ads
ads
साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांचे ते विधान भाजपाने नाकारले

साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांचे ते विधान भाजपाने नाकारले

नवी दिल्ली, १९ एप्रिल – शहीद हेमंत करकरे यांच्यासंदर्भात…

रोहित शेखर तिवारी यांचा मृत्यू संशयास्पद

रोहित शेखर तिवारी यांचा मृत्यू संशयास्पद

•खुनाचा गुन्हा दाखल, नवी दिल्ली, १९ एप्रिल – उत्तरप्रदेश…

दुसर्‍या टप्प्यात ६६ टक्के मतदान लोकसभा निवडणूक

दुसर्‍या टप्प्यात ६६ टक्के मतदान लोकसभा निवडणूक

•कुठलीही अप्रिय घटना नाही, नवी दिल्ली, १८ एप्रिल –…

१८ वर्षीय तरुणीला मदरशामध्ये जिवंत जाळले

१८ वर्षीय तरुणीला मदरशामध्ये जिवंत जाळले

•प्राचार्याविरुद्ध केली लैंगिक छळाची तक्रार •बांगलादेशातील काळिमा फासणारी घटना,…

रशिया, ट्रम्प यांच्या प्रचारकांमध्ये संगनमत नसल्याचा दावा

रशिया, ट्रम्प यांच्या प्रचारकांमध्ये संगनमत नसल्याचा दावा

वॉशिंग्टन, १९ एप्रिल – अमेरिकी अध्यक्षपदाच्या २०१६ मधील निवडणुकीत…

पाकिस्तानमध्ये १४ प्रवाशांना घातल्या गोळ्या

पाकिस्तानमध्ये १४ प्रवाशांना घातल्या गोळ्या

कराची, १८ एप्रिल – पाकिस्तानातील बलुचिस्तान प्रांतात एका महामार्गावर…

प्रियांका चतुर्वेदी शिवसेनेत

प्रियांका चतुर्वेदी शिवसेनेत

•व्यथित अंत:करणाने काँग्रेसचा राजीनामा, नवी दिल्ली/मुंबई, १९ एप्रिल –…

…तर नेत्याला रॉकेटवर बांधून पाठवले असते!

…तर नेत्याला रॉकेटवर बांधून पाठवले असते!

•मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा घणाघात, नगर, १६ एप्रिल –…

काँग्रेस हा गाढवांचा पक्ष : प्रकाश आंबेडकर

काँग्रेस हा गाढवांचा पक्ष : प्रकाश आंबेडकर

सोलापूर, १४ एप्रिल – काँग्रेस हा गाढवांचा पक्ष असल्याची…

विरोधकांनी केली मोदीकेंद्रित निवडणूक!

विरोधकांनी केली मोदीकेंद्रित निवडणूक!

॥ विशेष : विश्‍वास पाठक | जिथे जिथे समाजवादी…

मोदी सरकारला श्रेय का नको?

मोदी सरकारला श्रेय का नको?

॥ प्रासंगिक : विजय चौथाईवाले | भारत हा परंपरेने…

प्रतिमा आणि प्रतिकांची लढाई

प्रतिमा आणि प्रतिकांची लढाई

॥ जागता पहारा : भाऊ तोरसेकर | उलट मोदी…

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

‘फोर्ब्स’ने नुकतीच सर्वाधिक कमाई करणार्‍या अभिनेत्यांच्या नावाची यादी जाहीर…

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

बॉलिवूडची बेबी डॉल म्हणजेच सनी लिओनीचे नाव इंटरनेटवर सर्वाधिक…

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

‘रेस- ३’ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये कमबॅक करणारा अभिनेता बॉबी देओल…

पंचांग
वार: | तिथी:
नक्षत्र: | राशी:
करण: | योग:
सूर्योदय: 06:08 | सूर्यास्त: 18:42
अयनांश:
Home » केरळ, राज्य » पूर ओसरला; केरळला आता रोगराईचा धोका

पूर ओसरला; केरळला आता रोगराईचा धोका

पुनर्वसन मोठी समस्या,
वृत्तसंस्था
तिरुवनंतपुरम्, २० ऑगस्ट –

Weather Flash Flood And Landslide Kerala

Weather Flash Flood And Landslide Kerala

केरळात गेल्या दोन दिवसांपासून पाऊस जवळजवळ थांबलेला आहे. काही भागात तुरळक सरी वगळता कुठेही पावसाचा जोर आढळून आला नसला, तरी आता ठिकठिकाणी साचलेले पाणी आणि घाणीच्या साम्राज्यामुळे केरळला आता संसर्गजन्य रोगांचा धोका निर्माण झाला आहे.
केरळच्या सर्वच भागांमध्ये घाण आणि दुर्गंधी पसरली आहे. एकीकडे अजूनही पुराच्या पाण्यात अडकलेल्या नागरिकांना वाचविण्यासाठी प्रशासनाचे शर्थीचे प्रयत्न सुरू असताना, संसर्गजन्य रोगांचाही उद्रेक सुरू झाला आहे. यामुळे रोगाच्या विळख्यातून लोकांना वाचविण्यासाठी राज्य प्रशासनाला दुसर्‍या आघाडीवर लढावे लागत आहे.
राज्यभरातील एकूण ५६४५ मदत शिबिरांमध्ये सुमारे ७.२४ लाख नागरिक वास्तव्याला असून, त्यांच्या दैनंदिन गरजा पूर्ण करण्यासोबतच, त्यांचे योग्य पुनर्वसन करणे, ही देखील सरकारपुढील सर्वात मोठी समस्या आहे. पुरामुळे शेकडो लोकांना जीव गमवावा लागल्यानंतर आता संसर्गामुळे कुणाचा जीव जाणार नाही, याची काळजी घेताना ठिकठिकाणी ३७५७ वैद्यकीय मदत केंद्रे आणि प्राथमिक उपचार केंद्रे सुरू करण्यात आली आहेत. यात सर्व संसर्गजन्य आजारांवरील औषधे मोठ्या प्रमाणात उपलब्ध करून देण्यात आली आहे, अशी माहिती केंद्रीय आरोग्य मंत्री जे. पी. नड्डा यांनी नवी दिल्लीत दिली.
ड्रोनचा वापर
काही भागातील पूरस्थिती अजूनही गंभीर असून, तिथे हजारो लोक अडकले आहेत. यातील काही भाग दुर्गम आहे. या सर्व लोकांची माहिती घेऊन त्यांच्यापर्यंत पोहोचण्यासाठी ड्रोनचा वापर केला जात आहे, अशी माहिती लष्कराच्या नॉर्दर्न कमांडचे प्रमुख लेफ्टनंट जनरल डी. आर. सोनी यांनी पत्रपरिषदेत दिली. मदत व बचाव कार्यावर आम्ही सध्या लक्ष केंद्रित केले आहे. लष्कराचे १५०० जवान या कार्यात दिवसरात्र परिश्रम घेत आहेत. जे लोक इमारतींच्या छतावर आणि सहजपणे पोहोचता न येणार्‍या भागात अडकले आहेत, त्यांना मदत करण्यासाठी हेलिकॉप्टर्सचा वापर केला जात आहे. ज्या भागात कुठलीही दूरसंचार सुविधा नाही, तिथे लष्करी जवानांना सॅटेलाईट फोन देण्यात आले आहेत.
महाराष्ट्रातून १०० डॉक्टरांचे पथक
महाराष्ट्र सरकारने केरळमधील पूरग्रस्तांना तसेच संसर्गाच्या विळख्यात सापडलेल्या नागरिकांना मदत करण्यासाठी राज्यातून १०० डॉक्टरांचे पथक आज सकाळी रवाना केले. इंडियन एअर फोर्सच्या दोन विमानांमधून हे वैद्यकीय पथक तिरुवनंतपुरम्कडे रवाना झाले. मदत व बचाव कार्यालय लक्ष ठेवण्यासाठी या पथकासोबत स्वत: राज्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री गिरीश बापट हे देखील यातील एका विमानातून गेले आहेत.
कोची विमानतळ सुरू
गेल्या काही दिवसांपासून पुराच्या विळख्यात सापडलेल्या कोची विमानतळावरील पाणी आता पूर्णपणे ओसरले असून, हे विमानतळ हवाई वाहतुकीसाठी आज सकाळी खुले करण्यात आले आहे.
उपराष्ट्रपतींकडून एक महिन्याचे वेतन
उपराष्ट्रपती एम. व्यंकय्या नायडू यांनी केरळवासीयांना मदतीचा हात म्हणून आपले एक महिन्याचे वेतन देण्याची घोषणा केली. केरळातील स्थितीचा आढावा घेणार्‍या बैठकीत उपस्थित राहिल्यानंतर त्यांनी हा निर्णय घेतला.
छत्तीसगडकडून २५०० टन तांदूळ रवाना
दरम्यान, छत्तीसगड सरकारने केरळातील पूरग्रस्तांकरिता २५०० टन तांदूळ पाठविला आहे. हा तांदूळ घेऊन मालगाडी रविवारी दुपारीच केरळकडे रवाना करण्यात आली, अशी माहिती अधिकार्‍यांनी दिली.
सुप्रीम कोर्टाचे सर्व न्यायमूर्ती योगदान देणार
सर्वोच्च न्यायालयातील सर्वच न्यायमूर्तीही केरळ मदत निधीत आपले योगदान देणार असल्याची माहिती सरन्यायाधीश दीपक मिश्रा यांनी आज दिली. एका प्रकरणात सुनावणी सुरू असताना महान्यायवादी के. के. वेणुगोपाल यांनी केरळातील भीषण स्थितीकडे न्यायालयाचे लक्ष वेधले. तेव्हा गांभीर्य लक्षात घेऊन सरन्यायाधीशांनी उपरोक्त माहिती दिली.

Posted by : | on : 21 Aug 2018
Filed under : केरळ, राज्य.
You can follow any responses to this entry through the RSS 2.0You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Change Language: press Ctrl+g

    छायाचित्रातून

  • भारताने ऑस्ट्रेलियात रचला इतिहास भारताने ऑस्ट्रेलियात रचला इतिहास
  • हार्दिक पंड्या, लोकेश राहुलला बीसीसीआयची नोटीस हार्दिक पंड्या, लोकेश राहुलला बीसीसीआयची नोटीस
  • भारताचा ऑस्ट्रेलियात विक्रमी विजय भारताचा ऑस्ट्रेलियात विक्रमी विजय
  • पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक
  • कोहली, मीराबाईला खेलरत्न कोहली, मीराबाईला खेलरत्न

हवामान

दृष्टीक्षेपात

व्हिडीओ संग्रह

More in केरळ, राज्य (337 of 727 articles)

Amarindersingh
अमरिंदरसिंग यांचा सवाल, वृत्तसंस्था चंदीगड, १९ ऑगस्ट - इम्रान खान यांच्या शपथविधी समारंभात पाकिस्तानचे लष्करप्रमुख जनरल कमर बाजवा यांना अलिंगन ...

×