : ल.त्र्यं. जोशी | संघस्थापनेपासूनचा हा धावता…

साद समाजपुरुषाची!

साद समाजपुरुषाची!

॥ संवाद : सोमनाथ देशमाने | स्वातंत्र्यदिनाच्या दिवशी लाल…

गॉड आणि सैतान

गॉड आणि सैतान

॥ जागता पहारा : भाऊ तोरसेकर | कठुआ, उन्नाव…

मोरूच्या मावशीची ‘एक्झिट’

मोरूच्या मावशीची ‘एक्झिट’

मुंबईच्या गिरणगावाने अनेक कलाकार रंगभूमी आणि रुपेरी पडद्याला दिले,…

‘सिमरन’मधील नवीन गाणे प्रदर्शित

‘सिमरन’मधील नवीन गाणे प्रदर्शित

अभिनेत्री कंगना राणावत लवकरच सिमरन या चित्रपटाद्वारे प्रेक्षकांच्या भेटीला…

चिरंजीवीसोबत सिनेमा करण्यास ऐश्‍वर्याचा नकार?

चिरंजीवीसोबत सिनेमा करण्यास ऐश्‍वर्याचा नकार?

ऐश्‍वर्या राय बच्चनची सध्या बॉलीवूडमध्ये सेकंड इनिंग सुरू आहे.…

पंचांग
वार: | तिथी:
नक्षत्र: | राशी:
करण: | योग:
सूर्योदय: 06:15 | सूर्यास्त: 18:23
अयनांश:
Home » जम्मू-काश्मीर, राज्य » तीन चकमकींमध्ये आठ अतिरेक्यांचा खातमा

तीन चकमकींमध्ये आठ अतिरेक्यांचा खातमा

►एकाला जिवंत पडकले, १२ जवान जखमी,
वृत्तसंस्था
श्रीनगर, १३ सप्टेंबर –

Jammu Kashmir Map

Jammu Kashmir Map

जम्मू-काश्मिरातील बारामुल्ला व रियासी जिल्ह्यात, तसेच नियंत्रण रेषेवरील केरन सेक्टरमध्ये आज गुरुवारी झडलेल्या तीन वेगवेगळ्या चकमकींमध्ये सुरक्षा दलाच्या जवानांनी आठ अतिरक्यांचा खातमा केला, तर एकाला जिवंत पकडले आहे. हे सर्व अतिरेकी जैश-ए-मोहमदचे आणि लष्कर-ए-तोयबाचे असून, यात जैशच्या सर्वात वरिष्ठ कमांडरचाही समावेश आहे. या चकमकीत १२ जवानही जखमी झाले.
उत्तर काश्मीरच्या सोपोर शहरातील चिंकीपुरा भागात काही अतिरेकी आले असल्याची खात्रीलायक माहिती मिळाली होती. परिसरातील सर्व नागरिकांना सुरक्षित ठिकाणी हलविल्यानंतर सुरक्षा दलाच्या जवानांनी शोधमोहीम राबवली. एका ठिकाणी लपलेल्या अतिरेक्यांनी गोळीबार केला. यावेळी झडलेल्या चकमकीत तीन अतिरेकी ठार झाले. यात ठार झालेल्या जैशच्या कमांडरचे नाव अली आहे. या अतिरेक्यांजवळून मोठ्या प्रमाणात शस्त्र व स्फोटकांचा साठा ताब्यात घेण्यात आला, अशी माहिती पोलिस अधिकार्‍याने दिली. अली आणि झिया उल् रेहमान अशी या अतिरेक्यांची नावे आहेत.
या भागात आणखीही काही अतिरेकी लपले असून, त्यांच्या पळण्याचे मार्ग बंद करण्यासाठी जवानांनी संपूर्ण परिसराची नाकेबंदी केली आहे. सीआरपीएफ, राज्य पोलिस दल आणि राष्ट्रीय रायफल्सच्या जवानांनी ही मोहीम राबवली आहे, असे अधिकार्‍याने सांगितले. अतिरेकीविरोधी मोहिमेच्या काळात सोशय मीडियावर उठणार्‍या अफवा रोखण्यासाठी खबरदारीचा उपाय म्हणून बारामुल्ला जिल्ह्यातील इंटरनेट सेवा बंद करण्यात आली असून, शाळा आणि महाविद्यालये बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
रियासी जिल्ह्यातील चकमक
रियासी जिल्ह्यातील काकरियाल भागातील एका घरात जैश-ए-मोहम्मदचे तीन अतिरेकी लपले होते. याबाबतची माहिती मिळताच जवानांनी ड्रोन आणि हेलिकॉप्टरच्या माध्यमातून त्यांचा ठावठिकाणा आणि घरात कुणीही नागरिक नाही, हे निश्‍चित केले आणि मोहीम राबवली. या चकमकीत दोन अतिरेकी ठार झाले, तर एका अतिरेक्याला जिवंत अटक करण्यात आली. यात सात जवान आणि पाच पोलिस जखमी झाले, असे अधिकारी म्हणाला. कटरा येथील नारायण रुग्णालयात जवानांवर उपचार केले जात आहे, असे अधिकार्‍याने सांगितले.
नियंत्रण रेषेवर तिघांना कंठस्नान
नियंत्रण रेषेवरील केरान सेक्टरमधून घुसखोरी करणार्‍या अतिरेक्यांना लष्करी जवानांनी घेरले आणि शरण येण्याचा आदेश दिला, पण अतिरेक्यांनी गोळीबार केला. यावेळी झडलेल्या भीषण चकमकीत तीन अतिरेकी ठार झाले. या तिन्ही चकमकींमध्ये ठार झालेले अतिरेकी पाकिस्तानी नागरिक असून, ते जैश आणि तोयबाचे असल्याचे अधिकारी म्हणाला.
पाकी नागरिकाला अटक
दरम्यान, पूंछ जिल्ह्यातील नियंत्रण रेषेवरून भारतात घुसखोरी करणार्‍या एका पाकिस्तानी नागरिकाला लष्करी जवानांनी अटक केली आहे. रंगहार नल्ला भागात संशयास्पद हालचाली टिपल्यानंतर जवानांनी त्याला अटक केली. उमर युसुफ असे त्याचे नाव असून, तो गुलाम काश्मिरात राहातो. सीमेवर फिरत असताना अचानक तो भारतीय हद्दीत दाखल झाला होता. त्याला पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले असून, त्याच्याजवळ दोन ओळखपत्र आणि ५० रुपये आढळून आले, अशी माहिती लष्करी प्रवक्त्याने दिली.
पाच दिवसांपासून उपाशी होते
काकरियाल भागातील ज्याच्या घरात जैशच्या तीन अतिरेक्यांनी प्रवेश केला होता, ते तिघेही गेल्या पाच दिवसांपासून उपाशी होते. बुधवारी रात्री ते आमच्या घरात शिरले आणि आमच्याविषयी कुणाला काहीच सांगू नका, अशी धमकी दिली. भूक लागली असल्याने त्यांनी आम्हाला बिस्किट आणि फळे मागितली. त्यांचे कपडे फाटलेले होते. त्यांनी आमचे चांगले कपडे घातले आणि कारची व्यवस्था करण्यास सांगितले. त्या बदल्यात आम्हाला चांगली रक्कम देऊ केली. पण, आमच्याजवळ कार नव्हती. नंतर ते तिघेही घरातून बाहेर पडले. या घरातील एका सदस्यानेच ही माहिती दिली.

Posted by : | on : Sep 14 2018
Filed under : जम्मू-काश्मीर, राज्य.
You can follow any responses to this entry through the RSS 2.0You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Change Language: press Ctrl+g

हवामान

दृष्टीक्षेपात

व्हिडीओ संग्रह

More in जम्मू-काश्मीर, राज्य (9 of 781 articles)

Electioncommission Building1
►निवडणूक आयोगाची नोटिस ►मान्यता रद्द होण्याची शक्यता, वृत्तसंस्था नवी दिल्ली, ११ सप्टेंबर - [caption id="attachment_58421" align="alignleft" width="300"] Electioncommission Building1[/caption] निवडणूक ...

×