ads
ads
कायद्याने राममंदिर मान्य!

कायद्याने राममंदिर मान्य!

►मुस्लिम पक्षकार अन्सारीची भूमिका, अयोध्या, २० नोव्हेंबर – अयोध्येतील…

एकाला फाशी, दुसर्‍याला जन्मठेप

एकाला फाशी, दुसर्‍याला जन्मठेप

►१९८४ मधील शीखनरसंहार; ३४ वर्षांनंतर निकाल, नवी दिल्ली, २०…

भक्तांची श्रद्धा चिरडू देणार नाही : अमित शाह

भक्तांची श्रद्धा चिरडू देणार नाही : अमित शाह

नवी दिल्ली, २० नोव्हेंबर – स्वामी अय्यप्पांच्या भक्तांशी केरळ…

काश्मीर पाकिस्तानचेच शाहिद आफ्रिदीची सारवासारव

काश्मीर पाकिस्तानचेच शाहिद आफ्रिदीची सारवासारव

इस्लामाबाद, १८ नोव्हेंबर – पाकिस्तानमधील राज्यकर्त्यांना देशाचा भाग असलेले…

अमेरिका भारताला देणार २४ पाणबुडीभेदी हेलिकॉप्टर्स

अमेरिका भारताला देणार २४ पाणबुडीभेदी हेलिकॉप्टर्स

►२०० अब्ज डॉलर्सचा व्यवहार, वॉशिंग्टन, १७ नोव्हेंबर – चीन…

मल्ल्यासाठी तिहारच योग्य

मल्ल्यासाठी तिहारच योग्य

►ब्रिटनच्या न्यायालयाचे शिक्कामोर्तब, लंडन, १७ नोव्हेंबर – सार्वजनिक आणि…

मराठा आरक्षणावरून विरोधकांमध्ये फूट

मराठा आरक्षणावरून विरोधकांमध्ये फूट

मुस्लिम आरक्षणावरून सभागृहात गदारोळ, राजदंड पळवला, मुंबई, २० नोव्हेंबर…

विधानसभा कामकाजास ‘वंदे मातरम’ने सुरुवात

विधानसभा कामकाजास ‘वंदे मातरम’ने सुरुवात

मुंबई, १९ नोव्हेंबर – महाराष्ट्र विधानसभेच्या हिवाळी अधिवेशनाच्या कामकाजास…

मराठा आरक्षणावर उद्या हायकोर्टात सुनावणी

मराठा आरक्षणावर उद्या हायकोर्टात सुनावणी

मुंबई, १९ नोव्हेंबर – मराठा आरक्षणाचा प्रश्‍न तातडीने निघाली…

तापमानवाढीचा धोका वाढतोय

तापमानवाढीचा धोका वाढतोय

॥ विशेष : अ‍ॅड. गिरीश राऊत | विकास पृथ्वीची…

अपनी अकल लगाओ!

अपनी अकल लगाओ!

॥ मानसरंग : मयुरेश डंके | गेटवे ऑफ इंडिया,…

राफेल सुनावणी : अर्धे नुकसान, अर्धा फायदा

राफेल सुनावणी : अर्धे नुकसान, अर्धा फायदा

॥ सारांश : ल.त्र्यं. जोशी | एक बाब मात्र…

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

‘फोर्ब्स’ने नुकतीच सर्वाधिक कमाई करणार्‍या अभिनेत्यांच्या नावाची यादी जाहीर…

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

बॉलिवूडची बेबी डॉल म्हणजेच सनी लिओनीचे नाव इंटरनेटवर सर्वाधिक…

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

‘रेस- ३’ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये कमबॅक करणारा अभिनेता बॉबी देओल…

पंचांग
वार: | तिथी:
नक्षत्र: | राशी:
करण: | योग:
सूर्योदय: 06:36 | सूर्यास्त: 17:48
अयनांश:
Home » दिल्ली, राज्य » लाभाचे पद : आपच्या २७ आमदारांना जीवदान

लाभाचे पद : आपच्या २७ आमदारांना जीवदान

►निवडणूक आयोगाच्या शिफारसीनुसार राष्ट्रपतींनी याचिका फेटाळली
►केजरीवाल, सिसोदिया, आपच्या ११ आमदारांना जामीन,
नवी दिल्ली, २५ ऑक्टोबर –

Kejriwal

Kejriwal

लाभाच्या पद प्रकरणात आमदारकी गमावण्याचा धोका असलेल्या आम आदमी पार्टीच्या २७ आमदारांना आज गुरुवारी मोठा दिलासा मिळाला. राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी या संदर्भातील याचिका फेटाळून लावली. त्यामुळे आपच्या २७ आमदारांची आमदारकी कायम राहिली आहे.
आपचे सरकार सत्तेवर आल्यानंतर मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी आपच्या २७ आमदारांना त्यांच्या त्यांच्या मतदारसंघातील सरकारी रुग्णालयातील रुग्ण कल्याण समितीचे अध्यक्ष म्हणून नियुक्त केले होते. रुग्ण कल्याण समितीचे अध्यक्षपद हे लाभाचे पद असल्याचा दावा करत विभोर आनंद नावाच्या व्यक्तीने आपच्या २७ आमदारांची आमदारकी रद्द करण्याची याचिका राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्याकडे दाखल केली होती. राष्ट्रपतींनी पुढील कारवाईसाठी ही याचिका निवडणूक आयोगाकडे पाठवली होती.
निवडणूक आयोगाने सुनावणी करत रुग्ण कल्याण समितीच्या अध्यक्षाला कोणताही पगार वा अन्य भत्ते मिळत नसल्यामुळे हे पद लाभाचे नसल्याबाबतचा अहवाल राष्ट्रपती कार्यालयाकडे पाठवला होता. निवडणूक आयोगाच्या अहवालानुसार राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी ही याचिका फेटाळून लावली. त्यामुळे या २७ जणांच्या आमदारकीवर असलेली टांगती तलवार संपुष्टात आली आहे.
लाभाच्या पद प्रकरणात २७ आमदारांचे सदस्यत्व रद्द झाले असते तरी, केजरीवाल सरकारला कोणताही धोका पोहोचला नसता, मात्र सरकारचे संख्याबळ घटले असते. तसेच या २७ मतदारसंघात पोटनिवडणुका घ्याव्या लागल्या असत्या, तो प्रकारही आता टळला आहे. दिल्ली विधानसभेत आपचे ६६ आमदार आहेत. आपच्या २७ आमदारांचे संख्याबळ कमी झाले असते तर विधानसभेतील आमदाराची संख्या ३९ झाली असती. ७० सदस्यांच्या विधानसभेत ही संख्या बहुमतापेक्षा थोडी जास्तच होती.
मुख्य सचिव अंशुप्रकाश मारहाण प्रकरण
दिल्लीचे मुख्य सचिव अंशुप्रकाश यांना मारहाण करण्याच्या प्रकरणात मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आणि उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया आणि आम आदमी पार्टीच्या ११ आमदारांना न्यायालयाने आज गुरुवारी जामीन मंजूर केला आहे.
मुख्यमंत्री केजरीवाल यांच्या निवासस्थानी १९ फेब्रुवारीच्या रात्री झालेल्या बैठकीत आपच्या आमदारांनी मुख्य सचिव अंशुप्रकाश यांना मारहाण केली होती. या घटनेमुळे प्रचंड खळबळ उडाली होती. दिल्ली सरकारमधील आयएएस अधिकार्‍यांच्या संघटनेने संपाचे हत्यार उपसले होते, दिल्ली सेवा संघाच्या अधिकार्‍यांनीही या संपाला पाठिंबा दिला होता. त्यामुळे केजरीवाल सरकारची प्रचंड राजकीय कोंडी झाली होती. याप्रकरणी आपचे आमदार प्रकाश जारवाल आणि अमानतुल्ला खान यांना अटक झाली होती. पोलिसांनी याप्रकरणी मुख्यमंत्री केजरीवाल, उपमुख्यमंत्री सिसोदिया आणि आपच्या ११ आमदारांवरही आरोपपत्र दाखल करत त्यांना समन्स बजावला होता. दिल्ली पोलिसांनी मुख्यमंत्री केजरीवाल यांच्या निवासस्थानी धाड घालत केजरीवाल आणि सिसोदिया यांची कसून चौकशीही केली होती.
न्यायालयाच्या समन्सनुसार केजरीवाल, सिसोदिया आणि आपचे ११ आमदार आज सकाळी अतिरिक्त मुख्य महानगर दंडाधिकारी समर विशाल यांच्या न्यायालयात उपस्थित झाले. न्यायालयाने प्रकाश जारवाल आणि अमानतुल्ला खान यांना वगळून अन्य सर्वांची ५० हजार रुपयांच्या व्यक्तिगत जातमुचलक्यावर सुटका केली. प्रकाश जारवाल आणि अमानमुल्ला खान यांना उच्च न्यायालयाने याआधीच जामीन मंजूर केला आहे. याप्रकरणी पुढील सुनावणीसाठी न्यायालयाने ७ डिसेंबर ही तारिख निश्‍चित केली.

Posted by : | on : 26 Oct 2018
Filed under : दिल्ली, राज्य.
You can follow any responses to this entry through the RSS 2.0You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Change Language: press Ctrl+g

    छायाचित्रातून

  • पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक
  • कोहली, मीराबाईला खेलरत्न कोहली, मीराबाईला खेलरत्न
  • अमित पांघळला बॉक्सिंगचे सुवर्ण अमित पांघळला बॉक्सिंगचे सुवर्ण
  • तेजिंदरपालला सुवर्णपदक तेजिंदरपालला सुवर्णपदक
  • महाराष्ट्राच्या राहीचा सुवर्णभेद महाराष्ट्राच्या राहीचा सुवर्णभेद

हवामान

दृष्टीक्षेपात

व्हिडीओ संग्रह

More in दिल्ली, राज्य (50 of 672 articles)

Savjibhai Dholakia
२५ ऑक्टोबर - दिवाळीच्या मुहूर्तावर सावजी ढोलकिया या गुजरातमधील सूरतच्या हिरा व्यापार्‍याने सलग चौथ्या वर्षी कर्मचार्‍यांना बंपर बोनस दिला आहे. ...

×