ads
ads
एम. जे. अकबर यांचा राजीनामा

एम. जे. अकबर यांचा राजीनामा

►आरोपांचा केला इन्कार ►न्यायालयीन लढाई लढण्याचा निर्धार, नवी दिल्ली,…

नोटाबंदीवरून जागतिक अहवालात मोदी सरकारचे कौतुक

नोटाबंदीवरून जागतिक अहवालात मोदी सरकारचे कौतुक

नवी दिल्ली, १७ ऑक्टोबर – मोदी सरकारने घेतलेल्या नोटाबंदी…

केवायसी पूर्ण करणार्‍या मोबाईल वॉलेट कंपन्यांच्या आंतरक्रियाशीलतेला मान्यता

केवायसी पूर्ण करणार्‍या मोबाईल वॉलेट कंपन्यांच्या आंतरक्रियाशीलतेला मान्यता

►रिझर्व्ह बँकेचे आदेश, बंगळुरू, १७ ऑक्टोबर – केवायसी प्रक्रिया…

संयुक्त राष्ट्र मानवाधिकार परिषदेवर भारताचा मोठा विजय

संयुक्त राष्ट्र मानवाधिकार परिषदेवर भारताचा मोठा विजय

►तीन वर्षांचा राहणार कार्यकाळ, संयुक्त राष्ट्रसंघ, १३ ऑक्टोबर –…

भारतीय चित्रपटांवर पूर्णपणे बंदी घाला

भारतीय चित्रपटांवर पूर्णपणे बंदी घाला

►पाकिस्तानी निर्मात्यांची मागणी, कराची, १३ ऑक्टोबर – भारतीय चित्रपटांवर…

रिलायन्ससोबत फक्त १० टक्के ऑफसेट करार

रिलायन्ससोबत फक्त १० टक्के ऑफसेट करार

►दसाँ एव्हिएशनच्या अधिकार्‍याची माहिती, पॅरिस, १२ ऑक्टोबर – राफेल…

विजयादशमीनंतर राज्य मंत्रिमंडळ विस्तार?

विजयादशमीनंतर राज्य मंत्रिमंडळ विस्तार?

नवी दिल्ली, १६ ऑक्टोबर – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या…

विद्यमान संमेलनाध्यक्षांचा महिना उलटल्यावर आक्षेप

विद्यमान संमेलनाध्यक्षांचा महिना उलटल्यावर आक्षेप

►साहित्य संमेलनाध्यक्ष निवड प्रकरण, नागपूर, १६ ऑक्टोबर – अखिल…

विजय फणशीकर, रमेश पतंगे यांना लोकमान्य टिळक जीवनगौरव पुरस्कार

विजय फणशीकर, रमेश पतंगे यांना लोकमान्य टिळक जीवनगौरव पुरस्कार

►महाराष्ट्र शासनाचे उत्कृष्ट पत्रकारिता पुरस्कार जाहीर, मुंबई, १० ऑक्टोबर…

३७० पेक्षाही घातक कलम ३५-ए!

३७० पेक्षाही घातक कलम ३५-ए!

॥ कटाक्ष : गजानन निमदेव | कलम ३५-ए हा…

न्यायपालिका संकटमुक्त

न्यायपालिका संकटमुक्त

॥ सारांश : ल.त्र्यं. जोशी | एवढ्या उच्च पातळीवरुन…

सभेत सोडलेला उंदीर

सभेत सोडलेला उंदीर

॥ जागता पहारा : भाऊ तोरसेकर | अडचणीतली काँग्रेस…

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

‘फोर्ब्स’ने नुकतीच सर्वाधिक कमाई करणार्‍या अभिनेत्यांच्या नावाची यादी जाहीर…

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

बॉलिवूडची बेबी डॉल म्हणजेच सनी लिओनीचे नाव इंटरनेटवर सर्वाधिक…

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

‘रेस- ३’ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये कमबॅक करणारा अभिनेता बॉबी देओल…

पंचांग
वार: | तिथी:
नक्षत्र: | राशी:
करण: | योग:
सूर्योदय: 06:21 | सूर्यास्त: 18:01
अयनांश:
Home » बिहार-झारखंड, राज्य » मुजफ्फरपूर प्रकरणाची न्यायालयीन चौकशी

मुजफ्फरपूर प्रकरणाची न्यायालयीन चौकशी

जदयुची तयारी, नितीश कुमार देणार नाहीत राजीनामा,
नवी दिल्ली, ५ ऑगस्ट –

Nitish Kumar1

Nitish Kumar1

मुजफ्फरपूर येथील मुलींच्या वसतिगृहातील बलात्कार प्रकरणी विरोधी पक्षांकडून सुरू असलेल्या हल्ल्याला उत्तर देताना जनता दल युनायटेडने (जदयु) आज स्पष्ट केले की, या प्रकरणावरून बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार राजीनामा देणार नाहीत. आमचा पक्ष या प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाच्या देखरेखीखाली तपास व चौकशी करण्यासाठी तयार आहे, असे पक्षाचे वरिष्ठ नेते के. सी. त्यागी यांनी सांगितले.
या प्रकरणी नितीश कुमार यांच्या मुख्यमंत्रिपदाच्या राजीनाम्याची मागणी फेटाळून लावताना त्यागी म्हणाले की, काल दिल्लीस्थित जंतरमंतर येथे लालूप्रसाद यादव यांच्या राष्ट्रीय जनता दलातर्फे आयोजित निदर्शनामध्ये सहभागी काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्यासह इतरही पक्षांच्या नेत्यांची मी निंदा करतो. बिहारमध्ये दुर्भाग्यपूर्ण व लाजीरवाणी घटना घडली असताना त्याचा राजकीय लाभ घेण्याचे घाणेरडे राजकारण या पक्षांतर्फे केले जात आहे. काल या राजकीय पक्षांनी केवळ मैत्री दिवस साजरा केला, असेही त्यागी म्हणाले.
येथे एका पत्रपरिषदेत बोलताना त्यागी म्हणाले की, मुलींवर झालेला बलात्कार हा राओला सरकार आणि नितीश कुमार यांच्या नेतृत्वाखालील बिहार सरकारच्या विरोधात विरोधी पक्षांसाठी एकता दाखविण्याचा किंवा नितीश कुमार यांचा राजीनामा मागण्याचा मुद्दा कसा काय होऊ शकतो. बिहारमधील पीडितांच्या मुद्यांवरून राजकारण केले जाणे, दुर्दैवी बाब आहे. विरोधी पक्षांनीही भलेही मागणी केली असली तरी नितीश कुमार मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा देणार नाहीत.
हिंमत असेल तर नितीश कुमार यांना विधानसभेतून बडतर्फ करून दाखवावे, असे आव्हानही त्यागी यांनी यावेळी विरोधी पक्षांना दिले. नितीश कुमार एक संवेदनशील व्यक्तिमत्त्व आहे. या घटनेमुळे त्यांनाही दु:ख झाले आहे, तेही लाजीरवाणे झाले आहेत. मात्र, विरोध पक्ष या घटनेचे राजकारण करून नितीश कुमार यांना वेदना देण्याचाच प्रयत्न करीत आहे. मात्र, ते कदापि राजीनामा देणार नाहीत. आम्ही त्यांना तसे करू देणार नाही.
नितीश कुमार यांच्या राजीनाम्याची मागणी ही वाळू माफिया आणि मद्यसम्राटांच्या इशार्‍यावरून पुढे करण्यात येत आहे. या राजीनाम्यामुळे त्यांना लाभ मिळवून देण्याचा विरोधकांचा प्रयत्न आहे. नितीश कुमार यांच्या नेतृत्वाखालील राज्य सरकारने प्रभावीपणे यांच्यावर प्रतिबंध आणले आहेत, असेही त्यांनी निदर्शनास आणून दिले.
राजदच्या निदर्शने आंदोलनात राहुल गांधी यांनी सहभागी होणे दुर्दैवी आहे. मी सीताराम येचुरी व डी. राजा यांचीही निंदा करतो. जेएनयु अध्यक्ष चंद्रशेखर आणि पूर्णियाचे आमदार अजित सरकार यांची हत्या ते विसरले आणि राजदच्या विरोध प्रदर्शनात ते सहभागी झाले, असेही जदयुचे राज्यसभा सदस्य असलेले व पक्षाचे प्रवक्ते त्यागी म्हणाले. या प्रकरणाच्या तपास व चौकशीवर देखरेख ठेवण्याचीं विनंती नितीश कुमार यांनी पाटणा उच्च न्यायालयाला एक पत्र पाठवून केली आहे. एवढेच नव्हे तर सर्वोच्च न्यायालयाच्या देखरेखीखालीही चौकशी करावी लागली तर त्यासाठीही आमचा पक्ष तयार असल्याचे त्यागी यांनी सांगितले.
बिहार सरकारने आरोपींच्या विरोधात त्वरित कारवाई करण्याचे निर्देश देऊन राजद आणि विरोधी पक्षांच्या इच्छेनुसार या घटनेच्या सीबीआय चौकशीची शिफारसही केली आहे, अशी माहिती देऊन त्यागी म्हणाले की, विरोधी पक्ष या घटनेचा वापर निव्वळ अफवा पसरविण्यासाठी, तसेच वाळू माफिया व मद्यसम्राटांना सहकार्य मिळवून देण्यासाठी आहे. विरोधक जदयु आणि नितीश कुमार यांना हटवून राज्यात अराजकता आणि जंगलराज पुन्हा सुरू होण्यासाठी प्रयत्न करीत आहेत, असा आरोपही त्यागी यांनी केला.
राज्यातील मुलांच्या सर्वच वसतीगृह आणि अनाथालयांची चौकशी सर्वोच्च न्यायालयाच्या देखरेखीखाली करण्यात यावी, अशी मागणीही यावेळी त्यागी यांनी केली.
सहा अधिकारी निलंबित
पाटणा – बिहारच्या मुझफ्फरपूर येथील मुलींच्या वसतीगृहात जवळपास ३४ मुलींवरील झालेल्या बलात्काराच्या प्रकरणामुळे बिहारमधील नितीश कुमार सरकार अडचणीत आले आहे. विरोधी पक्षांकडून या प्रकरणी नितीश कुमार यांच्या राजीनाम्याची मागणी होत असताना आता या प्रकरणी मोठी कारवाई करण्यात आली आहे. टाटा इंस्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सच्या अहवालानंतर राज्यपाल सत्यपाल मलिक यांनी सामाजिक कल्याण विभागाच्या सहायक संचालकांना निलंबित केले आहे. मुजफ्फरपूरशिवाय अररिया, मधुबनी, भोजपूर, भागलपूर आणि मुंगेर येथीलही सहायक संचालकांचे निलंबन करण्यात आले आहे.
टाटा इंस्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सच्या अहवालानंतरही या निलंबित सहायक संचालकांनी आरोपींवर कोणतीही कारवाई न केल्याचा आरोप त्यांच्यावर आहे. दिवेश कुमार शर्मा, घनश्याम रविदास, कुमार सत्यकाम, आलोक रंजन, गीतांजली प्रसाद, सीमाकुमारी अशी निलंबित अधिकार्‍यांची नावे आहेत.
बिहारमधील मुझफ्फरपूर येथील मुलींच्या वसतीगृहात लहान मुलींवर लैंगिक अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. जवळपास ३४ मुलींवर बलात्कार करण्यात आला असून या घटनेने बिहारमध्ये संतापाची लाट उसळली आहे. या प्रकरणावरून काँग्रेसने भाजपा आणि जनता दल संयुक्तवर टीकास्त्र सोडले आहे.
लालूप्रसाद यादव यांचे चिरंजीव तेजस्वी यादव यांच्या नेतृत्वात काल नवी दिल्लीस्थित जंतरमंतर येथे विरोधक एकत्र आले होते व त्यांनी या प्रकरणावरून सरकारवर हल्ला चढविला होता. भाजपा आणि नितीश कुमार सरकार मुझफ्फरपूरमधील प्रमुख आरोपी ब्रजेश ठाकूरला पाठीशी घालत आहे, असा आरोपही काँग्रेसने केला आहे. गुरुवारी बिहार बंदची हाक देण्यात आली होती, तसेच सुप्रीम कोर्टानेही या प्रकरणाची स्वत:हून गुरुवारी दखल घेतली. सुप्रीम कोर्टाने बिहार सरकार, महिला व बालकल्याण मंत्रालयाला नोटीस बजावली आहे. बिहार सरकारने यासंदर्भात तपास अहवाल न्यायालयात सादर करावा, असे निर्देश कोर्टाने दिले आहेत.
सुप्रीम कोर्टाने वृत्तपत्र आणि वृत्तवाहिन्यांनाही निर्देश दिले आहेत. बलात्कार पीडित लहान मुलांचे छायाचित्र मग ते मॉर्फ केलेले किंवा चेहरा ब्लर केलेले असले तरी ते वापरू नये, अशा शब्दात न्यायालयाने प्रसार माध्यमांना ठणकावले आहे. तसेच त्यांची मुलाखतही घेऊ नये, असेही न्यायालयाने स्पष्ट केले आहे.

Posted by : | on : 6 Aug 2018
Filed under : बिहार-झारखंड, राज्य.
You can follow any responses to this entry through the RSS 2.0You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Change Language: press Ctrl+g

    छायाचित्रातून

  • पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक
  • कोहली, मीराबाईला खेलरत्न कोहली, मीराबाईला खेलरत्न
  • अमित पांघळला बॉक्सिंगचे सुवर्ण अमित पांघळला बॉक्सिंगचे सुवर्ण
  • तेजिंदरपालला सुवर्णपदक तेजिंदरपालला सुवर्णपदक
  • महाराष्ट्राच्या राहीचा सुवर्णभेद महाराष्ट्राच्या राहीचा सुवर्णभेद

हवामान

दृष्टीक्षेपात

व्हिडीओ संग्रह

More in बिहार-झारखंड, राज्य (111 of 604 articles)

Rahul Gandhi 7
गांधीच करणार नेतृत्व, वृत्तसंस्था नवी दिल्ली, ५ ऑगस्ट - मध्यप्रदेशप्रमाणेच आता मुख्यमंत्रिपदावरून काँग्रेस पक्षात गटबाजीला उधाण आले आहे. अशा परिस्थितीत ...

×