ads
ads
भाजपाच्या यादीत महाराष्ट्रातील सहा

भाजपाच्या यादीत महाराष्ट्रातील सहा

•पुण्यासाठी गिरीश बापटांचे नाव जाहीर, नवी दिल्ली, २३ मार्च…

शहीदांच्या अपमानासाठी राहुल गांधी यांनी माफी मागावी

शहीदांच्या अपमानासाठी राहुल गांधी यांनी माफी मागावी

•अमित शाह यांची मागणी •सॅम पित्रोदांच्या विधानांवर भूमिका स्पष्ट…

करमबीरसिंह होणार नवे नौदल प्रमुख

करमबीरसिंह होणार नवे नौदल प्रमुख

नवी दिल्ली, २३ मार्च – पुढील नौदल प्रमुख म्हणून…

इसिसवर विजय मिळवल्याची सीरियाची औपचारिक घोषणा

इसिसवर विजय मिळवल्याची सीरियाची औपचारिक घोषणा

बॅगहोझ, २३ मार्च – अमेरिकेचे पाठबळ असलेल्या सीरियन फौजांनी…

भारतावर पुन्हा हल्ला केला तर महागात पडेल

भारतावर पुन्हा हल्ला केला तर महागात पडेल

•अमेरिकेचा पाकिस्तानला इशारा, वॉशिंग्टन, २२ मार्च – पुलवामा हल्ला…

सहा महिन्यांत नीरवचे प्रत्यार्पण

सहा महिन्यांत नीरवचे प्रत्यार्पण

•भारतीय तपास यंत्रणांना विश्‍वास, लंडन, २२ मार्च – पंजाब…

रणजितसिंह मोहिते पाटील भाजपात

रणजितसिंह मोहिते पाटील भाजपात

•रणाआधीच भाजपाची जीत, मुंबई, २० मार्च – सोलापूर जिल्ह्यातील…

दाऊद शरण यायला तयार होता, पवारांनी दुर्लक्ष केले

दाऊद शरण यायला तयार होता, पवारांनी दुर्लक्ष केले

•प्रकाश आंबेडकरांचा गंभीर आरोप, मुंबई, १९ मार्च – कुख्यात…

शेतकर्‍यांना सर्वाधिक मदत युती सरकारच्या काळात

शेतकर्‍यांना सर्वाधिक मदत युती सरकारच्या काळात

•मुख्यमंत्री फडणवीस यांची स्पष्टोक्ती, औरंगाबाद, १७ मार्च – काँगे्रसप्रणित…

योद्धामंत्री: मनोहर पर्रीकर

योद्धामंत्री: मनोहर पर्रीकर

॥ जागता पहारा : भाऊ तोरसेकर | तशी पर्रीकरांची…

सत्य शिवाहून सुंदर हे…!

सत्य शिवाहून सुंदर हे…!

॥ मानसरंग : मयुरेश डंके | सामान्य माणसाला आपण…

पर्रीकर: गोयंच्या संस्काराचा ‘मनोहर’ आविष्कार

पर्रीकर: गोयंच्या संस्काराचा ‘मनोहर’ आविष्कार

॥ सारांश : ल.त्र्यं. जोशी | त्यांच्या आजाराच्या गांभीर्याच्या…

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

‘फोर्ब्स’ने नुकतीच सर्वाधिक कमाई करणार्‍या अभिनेत्यांच्या नावाची यादी जाहीर…

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

बॉलिवूडची बेबी डॉल म्हणजेच सनी लिओनीचे नाव इंटरनेटवर सर्वाधिक…

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

‘रेस- ३’ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये कमबॅक करणारा अभिनेता बॉबी देओल…

पंचांग
वार: | तिथी:
नक्षत्र: | राशी:
करण: | योग:
सूर्योदय: 06:27 | सूर्यास्त: 18:36
अयनांश:
Home » कर्नाटक, राज्य » भाजपाने शिवमोगा गड राखला, बेल्लारी गमावले

भाजपाने शिवमोगा गड राखला, बेल्लारी गमावले

►कर्नाटक पोटनिवडणूक,
बंगळुरू, ६ नोव्हेंबर –

Karnataka Elections Yeddyurappa1

Karnataka Elections Yeddyurappa1

कर्नाटकातील लोकसभेच्या तीन आणि विधानसभेच्या दोन जागांसाठी घेण्यात आलेल्या पोटनिवडणुकीचे निकाल आज मंगळवारी जाहीर करण्यात आले. शिवमोगा लोकसभा मतदारसंघ भाजपाने स्वत:कडे कायम राखला असून, बेल्लारी जागेवर भाजपाचा पराभव झाला आहे. जदएसनेही मंड्या लोकसभा मतदारसंघ स्वत:कडे कायम ठेवला आहे. रामनगर विधानसभेची जागा जदएसने व जामखांडी विधानसभेची जागा काँगे्रसने अपेक्षेप्रमाणेच स्वत:कडे कायम ठेवली आहे.
खनिजसमृद्ध बेल्लारी लोकसभा मतदारसंघ २००४ पासून वादग्रस्त खाणसम्राट रेड्डी बंधूंचा अभेद्य गड राहिला होता. या मतदारसंघात भाजपाने रेड्डी बंधूंच्या सर्वाधिक विश्‍वासातले सजमले जाणारे बी. श्रीरामुलू यांची बहीण जे. शांता यांना उमेदवारी दिली होती, तर काँगे्रसतर्फे व्ही. एस. उग्राप्पा रिंगणात होते. यावर्षीच्या मे महिन्यात झालेल्या निवडणुकीत भाजपाने स्वत: जनार्दन रेड्डी यांच्यापासून दूर ठेवले होते. तथापि, रेड्डी बंधूच्या आग्रहामुळे भाजपाने श्रीरामुलू यांच्या बहिणीला उमेदवारी जाहीर केली होती. या मतदारसंघात उग्राप्पा यांनी शांता यांचा २.४३ लाख मतांनी पराभव केला. शिवमोगा जागेवर मात्र भाजपाने जदएसचा दारुण पराभव केला. माजी मुख्यमंत्री बी. एस. येदीयुरप्पा यांचा गड असलेल्या या मतदारसंघातून येदीयुरप्पा यांचे पुत्र बी. वाय. राघवेंद्र यांना उमेदवारी दिली होती. राघवेंद्र यांनी जदएसचे मधू बंगारप्पा यांचा ५२ हजारावर मतांनी पराभव केला. मधू हे दिवंगत मुख्यमंत्री एस. बंगारप्पा यांचे पुत्र आहेत. मंड्या लोकसभा जागेवर जदएसचे उमेदवार एल. आर. शिवरामे यांनी भाजपाचे सिद्धरामय्या यांचा ३.२५ लाख मतांनी पराभव केला. सिद्धरामय्या हे माजी प्रशासकीय अधिकारी असून, ते नुकतेच राजकारणात आले होते.
माघार घेऊनही भाजपाला मतदान
रामनगर आणि जामखंडी विधानसभेच्या जागेसाठी झालेल्या पोटनिवडणुकीचे निकालही जाहीर झाले असून, रामनगर येथे मुख्यमंत्री एच. डी. कुमारस्वामी यांच्या पत्नी अनिता यांचा १,०९,१३७ मतांनी विजय झाला. विशेष म्हणजे, या मतदारसंघातील भाजपाचे एल. चंद्रशेखर यांनी निवडणुकीतून माघार घेतली असतानाही त्यांना १५ हजारावर मते मिळाली आहे. माघार घेण्यास उशीर झाल्याने त्यांचे नाव अधिकृत उमेदवार यादीत कायम राहिले होते. जामखंडी मतदारसंघात काँगे्रसचे आनंद निमगौडा यांनी भाजपाचे श्रीकांत कुळकर्णी यांचा ३९ हजार मतांनी पराभव केला. दरम्यान, विधानसभेतील विजयामुळे जदएस-काँगे्रसचे संख्याबळ १२० वर गेले आहे.

Posted by : | on : 7 Nov 2018
Filed under : कर्नाटक, राज्य.
You can follow any responses to this entry through the RSS 2.0You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Change Language: press Ctrl+g

    छायाचित्रातून

  • भारताने ऑस्ट्रेलियात रचला इतिहास भारताने ऑस्ट्रेलियात रचला इतिहास
  • हार्दिक पंड्या, लोकेश राहुलला बीसीसीआयची नोटीस हार्दिक पंड्या, लोकेश राहुलला बीसीसीआयची नोटीस
  • भारताचा ऑस्ट्रेलियात विक्रमी विजय भारताचा ऑस्ट्रेलियात विक्रमी विजय
  • पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक
  • कोहली, मीराबाईला खेलरत्न कोहली, मीराबाईला खेलरत्न

हवामान

दृष्टीक्षेपात

व्हिडीओ संग्रह

More in कर्नाटक, राज्य (189 of 702 articles)

Shabarimalai Swami Ayyappa Mandir
हायकोर्टाने खडसावले ►शबरीमलै मंदिर उघडले, एकही महिला आली नाही, कोची, ५ नोव्हेंबर - शबरीमलै येथील स्वामी अय्यप्पा मंदिराच्या दैनंदिन कारभारात ...

×