ads
ads
गोदावरी, कावेरी लवकरच जोडणार

गोदावरी, कावेरी लवकरच जोडणार

•नितीन गडकरी यांची घोषणा, अमरावती, २१ जानेवारी – दक्षिणेतील…

सिद्धगंगा मठाधीश शिवकुमार स्वामीजी यांचे निधन

सिद्धगंगा मठाधीश शिवकुमार स्वामीजी यांचे निधन

बंगळुरू, २१ जानेवारी – प्रख्यात गुरुवर्य आणि कर्नाटकच्या तुमकुरू…

कुंभात १ कोटी भाविकांचे संगम-स्नान

कुंभात १ कोटी भाविकांचे संगम-स्नान

प्रयागराज, २१ जानेवारी – पौष पौर्णिमेच्या पावन पर्वावर सुमारे…

आणिबाणी जाहीर करण्याची ट्रम्प यांची धमकी

आणिबाणी जाहीर करण्याची ट्रम्प यांची धमकी

►मेक्सिको सीमेवरील भिंतीचा वाद पेटणार, वॉशिंग्टन, १० जानेवारी –…

विक्रम मिस्री चीनमधील नवे राजदूत

विक्रम मिस्री चीनमधील नवे राजदूत

►पदभार स्वीकारताच केली द्विपक्षीय मुद्यांवर चर्चा, बीजिंग, ८ जानेवारी…

शटडाऊन सुरूच ठेवेन, आणिबाणीचाही पर्याय खुला

शटडाऊन सुरूच ठेवेन, आणिबाणीचाही पर्याय खुला

►डोनाल्ड ट्रम्प यांचा काँगे्रस सभागृहाला इशारा ►मेक्सिकोच्या सीमेवर भिंत…

डान्सबार बंदीसाठी नवा अध्यादेश

डान्सबार बंदीसाठी नवा अध्यादेश

मुंबई, १८ जानेवारी – राज्यातील डान्सबार पुन्हा सुरू करण्याचा…

समृद्धी महामार्गासाठी स्टेट बँक देणार ८५०० कोटींचे कर्ज

समृद्धी महामार्गासाठी स्टेट बँक देणार ८५०० कोटींचे कर्ज

►९५ टक्के भूसंपादन पूर्ण, मुंबई, १७ जानेवारी – स्टेट…

ओबीसी महामंडळांसाठी ७३६ कोटी!

ओबीसी महामंडळांसाठी ७३६ कोटी!

•तरुणांना मिळणार १० ते ५० लाखांचे कर्ज •सावित्रीबाई फुले…

भारताचा पुरुषार्थ प्रकट होण्यास…

भारताचा पुरुषार्थ प्रकट होण्यास…

॥ विशेष : डॉ. मनमोहन वैद्य | सह सरकार्यवाह,…

ऑगस्टा वेस्टलँड

ऑगस्टा वेस्टलँड

॥ चतुरस्त्र : स्वाती तोरसेकर | ऑगस्टा विषयाला हात…

तिसरी आघाडी की तीन आघाड्या?

तिसरी आघाडी की तीन आघाड्या?

॥ जागता पहारा : भाऊ तोरसेकर | भाजपा वा…

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

‘फोर्ब्स’ने नुकतीच सर्वाधिक कमाई करणार्‍या अभिनेत्यांच्या नावाची यादी जाहीर…

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

बॉलिवूडची बेबी डॉल म्हणजेच सनी लिओनीचे नाव इंटरनेटवर सर्वाधिक…

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

‘रेस- ३’ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये कमबॅक करणारा अभिनेता बॉबी देओल…

पंचांग
वार: | तिथी:
नक्षत्र: | राशी:
करण: | योग:
सूर्योदय: 07:01 | सूर्यास्त: 18:14
अयनांश:
Home » बंगाल, राज्य » तृणमूलमुळे बंगाल बंदला हिंसाचाराचे गालबोट

तृणमूलमुळे बंगाल बंदला हिंसाचाराचे गालबोट

काही काळासाठी रेल्वेसेवा प्रभावित,
कोलकाता, २६ सप्टेंबर –

Bjp West Bengal Protest

Bjp West Bengal Protest

उत्तर दिनाजपूर जिल्ह्यात पोलिसांनी गोळीबार करून दोन विद्यार्थ्यांना ठार केल्याच्या निषेधार्थ भाजपाने आज बुधवारी पुकारलेला १२ तासांचा बंद यशस्वी ठरला. मात्र, या बंदला विरोध करीत दंडेली करणार्‍या तृणमूल काँग्रेसने या बंदला हिंसाचाराचे गालबोट लावले.
वरिष्ठ मंत्री आणि तृणमूल काँग्रेसचे सरचिटणीस यांनी मात्र येथील परिस्थिती नियंत्रणात असून, जनजीवन सामान्य असल्याचा दावा केला. भाजपाच्या बंगाल बंदला पश्‍चिम मिदनापूर, पश्‍चिम बर्दवान, दक्षिण आणि उत्तर दिनाजपूर जिल्ह्यांमध्ये उत्स्फूर्त प्रतिसाद लाभत असल्याचे लक्षात येताच तृणमूल काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी दंडेली सुरू केली. बंदच्या समर्थनार्थ भाजपाने काढलेला शांततामय मोर्चा तृणमूलच्या कार्यकर्त्यांनी अडवला व भाजपच्या कार्यकर्त्यांना मारहाण केली. सध्या येथील परिस्थिती नियंत्रणात असल्याची माहिती पोलिसांनी दिली.
मिदनापूर जिल्ह्यात बसेसवर दगडफेक करून टायर जाळण्यात आले. हे कृत्य तृणमूल काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी केल्याचा आरोपही केला जात आहे. या ठिकाणची परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांची अतिरिक्त कुमक पाठवण्यात आली. येथील परिस्थितीही नियंत्रणात असल्याची माहिती पोलिस अधिकार्‍यांनी दिली.
बंदच्या समर्थनार्थ बंगालची राजधानी कोलकाता येथेही भाजपा नेत्यांनी मोर्चा काढला. या मोर्चामुळे धडकी भरलेल्या तृणमूल काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्यांना रस्त्यावर उतरून बंद मागे घेण्याबाबत आवाहन करावे लागले. बंगालमधील परिस्थितीवर आम्ही नजर ठेवून आहोत, असे तृणमूल काँग्रेसचे ज्येष्ठ नेते व मंत्री पार्थ चॅटर्जी यांनी सांगितले.
भाजपाच्या खासदार रूपा गांगुली यांनी गरियाहाट भागात मोर्चा काढून बंद ठेवला. तृणमूल काँग्रेसचे सरकार राज्यातील असंतोष दाबण्याचा प्रयत्न करीत असल्याचा आरोप त्यांनी यावेळी केला. भाजपाच्या बंगाल बंदला मिळालेल्या उत्स्फूर्त प्रतिसादामुळे राज्यातील पूर्व रेल्वे, दक्षिण-उत्तर रेल्वेचे वेळापत्रक काही काळासाठी बिघडले. मात्र, आंदोलकांनी संयम ठेवल्यामुळे येथे हिंसाचार झाला नाही, असे पोलिस अधिकार्‍यांनी सांगितले.
भाजपाच्या बंगाल बंदला तोंड देण्यासाठी कोलकाता येथे चोख पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला. बंदला तोडफोडीचे गालबोट लागलेले नाही, अशी माहिती येथील एका वरिष्ठ पोलिस अधिकार्‍याने दिली आहे. भाजपाने बंदची घोषणा केल्यावर बंदच्या दिवशी कार्यालयात हजर राहा, असा आदेश तृणमूल काँग्रेसने राज्य सरकारच्या कर्मचार्‍यांना दिले होते. दुसर्‍या दिवशी सुटी असल्याने बंदच्या दिवशी अर्ध्या दिवसाची सुटीही मिळणार नाही, असेही तृणमूलने सरकारी कर्मचार्‍यांना दिलेल्या आदेशात म्हटले होते.

Posted by : | on : 27 Sep 2018
Filed under : बंगाल, राज्य.
You can follow any responses to this entry through the RSS 2.0You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Change Language: press Ctrl+g

    छायाचित्रातून

  • भारताने ऑस्ट्रेलियात रचला इतिहास भारताने ऑस्ट्रेलियात रचला इतिहास
  • हार्दिक पंड्या, लोकेश राहुलला बीसीसीआयची नोटीस हार्दिक पंड्या, लोकेश राहुलला बीसीसीआयची नोटीस
  • भारताचा ऑस्ट्रेलियात विक्रमी विजय भारताचा ऑस्ट्रेलियात विक्रमी विजय
  • पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक
  • कोहली, मीराबाईला खेलरत्न कोहली, मीराबाईला खेलरत्न

हवामान

दृष्टीक्षेपात

व्हिडीओ संग्रह

More in बंगाल, राज्य (213 of 650 articles)


२६ सप्टेंबर - काश्मीरमध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होऊ नयेत म्हणून दहशतवाद्यांनी आणि फुटीरतावाद्यांनी घातपाताच्या धमक्या दिल्या आहेत. येथे उमेदवारी ...

×