ads
ads
स्वामी असीमानंद निर्दोष

स्वामी असीमानंद निर्दोष

•समझौता एक्स्प्रेस स्फोट प्रकरण, पंचकुला, २० मार्च – समझौता…

बसपा नेते चंद्रप्रकाश मिश्रा भाजपात

बसपा नेते चंद्रप्रकाश मिश्रा भाजपात

नवी दिल्ली, २० मार्च – उत्तरप्रदेशातील बसपाचे नेते चंद्रप्रकाश…

मुळांना नित्य नेमे ओंजळभर पाणी!

मुळांना नित्य नेमे ओंजळभर पाणी!

•उद्या जागतिक जल दिन, नागपूर, २० मार्च – झाडांना…

नीरवला अटक; मोदी सरकारच्या प्रयत्नांना यश

नीरवला अटक; मोदी सरकारच्या प्रयत्नांना यश

•स्कॉटलंड यार्डची कारवाई, लंडन, २० मार्च – पंजाब नॅशनल…

दलाई लामांचा उत्तराधिकारी चीनच्या मंजुरीनेच

दलाई लामांचा उत्तराधिकारी चीनच्या मंजुरीनेच

•चिनी परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाची माहिती, बीजिंग, १९ मार्च –…

नीरव मोदीविरोधात अटक वॉरंट जारी

नीरव मोदीविरोधात अटक वॉरंट जारी

लंडन, १८ मार्च – पंजाब नॅशनल बँकेत सुमारे १४…

रणजितसिंह मोहिते पाटील भाजपात

रणजितसिंह मोहिते पाटील भाजपात

•रणाआधीच भाजपाची जीत, मुंबई, २० मार्च – सोलापूर जिल्ह्यातील…

दाऊद शरण यायला तयार होता, पवारांनी दुर्लक्ष केले

दाऊद शरण यायला तयार होता, पवारांनी दुर्लक्ष केले

•प्रकाश आंबेडकरांचा गंभीर आरोप, मुंबई, १९ मार्च – कुख्यात…

शेतकर्‍यांना सर्वाधिक मदत युती सरकारच्या काळात

शेतकर्‍यांना सर्वाधिक मदत युती सरकारच्या काळात

•मुख्यमंत्री फडणवीस यांची स्पष्टोक्ती, औरंगाबाद, १७ मार्च – काँगे्रसप्रणित…

१७ व्या लोकसभेचा महाकुंभ!

१७ व्या लोकसभेचा महाकुंभ!

॥ विशेष : सुधीर पाठक | १७ व्या लोकसभेसाठीचा…

निवडणुकीपूर्वीच महागठबंधनाचा बँडबाजा

निवडणुकीपूर्वीच महागठबंधनाचा बँडबाजा

॥ सारांश : ल.त्र्यं. जोशी | महागठबंधन याचा अर्थच…

जबरदस्त तडाखा कसा द्यायचा आम्ही जाणतो!

जबरदस्त तडाखा कसा द्यायचा आम्ही जाणतो!

॥ रोखठोक : हितेश शंकर | पुलवामातील दहशतवादी हल्ल्यात…

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

‘फोर्ब्स’ने नुकतीच सर्वाधिक कमाई करणार्‍या अभिनेत्यांच्या नावाची यादी जाहीर…

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

बॉलिवूडची बेबी डॉल म्हणजेच सनी लिओनीचे नाव इंटरनेटवर सर्वाधिक…

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

‘रेस- ३’ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये कमबॅक करणारा अभिनेता बॉबी देओल…

पंचांग
वार: | तिथी:
नक्षत्र: | राशी:
करण: | योग:
सूर्योदय: 06:30 | सूर्यास्त: 18:35
अयनांश:
Home » मध्य प्रदेश-छत्तीसगड, राज्य » शहरी माओवाद्यांना काँग्रेसचा पाठिंबा

शहरी माओवाद्यांना काँग्रेसचा पाठिंबा

►पंतप्रधान मोदी यांचा घणाघाती हल्ला,
जगदलपूर, ९ नोव्हेंबर –

Pm Modi Chitradurga Rally

Pm Modi Chitradurga Rally

गरीब आदिवासी तरुणांचे आयुष्य उद्ध्वस्त करणार्‍या शहरी माओवाद्यांना काँगे्रसचा संपूर्ण पाठिंबा आहे. या पक्षाच्या नेत्यांनी आदिवासींची नेहमीच थट्टा उडवली असून, त्यांचा वापर केवळ मतांसाठीच केला आहे, असा घणाघाती हल्ला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज शुक्रवारी येथे चढविला.
दोन टप्प्यात विधानसभेची निवडणूक होत असलेल्या छत्तीसगडच्या जगदलपूर येथे विशाल जाहीर सभेला संबोधित करताना पंतप्रधानांनी काँगे्रसला धारेवर धरले. हा पक्ष आदिवासींची थट्टा का करतो, हे मला अजूनही कळले नाही. एकदा मी ईशान्य भारतात गेलो होतो. तिथे मी पारंपरिक आदिवासी पेहराव परिधान केला होता. त्यावेळीही काँगे्रस नेत्यांनी माझी थट्टा केली होती. हा आदिवासी संस्कृतीचा सर्वांत मोठा अपमान आहे, असे पंतप्रधान म्हणाले.
छत्तीसगडचा सर्वांगीण विकास करण्याचे दिवंगत पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांचे स्वप्न पूर्ण केल्याशिवाय मी स्वस्थ बसणार नाही. या राज्यातील बस्तर प्रांताच्या विकासाकडे काँगे्रसने नेहमीच दुर्लक्ष केले, त्यासाठी या पक्षाने नक्षलवादी हिंसाचाराचे कारण पुढे केले होते. पण, गेल्या १५ वर्षांत भाजपा सरकारने या प्रांताचाही चेहरा बदलविला. चांगले रस्ते आणि विविध उपाययोजना राबवून बस्तरचा विकास केला, असे मोदी यांनी सांगितले.
शहरी नक्षलवादी शहरांमध्ये वातानुकूलित घरांमध्ये राहतात. त्यांची स्वत:ची मुले विदेशात शिक्षण घेतात. तथापि, याच पॉश घरांमध्ये बसून ते गरीब आदिवासींच्या लहान मुलांना नक्षलवादाकडे नेतात. या मुलांच्या हातात लेखणी देण्याऐवजी शस्त्र देऊन त्यांच्या आई-वडिलांचं स्वप्न उद्ध्वस्त करतात. सरकार नक्षलवाद्यांविरोधात कारवाई करून त्यांचे कुटील डाव हाणून पाडत असताना, काँग्रेस पक्ष या शहरी माओवादाच्या समर्थनार्थ का उभा राहतो, अशा शब्दांत पंतप्रधानांनी काँग्रेसवर टीका केली. अशा लोकांपासून छत्तीसगडला वाचवायचे असेल, तर छत्तीसगड आणि बस्तरमधील सर्व जागांवर कमळ फुलायलाच हवे, असे त्यांनी स्पष्ट केले.
काँग्रेससाठी दलित, शोषित आणि वंचित लोक म्हणजे मतांचा खजिना आहे. काँग्रेसने या लोकांना फक्त व्होटबँक मानले आहे. या पक्षाने फक्त मतांसाठी आदिवासींचा वापर केला, असे सांगताना, अटलबिहारी वाजपेयी यांनीच सर्वप्रथम आदिवासी समाजासाठी स्वतंत्र विभाग तयार केल्याचे ते म्हणाले.
पत्रकाराची हत्या करणार्‍या नक्षलवाद्यांना काँग्रेसचे नेते क्रांतिकारी म्हणतात, ही कोणती विचारधारा आहे, अशी चपराक हाणताना, भाजपा हा कुणाच्या कृपादृष्टीवर चालणारा पक्ष नाही, देशातील सव्वाशे कोटी जनताच भाजपासाठी हायकमांड आहे, असे त्यांनी सांगितले.
अटलबिहारी वाजपेयींचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी मी बस्तरमध्ये येतो. छत्तीसगडचा विकास फक्त भाजपामुळेच झाला. आगामी काळात लोक रोजगाराच्या शोधात छत्तीसगडमध्ये येतील, असा दावा त्यांनी केला. छत्तीसगडमध्ये भाजपाचा पराभव करणे अशक्य झाले म्हणून केंद्रातील संपुआ सरकारने १० वर्षे या राज्यातील विकास कामे रोखून ठेवली, असा आरोप करीत, अशा लोकांना तुम्ही माफ कराल काय, त्यांना आपले बहुमूल्य मत देणार काय, असा सवाल पंतप्रधानांनी केला.

Posted by : | on : 10 Nov 2018
Filed under : मध्य प्रदेश-छत्तीसगड, राज्य.
You can follow any responses to this entry through the RSS 2.0You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Change Language: press Ctrl+g

    छायाचित्रातून

  • भारताने ऑस्ट्रेलियात रचला इतिहास भारताने ऑस्ट्रेलियात रचला इतिहास
  • हार्दिक पंड्या, लोकेश राहुलला बीसीसीआयची नोटीस हार्दिक पंड्या, लोकेश राहुलला बीसीसीआयची नोटीस
  • भारताचा ऑस्ट्रेलियात विक्रमी विजय भारताचा ऑस्ट्रेलियात विक्रमी विजय
  • पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक
  • कोहली, मीराबाईला खेलरत्न कोहली, मीराबाईला खेलरत्न

हवामान

दृष्टीक्षेपात

व्हिडीओ संग्रह

More in मध्य प्रदेश-छत्तीसगड, राज्य (183 of 701 articles)

Shivrajsingh Chouhan
९ नोव्हेंबर - मध्यप्रदेशचा विकास हेच माझे उद्दिष्ट आहे आणि गेल्या १५ वर्षांपासून मी विकासावरच भर देत आहे, पण विकासाला ...

×