ads
ads
कायद्याने राममंदिर मान्य!

कायद्याने राममंदिर मान्य!

►मुस्लिम पक्षकार अन्सारीची भूमिका, अयोध्या, २० नोव्हेंबर – अयोध्येतील…

एकाला फाशी, दुसर्‍याला जन्मठेप

एकाला फाशी, दुसर्‍याला जन्मठेप

►१९८४ मधील शीखनरसंहार; ३४ वर्षांनंतर निकाल, नवी दिल्ली, २०…

भक्तांची श्रद्धा चिरडू देणार नाही : अमित शाह

भक्तांची श्रद्धा चिरडू देणार नाही : अमित शाह

नवी दिल्ली, २० नोव्हेंबर – स्वामी अय्यप्पांच्या भक्तांशी केरळ…

काश्मीर पाकिस्तानचेच शाहिद आफ्रिदीची सारवासारव

काश्मीर पाकिस्तानचेच शाहिद आफ्रिदीची सारवासारव

इस्लामाबाद, १८ नोव्हेंबर – पाकिस्तानमधील राज्यकर्त्यांना देशाचा भाग असलेले…

अमेरिका भारताला देणार २४ पाणबुडीभेदी हेलिकॉप्टर्स

अमेरिका भारताला देणार २४ पाणबुडीभेदी हेलिकॉप्टर्स

►२०० अब्ज डॉलर्सचा व्यवहार, वॉशिंग्टन, १७ नोव्हेंबर – चीन…

मल्ल्यासाठी तिहारच योग्य

मल्ल्यासाठी तिहारच योग्य

►ब्रिटनच्या न्यायालयाचे शिक्कामोर्तब, लंडन, १७ नोव्हेंबर – सार्वजनिक आणि…

मराठा आरक्षणावरून विरोधकांमध्ये फूट

मराठा आरक्षणावरून विरोधकांमध्ये फूट

मुस्लिम आरक्षणावरून सभागृहात गदारोळ, राजदंड पळवला, मुंबई, २० नोव्हेंबर…

विधानसभा कामकाजास ‘वंदे मातरम’ने सुरुवात

विधानसभा कामकाजास ‘वंदे मातरम’ने सुरुवात

मुंबई, १९ नोव्हेंबर – महाराष्ट्र विधानसभेच्या हिवाळी अधिवेशनाच्या कामकाजास…

मराठा आरक्षणावर उद्या हायकोर्टात सुनावणी

मराठा आरक्षणावर उद्या हायकोर्टात सुनावणी

मुंबई, १९ नोव्हेंबर – मराठा आरक्षणाचा प्रश्‍न तातडीने निघाली…

तापमानवाढीचा धोका वाढतोय

तापमानवाढीचा धोका वाढतोय

॥ विशेष : अ‍ॅड. गिरीश राऊत | विकास पृथ्वीची…

अपनी अकल लगाओ!

अपनी अकल लगाओ!

॥ मानसरंग : मयुरेश डंके | गेटवे ऑफ इंडिया,…

राफेल सुनावणी : अर्धे नुकसान, अर्धा फायदा

राफेल सुनावणी : अर्धे नुकसान, अर्धा फायदा

॥ सारांश : ल.त्र्यं. जोशी | एक बाब मात्र…

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

‘फोर्ब्स’ने नुकतीच सर्वाधिक कमाई करणार्‍या अभिनेत्यांच्या नावाची यादी जाहीर…

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

बॉलिवूडची बेबी डॉल म्हणजेच सनी लिओनीचे नाव इंटरनेटवर सर्वाधिक…

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

‘रेस- ३’ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये कमबॅक करणारा अभिनेता बॉबी देओल…

पंचांग
वार: | तिथी:
नक्षत्र: | राशी:
करण: | योग:
सूर्योदय: 06:36 | सूर्यास्त: 17:48
अयनांश:
Home » मध्य प्रदेश-छत्तीसगड, राज्य » मध्यप्रदेशसाठी भाजपाचे १७७ उमेदवार घोषित

मध्यप्रदेशसाठी भाजपाचे १७७ उमेदवार घोषित

►४१ विद्यमान आमदारांना नाकारले,
नवी दिल्ली, २ नोव्हेंबर –

Bjp Flag

Bjp Flag

मध्यप्रदेश विधानसभा निवडणुकीसाठी भाजपाने १७७ उमेदवारांच्या नावाची आपली पहिली यादी आज जाहीर केली. भाजपाच्या पहिल्या यादीत तीन मंत्र्यासह ३५ आमदारांना उमेदवारी नाकारण्यात आली. यासोबतच तेलंगणा आणि मिझोरम विधानसभेसाठी उमेदवारांच्या नावांची घोषणाही भाजपाने केली आहे. मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांच्या विदिशा मतदारसंघात भाजपाने मुकेश टंडन यांना उमेदवारी दिली आहे. शिवराजसिंह चौहान कुठून निवडणूक लढणार ते अद्याप जाहीर झाले नाही.
भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांच्या अध्यक्षतेखाली गुरुवारी रात्री भाजपा मुख्यालयात झालेल्या केंद्रीय निवडणूक समितीच्या बैठकीत भाजप उमेदवारांच्या नावांवर शिक्कामोर्तब करण्यात आले. या बैठकीला पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री राजनाथसिंह, अर्थमंत्री अरुण जेटली, परराष्ट्र व्यवहार मंत्री सुषमा स्वराज उपस्थित होते. मध्यप्रदेशचे निवडणूक प्रभारी धर्मेंद्र प्रधान, प्रदेश प्रभारी डॉ. विनय सहस्त्रबुद्धे, मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान, प्रदेश भाजपा अध्यक्ष राकेशसिंह यांच्यासह अनेक नेते यावेळी उपस्थित होते.
भाजपाने मध्यप्रदेशात ६ महिला आमदारांसह ३५ विद्यमान आमदारांना उमेदवारी नाकारली आहे. माजी मुख्यमंत्री बाबुलाल गौर आणि शिवराज मंत्रिमंडळातील मंत्री हर्षसिंह यांच्या उमेदवारीबाबत अद्याप निर्णय झाला नाही.
शिवराजसिंह चौहान मंत्रिमंडळात मंत्री असलेल्या मायासिंह यांना भाजपाने उमेदवारी नाकारली आहे. पूर्व ग्वाल्हेर या मायासिंह यांच्या मतदारसंघात भाजपाने नगरसेवक सतीश शिकरवार यांना उमेदवारी दिली आहे. मायासिंह या राजस्थानच्या मुख्यमंत्री वसुंधरा राजे यांच्या मामी आहेत. माजी मंत्री गौरीसिंह शेजवार यांच्या जागेवर भाजपाने त्यांच्या मुलाला मुदितला उमेदवारी दिली आहे. गौरीसिंह शेजवार यांनी यावेळी निवडणूक लढवण्यास असमर्थता दर्शवली होती. भाजपाच्या उमेदवारांच्या यादीत एका खासदाराचाही समावेश असल्याचे समजते.
भाजपात प्रवेश केलेल्या तीन अपक्ष आमदारांनाही भाजपाने उमेदवारी दिली आहे. २३० सदस्यीय मध्यप्रदेश विधानसभेसाठी २८ नोव्हेंबरला एकाच टप्प्यात मतदान होणार आहे. भाजपा राज्यातील सर्व म्हणजे २३० जागा स्वबळावर लढवणार आहे. भाजपाच्या ५३ उमेदवारांच्या नावांची घोषणा अजून व्हायची आहे.
मिझोराममधील २४, तर तेलंगणातील २८ उमेदवारांच्या नावाची पहिली यादीही भाजपाने आज जाहीर केली.
माजी काँग्रेस खासदार प्रेमचंद गुडडू भाजपात
मध्यप्रदेश विधानसभा निवडणुकीच्या पृष्ठभूमीवर माजी खासदार व दिग्विजय सिंह यांचे निकटवर्ती प्रेमचंद गुड्डू यांनी आज शुक्रवारी भाजपात प्रवेश केल्यामुळे काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे.
राजधानी दिल्लीतील भाजपा मुख्यालयात भाजपाचे राष्ट्रीय महासचिव कैलास विजयवर्गीय तसेच केंद्रीय मंत्री थावरचंद गहलोत आणि नरेंद्रसिंह तोमर यांच्या उपस्थितीत प्रेमचंद गुड्डू यांनी भाजपात प्रवेश केला. गुड्डू २००९ ते २०१४ या काळात उज्जैनमधून काँग्रेसचे खासदार होते. प्रेमचंद गुड्डू भाजपातर्फे विधानसभा निवडणूक लढवण्याची शक्यता आहे.
प्रेमचंद गुड्डू यांच्या मुलाने अजित बौरासी यानेही आज इंदूरच्या भाजपा कार्यालयात भाजपात प्रवेश घेतला. प्रेमचंद काँग्रसमध्ये दिग्विजयसिंह यांचे निकटवर्ती होते. पक्षात सातत्याने होत असलेल्या उपेक्षेमुळे त्यांनी काही दिवसांपूर्वी प्रदेश काँग्रेस अध्यक्ष कमलनाथ यांचीही भेट घेतली होती. उज्जैनमध्ये काँग्रेस पदाधिकार्‍यांच्या नियुक्त्या करताना कमलनाथ यांनी गुड्डू यांच्या समर्थकांची उपेक्षा केली होती. त्यामुळे गुड्डू आणि कमलनाथ यांच्यात वादावादीही झाली होती.

Posted by : | on : 3 Nov 2018
Filed under : मध्य प्रदेश-छत्तीसगड, राज्य.
You can follow any responses to this entry through the RSS 2.0You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Change Language: press Ctrl+g

    छायाचित्रातून

  • पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक
  • कोहली, मीराबाईला खेलरत्न कोहली, मीराबाईला खेलरत्न
  • अमित पांघळला बॉक्सिंगचे सुवर्ण अमित पांघळला बॉक्सिंगचे सुवर्ण
  • तेजिंदरपालला सुवर्णपदक तेजिंदरपालला सुवर्णपदक
  • महाराष्ट्राच्या राहीचा सुवर्णभेद महाराष्ट्राच्या राहीचा सुवर्णभेद

हवामान

दृष्टीक्षेपात

व्हिडीओ संग्रह

More in मध्य प्रदेश-छत्तीसगड, राज्य (37 of 672 articles)

Ram Madhav
यांचा स्पष्ट आरोप, नवी दिल्ली, २ नोव्हेंबर - आंध्रप्रदेशचे मुख्यमंत्री आणि तेलुगू देसम पार्टीचे अध्यक्ष एन. चंद्राबाबू नायडू यांनी काँग्रेससोबत ...

×