अ‍ॅट्रॉसिटी प्रकरणात तातडीने अटक नको

अ‍ॅट्रॉसिटी प्रकरणात तातडीने अटक नको

►सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश ►कायद्याचा प्रचंड गैरवापर, नवी दिल्ली, २०…

राज्यातील ७ मान्यवरांना पद्मपुरस्कार प्रदान

राज्यातील ७ मान्यवरांना पद्मपुरस्कार प्रदान

नवी दिल्ली, २० मार्च – प्रसिद्ध हिंदुस्तानी शास्त्रीय गायक…

हलक्या दर्जाचे हेल्मेट बनविणार्‍यांवर कारवाई करा

हलक्या दर्जाचे हेल्मेट बनविणार्‍यांवर कारवाई करा

►सचिनचे नितीन गडकरींना पत्र, मुंबई, २० मार्च – माजी…

इम्रानच्या ट्विटला भारतीय मुस्लिमांचे चोख उत्तर

इम्रानच्या ट्विटला भारतीय मुस्लिमांचे चोख उत्तर

कराची, २० मार्च – पाकिस्तानच्या तहरीक-ए-इन्साफ या पक्षाचा प्रमुख…

पुतिन चौथ्यांदा रशियाच्या अध्यक्षपदी

पुतिन चौथ्यांदा रशियाच्या अध्यक्षपदी

►७६.६७ टक्के विक्रमी मतांनी विजयी, मॉस्को, १९ मार्च –…

श्रीलंकेतील आणिबाणी उठली

श्रीलंकेतील आणिबाणी उठली

►भारत दौर्‍यानंतर घेतला निर्णय, कोलंबो, १८ मार्च – बौद्ध…

मुंबईत रेल्वे भरती प्रक्रियेविरोधात आंदोलन

मुंबईत रेल्वे भरती प्रक्रियेविरोधात आंदोलन

►पोलिसांच्या लाठीमारात ७ विद्यार्थी जखमी ►मध्य रेल्वेची वाहतूक सुरू,…

जात किंवा धर्म दहशतवाद शिकवत नाही

जात किंवा धर्म दहशतवाद शिकवत नाही

►पद्मश्री अ‍ॅड. उज्ज्वल निकम यांचे प्रतिपादन, वाशीम, १८ मार्च…

गुढीपाडव्यापासून राज्यात प्लॅस्टिक बंदी

गुढीपाडव्यापासून राज्यात प्लॅस्टिक बंदी

►काही वस्तूंना वगळले, मुंबई, १६ मार्च – येत्या रविवारपासून…

उदात्त हिंदू संस्कृतीचा नववर्षारंभ

उदात्त हिंदू संस्कृतीचा नववर्षारंभ

॥ तरंग : दीपक कलढोणे | प्रतिवर्षी गुढीपाडवा आला…

किलबिल किलबिल पक्षी बोलती…

किलबिल किलबिल पक्षी बोलती…

॥ संवाद : सोमनाथ देशमाने | जे. कृष्णमूर्तींनी मला…

काँग्रेसचा संसदेतील पलायनवाद

काँग्रेसचा संसदेतील पलायनवाद

॥ विशेष : ल. त्र्यं. जोशी | संसदेच्या अंदाजपत्रकी…

‘सिमरन’मधील नवीन गाणे प्रदर्शित

‘सिमरन’मधील नवीन गाणे प्रदर्शित

अभिनेत्री कंगना राणावत लवकरच सिमरन या चित्रपटाद्वारे प्रेक्षकांच्या भेटीला…

चिरंजीवीसोबत सिनेमा करण्यास ऐश्‍वर्याचा नकार?

चिरंजीवीसोबत सिनेमा करण्यास ऐश्‍वर्याचा नकार?

ऐश्‍वर्या राय बच्चनची सध्या बॉलीवूडमध्ये सेकंड इनिंग सुरू आहे.…

रणबीरच्या फिरण्यावर बंदी

रणबीरच्या फिरण्यावर बंदी

संजय दत्तच्या आयुष्यावर आधारित चित्रपटात रणबीर कपूर ६ वेगवेगळ्या…

पंचांग
वार: | तिथी:
नक्षत्र: | राशी:
करण: | योग:
सूर्योदय: 06:30 | सूर्यास्त: 18:36
अयनांश:
Home » उत्तर प्रदेश, राज्य » ‘हर-हर मोदी, घर-घर मोदी’ने दणाणली वाराणसी!

‘हर-हर मोदी, घर-घर मोदी’ने दणाणली वाराणसी!

•►विरोधकांचा गायत्री प्रजापती मंत्रजप : मोदी
►तुम्हाला छळणार्‍यांचे ‘पिंडदान’ करण्याची संधी!,
वृत्तसंस्था
वाराणसी/जौनपूर, ४ मार्च –

उत्तर प्रदेशमधील त्रस्त मतदारांना, त्यांची छळवणूक करणार्‍यांचे ‘पिंडदान’ करण्याची संधी निवडणुकीच्या निमित्ताने चालून आली आहे. मतदारांनी ८ मार्चला मतदानाच्या दिवशी ‘पिंडदान’ करून त्यांचे कर्तव्य पार पाडावे, असे आवाहन जौनपूर येथील सभेत आज शनिवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले. या देशात जेव्हा आम्ही एखाद्या चांगल्या कामाची सुरुवात करतो, तेव्हा गायत्री मंत्राचा जप करतो. मात्र, सपा-कॉंग्रेस आघाडी गुन्हेगार असलेल्या ‘गायत्री प्रजापती’च्या नावाचा मंत्रजप करीत आहेत, अशी घणाघाती टीकाही त्यांनी यावेळी केली.
बलात्काराचा गुन्हा असलेला सपा उमेदवार गायत्री प्रजापती आणि सपातर्फे त्याला मिळत असलेले संरक्षण यांना आजच्या सभेत पंतप्रधानांनी लक्ष्य केले. पंतप्रधान म्हणाले, गायत्री प्रजापतीविरुद्ध गुन्हा दाखल असून देखील, अखिलेश यादव त्याच्या प्रचारासाठी जातात. परंतु, पोलिसांना प्रजापतीचा ठावठिकाणा कळत नाही! तुमची मुलगी न्याय मागते आहे. परंतु, मुख्यमंत्री अखिलेश गुन्हेगार असलेल्या गायत्री प्रजापतीला संरक्षण देत आहेत. म्हैस हरविली, तर तिला शोधणारे पोलिस आता काय करीत आहेत? असा सवालही त्यांनी यावेळी केला.
विरोधकांना लक्ष्य करीत, पंतप्रधान म्हणाले, भाजपा सब का साथ-सब का विकास यावर विश्‍वास ठेवतो. मात्र, विरोधकांचा विश्‍वास ‘कुछ का साथ, कुछ का ही विकास’ यावर आहे.
दरम्यान, या सभेपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाराणसी मतदारसंघात आज आयोजित करण्यात आलेल्या ‘रोड शो’मध्ये ‘हर-हर मोदी, घर-घर मोदी’ च्या घोषणांनी वातावरण दणाणले. मोदी यांचे तुफान गर्दीत प्रचंड उत्साहात स्वागत करण्यात आले. पंतप्रधान आज हवाई दलाच्या विशेष हेलिकॉप्टरमधून वाराणसीत दाखल झाले. भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांच्यासह वरिष्ठ नेत्यांनी त्यांचे स्वागत केले. त्यानंतर ते बनारस हिंदू विद्यापीठात गेले. पंडित मदन मोहन मालवीय यांच्या वाराणसी येथील प्रतिमेला त्यांनी पुष्पहार अर्पण केला. त्यानंतर अतिथी गृहापासून मोदी यांच्या ‘रोड शो’ला प्रारंभ झाला. पुढे काशी विश्‍वनाथ मंदिरापर्यंत ताफा पोहचला. काशी विश्‍वनाथ मंदिरात जाऊन पंतप्रधानांनी पूजा केली. या संपूर्ण परिसरात रस्त्याच्या दुतर्फा हजारोंच्या संख्येने नागरिक उपस्थित होते.कालभैरव मंदिरापर्यंत हा सात किलोमीटरचा ‘रोड शो’ पोहोचल्यावर तेथे पंतप्रधानांनी दर्शन घेतले आणि ‘रोड शो’चा समारोप झाला. त्यानंतर ते जौनपूर येथील प्रचारसभेसाठी रवाना झाले.
वाराणसी लोकसभा मतदार संघाचे प्रतिनिधीत्व करणारे पंतप्रधान मोदी पुढील तीन दिवस येथेच मुक्काम करणार आहेत. रविवारी वाराणसीतील टाऊन हॉल मैदानावर दोन हजार विशेष निमंत्रितांशी ते चर्चा करणार असून, सोमवारी वाराणसीतील रोहानियामध्ये सभा घेऊन प्रचाराचा समारोप करतील.
आव्हाने- प्रतिआव्हाने, आरोप-प्रत्यारोप !
सपा नेते आणि उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री अखिलेश यादव यांनी भदोही येथे आज शनिवारी जाहीर सभा घेतली. मी माझ्या सरकारने केलेली दहा कामे सांगतो. पंतप्रधानांनी त्यांनी केलेली दहा कामे सांगावी, असे आव्हान यावेळी अखिलेश यादव यांनी जाहीर सभेत दिले. आपण आपल्या सरकारच्या पाच वर्षांची कामगिरी मांडण्यासाठी तयार आहोत. मात्र, पंतप्रधान तीन वर्षात काय केले, हे ते सांगू शकतील काय? असा सवाल यावेळी अखिलेश यांनी केला.
दरम्यान, वाराणसी येथे पंतप्रधान मोदी यांच्या रोड शो दरम्यान पोस्टर्स हटवण्यावरून भाजपा आणि कॉंग्रेस-सपा कार्यकर्त्यांमध्ये वादावादी झाली. सपाच्या कार्यकर्त्यांनी भाजपाचे पोस्टर्स हटविल्याचा आरोप प्रसारमाध्यमांशी बोलताना भाजपाचे प्रवक्ते श्रीकांत शर्मा यांनी केला. जिल्हा प्रशासनाचीही त्यांना साथ होती, असे ते म्हणाले. पोलिस महानिरीक्षकांनी मात्र, भाजपाचा आरोप तथ्यहीन असल्याचे वृत्तसंस्थेस सांगितले. दुसरीकडे, पंतप्रधान मोदी यांनी आचारसंहितेचा भंग केल्याचा आरोप कॉंग्रेसने केला. प्रसारमाध्यमांशी बोलताना कॉंग्रेसचे सरचिटणीस मित्तल म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बनारस हिंदू विद्यापीठापासून काशी विश्‍वनाथ मंदिरापर्यंत आयोजित केलेल्या ‘रोड शो’मुळे आचारसंहितेचा भंग झाला आहे. पूर्वपरवानगी न घेताच, या ‘रोड शो’चे आयोजन करण्यात आले. निवडणूक आयोगाने पंतप्रधानांवर गुन्हा दाखल करावा, अशी मागणी आम्ही आयोगाकडे पत्राद्वारे केली आहे, असे त्यांनी प्रसारमाध्यमांना सांगितले.
भाजपाला बहुमत मिळणार: योगी आदित्यनाथ
गोरखपूर: उत्तर प्रदेश विधानसभेत बहुमत मिळेल, असा विश्‍वास भाजपाचे नेते योगी आदित्यनाथ यांनी आज शनिवारी व्यक्त केला. भाजपाने विकास आणि राष्ट्रवाद यावर लक्ष केंद्रित करण्याचे ठरविले आहे, असे ते म्हणाले. उत्तर प्रदेश विधानसभेच्या सहाव्या टप्प्यासाठी आज मतदान झाले. योगी आदित्यनाथ यांनी आपला मतदानाचा हक्क बजावला. मतदानानंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना ते म्हणाले, विकास करणे आणि राष्ट्रवादाचा प्रचार करणे, हेच भाजपाचे धोरण आहे.
अखेरच्या टप्प्यातील मतदान ८ मार्चला
दरम्यान, आज उत्तर प्रदेशमध्ये सहाव्या टप्प्यातील मतदान पार पडले. शेवटच्या सातव्या टप्प्यातील मतदान बाकी असून, यासाठी ८ मार्च रोजी मतदान होणार आहे. तर, ११ मार्च रोजी या निवडणुकीचे निकाल जाहीर होणार आहेत.

शेअर करा

Posted by on Mar 5 2017. Filed under उत्तर प्रदेश, राज्य. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

प्रतिक्रिया नोंदवा

Marathi/English, press Ctrl+g  

हवामान

दृष्टीक्षेपात

व्हिडीओ संग्रह

मागील बातम्या, लेख शोध

Search by Date
Search by Category
Search with Google
More in उत्तर प्रदेश, राज्य (760 of 958 articles)


वृत्तसंस्था नवी दिल्ली, ४ मार्च - बाबरी कृती समितीचे प्रमुख आणि माजी खासदार सय्यद शहाबुद्दीन यांचे आज शनिवारी सकाळी निधन ...