ads
ads
कायद्याने राममंदिर मान्य!

कायद्याने राममंदिर मान्य!

►मुस्लिम पक्षकार अन्सारीची भूमिका, अयोध्या, २० नोव्हेंबर – अयोध्येतील…

एकाला फाशी, दुसर्‍याला जन्मठेप

एकाला फाशी, दुसर्‍याला जन्मठेप

►१९८४ मधील शीखनरसंहार; ३४ वर्षांनंतर निकाल, नवी दिल्ली, २०…

भक्तांची श्रद्धा चिरडू देणार नाही : अमित शाह

भक्तांची श्रद्धा चिरडू देणार नाही : अमित शाह

नवी दिल्ली, २० नोव्हेंबर – स्वामी अय्यप्पांच्या भक्तांशी केरळ…

काश्मीर पाकिस्तानचेच शाहिद आफ्रिदीची सारवासारव

काश्मीर पाकिस्तानचेच शाहिद आफ्रिदीची सारवासारव

इस्लामाबाद, १८ नोव्हेंबर – पाकिस्तानमधील राज्यकर्त्यांना देशाचा भाग असलेले…

अमेरिका भारताला देणार २४ पाणबुडीभेदी हेलिकॉप्टर्स

अमेरिका भारताला देणार २४ पाणबुडीभेदी हेलिकॉप्टर्स

►२०० अब्ज डॉलर्सचा व्यवहार, वॉशिंग्टन, १७ नोव्हेंबर – चीन…

मल्ल्यासाठी तिहारच योग्य

मल्ल्यासाठी तिहारच योग्य

►ब्रिटनच्या न्यायालयाचे शिक्कामोर्तब, लंडन, १७ नोव्हेंबर – सार्वजनिक आणि…

मराठा आरक्षणावरून विरोधकांमध्ये फूट

मराठा आरक्षणावरून विरोधकांमध्ये फूट

मुस्लिम आरक्षणावरून सभागृहात गदारोळ, राजदंड पळवला, मुंबई, २० नोव्हेंबर…

विधानसभा कामकाजास ‘वंदे मातरम’ने सुरुवात

विधानसभा कामकाजास ‘वंदे मातरम’ने सुरुवात

मुंबई, १९ नोव्हेंबर – महाराष्ट्र विधानसभेच्या हिवाळी अधिवेशनाच्या कामकाजास…

मराठा आरक्षणावर उद्या हायकोर्टात सुनावणी

मराठा आरक्षणावर उद्या हायकोर्टात सुनावणी

मुंबई, १९ नोव्हेंबर – मराठा आरक्षणाचा प्रश्‍न तातडीने निघाली…

तापमानवाढीचा धोका वाढतोय

तापमानवाढीचा धोका वाढतोय

॥ विशेष : अ‍ॅड. गिरीश राऊत | विकास पृथ्वीची…

अपनी अकल लगाओ!

अपनी अकल लगाओ!

॥ मानसरंग : मयुरेश डंके | गेटवे ऑफ इंडिया,…

राफेल सुनावणी : अर्धे नुकसान, अर्धा फायदा

राफेल सुनावणी : अर्धे नुकसान, अर्धा फायदा

॥ सारांश : ल.त्र्यं. जोशी | एक बाब मात्र…

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

‘फोर्ब्स’ने नुकतीच सर्वाधिक कमाई करणार्‍या अभिनेत्यांच्या नावाची यादी जाहीर…

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

बॉलिवूडची बेबी डॉल म्हणजेच सनी लिओनीचे नाव इंटरनेटवर सर्वाधिक…

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

‘रेस- ३’ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये कमबॅक करणारा अभिनेता बॉबी देओल…

पंचांग
वार: | तिथी:
नक्षत्र: | राशी:
करण: | योग:
सूर्योदय: 06:36 | सूर्यास्त: 17:48
अयनांश:
Home » केरळ, राज्य » शबरीमलैच्या दैनंदिन कामकाजात सरकारी हस्तक्षेप नको

शबरीमलैच्या दैनंदिन कामकाजात सरकारी हस्तक्षेप नको

►केरळ हायकोर्टाने खडसावले
►शबरीमलै मंदिर उघडले, एकही महिला आली नाही,
कोची, ५ नोव्हेंबर –

Shabarimalai Swami Ayyappa Mandir

Shabarimalai Swami Ayyappa Mandir

शबरीमलै येथील स्वामी अय्यप्पा मंदिराच्या दैनंदिन कारभारात हस्तक्षेप करण्याचा राज्य सरकारला मुळीच अधिकार नाही. केवळ शबरीमलै परिसरात कायदा व सुव्यस्था राखण्यापुरतीच भूमिका सरकारने पार पाडावी, अशा कठोर शब्दात केरळ उच्च न्यायालयाने आज सोमवारी सरकारला खडसावले.
मंदिराच्या दर्शनासाठी शबरीमलै परिसरात पोहोचण्याकरिता रविवारपासून भाविक प्रयत्न करीत आहेत, पण सरकारी अधिकारी आणि पोलिसांच्या अडवणूक धोरणामुळे त्यांना त्रास सहन करावा लागत आहे, यासाठीही न्या. पी. आर. रामचंद्रन् मेनन आणि न्या. एन. अनिलकुमार यांच्या खंडपीठाने सरकारवर कठोर ताशेरे ओढले.
शबरीमलैमधील दैनंदिन व्यवहारात हस्तक्षेप करण्यापासून राज्य सरकार आणि मुख्यमंत्र्यांना रोखण्यात यावे, अशी विनंती करणार्‍या एका जनहित याचिकेवर सुनावणी करताना न्यायालयाने सरकारवर संताप व्यक्त केला. सरकारची जबाबदारी केवळ शबरीमलै परिसरात कायदा व सुव्यवस्था राखण्याची आहे. भाविकांना कुठलाही त्रास होणार नाही, याची काळजी सरकारने घ्यावी. हीच सरकारची जबाबदारी असून, सरकारने स्वत:ला तेवढ्यापुरतेच मर्यादित ठेवावे. मंदिर प्रशासनाला त्यांचे काम करू द्यावे, असेही न्यायालयाने स्पष्ट केले. दर्शनासाठी आलेल्या भाविकांचे नाव आणि पत्ते नोंदविणार्‍या पोलिसांनाही न्यायालयाने फटकारले. सरकारला यातून नेमके काय करायचे आहे, असा सवाल न्यायालयाने केला. सोबतच, शबरीमलै येथे वृत्तसंकलनासाठी आलेल्या माध्यम प्रतिनिधींना का रोखण्यात आले, त्यांना त्यांचे कर्तव्य करण्यापासून रोखण्याचा अधिकार तुम्हाला कुणी दिला, असा संतप्त सवालही न्यायालयाने केला. आम्ही मीडियाला मंदिर परिसरात जाण्यापासून रोखले नाही, अशी माहिती सरकारच्यावतीने देण्यात आली, पण आम्ही रविवारपासून जे पाहात आहोत, ते काय आहे, अशी विचारणा न्यायालयाने केली.
शबरीमलै मंदिर उघडले, एकही महिला आली नाही
दिवाळीच्या विशेष पूजेसाठी आज सोमवारी शबरीमलै मंदिराचे दार उघडण्यात आले. यानिमित्त रविवारपासून या संपूर्ण परिसरात सुरक्षा दल आणि पोलिसांची कडक बंदोबस्त ठेवण्यात आला होता. विशेष म्हणजे, आज स्वामी अय्यप्पांच्या दर्शनासाठी एकही महिला मंदिराच्या परिसरात फिरकली नाही.
सर्वोच्च न्यायालयाने सर्वच वयोगटातील महिलांना शबरीमलै मंदिरात दर्शन घेण्याची परवानगी दिल्यानंतर गेल्या महिन्यात पाच दिवसांकरिता मंदिराचे दार उघडण्यात आले होते, त्यावेळी शेकडो महिला दर्शनासाठी आल्या होत्या, पण भाविकांच्या हिंसक आंदोलनामुळे त्यांना मंदिराच्या सीमेबाहेरच थांबावे लागले होते. काही महिला धाडस करून मंदिराच्या जवळ आल्या होत्या, मात्र त्यांनाही परत जावे लागले होते. त्यामुळे आजही महिला धाडस करणार काय, याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. तथापि, आज एकही महिला मंदिराच्या परिसरातही फिरकली नाही.
महिला भाविकांच्या सुरक्षेसाठी २३०० जवान, कमांडो आणि पोलिस तैनात करण्यात आले होते. यात शंभरावर महिला पोलिसांचाही समावेश होता. तथापि, मंदिरात ५० वर्षांवरीलच महिला पोलिसांना तैनात करण्यात आले आहे. सायंकाळी पाच वाजता मंदिराचे दार उघडण्यात आल्यानंतर विशेष पूजेचे आयोजन करण्यात आले. सुमारे तासभर ही पूजा सुरू होती.

Posted by : | on : 6 Nov 2018
Filed under : केरळ, राज्य.
You can follow any responses to this entry through the RSS 2.0You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Change Language: press Ctrl+g

    छायाचित्रातून

  • पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक
  • कोहली, मीराबाईला खेलरत्न कोहली, मीराबाईला खेलरत्न
  • अमित पांघळला बॉक्सिंगचे सुवर्ण अमित पांघळला बॉक्सिंगचे सुवर्ण
  • तेजिंदरपालला सुवर्णपदक तेजिंदरपालला सुवर्णपदक
  • महाराष्ट्राच्या राहीचा सुवर्णभेद महाराष्ट्राच्या राहीचा सुवर्णभेद

हवामान

दृष्टीक्षेपात

व्हिडीओ संग्रह

More in केरळ, राज्य (35 of 672 articles)

Shabarimalai Swami Ayyappa Mandir
सुरक्षा, कलम १४४ लागू, शबरीमलै, ४ नोव्हेंबर - येथील शबरीमलै मंदिराचे दार उद्या सोमवारी विशेष धार्मिक विधिसाठी उघडण्यात येणार असून, ...

×