ads
ads
महाआघाडी म्हणजे भ्रष्ट, नकारात्मक विचारांचा मेळावा

महाआघाडी म्हणजे भ्रष्ट, नकारात्मक विचारांचा मेळावा

•पंतप्रधान मोदी यांचा घणाघाती हल्ला, नवी दिल्ली, २० जानेवारी…

आरक्षणामुळे रालोआच्या १० टक्के जागा वाढतील

आरक्षणामुळे रालोआच्या १० टक्के जागा वाढतील

•रामविलास पासवान यांचा दावा, नवी दिल्ली, २० जानेवारी –…

कुंभमेळ्यात आज पौष पौर्णिमेनिमित्त पवित्र स्नान

कुंभमेळ्यात आज पौष पौर्णिमेनिमित्त पवित्र स्नान

•लाखो भाविक येण्याची शक्यता, प्रयागराज, २० जानेवारी – उद्या…

आणिबाणी जाहीर करण्याची ट्रम्प यांची धमकी

आणिबाणी जाहीर करण्याची ट्रम्प यांची धमकी

►मेक्सिको सीमेवरील भिंतीचा वाद पेटणार, वॉशिंग्टन, १० जानेवारी –…

विक्रम मिस्री चीनमधील नवे राजदूत

विक्रम मिस्री चीनमधील नवे राजदूत

►पदभार स्वीकारताच केली द्विपक्षीय मुद्यांवर चर्चा, बीजिंग, ८ जानेवारी…

शटडाऊन सुरूच ठेवेन, आणिबाणीचाही पर्याय खुला

शटडाऊन सुरूच ठेवेन, आणिबाणीचाही पर्याय खुला

►डोनाल्ड ट्रम्प यांचा काँगे्रस सभागृहाला इशारा ►मेक्सिकोच्या सीमेवर भिंत…

डान्सबार बंदीसाठी नवा अध्यादेश

डान्सबार बंदीसाठी नवा अध्यादेश

मुंबई, १८ जानेवारी – राज्यातील डान्सबार पुन्हा सुरू करण्याचा…

समृद्धी महामार्गासाठी स्टेट बँक देणार ८५०० कोटींचे कर्ज

समृद्धी महामार्गासाठी स्टेट बँक देणार ८५०० कोटींचे कर्ज

►९५ टक्के भूसंपादन पूर्ण, मुंबई, १७ जानेवारी – स्टेट…

ओबीसी महामंडळांसाठी ७३६ कोटी!

ओबीसी महामंडळांसाठी ७३६ कोटी!

•तरुणांना मिळणार १० ते ५० लाखांचे कर्ज •सावित्रीबाई फुले…

भारताचा पुरुषार्थ प्रकट होण्यास…

भारताचा पुरुषार्थ प्रकट होण्यास…

॥ विशेष : डॉ. मनमोहन वैद्य | सह सरकार्यवाह,…

ऑगस्टा वेस्टलँड

ऑगस्टा वेस्टलँड

॥ चतुरस्त्र : स्वाती तोरसेकर | ऑगस्टा विषयाला हात…

तिसरी आघाडी की तीन आघाड्या?

तिसरी आघाडी की तीन आघाड्या?

॥ जागता पहारा : भाऊ तोरसेकर | भाजपा वा…

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

‘फोर्ब्स’ने नुकतीच सर्वाधिक कमाई करणार्‍या अभिनेत्यांच्या नावाची यादी जाहीर…

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

बॉलिवूडची बेबी डॉल म्हणजेच सनी लिओनीचे नाव इंटरनेटवर सर्वाधिक…

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

‘रेस- ३’ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये कमबॅक करणारा अभिनेता बॉबी देओल…

पंचांग
वार: | तिथी:
नक्षत्र: | राशी:
करण: | योग:
सूर्योदय: 07:02 | सूर्यास्त: 18:14
अयनांश:
Home » केरळ, राज्य » बलात्कारी आमदारावरून केरळ माकपात संघर्ष

बलात्कारी आमदारावरून केरळ माकपात संघर्ष

►प्रकरण दाबण्याचा वृंदा करात यांच्याकडून प्रयत्न,
वृत्तसंस्था
तिरुवनंतपूरम्, ५ सप्टेंबर –

Kerala Map

Kerala Map

नेहमीच गोपनीयतेच्या पडद्याआड राहणार्‍या आणि तरीही लोकशाही, मानवाधिकाराचा टाहो फोडणार्‍या मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाकडून (माकपा) आता बलात्काराचा गुन्हाही गुप्त ठेवण्याचा प्रयत्न केला जात आहे. या मार्क्स व लेनिनवादी पक्षाची महिलांना क:पदार्थ समजणारी संस्कृती एका पीडितेला न्यायापासून वंचित ठेवत असल्याचा धक्कादायक प्रकार केरळमध्ये उघडकीस आला.
शोरनूर येथील माकपाचे आमदार पी. के. शशी यांच्यावर पक्षातील एका महिला नेत्यावर बलात्कार केल्याचा आरोप आहे. ही पीडिता माकपाची युवा संघटन- ऑर्गनायझेशन डेमॉक्रेटिक युथ फेडरेशन ऑफ इंडियाची (डीवायएफआय) नेता असल्याचे सांगितले जाते.
वृत्तानुसार, माकपाच्या पॉलिट ब्यूरोला याबाबत दोन आठवड्यांपूर्वी तक्रार प्राप्त झाली. पोलिट ब्यूरोच्या सदस्य व माकपचे माजी सरचिटणीस प्रकाश करात यांच्या पत्नी वृंदा करात यांच्याकडे पीडितेने तक्रार दिली. या प्रकरणाच्या चौकशीसाठी पोलिट ब्यूरोने मंत्रिमंडळाच्या दोन सदस्यांची चौकशी समिती स्थापन केली.
दरम्यान, बलात्काराचा आरोप असलेल्या माकपा नेत्यावर, तसेच या प्रकरणाची माहिती असूनही पोलिस तक्रार न दिल्याने वृंदा करात यांच्यावर पोलिस कारवाई करण्यात यावी, अशी मागणी नागरी समितीने केली आहे. पक्षाच्या पुरुषप्रधान संस्कृतीसमोर वृंदा करात झुकल्या असून, त्या पक्षाचा वरिष्ठ नेता पी. के. शशी याला बलात्काराच्या गुन्ह्यातून वाचवण्याचा प्रयत्न करीत असल्याचा आरोप त्यांच्यावर केला जात आहे. दोन आठवड्यांपूर्वी त्यांना तक्रार प्राप्त झाली. मात्र, पक्षांतर्गत चौकशीचे कारण दाखवत त्यांनी ही तक्रार दाबून ठेवल्याचा आरोपही केला जात आहे.
पक्षनेत्यांचे गुन्हे दडवण्यासाठी, पक्षांतर्गत चौकशी केली जात असल्याचे जाहीर करून माकपाने कित्येक वेळा मुक्त व निष्पक्ष पोलिस चौकशीस नकार देत कायद्यालाच आव्हान दिले आहे. पक्षपाती मल्याळी प्रसारमाध्यमांनी आठवडाभरापेक्षा जास्त काळ हे वृत्त दडपण्याचा प्रयत्न केला. मात्र, सोशल मीडियाच्या माध्यमातून या बातमीला पाय फुटले.
पक्षाच्या केंद्रीय नेतृत्वात फूट
या मुद्यावरून पक्षाच्या केंद्रीय नेतृत्वात फूट पडली आहे. माकपाचे सरचिटणीस सीताराम येचुरी आणि पोलिट ब्युरोमध्ये या मुद्यावरून संघर्ष निर्माण झाला आहे. आमदार पी. के. शशी यांनी पल्लकडमधील पक्षाच्या विभागीय समिती कार्यालयात बलात्कार केल्याची तक्रार पीडितेने मागील महिन्यात पक्षाच्या जिल्हा व राज्य नेतृत्वाला दिली होती. मात्र, त्यावर कारवाई झाली नाही. तिने वृंदा करात यांच्याकडे १४ ऑगस्ट रोजी तक्रार केली. अखेर निराश झाल्याने तिने सोमवारी सीताराम येचुरी यांच्याकडे तक्रार केली. त्यांनी ही तक्रार राज्य समितीकडे पाठवल्याची माहिती सूत्रांनी दिली. सीताराम येचुरी यांनी तक्रार मिळाल्याची पुष्टी प्रसारमाध्यमांसमोर केली आहे. येचुरी यांच्या या सार्वजनिक कबुलीमुळे पोलिट ब्यूरोतील काही सदस्य बेचैन झाले आहेत.
भाजयुमोचा निषेध मोर्चा
माकपाच्या महिला नेत्यावर अत्याचाराच्या निषेधार्थ भाजयुमोने आज बुधवारी आमदार पी. के. शशी यांच्या पलक्कड जिल्ह्यातील कुलिक्कलियाड येथील घरावर निषेध मोर्चा काढला. त्यांनी घोषणाबाजी करीत त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली. मात्र, मोर्चेकर्‍यांना वाटेत अडवून बेकायदेशीर जमाव जमवल्याच्या आरोपाखाली अटक करण्यात आली, अशी माहिती पोलिसांनी दिली.
अशा चुका होतातच : माकप नेत्या
बलात्कार काही नवीन गोष्ट नाही. कम्युनिस्ट पार्टी अस्तित्वात आल्यापासून हे प्रकार होत आहेत. पक्षाचे नेतेही मनुष्यच आहेत. त्यामुळे अशा मानवी चुका होतातच.
-एम. सी. जोसेफिन, राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष

Posted by : | on : 6 Sep 2018
Filed under : केरळ, राज्य.
You can follow any responses to this entry through the RSS 2.0You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Change Language: press Ctrl+g

    छायाचित्रातून

  • भारताने ऑस्ट्रेलियात रचला इतिहास भारताने ऑस्ट्रेलियात रचला इतिहास
  • हार्दिक पंड्या, लोकेश राहुलला बीसीसीआयची नोटीस हार्दिक पंड्या, लोकेश राहुलला बीसीसीआयची नोटीस
  • भारताचा ऑस्ट्रेलियात विक्रमी विजय भारताचा ऑस्ट्रेलियात विक्रमी विजय
  • पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक
  • कोहली, मीराबाईला खेलरत्न कोहली, मीराबाईला खेलरत्न

हवामान

दृष्टीक्षेपात

व्हिडीओ संग्रह

More in केरळ, राज्य (232 of 648 articles)


सरकारचा मात्र विरोध, तभा वृत्तसेवा कोलकाता, ४ सप्टेंबर - पश्‍चिम बंगालमध्ये वाढत्या लव्ह जिहादच्या मानसिकतेविरोधात व्यापक आंदोलन छेडण्याची घोषणा विश्‍व ...

×