जम्मू-काश्मिरात राज्यपाल राजवट

जम्मू-काश्मिरात राज्यपाल राजवट

►राष्ट्रपतींची मंजुरी, वृत्तसंस्था नवी दिल्ली, २० जून – जम्मू-काश्मिरात…

पुरस्काराचा महाराष्ट्री ‘योग’

पुरस्काराचा महाराष्ट्री ‘योग’

►विश्‍वास मंडलिक, योगसंस्थेची पंतप्रधान योग पुरस्कारासाठी निवड, तभा वृत्तसेवा…

विरोधकांचे नेतृत्व राहुल गांधींकडेच हवे : शीला दीक्षित

विरोधकांचे नेतृत्व राहुल गांधींकडेच हवे : शीला दीक्षित

वृत्तसंस्था नवी दिल्ली, २० जून – आगामी सार्वत्रिक निवडणुकीत…

भारत-फ्रान्स उभारणार मजबूत भागीदारी

भारत-फ्रान्स उभारणार मजबूत भागीदारी

►परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांची माहिती, वृत्तसंस्था पॅरीस, १९ जून…

भारतच अमेरिकेचा मुख्य संरक्षण भागीदार

भारतच अमेरिकेचा मुख्य संरक्षण भागीदार

►७१६ अब्ज डॉलर्सच्या विधेयकाला सिनेटची मंजुरी, वृत्तसंस्था वॉशिंग्टन, १९…

जपानमध्ये शक्तिशाली भूकंप, तीन ठार

जपानमध्ये शक्तिशाली भूकंप, तीन ठार

►२०० पेक्षा जास्त जखमी, वृत्तसंस्था टोकयो, १८ जून –…

राज्यात नवीन फळबाग लागवड योजना

राज्यात नवीन फळबाग लागवड योजना

►अन्नप्रक्रिया उद्योगाला चालना ►राज्य मंत्रिमंडळाची मंजुरी, तभा वृत्तसेवा मुंबई,…

डीएसके प्रकरणी महाबँकेच्या एमडीला अटक

डीएसके प्रकरणी महाबँकेच्या एमडीला अटक

►आणखी सहा जण ताब्यात, वृत्तसंस्था पुणे, २० जून –…

पुढचा मुख्यमंत्री शिवसेनेचाच

पुढचा मुख्यमंत्री शिवसेनेचाच

►उद्धव ठाकरे यांची घोषणा, तभा वृत्तसेवा मुंबई, १९ जून…

आंबेडकरी चळवळीचे अपहरण

आंबेडकरी चळवळीचे अपहरण

॥ जागता पहारा : भाऊ तोरसेकर | पुण्याच्या पोलिसांनी…

वृत्तींवर विजय मिळवणारा योग

वृत्तींवर विजय मिळवणारा योग

॥ विशेष : वैद्य सुयोग दांडेकर | २१ जून…

कैरानाच्या पश्‍चात…

कैरानाच्या पश्‍चात…

॥ रोखठोक : हितेश शंकर | केरळमध्ये सुरू असलेले…

‘सिमरन’मधील नवीन गाणे प्रदर्शित

‘सिमरन’मधील नवीन गाणे प्रदर्शित

अभिनेत्री कंगना राणावत लवकरच सिमरन या चित्रपटाद्वारे प्रेक्षकांच्या भेटीला…

चिरंजीवीसोबत सिनेमा करण्यास ऐश्‍वर्याचा नकार?

चिरंजीवीसोबत सिनेमा करण्यास ऐश्‍वर्याचा नकार?

ऐश्‍वर्या राय बच्चनची सध्या बॉलीवूडमध्ये सेकंड इनिंग सुरू आहे.…

रणबीरच्या फिरण्यावर बंदी

रणबीरच्या फिरण्यावर बंदी

संजय दत्तच्या आयुष्यावर आधारित चित्रपटात रणबीर कपूर ६ वेगवेगळ्या…

पंचांग
वार: | तिथी:
नक्षत्र: | राशी:
करण: | योग:
सूर्योदय: 05:54 | सूर्यास्त: 19:03
अयनांश:
Home » उत्तर प्रदेश, राज्य » बंगल्याची तोडफोड हा भाजपाचाच कट

बंगल्याची तोडफोड हा भाजपाचाच कट

►अखिलेश यादवांच्या उलट्या बोंबा,
वृत्तसंस्था
लखनौ, १३ जून –
सरकारी बंगला रिकामा करताना, बंगल्याचे करण्यात आलेले प्रचंड नुकसान वृत्तवाहिन्यांनी समोर आणल्यानंतर समाजवादी पार्टीचे अध्यक्ष अखिलेश यादव यांनी, या नुकसानीचे खापर भाजपावरच फोडले. चार पोटनिवडणुकांमध्ये पराभूत झाल्याने वैतागलेल्या भाजपानेच हा कट रचला असल्याच्या उलट्या बोंबा अखिलेशने मारल्या.
अखिलेश यादव यांनी शासकीय बंगला रिकामा केल्यानंतर लगेच बहुतेक सर्वच वृत्तवाहिन्यांनी बंगल्याच्या आतील दृश्य प्रसारित केले. यात ठिकठिकाणी तोडफोड करण्यात आल्याचे आणि अनेक भिंतीही फोडण्यात आल्याचे स्पष्टपणे दिसत आहे. या प्रकाराची गंभीर दखल घेऊन राज्यपाल राम नाईक यांनी कडक कारवाई करण्याचे निर्देश प्रशासनाला दिले असतानाच, अखिलेश यादव यांनी आज बुधवारी तातडीने पत्रपरिषद बोलावली व हा सर्व कट भाजपाचाच असल्याचा आरोप करून टाकला.
करदात्यांच्या पैशातून आपण सरकारी बंगल्यांची डागडुजी व नूतनीकरण करीत असतो. ४ विक्रमादित्य मार्ग हा बंगला ज्या पद्धतीने उद्ध्वस्त करण्याचा प्रयत्न झाला, तो गंभीर प्रकार आहे. राज्य सरकारने या प्रकरणी कारवाई करायलाच हवी, असे राज्यपाल राम नाईक यांनी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना लिहिलेल्या पत्रात म्हटले आहे. या बंगल्यातील बहुतांश किमती सामान मी स्वत:च्या पैशाने खरेदी केले होते. बंगला सोडताना ते सामान मी सोबत नेले. त्यासाठी काही प्रमाणात तोडफोड करणे आवश्यक होते. मी जे सामान नेले, ते सरकारी पैशातून होते, हे सिद्ध झाले, तर सामान परत करण्यासोबतच झालेल्या नुकसानीची भरपाई करण्याची माझी तयारी आहे, असेही अखिलेश यांनी सांगितले.
राज्यपालांवर टीका शोभत नाही
अखिलेश यादव यांनी आपल्या दोषाचे खापर भाजपावर फोडताना राज्यपाल राम नाईक यांच्यावरही टीका केली. ज्या पदावर ते आहेत, त्यांना अशा प्रकारचा व्यवहार शोभत नाही. राज्यपाल घटनेच्या चौकटीत काम करीत नाही, त्यांच्यात रा. स्व. संघाचा आत्मा आहे, असा आरोप अखिलेश यादव यांनी केला होता.
भिंतीच्या मागे काय होते? : भाजपाचा पलटवार
अखिलेश यादव यांनी बंगल्यातील तोडफोडीचे खापर भाजपावर फोडल्यानंतर, भाजपाने लगेच जोरदार पलटवार केला. बंगल्यातील भिंतींना मोठमोठे भगदाड पाडण्यात आले आहेत, तेव्हा त्या भिंतींच्या मागे नेमके काय लपवले होते, हे अखिलेश यांनीच सांगावे, असा तिखट सवाल भाजपाने केला आहे.
योगी आदित्यनाथ सरकारमधील वरिष्ठ मंत्री सिद्धार्थनाथ सिंह म्हणाले की, चोराच्या मनात जेव्हा चांदण असते, तेव्हाच तो आपले दोष इतरांवर ढकलण्याचा प्रयत्न करीत असतो. अशी व्यक्ती नेहमीच अस्वस्थ असते. सरकारी बंगल्यातील बहुतांश भिंती फोडण्यात आल्या आहेत. याचाच अर्थ त्या भिंतींमध्ये काहीतरी लपविण्यात आले होते. बंगला रिकामा करताना त्या वस्तू बाहेर काढणे आवश्यक असल्यानेच अखिलेश यांनी बंगल्याचे इतके नुकसान केले आहे.

Posted by : | on : Jun 14 2018 | Filed under : उत्तर प्रदेश, राज्य.
You can follow any responses to this entry through the RSS 2.0.
Both comments and pings are currently closed.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Marathi/English, press Ctrl+g  

हवामान

दृष्टीक्षेपात

व्हिडीओ संग्रह

More in उत्तर प्रदेश, राज्य (17 of 1119 articles)

Arvind Kejriwal Aap Ministers Sleep At Lgs Office
►रात्रभर राहिले झोपून ►सत्येंद्र जैन बेमुदत उपोषणावर, तभा वृत्तसेवा नवी दिल्ली, १२ जून - मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आणि त्यांच्या मंत्रिमंडळातील ...

×