ads
ads
दुष्काळाची चिंता करू नका, केंद्र पाठीशी!

दुष्काळाची चिंता करू नका, केंद्र पाठीशी!

►४ वर्षांत सव्वा कोटी घरांची निर्मिती ►२०२२ पर्यंत सर्वांसाठी…

राममंदिरासाठी लवकर कायदा व्हावा

राममंदिरासाठी लवकर कायदा व्हावा

►विजयादशमी उत्सवात सरसंघचालकांचे ठाम प्रतिपादन, नागपूर, १९ ऑक्टोबर –…

ही चळवळ कुठे जाऊन थांबेल, नेम नाही

ही चळवळ कुठे जाऊन थांबेल, नेम नाही

►उच्च न्यायालयाला भीती, मुंबई, १९ ऑक्टोबर – ‘मी टू’…

संयुक्त राष्ट्र मानवाधिकार परिषदेवर भारताचा मोठा विजय

संयुक्त राष्ट्र मानवाधिकार परिषदेवर भारताचा मोठा विजय

►तीन वर्षांचा राहणार कार्यकाळ, संयुक्त राष्ट्रसंघ, १३ ऑक्टोबर –…

भारतीय चित्रपटांवर पूर्णपणे बंदी घाला

भारतीय चित्रपटांवर पूर्णपणे बंदी घाला

►पाकिस्तानी निर्मात्यांची मागणी, कराची, १३ ऑक्टोबर – भारतीय चित्रपटांवर…

रिलायन्ससोबत फक्त १० टक्के ऑफसेट करार

रिलायन्ससोबत फक्त १० टक्के ऑफसेट करार

►दसाँ एव्हिएशनच्या अधिकार्‍याची माहिती, पॅरिस, १२ ऑक्टोबर – राफेल…

तिहेरी तलाकच्या नव्या अध्यादेशानुसार पहिला गुन्हा औरंगाबादेत

तिहेरी तलाकच्या नव्या अध्यादेशानुसार पहिला गुन्हा औरंगाबादेत

औरंगाबाद, १९ ऑक्टोबर – सोशल मीडियावर तिहेरी तलाक दिल्याने…

तर अपमान विसरून भाजपाचा प्रचार करणार

तर अपमान विसरून भाजपाचा प्रचार करणार

►उद्धव ठाकरे यांची घोषणा, मुंबई, १९ ऑक्टोबर – पाच…

विजयादशमीनंतर राज्य मंत्रिमंडळ विस्तार?

विजयादशमीनंतर राज्य मंत्रिमंडळ विस्तार?

नवी दिल्ली, १६ ऑक्टोबर – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या…

३७० पेक्षाही घातक कलम ३५-ए!

३७० पेक्षाही घातक कलम ३५-ए!

॥ कटाक्ष : गजानन निमदेव | कलम ३५-ए हा…

न्यायपालिका संकटमुक्त

न्यायपालिका संकटमुक्त

॥ सारांश : ल.त्र्यं. जोशी | एवढ्या उच्च पातळीवरुन…

सभेत सोडलेला उंदीर

सभेत सोडलेला उंदीर

॥ जागता पहारा : भाऊ तोरसेकर | अडचणीतली काँग्रेस…

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

‘फोर्ब्स’ने नुकतीच सर्वाधिक कमाई करणार्‍या अभिनेत्यांच्या नावाची यादी जाहीर…

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

बॉलिवूडची बेबी डॉल म्हणजेच सनी लिओनीचे नाव इंटरनेटवर सर्वाधिक…

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

‘रेस- ३’ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये कमबॅक करणारा अभिनेता बॉबी देओल…

पंचांग
वार: | तिथी:
नक्षत्र: | राशी:
करण: | योग:
सूर्योदय: 06:22 | सूर्यास्त: 17:59
अयनांश:
Home » राज्य, हिमाचल-उत्तराखंड » भारत ठरेल जागतिक अर्थव्यवस्थेच्या वृद्धीचे इंजिन : मोदी

भारत ठरेल जागतिक अर्थव्यवस्थेच्या वृद्धीचे इंजिन : मोदी

उत्तराखंडातील पहिली गुंतवणूक शिखर परिषद,
डेहराडून, ७ ऑक्टोबर –

Modi 4

Modi 4

देश सध्या अभूतपूर्व सामाजिक आणि आर्थिक बदलाच्या युगातून जात आहे. हा सकारात्मक बदल, येत्या दशकात भारत हा जागतिक अर्थव्यवस्थेच्या वृद्धीचे इंजिन ठरेल, याचा विश्‍वास देणारा आहे, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज रविवारी सांगितले. ते डेस्टिनेशन उत्तराखंड इन्व्हेस्टर्स समिट २०१८ चे उद्घाटन करताना बोलत होते.
देशात झालेल्या सामाजिक आणि आर्थिक बदलांमुळे हा देश आता जगभरात गुंतवणुकीसाठी गुंतवणुकीसाठी सर्वोत्तम ठरला आहे, असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले. यावेळी देशातील प्रख्यात उद्योजक, व्यावसायिक उपस्थित होते.
वित्तीय तुटीचे प्रमाण कमी झाले आहे. सध्या चलनवाढीचा दरही नियंत्रणात आहे. देशातील मध्यमवर्गीयांची संख्या वाढत आहे. जनसांख्यिकीचा लाभ भारताला मिळणार आहे, असे त्यांनी यावेळी स्पष्ट केले.
मागील चार वर्षांत केंद्र व राज्य सरकारने केलेल्या १० हजार उपाययोजनांचा फायदा मिळाला. यामुळे जागतिक पातळीवरील व्यावसायिक मानांकनात भारताची स्थिती ४२ अंकांनी सुधरली, असे त्यांनी भारत गुंतवणुकीचे सर्वोत्तम स्थान असल्याचा खुलासा करताना सांगितले.
स्वातंत्र्यप्राप्तीनंतर करसंकलन पद्धतीत आमूलाग्र बदल करून जीएसटी पद्धत लागू केल्याने भारतात सर्वत्र समान दर लागू झाले. पायाभूत क्षेत्रामध्ये झालेल्या विकासावर प्रकाशझोत टाकताना त्यांनी सांगितले की, देशभरात १० हजार किलोमीटर लांबीचे महामार्ग उभारण्यात आले. मागील सरकारपेक्षा हा वेग दुप्पट असल्याचे त्यांनी सांगितले.
उड्डयन क्षेत्रानेही मोठी झेप घेतली असून, देशभरात १०० नवी विमानतळे आणि हेलिपॅड्स उभारण्यात आले आहेत. महानगर आणि लहान शहरांमधून विमान प्रवासाची सुविधा उपलब्ध करण्यात आल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली.
विविध शहरांमध्ये हाय स्पीड रेल्वे प्रकल्प आणि मेट्रो रेल्वे, सर्वांसाठी घरे ही केंद्राची योजना, सर्वांसाठी ऊर्जा-इंधन, सर्वांसाठी बँक सुविधांमुळे देशात मोठा बदल झाला आहे. त्यामुळे भारत गुंतवणुकीसाठी एक सर्वोत्तम स्थान होत आहे, असे त्यांनी सांगितले.
मेक इन इंडिया हा माझा गुंतवणूकदारांना संदेश असला, तरी ही गुंतवणूक केवळ भारतासाठी नव्हे, तर जगासाठी करा, असेही त्यांनी स्पष्ट केले.
आयुषमान भारत योजनेमुळे देशातील मोठ्या लोकसंख्येला विम्याचे छत्र लाभले. आरोग्य क्षेत्रात गुंतवणूक करण्याची ही एक गुंतवणूकदारांना मोठी संधी आहे, असेेही त्यांनी सांगितले.
उत्तराखंड हा उदयोन्मुख नवभारताच्या शिरपेचातील एक लकाकणारे रत्न आहे. औद्योगिक घराण्यांनी या राज्यामध्ये गुंतवणूक करावी, उत्तराखंडची स्थापना झाल्यापासूनची ती एक मोठे पाऊल असेल, असे आवाहनही त्यांनी यावेळी उद्योजकांना केले.

Posted by : | on : 8 Oct 2018
Filed under : राज्य, हिमाचल-उत्तराखंड.
You can follow any responses to this entry through the RSS 2.0You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Change Language: press Ctrl+g

    छायाचित्रातून

  • पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक
  • कोहली, मीराबाईला खेलरत्न कोहली, मीराबाईला खेलरत्न
  • अमित पांघळला बॉक्सिंगचे सुवर्ण अमित पांघळला बॉक्सिंगचे सुवर्ण
  • तेजिंदरपालला सुवर्णपदक तेजिंदरपालला सुवर्णपदक
  • महाराष्ट्राच्या राहीचा सुवर्णभेद महाराष्ट्राच्या राहीचा सुवर्णभेद

हवामान

दृष्टीक्षेपात

व्हिडीओ संग्रह

More in राज्य, हिमाचल-उत्तराखंड (34 of 606 articles)

Jammu Kashmir Map
जवानांना सतर्कतेचे आवाहन ►आज पहिल्या टप्प्याचे मतदान, श्रीनगर, ७ ऑक्टोबर - जम्मू-कश्मीरमध्ये होणार्‍या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये अडथळे आणण्यासाठी पाकिस्तान ...

×