ads
ads
दहशतवादाचा पाडाव करण्यास भारतीय नेतृत्व सक्षम

दहशतवादाचा पाडाव करण्यास भारतीय नेतृत्व सक्षम

•अजित डोवाल यांचे प्रतिपादन •पुलवामा हल्ला कधीच विसरणार नाही,…

सात अतिरेक्यांच्या १३ मालमत्ता जप्त

सात अतिरेक्यांच्या १३ मालमत्ता जप्त

•टेरर फंडिंगप्रकरणी ईडीची धडक कारवाई, नवी दिल्ली, १९ मार्च…

इतरांना त्रास होत असल्यास पक्ष्यांसाठी दाणे ठेवणे चूकच

इतरांना त्रास होत असल्यास पक्ष्यांसाठी दाणे ठेवणे चूकच

•सर्वोच्च न्यायालयाचा निर्वाळा, नवी दिल्ली, १९ मार्च – इमारतीच्या…

दलाई लामांचा उत्तराधिकारी चीनच्या मंजुरीनेच

दलाई लामांचा उत्तराधिकारी चीनच्या मंजुरीनेच

•चिनी परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाची माहिती, बीजिंग, १९ मार्च –…

नीरव मोदीविरोधात अटक वॉरंट जारी

नीरव मोदीविरोधात अटक वॉरंट जारी

लंडन, १८ मार्च – पंजाब नॅशनल बँकेत सुमारे १४…

डेटा चोरी प्रकरणी झुकेरबर्ग यांचा खोटारडेपणा उघड

डेटा चोरी प्रकरणी झुकेरबर्ग यांचा खोटारडेपणा उघड

•फेसबूकला होती संपूर्ण माहिती, लंडन, १८ मार्च – कॅम्ब्रिज…

दाऊद शरण यायला तयार होता, पवारांनी दुर्लक्ष केले

दाऊद शरण यायला तयार होता, पवारांनी दुर्लक्ष केले

•प्रकाश आंबेडकरांचा गंभीर आरोप, मुंबई, १९ मार्च – कुख्यात…

शेतकर्‍यांना सर्वाधिक मदत युती सरकारच्या काळात

शेतकर्‍यांना सर्वाधिक मदत युती सरकारच्या काळात

•मुख्यमंत्री फडणवीस यांची स्पष्टोक्ती, औरंगाबाद, १७ मार्च – काँगे्रसप्रणित…

काटोलमध्ये पोटनिवडणूक नको

काटोलमध्ये पोटनिवडणूक नको

•शरद पवार यांची मागणी •कुणीच अर्ज भरू नये, मुंबई,…

१७ व्या लोकसभेचा महाकुंभ!

१७ व्या लोकसभेचा महाकुंभ!

॥ विशेष : सुधीर पाठक | १७ व्या लोकसभेसाठीचा…

निवडणुकीपूर्वीच महागठबंधनाचा बँडबाजा

निवडणुकीपूर्वीच महागठबंधनाचा बँडबाजा

॥ सारांश : ल.त्र्यं. जोशी | महागठबंधन याचा अर्थच…

जबरदस्त तडाखा कसा द्यायचा आम्ही जाणतो!

जबरदस्त तडाखा कसा द्यायचा आम्ही जाणतो!

॥ रोखठोक : हितेश शंकर | पुलवामातील दहशतवादी हल्ल्यात…

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

‘फोर्ब्स’ने नुकतीच सर्वाधिक कमाई करणार्‍या अभिनेत्यांच्या नावाची यादी जाहीर…

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

बॉलिवूडची बेबी डॉल म्हणजेच सनी लिओनीचे नाव इंटरनेटवर सर्वाधिक…

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

‘रेस- ३’ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये कमबॅक करणारा अभिनेता बॉबी देओल…

पंचांग
वार: | तिथी:
नक्षत्र: | राशी:
करण: | योग:
सूर्योदय: 06:31 | सूर्यास्त: 18:35
अयनांश:
Home » केरळ, राज्य » शबरीमलैवर भाविकांचाच अधिकार

शबरीमलैवर भाविकांचाच अधिकार

पंडालम् राजघराण्याची स्पष्टोक्ती,
तिरुवनंतपुरम्, २४ ऑक्टोबर –

Shabarimalai Swami Ayyappa Mandir

Shabarimalai Swami Ayyappa Mandir

शबरीमलै देवस्थानावर त्रावणकोर देवासम समितीचा अधिकार असल्याचा केरळ राज्य सरकारने केलेला दावा चुकीचा असून, या मंदिरावर भाविकांचा अधिकार असल्याचे पंडालम् राजघराण्याचे प्रतिनिधी शशिकुमार वर्मा यांनी स्पष्ट केले आहे.
शबरीमलै मंदिरात १० ते ५० वयोगटातील महिलांच्या प्रवेशाबाबत तीव्र भूमिका घेत, कोणत्याही परिस्थितीत या वयोगटातील महिलांना मंदिरात प्रवेश करू दिला जाणार नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
शबरीमलै मंदिर भाविकांसाठी आहे. रुढी किंवा परंपरेचे उल्लंघन होत असल्यास त्याबाबत प्रश्‍न विचारण्याचा भाविकांना अधिकार असल्याचे त्यांनी सांगितले. मंदिर बंद करावे, असे आम्ही कधीच सांगितले नाही. परंपरांबाबत आम्ही कधीही तडजोड करणार नाही. अय्यप्पा मंदिराच्या संपत्तीवर आमच्या कुटुंबाचा डोळा नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.
मंदिरातील महिला प्रवेशाच्या मुद्यावरून हिंदूंमध्ये फूट पाडण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा आरोपही त्यांनी यावेळी केला. मात्र, अय्यप्पांच्या भक्तांनी हा प्रकार समजून घेतल्याने ते या सापळ्यात अडकले नाहीत, असे त्यांनी सांगितले. मासिक पूजेसाठी ऑक्टोबर १७ ते २२ या कालावधित मंदिर उघडण्यात आल्यावर झालेला प्रकार वेदनादायी होता. मंदिर परिसरामध्ये भाविकांसाठी राहण्याची व्यवस्था, शौचालय, पाण्याची व्यवस्था अद्यापही न करू शकलेल्या राज्य सरकारने मंदिरात प्रवेश करण्याचा प्रयत्न करणार्‍या ६ महिलांना पोलिस संरक्षण दिले, असा आरोप त्यांनी केला. अय्यप्पा यांची खरी भाविक असलेली १० ते ५० वयोगटातील महिला कधीच सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार मंदिरात प्रवेश करणार नाही, असा दावा त्यांनी यावेळी केला. मंदिरात प्रवेश करण्याचा प्रयत्न करणार्‍या ६ महिलांना देण्यात आलेले पोलिस संरक्षण, एका छुप्या अजेंड्याचा भाग होता, याची पटकथा आधीच लिहिण्यात आली होती, असा आरोपही त्यांनी केला. राजघराण्याची मंदिराप्रती असलेली निष्ठा दर ५ वर्षांनी बदलत नाही, अशी टीका त्यांनी केरळमधील डाव्या सरकारवर केली.
मंदिर प्रवेशासाठी महिलांची उच्च न्यायालयात धाव
कोची ः शबरीमलै मंदिरात अयप्पा यांची पूजा करण्यासाठी पोलिस संरक्षण देण्याचे आदेश केरळ राज्य सरकारला द्यावे, अशी मागणी करीत १० ते ५० वयोगटातील ए. के. मायाकृष्णन, रेखा एस, जलाजामोल पी. एस. आणि जयामोल पी. एस. या चार महिलांनी केरळ उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. न्यायालयाने, या प्रकरणी कोणती भूमिका घेणार आहात, हे केरळ राज्य सरकारने स्पष्ट करावे, असे आदेश देत सुनावणी सोमवारपर्यंत समोर ढकलली.
मुख्य पुजार्‍यावर अवमानना याचिका
नवी दिल्ली : शबरीमलै मंदिरात १० ते ५० वयोगटातील महिलांना प्रवेश नाकारणार्‍या पाच जणांविरुद्ध न्यायालयीन अवमानना कारवाई करण्यासाठी परवानगी मागणारे अर्ज अ‍ॅटर्नी जनरलला प्राप्त झाले आहेत.
यापैकी एक याचिका शबरीमलै मंदिराचे मुख्य पुजारी कंटाररू राजीवरू यांच्या विरोधात असून, १० ते ५० वयोगटातील महिलांनी मंदिरात प्रवेश केल्यास मंदिराचे दरवाजे बंद करू, असे सांगितले होते. मंदिराचे विश्‍वस्त मंडळाचे अध्यक्ष पी. रामावर्मा यांनी या वयोगटातील महिलांना रोखण्याचे आदेश दिले होते, असा आरोप करीत, त्यांच्या विरोधातही याचिका दाखल करण्यात आली आहे. भाजपाचे प्रदेशाध्यक्ष पी. एस. श्रीधरन पिल्लई, भाजपा नेते मुरलीधरन् उन्नीनाथन् के आणि नट कोल्लम थुलासी यांच्याही विरोधात याचिका दाखल करण्यात आली आहे.

Posted by : | on : 25 Oct 2018
Filed under : केरळ, राज्य.
You can follow any responses to this entry through the RSS 2.0You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Change Language: press Ctrl+g

    छायाचित्रातून

  • भारताने ऑस्ट्रेलियात रचला इतिहास भारताने ऑस्ट्रेलियात रचला इतिहास
  • हार्दिक पंड्या, लोकेश राहुलला बीसीसीआयची नोटीस हार्दिक पंड्या, लोकेश राहुलला बीसीसीआयची नोटीस
  • भारताचा ऑस्ट्रेलियात विक्रमी विजय भारताचा ऑस्ट्रेलियात विक्रमी विजय
  • पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक
  • कोहली, मीराबाईला खेलरत्न कोहली, मीराबाईला खेलरत्न

हवामान

दृष्टीक्षेपात

व्हिडीओ संग्रह

More in केरळ, राज्य (204 of 699 articles)

Chintamani Malviya Bjp
२४ ऑक्टोबर - फटाक्यांची विक्री आणि फटाके फोडण्यासंबंधी सर्वोच्च न्यायालयाने मोठा निर्णय दिला आहे. मात्र मध्यप्रदेशचे भाजपा खासदार चिंतामणी मालवीय ...

×