ads
ads
महाआघाडी म्हणजे भ्रष्ट, नकारात्मक विचारांचा मेळावा

महाआघाडी म्हणजे भ्रष्ट, नकारात्मक विचारांचा मेळावा

•पंतप्रधान मोदी यांचा घणाघाती हल्ला, नवी दिल्ली, २० जानेवारी…

आरक्षणामुळे रालोआच्या १० टक्के जागा वाढतील

आरक्षणामुळे रालोआच्या १० टक्के जागा वाढतील

•रामविलास पासवान यांचा दावा, नवी दिल्ली, २० जानेवारी –…

कुंभमेळ्यात आज पौष पौर्णिमेनिमित्त पवित्र स्नान

कुंभमेळ्यात आज पौष पौर्णिमेनिमित्त पवित्र स्नान

•लाखो भाविक येण्याची शक्यता, प्रयागराज, २० जानेवारी – उद्या…

आणिबाणी जाहीर करण्याची ट्रम्प यांची धमकी

आणिबाणी जाहीर करण्याची ट्रम्प यांची धमकी

►मेक्सिको सीमेवरील भिंतीचा वाद पेटणार, वॉशिंग्टन, १० जानेवारी –…

विक्रम मिस्री चीनमधील नवे राजदूत

विक्रम मिस्री चीनमधील नवे राजदूत

►पदभार स्वीकारताच केली द्विपक्षीय मुद्यांवर चर्चा, बीजिंग, ८ जानेवारी…

शटडाऊन सुरूच ठेवेन, आणिबाणीचाही पर्याय खुला

शटडाऊन सुरूच ठेवेन, आणिबाणीचाही पर्याय खुला

►डोनाल्ड ट्रम्प यांचा काँगे्रस सभागृहाला इशारा ►मेक्सिकोच्या सीमेवर भिंत…

डान्सबार बंदीसाठी नवा अध्यादेश

डान्सबार बंदीसाठी नवा अध्यादेश

मुंबई, १८ जानेवारी – राज्यातील डान्सबार पुन्हा सुरू करण्याचा…

समृद्धी महामार्गासाठी स्टेट बँक देणार ८५०० कोटींचे कर्ज

समृद्धी महामार्गासाठी स्टेट बँक देणार ८५०० कोटींचे कर्ज

►९५ टक्के भूसंपादन पूर्ण, मुंबई, १७ जानेवारी – स्टेट…

ओबीसी महामंडळांसाठी ७३६ कोटी!

ओबीसी महामंडळांसाठी ७३६ कोटी!

•तरुणांना मिळणार १० ते ५० लाखांचे कर्ज •सावित्रीबाई फुले…

भारताचा पुरुषार्थ प्रकट होण्यास…

भारताचा पुरुषार्थ प्रकट होण्यास…

॥ विशेष : डॉ. मनमोहन वैद्य | सह सरकार्यवाह,…

ऑगस्टा वेस्टलँड

ऑगस्टा वेस्टलँड

॥ चतुरस्त्र : स्वाती तोरसेकर | ऑगस्टा विषयाला हात…

तिसरी आघाडी की तीन आघाड्या?

तिसरी आघाडी की तीन आघाड्या?

॥ जागता पहारा : भाऊ तोरसेकर | भाजपा वा…

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

‘फोर्ब्स’ने नुकतीच सर्वाधिक कमाई करणार्‍या अभिनेत्यांच्या नावाची यादी जाहीर…

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

बॉलिवूडची बेबी डॉल म्हणजेच सनी लिओनीचे नाव इंटरनेटवर सर्वाधिक…

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

‘रेस- ३’ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये कमबॅक करणारा अभिनेता बॉबी देओल…

पंचांग
वार: | तिथी:
नक्षत्र: | राशी:
करण: | योग:
सूर्योदय: 07:02 | सूर्यास्त: 18:14
अयनांश:
Home » उत्तर प्रदेश, राज्य » फरक्का एक्सप्रेसला अपघात, ९ ठार

फरक्का एक्सप्रेसला अपघात, ९ ठार

►नऊ डबे व इंजीन घसरले
►रायबरेलीतील घटना, ३५ जखमी,
लखनौ, १० ऑक्टोबर –

Farakka Express Train Derailed Near Rae Bareli Uttar Pradesh

Farakka Express Train Derailed Near Rae Bareli Uttar Pradesh

उत्तरप्रदेशच्या रायबरेलीजवळ न्यू फरक्का एक्सप्रेसचे नऊ डबे आणि इंजीन आज बुधवारी सकाळच्या सुमारास रुळावरून घसरले. या अपघात ९ प्रवाशांचा मृत्यू झाला असून, किमान ३५ प्रवासी जखमी झाले आहेत. यातील नऊ जणांची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती आहे.
ही एक्सप्रेस बंगालच्या माल्दा येथून नवी दिल्लीकडे निघाली होती. सकाळी सव्वा सहाच्या सुमारास रायबरेलीच्या हरचांदपूर भागात हा अपघात झाला, अशी माहिती उत्तरप्रदेशचे अतिरिक्त पोलिस महासंचालक आनंद कुमार यांनी दिली. जखमींमध्ये १० महिला आणि सहा बालकांचा समावेश आहे. किरकोळ जखमींना रायबरेली येथील शासकीय रुग्णालयात भरती करण्यात आले असून, गंभीर जखमींना लखनौला हलविण्यात आले आहे. या अपघातामुळे रखडलेल्या उर्वरित प्रवाशांसाठी लखनौपर्यंत विशेष बसची व्यवस्था करण्यात आली आहे, असे त्यांनी सांगितले.
उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी अपघाताची संपूर्ण माहिती प्राप्त करीत, प्रशासनाला मदत व बचाव युद्धपातळीवर हाती घेण्याचे आदेश दिले. एनडीआरएफची काही पथकेही घटनास्थळी दाखल झाली आहेत.
अपघात झाला त्यावेळी अनेक प्रवाशी झोपेत होते. अचानक डबे घसरल्याने प्रवाशांना धक्का जाणवला. मात्र नेमके काय झाले, हे कुणालाच कळले नाही. दरम्यान, या अपघाताबाबत घातपाताचा संशय व्यक्त केला जात आहे. त्यामुळे एटीएस पथकालाही घटनास्थळी पाठवण्याचे आदेश दिले आहेत.
पंतप्रधानांना दु:ख
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या अपघातावर दु:ख व्यक्त केले आहे. जखमींच्या प्रकृतीत लवकर सुधारणा व्हावी, अशी प्रार्थना त्यांनी ट्विटरवर केली आहे, तर रेल्वेमंत्री पीयूष गोयल यांनी मृतांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी पाच लाख, गंभीर जखमींना प्रत्येकी एक लाख आणि किरकोळ जखमींना ५० हजार रुपयांची आर्थिक मदत जाहीर केली आहे.

Posted by : | on : 11 Oct 2018
Filed under : उत्तर प्रदेश, राज्य.
You can follow any responses to this entry through the RSS 2.0You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Change Language: press Ctrl+g

    छायाचित्रातून

  • भारताने ऑस्ट्रेलियात रचला इतिहास भारताने ऑस्ट्रेलियात रचला इतिहास
  • हार्दिक पंड्या, लोकेश राहुलला बीसीसीआयची नोटीस हार्दिक पंड्या, लोकेश राहुलला बीसीसीआयची नोटीस
  • भारताचा ऑस्ट्रेलियात विक्रमी विजय भारताचा ऑस्ट्रेलियात विक्रमी विजय
  • पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक
  • कोहली, मीराबाईला खेलरत्न कोहली, मीराबाईला खेलरत्न

हवामान

दृष्टीक्षेपात

व्हिडीओ संग्रह

More in उत्तर प्रदेश, राज्य (194 of 648 articles)

Tropical Cyclones
लोकांना सुरक्षित ठिकाणी नेले, भुवनेश्‍वर, १० ऑक्टोबर - बंगालच्या उपसागरात तयार झालेल्या ‘तितली’ चक्रीवादळाने आज बुधवारी उग्र रूप धारण केले ...

×