ads
ads
नक्षल समर्थकांच्या पत्रातील ‘तो’ क्रमांक दिग्विजयसिंहांचाच

नक्षल समर्थकांच्या पत्रातील ‘तो’ क्रमांक दिग्विजयसिंहांचाच

►पुणे पोलिसांची पुष्टी, चौकशी होणार, पुणे, १९ नोव्हेंबर –…

अटकाने, लटकाने, भटकानेवाल्या संस्कृतीमुळे देशाचे नुकसान

अटकाने, लटकाने, भटकानेवाल्या संस्कृतीमुळे देशाचे नुकसान

►पंतप्रधान मोदी यांचा जोरदार पलटवार, नवी दिल्ली, १९ नोव्हेंबर…

आरबीआय मंडळाची नऊ तास वादळी बैठक

आरबीआय मंडळाची नऊ तास वादळी बैठक

►अनेक मुद्यांवर समझोत्याचे संकेत, मुंबई, १९ नोव्हेंबर – केंद्र…

काश्मीर पाकिस्तानचेच शाहिद आफ्रिदीची सारवासारव

काश्मीर पाकिस्तानचेच शाहिद आफ्रिदीची सारवासारव

इस्लामाबाद, १८ नोव्हेंबर – पाकिस्तानमधील राज्यकर्त्यांना देशाचा भाग असलेले…

अमेरिका भारताला देणार २४ पाणबुडीभेदी हेलिकॉप्टर्स

अमेरिका भारताला देणार २४ पाणबुडीभेदी हेलिकॉप्टर्स

►२०० अब्ज डॉलर्सचा व्यवहार, वॉशिंग्टन, १७ नोव्हेंबर – चीन…

मल्ल्यासाठी तिहारच योग्य

मल्ल्यासाठी तिहारच योग्य

►ब्रिटनच्या न्यायालयाचे शिक्कामोर्तब, लंडन, १७ नोव्हेंबर – सार्वजनिक आणि…

विधानसभा कामकाजास ‘वंदे मातरम’ने सुरुवात

विधानसभा कामकाजास ‘वंदे मातरम’ने सुरुवात

मुंबई, १९ नोव्हेंबर – महाराष्ट्र विधानसभेच्या हिवाळी अधिवेशनाच्या कामकाजास…

मराठा आरक्षणावर उद्या हायकोर्टात सुनावणी

मराठा आरक्षणावर उद्या हायकोर्टात सुनावणी

मुंबई, १९ नोव्हेंबर – मराठा आरक्षणाचा प्रश्‍न तातडीने निघाली…

मराठा समाजाला स्वतंत्र प्रवर्गात आरक्षण

मराठा समाजाला स्वतंत्र प्रवर्गात आरक्षण

►अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला मुख्यमंत्री फडणवीस यांची घोषणा ►मागासवर्ग आयोगाच्या तिन्ही…

तापमानवाढीचा धोका वाढतोय

तापमानवाढीचा धोका वाढतोय

॥ विशेष : अ‍ॅड. गिरीश राऊत | विकास पृथ्वीची…

अपनी अकल लगाओ!

अपनी अकल लगाओ!

॥ मानसरंग : मयुरेश डंके | गेटवे ऑफ इंडिया,…

राफेल सुनावणी : अर्धे नुकसान, अर्धा फायदा

राफेल सुनावणी : अर्धे नुकसान, अर्धा फायदा

॥ सारांश : ल.त्र्यं. जोशी | एक बाब मात्र…

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

‘फोर्ब्स’ने नुकतीच सर्वाधिक कमाई करणार्‍या अभिनेत्यांच्या नावाची यादी जाहीर…

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

बॉलिवूडची बेबी डॉल म्हणजेच सनी लिओनीचे नाव इंटरनेटवर सर्वाधिक…

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

‘रेस- ३’ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये कमबॅक करणारा अभिनेता बॉबी देओल…

पंचांग
वार: | तिथी:
नक्षत्र: | राशी:
करण: | योग:
सूर्योदय: 06:36 | सूर्यास्त: 17:48
अयनांश:
Home » केरळ, राज्य » प्रचंड तणावात शबरीमलाचे दरवाजे महिलांसाठी उघडले

प्रचंड तणावात शबरीमलाचे दरवाजे महिलांसाठी उघडले

►सकाळपासून जोरदार निदर्शने
►निलक्कल, पम्बामध्ये निदर्शकांची गर्दी,
तिरुवनंतपुरम्, १७ ऑक्टोबर –

Shabarimalai Swami Ayyappa Mandir

Shabarimalai Swami Ayyappa Mandir

सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर आज बुधवारी शबरीमाला मंदिराचे दरवाजे प्रथमच महिलांसाठी उघडण्यात आले. मंदिराचे दरवाजे आज उघडण्यात येणार असल्याच्या पृष्ठभूमीवर विरोध करणार्‍यांनी सकाळपासूनच मंदिर परिसरात जोरदार निदर्शने केली. या आंदोलकांनी भक्तांना पिटाळतानाच महिला पत्रकार आणि तिच्या चमूवरही हल्ला केला. इतर पत्रकारांनाही धक्काबुक्की करून त्यांना वृत्तांकन करण्यापासून रोखण्यात आले. त्यामुळे संपूर्ण मंदिर परिसरात मोठा तणाव निर्माण झाला होता. या तणावामुळे काही महिलांना भगवान अयप्पाचे दर्शन न घेताच माघारी परतावे लागले.
सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर महिला भाविकांचा भगवान अय्यप्पाच्या दर्शनाचा मार्ग मोकळा झाला असून, अखेर महिलांना मंदिरात प्रवेश मिळाला आहे. महिलांना मंदिरात प्रवेश देण्यास काही संघटनांनी विरोध केला होता. विरोधकांनी सकाळपासूनच मंदिर परिसरात निदर्शने सुरू केली. मंदिराकडे जाणार्‍या निलक्कल आणि पम्बा या दोन्ही मुख्य रस्त्यांच्याकडेला आंदोलकांनी प्रचंड गर्दी केली होती. निलक्कल आणि पम्बामध्ये निदर्शने करणार्‍या त्रावणकोर देवासम् बोर्डाच्या माजी अध्यक्षांसह ५० लोकांना पोलिसांनी आतापर्यंत ताब्यात घेतले आहे.
आंदोलकांनी निदर्शने सुरू केल्याने महिलांना अय्यप्पाचे दर्शन न घेताच माघारी परतावे लागले. न्यायालयाने आदेश दिल्यानंतर शबरीमालाचा डोंगर चढणारी आंध्रप्रदेशातील गोदावरी जिल्ह्याची रहिवासी माधवी शीर्ष ही पहिली मुलगी आहे. मात्र, पम्बाच्या आसपास असलेल्या मोठ्या पोलिस बंदोबस्तामुळे तिलाही दर्शन न घेता माघारी परतावे लागले. कुटुंबीयांसोबत आज सकाळी तिने मंदिरात जाण्याचा प्रयत्न केला. मात्र, आंदोलकांनी रस्ता रोखून धरल्याने तिला माघारी परतावे लागले.
दरम्यान, महिलांच्या मंदिर प्रवेशाला विरोध करणार्‍या शबरीमाला आचार संरक्षण समितीचा तंबू पोलिसांनी हटवला असून, आंदोलकांना पांगवण्यास सुरुवात केली होती. त्यासाठी पोलिसांनी बळाचाही वापरही केला. या परिसरात एकूण ५०० पोलिसांना तैनात करण्यात आले होते. दरम्यान, आज सायंकाळी पाच दिवसांच्या मासिक पूजेनंतर २२ ऑक्टोबर रोजी हे दरवाजे पुन्हा बंद केले जाणार आहेत.
सरकार उद्ध्वस्त करतेय शतकांपासूनच्या रुढी
सरकार आणि त्रावणकोर देवासम् बोर्ड शतकांपासूनच्या रुढी उद्ध्वस्त करीत असल्याचा आरोप शबरीमला डोंगर परिसरात राहणार्‍या आदिवासींनी केला आहे. महिलांच्या मंदिर प्रवेशाला विरोध करण्यासाठी या परिसरात १० ते १५ गटांनी निदर्शने केली. मासिकपाळीच्या वयातील महिलांना मंदिर प्रवेशाच्या बंदीची प्रथा केरळातील जंगलांमध्ये राहणार्‍या आदिवासींमध्ये पूर्वीपासून आहे, असा दावा या निदर्शकांनी केला. शबरीमला मंदिरात असलेले आदिवासींचे अधिकार काढून घेण्यासाठी सरकार आणि त्रावणकोर देवासम् बोर्ड प्रयत्न करीत असल्याचा आरोपही या आदिवासींनी केला.
‘तो’ द्रविडी परंपरेचा भाग
पम्बा येथे १० ते १५ गटांनी महिलांच्या मंदिर प्रवेशविरोधात निदर्शने केली. शबरीमलाच्या भोवती असलेल्या डोंगरांमध्ये आदिवासी समाजाचा प्रमुख राहतो. त्याला मूप्पन असे म्हटले जाते. द्रविडी परंपरेप्रमाणे येथील आदिवासी समाज निसर्गाची पूजा करतो. भगवान अय्यप्पा आमचे देव आहेत. विशिष्ट वयोगटातील महिलांना मंदिरात प्रवेश न देणे हा द्रविडी परंपरेचा भाग आहे. हे मंदिर घनदाट जंगलात असल्याने या परंपरेचा मान ठेवला पाहिजे, असे येथील निदर्शकांनी सांगितले.
पुनर्विचार याचिका दाखल करणार
शबरीमला मंदिरातील महिलांच्या प्रवेशाबाबत दिलेल्या निर्णयाचा पुनर्विचार करण्यात यावा, या मागणीसाठी याचिका दाखल करणार असल्याची माहिती अय्यप्पा धर्मसेनेचे प्रमुख आणि सामाजिक कार्यकर्ते राहुल एसवार यांनी दिली.
निदर्शने करीत असताना त्यांना आज पम्बा येथून पोलिसांनी ताब्यात घेतले. ते शबरीमला देवस्थानच्या मुख्य पुजार्‍याचे पुत्र आहेत. त्रावणकोर देवासम् बोर्डाचे माजी अध्यक्ष प्रायर गोपालकृष्णन् यांच्यासह पोलिसांनी एकूण ५० निदर्शकांना ताब्यात घेतले.

Posted by : | on : 18 Oct 2018
Filed under : केरळ, राज्य.
You can follow any responses to this entry through the RSS 2.0You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Change Language: press Ctrl+g

    छायाचित्रातून

  • पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक
  • कोहली, मीराबाईला खेलरत्न कोहली, मीराबाईला खेलरत्न
  • अमित पांघळला बॉक्सिंगचे सुवर्ण अमित पांघळला बॉक्सिंगचे सुवर्ण
  • तेजिंदरपालला सुवर्णपदक तेजिंदरपालला सुवर्णपदक
  • महाराष्ट्राच्या राहीचा सुवर्णभेद महाराष्ट्राच्या राहीचा सुवर्णभेद

हवामान

दृष्टीक्षेपात

व्हिडीओ संग्रह

More in केरळ, राज्य (66 of 669 articles)

India Kashmir Unrest Army
जवान शहीद, श्रीनगर, १७ ऑक्टोबर - येथे आज बुधवारी झालेल्या चकमकीत सुरक्षा दलाने लष्कर-ए-तोयबाच्या कमांडरसह तीन अतिरेक्यांचा खातमा केला. या ...

×