ads
ads
महाआघाडी देशविरोधी

महाआघाडी देशविरोधी

►पंतप्रधान मोदी यांचा विरोधकांवर हल्लाबोल, सिलवासा, १९ जानेवारी –…

भाजपाच दलितांचा उद्धारकर्ता

भाजपाच दलितांचा उद्धारकर्ता

►६० वर्षांत काँग्रेसने दलितांना काय दिले? ►नितीन गडकरी यांचा…

दिल्लीतील सरकार बदलवा

दिल्लीतील सरकार बदलवा

►विरोधकांच्या महारॅलीत ममता बॅनर्जींचा आक्रोश ►पंतप्रधानपदी कोण, निवडणुकीनंतर निर्णय,…

आणिबाणी जाहीर करण्याची ट्रम्प यांची धमकी

आणिबाणी जाहीर करण्याची ट्रम्प यांची धमकी

►मेक्सिको सीमेवरील भिंतीचा वाद पेटणार, वॉशिंग्टन, १० जानेवारी –…

विक्रम मिस्री चीनमधील नवे राजदूत

विक्रम मिस्री चीनमधील नवे राजदूत

►पदभार स्वीकारताच केली द्विपक्षीय मुद्यांवर चर्चा, बीजिंग, ८ जानेवारी…

शटडाऊन सुरूच ठेवेन, आणिबाणीचाही पर्याय खुला

शटडाऊन सुरूच ठेवेन, आणिबाणीचाही पर्याय खुला

►डोनाल्ड ट्रम्प यांचा काँगे्रस सभागृहाला इशारा ►मेक्सिकोच्या सीमेवर भिंत…

डान्सबार बंदीसाठी नवा अध्यादेश

डान्सबार बंदीसाठी नवा अध्यादेश

मुंबई, १८ जानेवारी – राज्यातील डान्सबार पुन्हा सुरू करण्याचा…

समृद्धी महामार्गासाठी स्टेट बँक देणार ८५०० कोटींचे कर्ज

समृद्धी महामार्गासाठी स्टेट बँक देणार ८५०० कोटींचे कर्ज

►९५ टक्के भूसंपादन पूर्ण, मुंबई, १७ जानेवारी – स्टेट…

ओबीसी महामंडळांसाठी ७३६ कोटी!

ओबीसी महामंडळांसाठी ७३६ कोटी!

•तरुणांना मिळणार १० ते ५० लाखांचे कर्ज •सावित्रीबाई फुले…

भारताचा पुरुषार्थ प्रकट होण्यास…

भारताचा पुरुषार्थ प्रकट होण्यास…

॥ विशेष : डॉ. मनमोहन वैद्य | सह सरकार्यवाह,…

ऑगस्टा वेस्टलँड

ऑगस्टा वेस्टलँड

॥ चतुरस्त्र : स्वाती तोरसेकर | ऑगस्टा विषयाला हात…

तिसरी आघाडी की तीन आघाड्या?

तिसरी आघाडी की तीन आघाड्या?

॥ जागता पहारा : भाऊ तोरसेकर | भाजपा वा…

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

‘फोर्ब्स’ने नुकतीच सर्वाधिक कमाई करणार्‍या अभिनेत्यांच्या नावाची यादी जाहीर…

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

बॉलिवूडची बेबी डॉल म्हणजेच सनी लिओनीचे नाव इंटरनेटवर सर्वाधिक…

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

‘रेस- ३’ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये कमबॅक करणारा अभिनेता बॉबी देओल…

पंचांग
वार: | तिथी:
नक्षत्र: | राशी:
करण: | योग:
सूर्योदय: 07:02 | सूर्यास्त: 18:13
अयनांश:
Home » बंगाल, राज्य » वीकेंडला करतात गोसेवा!

वीकेंडला करतात गोसेवा!

गोरक्षणासाठी बहुराष्ट्रीय कंपन्यांच्या कर्मचार्‍यांची धाव,
कोलकाता, २ सप्टेंबर –

Cow Goseva

Cow Goseva

गोहत्येचा मुद्दा देशभरात संवेदनशील झाला असतानाच, बंगालमधील बहुराष्ट्रीय कंपन्यांचे अनेक कर्मचारी गोरक्षणाच्या एकमेव उद्देशाने एकत्र आले आहेत. हे कर्मचारी आपला वीकेंड याच कार्यासाठी घालवतात.
हे सर्व जण वेगवेगळ्या बहुराष्ट्रीय कंपन्यांमध्ये कामाला आहेत. यातील काही कंपन्यांना शनिवार आणि रविवार असे सलग दोन दिवस, काही कंपन्यांना केवळ रविवारची सुटी असते. ज्यांना दोन दिवस सुट्या असता ते कर्मचारी दोन्ही दिवसांतील भरपूर वेळ उत्तर २४ परगणा जिल्ह्यातील गोशाळेत घालवतात. गायीचे शेण उचलण्यापासून तर त्यांना स्नान घालण्यापर्यंतचे सर्व काम ते करीत असतात. रविवारी सुटी असणारे कर्मचारी संपूर्ण दिवस देतात.
या पथकातील एक सदस्य मंजितसिंग म्हणाला की, गोसेवा करण्याचा निर्धार आम्ही केलेला आहे. लोकांकडे सर्वच गोष्टींसाठी भरपूर वेळ असतो, पण गोसेवेसाठी कुणीच आपला वेळ देत नाहीत. आमच्या पथकात १० ते १२ लोक आहेत. आमच्यापैकी प्रत्येक जण किंवा गट सुटीच्या दिवशी या जिल्ह्यातील प्रत्येक गोशाळेला भेट देतात आणि सेवा करतात.
अन्य एक सदस्य राजीव मिश्रा यांनी गटातील सदस्यांची कामे आणि त्यामागील मुख्य उद्देश विशद केला. गायींचे रक्षण करण्यासोबतच, गायीच्या शेणाचे आणि त्यापासून तयार होणार्‍या जैविक इंधनाचे महत्त्व नागरिकांना पटवून देण्याचे काम आम्ही करीत असतो. गायीच्या शेणापासून गोवर्‍या तयार होतात आणि या गोवर्‍यांच्या वापराचे अनेक फायदे आहेत. विशेष म्हणजे, गोवर्‍यांपासून घातक अशा कोणत्याही वायूची निर्मिती होत नाही. लोक आता शेणापासून धूपकांडी तयार करीत आहेत आणि ही कांडी पर्यावरणपूरक असल्याने त्यातून त्यांना उत्पन्नही मिळत आहे. प्रदूषणावर आळा घालण्यासोबतच डासांनाही पळवून लावण्यात या कांड्यांची मोठी मदत होत आहे.
गोमूत्राचेही वेगळे महत्त्व
गायीचे शेण आणि गोमूत्रापासून तयार होणार्‍या उत्पादनांचे महत्त्वही या पथकातील सदस्य नागरिकांना सांगत आहेत. या सदस्यांनी धूप कांड्या आणि अन्य वस्तूंसोबतच घर स्वच्छ करण्याचे लिक्विडही तयार केले आहे. येथील गोशाळांमध्ये या सर्व वस्तू विक्रीसाठी उपलब्ध असून, मोठ्या प्रमाणात त्यांची विक्री होत आहे.
कंपन्यांही करतात आर्थिक मदत
या पथकात नव्यानेच आलेला मनीष सिंह म्हणतो की, गायींची काळजी घेण्यासाठी आम्ही येथे प्रत्येक शनिवार आणि रविवारी येतो. या कार्यासाठी आमच्या कंपन्याही आम्हाला आर्थिक पाठबळ देत आहेत. गोरक्षा का आवश्यक आहे आणि यापासून रोजगाराची निर्मिती कशी होऊ शकते, याबाबत प्रचार आणि प्रसार करण्यावर आम्ही भर दिला असून, लोकांनाही आता गायींचे महत्त्व पटू लागले आहे. अन्य एक सदस्य पंकज कुमार म्हणतो की, बंगालमधील बहुतांश भागांमध्ये गायींची अमानुष कत्तल केली जाते. गाय हिंदूंचे श्रद्धास्थान आहे आणि यामुळेच गोरक्षा आपल्या सर्वांचेच मुख्य कर्तव्य असायला हवे. गोहत्येचा विपरित परिणाम पर्यावरणावरही होत असतो.

Posted by : | on : 3 Sep 2018
Filed under : बंगाल, राज्य.
You can follow any responses to this entry through the RSS 2.0You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Change Language: press Ctrl+g

    छायाचित्रातून

  • भारताने ऑस्ट्रेलियात रचला इतिहास भारताने ऑस्ट्रेलियात रचला इतिहास
  • हार्दिक पंड्या, लोकेश राहुलला बीसीसीआयची नोटीस हार्दिक पंड्या, लोकेश राहुलला बीसीसीआयची नोटीस
  • भारताचा ऑस्ट्रेलियात विक्रमी विजय भारताचा ऑस्ट्रेलियात विक्रमी विजय
  • पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक
  • कोहली, मीराबाईला खेलरत्न कोहली, मीराबाईला खेलरत्न

हवामान

दृष्टीक्षेपात

व्हिडीओ संग्रह

More in बंगाल, राज्य (233 of 644 articles)

Nagaland
दशकांच्या चर्चेचे फलित, वृत्तसंस्था नवी दिल्ली, ३१ ऑगस्ट - जवळपास २० वर्षांपासून होत असलेल्या चर्चेनंतर नागा बंडखोरांनी ग्रेटर नागालॅण्ड किंवा ...

×