ads
ads
काँग्रेससाठी राष्ट्रीय सुरक्षा म्हणजे आर्थिक स्रोत

काँग्रेससाठी राष्ट्रीय सुरक्षा म्हणजे आर्थिक स्रोत

►पंतप्रधान मोदी यांचा जोरदार हल्ला, नवी दिल्ली, १५ डिसेंबर…

गप्पा तरुणाईच्या, संधी वृद्धांना!

गप्पा तरुणाईच्या, संधी वृद्धांना!

►राहुल गांधींच्या ‘गप्पां’चा फुगा फुटला, नवी दिल्ली, १५ डिसेंबर…

हिजबुलच्या तीन अतिरेक्यांचा खातमा

हिजबुलच्या तीन अतिरेक्यांचा खातमा

►स्थानिक नागरिकांचा जवानांसोबत संघर्ष ►दगडफेक करणारे आठ नागरिक गोळीबारात…

महिंद राजपक्षे यांचा राजीनामा

महिंद राजपक्षे यांचा राजीनामा

►विक्रमासिंघे यांचा आज शपथविधी, कोलंबो, १५ डिसेंबर – वादग्रस्त…

अनिवासी भारतीयांमुळे वाढला परकीय चलनाचा ओघ

अनिवासी भारतीयांमुळे वाढला परकीय चलनाचा ओघ

वॉशिंग्टन, १३ डिसेंबर – विदेशी चलन भारतात पाठविण्यामध्ये पुन्हा…

मध्यम पल्ल्याच्या क्षेपणास्त्र चाचणीबाबत इराणचा दुजोरा

मध्यम पल्ल्याच्या क्षेपणास्त्र चाचणीबाबत इराणचा दुजोरा

तेहरान, ११ डिसेंबर – पाश्‍चात्त्य देशांनी व्यक्त केलेल्या तीव्र…

राज्यात जानेवारीमध्ये शिक्षक मेगाभरती

राज्यात जानेवारीमध्ये शिक्षक मेगाभरती

►सरकारी हालचालींना वेग, मुंबई, १३ डिसेंबर – राज्यात येत्या…

कोल्हापूरच्या अंबाबाईची मूर्ती बदला

कोल्हापूरच्या अंबाबाईची मूर्ती बदला

►भाविकांचे जिल्हाधिकार्‍यांना निवेदन, कोल्हापूर,१३ डिसेंबर – करवीर निवासिनी श्री…

राज्यात गृहनिर्माण विकास महामंडळाची स्थापना

राज्यात गृहनिर्माण विकास महामंडळाची स्थापना

►३८४ शहरात १९.४० लाख घरकुलांचे निर्माण, मुंबई, १३ डिसेंबर…

काय हुकले; कोण चुकले?

काय हुकले; कोण चुकले?

॥ कटाक्ष : गजानन निमदेव | देशाचा पुढला पंतप्रधान…

बूँद से जो गयी, वह कभी नहीं आयेगी

बूँद से जो गयी, वह कभी नहीं आयेगी

॥ मानसरंग : मयुरेश डंके | एखाद्या गोष्टीचा दूरवर…

गांधी, उपाध्याय, लोहियांचे स्वप्न साकार करणारे गडकरी

गांधी, उपाध्याय, लोहियांचे स्वप्न साकार करणारे गडकरी

॥ विशेष : धनंजय बापट | नितीनजींचा देशात, जगात…

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

‘फोर्ब्स’ने नुकतीच सर्वाधिक कमाई करणार्‍या अभिनेत्यांच्या नावाची यादी जाहीर…

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

बॉलिवूडची बेबी डॉल म्हणजेच सनी लिओनीचे नाव इंटरनेटवर सर्वाधिक…

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

‘रेस- ३’ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये कमबॅक करणारा अभिनेता बॉबी देओल…

पंचांग
वार: | तिथी:
नक्षत्र: | राशी:
करण: | योग:
सूर्योदय: 06:52 | सूर्यास्त: 17:54
अयनांश:
Home » जम्मू-काश्मीर, राज्य » तोयबाच्या पाच अतिरेक्यांचा खातमा

तोयबाच्या पाच अतिरेक्यांचा खातमा

सुरक्षा जवानांची मोठी कामगिरी,
वृत्तसंस्था
श्रीनगर, ४ ऑगस्ट –
जम्मू-काश्मीरच्या शोपियाँ जिल्ह्यात सुरक्षा दलाच्या जवानांनी आज शनिवारी धडक कारवाई करीत लष्कर-ए-तोयबाच्या पाच अतिरेक्यांना यमसदनी धाडले. यात तोयबाचा जिल्हा कमांडर उमर मलिकाचाही समावेश आहे.
शुक्रवारी बारामुल्ला जिल्ह्यातील दुरसू गावात दोन अतिरेक्यांना ठार केल्यानंतर जवळच असलेल्या शोपियाँ जिल्ह्यातील किलोरा गावातही तोयबाचे काही अतिरेकी आले असल्याची माहिती मिळाली होती. त्यानंतर लष्कर, सीआरपीएफ आणि पोलिसांनी संयुक्त मोहीम उघडली, पण रात्र झाल्याने जवानांनी वेढा कायम ठेवताना, मोहीम थांबवली होती. आज पहाटे अतिरेक्यांना इशारा देण्यासाठी जवानांनी आधी हवेत गोळीबार केला. आपण वेढल्या गेलो असल्याचे लक्षात आल्यानंतर अतिरेक्यांनी जवानांच्या दिशेने बेछुट गोळीबार केला. यावेळी झडलेल्या चकमकीत पाच अतिरेक्यांना ठार मारण्यात आले, अशी माहिती लष्कराच्या वरिष्ठ अधिकार्‍याने दिली.
या भागात आणखीही काही अतिरेकी लपले असून, त्यांनाही ठार मारण्यासाठी जवानांनी चहूबाजूंनी नाकेबंदी केली आहे. चकमकीत ठार झालेल्या अतिरेक्यांची ओळख पटली असून, उमर नझीर मलिक, वकार अहमद शेख, ऐजाज अहमद पॉल, अर्शद अहमद खान आणि आरिफ अहमद मिर अशी त्यांची नावे आहेत. इतर तिघांची ओळख पटली नाही. चारही अतिरेक्यांचे मृतदेह आणि एके रायफल्स ताब्यात घेण्यात आली, असे अधिकारी म्हणाला.
जवानांवर दगडफेक, कारवाईत दोन ठार
शोपियाँ जिल्ह्यात चकमक सुरू असताना, अतिरेक्यांचे रक्षण करण्यासाठी स्थानिक नागरिकांनी जवानांवर जोरदार दगडफेक केली. त्यामुळे जवानांनाही बळाचा वापर करावा लागला. यात दोन नागरिक ठार तर दहा नागरिक जखमी झाले आहेत. दगडफेक करणार्‍या नागरिकांना पांगविण्यासाठी जवानांनी पेलेट गन्सचा मारा करण्यासोबतच हवेत गोळीबारही केला. जखमींमध्ये चौघांची स्थिती गंभीर असल्याचे सांगण्यात आले.
जवानांवर पेट्रोल बॉम्बही फेकले
अतिरेकी समर्थक नागरिकांनी जवानांना गोळीबारापासून थांबविण्यासाठी पेट्रोल बॉम्बही फेकले. तथापि, यात कोणत्याही जवानाला इजा झाली नाही, अशी माहिती अधिकार्‍याने दिली. दरम्यान, शुक्रवारी ठार झालेल्या अतिरेक्यांच्या अंत्यसंस्कारातही नागरिकांनी जवानांवर दगडफेक केली. यामुळे जवानांना पुन्हा गोळीबार करावा लागला. यात एक नागरिक ठार झाल्याची माहिती आहे. बिलाल अहमद असे त्याचे नाव असल्याचे सांगण्यात आले.

Posted by : | on : 5 Aug 2018
Filed under : जम्मू-काश्मीर, राज्य.
You can follow any responses to this entry through the RSS 2.0You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Change Language: press Ctrl+g

    छायाचित्रातून

  • भारताचा ऑस्ट्रेलियात विक्रमी विजय भारताचा ऑस्ट्रेलियात विक्रमी विजय
  • पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक
  • कोहली, मीराबाईला खेलरत्न कोहली, मीराबाईला खेलरत्न
  • अमित पांघळला बॉक्सिंगचे सुवर्ण अमित पांघळला बॉक्सिंगचे सुवर्ण
  • तेजिंदरपालला सुवर्णपदक तेजिंदरपालला सुवर्णपदक

हवामान

दृष्टीक्षेपात

व्हिडीओ संग्रह

More in जम्मू-काश्मीर, राज्य (229 of 720 articles)


शाह यांचा घणाघात ►राजस्थानमध्ये गौरव यात्रेचा शुभारंभ, वृत्तसंस्था राजसमंद, ४ ऑगस्ट - राहुल गांधी केंद्र सरकारच्या चार वर्षांचा हिशेब मागत ...

×