ads
ads
वढेरांची विदेशातही संपत्ती; ईडीला आढळले पुरावे

वढेरांची विदेशातही संपत्ती; ईडीला आढळले पुरावे

►काँग्रेसला जोरदार दणका, नवी दिल्ली, ८ डिसेंबर – काँग्रेसच्या…

पूर्णत्वाचे प्रमाणपत्र असलेल्या फ्लॅटसवर जीएसटी नाही

पूर्णत्वाचे प्रमाणपत्र असलेल्या फ्लॅटसवर जीएसटी नाही

►अर्थमंत्रालयाची घोषणा, खरेदीदारांना दिलासा, नवी दिल्ली, ८ डिसेंबर –…

घुसखोरांसाठी भारत धर्मशाळा नाही : अमित शाह

घुसखोरांसाठी भारत धर्मशाळा नाही : अमित शाह

नवी दिल्ली, ८ डिसेंबर – या देशातील प्रत्येक संसाधनांवर…

भारत, अमेरिका संरक्षण क्षेत्रात जागतिक भागीदार

भारत, अमेरिका संरक्षण क्षेत्रात जागतिक भागीदार

►निर्मला सीतारामन यांच्या पाच दिवसांच्या दौर्‍याची सांगता, वॉशिंग्टन, ८…

तेल कपातीपूर्वी ओपेक घेणार नरेंद्र मोदींचा सल्ला

तेल कपातीपूर्वी ओपेक घेणार नरेंद्र मोदींचा सल्ला

►सौदी अरबचे तेलमंत्री खालिद अल फलिह यांची माहिती ►ट्रम्प…

भारताविरुद्ध पाक अजूनही तालिबानचा वापर करतो

भारताविरुद्ध पाक अजूनही तालिबानचा वापर करतो

►अमेरिकन कमांडरचा स्पष्ट आरोप, वॉशिंग्टन, ५ डिसेंबर – भारताविरोधात…

दुष्काळ निवारणासाठी आठ हजार कोटी हवे

दुष्काळ निवारणासाठी आठ हजार कोटी हवे

►मुख्यमंत्री फडणवीस यांची केंद्राकडे मागणी, नवी दिल्ली, ७ डिसेंबर…

भाजपा-सेनेत ‘मिले सूर मेरा तुम्हारा’

भाजपा-सेनेत ‘मिले सूर मेरा तुम्हारा’

►मुख्यमंत्र्यांचा उद्धव ठाकरे यांच्या गाडीतून प्रवास •►दोन्ही नेत्यांचे नगारा…

मराठा आरक्षण कायद्याला स्थगिती नाही : उच्च न्यायालय

मराठा आरक्षण कायद्याला स्थगिती नाही : उच्च न्यायालय

►पुढील सुनावणी १० डिसेंबरला, मुंबई, ५ डिसेंबर – राज्यपालांच्या…

हिंदूंनी कुठपर्यंत प्रतीक्षा करायची?

हिंदूंनी कुठपर्यंत प्रतीक्षा करायची?

॥ विशेष : आशुतोष अडोणी | श्रीरामजन्मभूमीवरील भव्य मंदिर…

काँग्रेसमुक्त भारत अंतीम टप्प्यात!

काँग्रेसमुक्त भारत अंतीम टप्प्यात!

॥ संवाद : सोमनाथ देशमाने | राहुल भोवती संशयाचे…

उथळ पाण्याचा खळखळाट

उथळ पाण्याचा खळखळाट

॥ जागता पहारा : भाऊ तोरसेकर | ही जागरुकता…

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

‘फोर्ब्स’ने नुकतीच सर्वाधिक कमाई करणार्‍या अभिनेत्यांच्या नावाची यादी जाहीर…

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

बॉलिवूडची बेबी डॉल म्हणजेच सनी लिओनीचे नाव इंटरनेटवर सर्वाधिक…

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

‘रेस- ३’ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये कमबॅक करणारा अभिनेता बॉबी देओल…

पंचांग
वार: | तिथी:
नक्षत्र: | राशी:
करण: | योग:
सूर्योदय: 06:48 | सूर्यास्त: 17:51
अयनांश:
Home » मध्य प्रदेश-छत्तीसगड, राज्य » नऊ नक्षल्यांचा खातमा

नऊ नक्षल्यांचा खातमा

►छत्तीसगडमध्ये जवानांची मोठी कामगिरी,
रायपूर, १३ ऑक्टोबर –

Maoist Naxal

Maoist Naxal

छत्तीसगडच्या बिजापूर जिल्ह्यातील एका दुर्गम गावात सुरक्षा दलाचे जवान आणि जिल्हा पोलिसांनी आज शनिवारी नऊ नक्षलवाद्यांना एका भीषण चकमकीत ठार केले.
बिजापूर पोलिस ठाण्याच्या हद्दीत येणार्‍या चेरपाल गावात पोलिस कर्मचारी गस्त घालत असताना, लपलेल्या नक्षलवाद्यांनी त्यांच्यावर गोळीबार केला. यात तो जखमी झाला. जवळच सीआरपीएफ आणि जिल्हा राखीव दलाचे जवान होते. गोळीबाराचा आवाज ऐकून जवानांनी धाव घेतली. यावेळी झडलेल्या भीषण चकमकीत नऊ नक्षलवादी ठार झाले, अशी माहिती बिजापूरच्या पोलिस अधीक्षकांनी वृत्तसंस्थेला दिली.
या गावात आज शनिवारी आठवडी बाजार भरतो. या बाजारात नक्षलवादी हल्ला करण्याची शक्यता असल्याने बाजाराच्या दिवशी तिथे जवान तैनात असतात. गोळीबाराच्या आवाजानंतर नक्षलवादी आले असल्याची खात्री जवानांना झाली आणि ही चकमक झडली, असे त्यांनी सांगितले.
बाजारात शेकडो नागरिक आले असल्याने त्यांना कुठलीही इजा होणार नाही, याची काळजी घेत जवानांनी आपली मोहीम यशस्वी केली. नक्षलवाद्यांची संख्या सुमारे १५ च्या घरात होती. तथापि, आपले नऊ साथीदार मारले गेल्याने उर्वरित नक्षल्यांनी गर्दीचा फायदा घेत पळ काढला. चकमकीची माहिती मिळताच सीआरपीएफ आणि पोलिसांची अतिरिक्त कुमकही घटनास्थळी दाखल झाली असून, पळालेल्या नक्षल्यांचा शोध घेण्यासाठी व्यापक मोहीम उघडण्यात आली आहे, असे ते म्हणाले.
जखमी पोलिसाला रायपूर येथील शासकीय रुग्णालयात भरती करण्यात आले असून, त्याची प्रकृती धोक्याबाहेर असल्याची माहिती आहे. ठार झालेल्या नक्षल्यांची ओळख अद्याप पटलेली नाही. त्यांच्याजवळून रायफल्स आणि अन्य शस्त्रसाठा ताब्यात घेण्यात आला आहे, असे त्यांनी सांगितले.
तीन नक्षलवादी शरण
दरम्यान, तीन नक्षलवाद्यांनी आज सुकमा जिल्ह्यात शरणागती पत्करली. या तिघांवरही प्रत्येकी आठ लाख रुपयांचे बक्षीस ठेवण्यात आले होते. नक्षली चळवळ आपल्या सिद्धांतावरून भरकटल्यामुळे आम्ही शरण येण्याचा निर्णय घेतला, असे त्यांनी पोलिसांना सांगितले.
हिजबुल अतिरेकी ठार
श्रीनगर : दक्षिण काश्मीरच्या पुलवामा जिल्ह्यात सुरक्षा दलाच्या जवानांनी आज शनिवारी सकाळी हिजबुल मुजाहिदीनच्या एका अतिरेक्याला यमसदनी धाडले. घटनास्थळावरून शस्त्र व स्फोटकांचा मोठा साठा ताब्यात घेण्यात आला आहे.
पुलवामा जिल्ह्यातील बाबगुंड भागात काही अतिरेकी आले असल्याची माहिती जवानांना शुक्रवारी मिळाली होती. त्यानंतर जवानांनी स्थानिक पोलिसांच्या सहकार्याने या भागात शोधमोहीम हाती घेतली होती. अतिरेकी नेमके कुठे आहेत, हे निश्‍चित केल्यानंतर जवानांनी रात्रभर वेढा दिला. आज सकाळी जवानांना पाहताच अतिरेक्यांनी गोळीबार केला. यावेळी झडलेल्या चकमकीत एक अतिरेकी ठार झाला, अशी माहिती पोलिस अधिकार्‍याने दिली. साबिर अहमद दार असे या अतिरेक्याचे नाव आहे.
पोलिस शहीद
दरम्यान, बारामुल्ला जिल्ह्यातील सोपोर शहरात अतिरेक्यांनी केलेल्या हल्ल्यात एक पोलिस शहीद झाला. जावेद अहमद लोन असे पोलिसाचे नाव असून, काही अतिरेकी शुक्रवारी रात्री त्यांच्या घरात घुसले आणि गोळीबार केला.

Posted by : | on : 14 Oct 2018
Filed under : मध्य प्रदेश-छत्तीसगड, राज्य.
You can follow any responses to this entry through the RSS 2.0You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Change Language: press Ctrl+g

    छायाचित्रातून

  • पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक
  • कोहली, मीराबाईला खेलरत्न कोहली, मीराबाईला खेलरत्न
  • अमित पांघळला बॉक्सिंगचे सुवर्ण अमित पांघळला बॉक्सिंगचे सुवर्ण
  • तेजिंदरपालला सुवर्णपदक तेजिंदरपालला सुवर्णपदक
  • महाराष्ट्राच्या राहीचा सुवर्णभेद महाराष्ट्राच्या राहीचा सुवर्णभेद

हवामान

दृष्टीक्षेपात

व्हिडीओ संग्रह

More in मध्य प्रदेश-छत्तीसगड, राज्य (118 of 705 articles)

Mahanadi Titli Flood
मदत छावण्यांमध्ये घेतला लाखो लोकांनी आश्रय, भुवनेश्‍वर, १३ ऑक्टोबर - ओडिशाच्या तीन जिल्ह्यांमध्ये तितली चक्रीवादळाचे थैमान अजूनही सुरूच असून, गजापती ...

×