ads
ads
नक्षल समर्थकांच्या पत्रातील ‘तो’ क्रमांक दिग्विजयसिंहांचाच

नक्षल समर्थकांच्या पत्रातील ‘तो’ क्रमांक दिग्विजयसिंहांचाच

►पुणे पोलिसांची पुष्टी, चौकशी होणार, पुणे, १९ नोव्हेंबर –…

अटकाने, लटकाने, भटकानेवाल्या संस्कृतीमुळे देशाचे नुकसान

अटकाने, लटकाने, भटकानेवाल्या संस्कृतीमुळे देशाचे नुकसान

►पंतप्रधान मोदी यांचा जोरदार पलटवार, नवी दिल्ली, १९ नोव्हेंबर…

आरबीआय मंडळाची नऊ तास वादळी बैठक

आरबीआय मंडळाची नऊ तास वादळी बैठक

►अनेक मुद्यांवर समझोत्याचे संकेत, मुंबई, १९ नोव्हेंबर – केंद्र…

काश्मीर पाकिस्तानचेच शाहिद आफ्रिदीची सारवासारव

काश्मीर पाकिस्तानचेच शाहिद आफ्रिदीची सारवासारव

इस्लामाबाद, १८ नोव्हेंबर – पाकिस्तानमधील राज्यकर्त्यांना देशाचा भाग असलेले…

अमेरिका भारताला देणार २४ पाणबुडीभेदी हेलिकॉप्टर्स

अमेरिका भारताला देणार २४ पाणबुडीभेदी हेलिकॉप्टर्स

►२०० अब्ज डॉलर्सचा व्यवहार, वॉशिंग्टन, १७ नोव्हेंबर – चीन…

मल्ल्यासाठी तिहारच योग्य

मल्ल्यासाठी तिहारच योग्य

►ब्रिटनच्या न्यायालयाचे शिक्कामोर्तब, लंडन, १७ नोव्हेंबर – सार्वजनिक आणि…

विधानसभा कामकाजास ‘वंदे मातरम’ने सुरुवात

विधानसभा कामकाजास ‘वंदे मातरम’ने सुरुवात

मुंबई, १९ नोव्हेंबर – महाराष्ट्र विधानसभेच्या हिवाळी अधिवेशनाच्या कामकाजास…

मराठा आरक्षणावर उद्या हायकोर्टात सुनावणी

मराठा आरक्षणावर उद्या हायकोर्टात सुनावणी

मुंबई, १९ नोव्हेंबर – मराठा आरक्षणाचा प्रश्‍न तातडीने निघाली…

मराठा समाजाला स्वतंत्र प्रवर्गात आरक्षण

मराठा समाजाला स्वतंत्र प्रवर्गात आरक्षण

►अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला मुख्यमंत्री फडणवीस यांची घोषणा ►मागासवर्ग आयोगाच्या तिन्ही…

तापमानवाढीचा धोका वाढतोय

तापमानवाढीचा धोका वाढतोय

॥ विशेष : अ‍ॅड. गिरीश राऊत | विकास पृथ्वीची…

अपनी अकल लगाओ!

अपनी अकल लगाओ!

॥ मानसरंग : मयुरेश डंके | गेटवे ऑफ इंडिया,…

राफेल सुनावणी : अर्धे नुकसान, अर्धा फायदा

राफेल सुनावणी : अर्धे नुकसान, अर्धा फायदा

॥ सारांश : ल.त्र्यं. जोशी | एक बाब मात्र…

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

‘फोर्ब्स’ने नुकतीच सर्वाधिक कमाई करणार्‍या अभिनेत्यांच्या नावाची यादी जाहीर…

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

बॉलिवूडची बेबी डॉल म्हणजेच सनी लिओनीचे नाव इंटरनेटवर सर्वाधिक…

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

‘रेस- ३’ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये कमबॅक करणारा अभिनेता बॉबी देओल…

पंचांग
वार: | तिथी:
नक्षत्र: | राशी:
करण: | योग:
सूर्योदय: 06:36 | सूर्यास्त: 17:48
अयनांश:
Home » ईशान्य भारत, राज्य » नागा बंडखोरांनी सोडली ‘ग्रेटर नागालॅण्ड’ची मागणी

नागा बंडखोरांनी सोडली ‘ग्रेटर नागालॅण्ड’ची मागणी

►दोन दशकांच्या चर्चेचे फलित,
वृत्तसंस्था
नवी दिल्ली, ३१ ऑगस्ट –
जवळपास २० वर्षांपासून होत असलेल्या चर्चेनंतर नागा बंडखोरांनी ग्रेटर नागालॅण्ड किंवा नागालिमची मागणी सोडण्यावर सहमती दर्शवली आहे. शेजारी राज्यांच्या सीमांना स्पर्श न करण्यावरही केंद्र सरकारसोबत झालेल्या या चर्चेदरम्यान सहमती झाली आहे.
घटनात्मक चौकटीमध्ये काही स्थानिक बदल करून नागा नागरिकांना विशेष दर्जा देण्याबाबत केंद्र सरकार प्रयत्न करीत आहे. याव्यतिरिक्त शेजारी राज्यांमध्ये वास्तव्य करणार्‍या नागा नागरिकांसाठी काही विशेष सोयीसुविधा निर्माण करण्याचा प्रयत्नही केंद्राकडून केला जाणार आहे.
शेजारी राज्यांमध्ये राहणार्‍या नागांच्या एकत्रीकरणाची मागणी आतापर्यंत एनएससीएन (आय-एम) संघटनेनी केली होती. मात्र, आता त्यांनी आपली मागणी मागे घेतली आहे, अशी माहिती केंद्राचे वार्ताकार आर. एन. रवि यांनी संसदीय कार्यसमितीला दिली. याऐवजी नागा जिथे आहेत तिथेच त्यांच्यासाठी विशेष व्यवस्था केली जाणार आहे. नागा आणि केंद्र सरकारसाठी संवेदनशील असलेल्या प्रतीकात्मक मुद्यांवर या वाटाघाटी झाल्या. त्यातून दोन्ही पक्षांना मान्य असलेला तोडगा काढण्यात आला, असे रवि यांनी सांगितले. केंद्र सरकारने नागालॅण्ड सरकार व अन्य तीन भागधारकांसोबत सत्ता वाटपाचा तपशीलवार विचार केला आहे, असेही त्यांनी सांगितले.
वार्ताकारांनी या व्यापक स्थितीबाबत समितीला माहिती दिली असून, ही चर्चा निर्णायक स्थितीत आल्याचे सांगितले. कोणत्याही राज्याची सीमा बदलली जाणार नाही किंवा बदलणारही नाही, असेही सांगण्यात आले आहे. अन्य गट चर्चेत सहभागी झाल्यास चर्चेतून बाहेर पडण्याचा इशारा एनएससीएनने (आय-एम) दिल्याने, केंद्र सरकारसमोर एनएससीएनसोबत (आय-एम) लहान सशस्त्र गटांच्या एकत्रीकरणाचे आव्हान होते, असे रवि यांनी सांगितले. या चर्चेत सहभागी होण्याचा प्रयत्न लहान सशस्त्र गट करीत होते. त्यामुळे चर्चेमध्ये त्यांचा समावेश करणेही आवश्यक होते, असे त्यांनी सांगितले. मागील वर्षभरात सरकारला यामध्ये यश मिळाले. नागालॅण्डमधील सहा सशस्त्र गट एकत्र येऊन शांतता प्रक्रियेत सहभागी झाले. मात्र, शांतता प्रक्रियेत सहभागी न झालेल्या एनएससीएन (के) गटाने २०१५ मध्ये शस्त्रसंधीचा भंग केला. आराखडा-करारनामा कराराच्या रूपरेषेप्रमाणे तयार करण्यात आला नाही, अशी माहिती त्यांनी समितीला दिली. हा आराखडा-करारनामा नागांच्या अद्वितीय इतिहासाला मान्यता देणारा असावा आणि नागांच्या इतिहासातील वैशिष्ट्य लक्षात घेऊन भारतीय संघराज्यातील सर्वसमावेशक करार असावा, अशी या संघटनेची मागणी होती.
केंद्र सरकार आणि एनएससीएन (आय-एम) यांनी आराखडा-करारनाम्यावर स्वाक्षरी केली. ही मूळ कराराची पायाभरणी होती. भारत सरकार एनएससीएनसोबत (आय-एम) मागील २० वर्षांपासून चर्चा करीत आहे. नागा हे भारतीय नाहीत, ते सार्वभौम आहेत, या तथ्यावरच करार करण्याच्या मुद्यावर ही संघटना अडून होती, असे रवि यांनी सांगितले. त्यानंतर नागांना विशेष व्यवस्था करून देण्याच्या मुद्यावर करार करण्यात आला. ही विशेष व्यवस्था कोणती, असा प्रश्‍न त्यांना विचारला असता, घटनेच्या कलम ३७१ ए प्रमाणे नागा हे विशेष असून, त्यांना विशेष दर्जा देण्यात येईल. याच दर्जानुसार काही बदल करून शेजारच्या राज्यांमध्ये राहणार्‍या नागांनाही हाच दर्जा देण्यात येईल, असे त्यांनी सांगितले. या करारातील तरतुदींनुसार मणिपूर, अरुणाचलप्रदेश आणि आसाममध्ये वास्तव्य करणार्‍या नागांसाठी याचे फायदे लागू राहतील, असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.

https://tarunbharat.org/?p=60981
Posted by : | on : 1 Sep 2018
Filed under : ईशान्य भारत, राज्य.
You can follow any responses to this entry through the RSS 2.0You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Change Language: press Ctrl+g

    छायाचित्रातून

  • पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक
  • कोहली, मीराबाईला खेलरत्न कोहली, मीराबाईला खेलरत्न
  • अमित पांघळला बॉक्सिंगचे सुवर्ण अमित पांघळला बॉक्सिंगचे सुवर्ण
  • तेजिंदरपालला सुवर्णपदक तेजिंदरपालला सुवर्णपदक
  • महाराष्ट्राच्या राहीचा सुवर्णभेद महाराष्ट्राच्या राहीचा सुवर्णभेद

हवामान

दृष्टीक्षेपात

व्हिडीओ संग्रह

More in ईशान्य भारत, राज्य (134 of 669 articles)

Madras High Court
संस्कृतीची लागण ►मद्रास उच्च न्यायालयाचा आदेश, वृत्तसंस्था चेन्नई, ३० ऑगस्ट - राष्ट्रीय महामार्गावरच्या सर्व टोल नाक्यांवर विद्यमान न्यायाधीश आणि अतिमहत्त्वाच्या ...

×