ads
ads
ओडिशा पोलिस अधिकार्‍याला मरणोत्तर अशोकचक्र

ओडिशा पोलिस अधिकार्‍याला मरणोत्तर अशोकचक्र

►केंद्रीय गृहमंत्रालयाची माहिती, नवी दिल्ली, १४ ऑक्टोबर – नक्षलवाद्यांशी…

पंतप्रधानांना ठार मारण्याची धमकी

पंतप्रधानांना ठार मारण्याची धमकी

►दिल्लीच्या पोलिस आयुक्तांना आला मेल, नवी दिल्ली, १३ ऑक्टोबर…

आता देशभरात समान मुद्रांक शुल्क

आता देशभरात समान मुद्रांक शुल्क

►हिवाळी अधिवेशनात विधेयक मांडणार, नवी दिल्ली, १३ ऑक्टोबर –…

संयुक्त राष्ट्र मानवाधिकार परिषदेवर भारताचा मोठा विजय

संयुक्त राष्ट्र मानवाधिकार परिषदेवर भारताचा मोठा विजय

►तीन वर्षांचा राहणार कार्यकाळ, संयुक्त राष्ट्रसंघ, १३ ऑक्टोबर –…

भारतीय चित्रपटांवर पूर्णपणे बंदी घाला

भारतीय चित्रपटांवर पूर्णपणे बंदी घाला

►पाकिस्तानी निर्मात्यांची मागणी, कराची, १३ ऑक्टोबर – भारतीय चित्रपटांवर…

रिलायन्ससोबत फक्त १० टक्के ऑफसेट करार

रिलायन्ससोबत फक्त १० टक्के ऑफसेट करार

►दसाँ एव्हिएशनच्या अधिकार्‍याची माहिती, पॅरिस, १२ ऑक्टोबर – राफेल…

विजय फणशीकर, रमेश पतंगे यांना लोकमान्य टिळक जीवनगौरव पुरस्कार

विजय फणशीकर, रमेश पतंगे यांना लोकमान्य टिळक जीवनगौरव पुरस्कार

►महाराष्ट्र शासनाचे उत्कृष्ट पत्रकारिता पुरस्कार जाहीर, मुंबई, १० ऑक्टोबर…

‘जमात ए पुरोगामी’ पुस्तकाचे भाऊ तोरसेकर यांच्या हस्ते प्रकाशन

‘जमात ए पुरोगामी’ पुस्तकाचे भाऊ तोरसेकर यांच्या हस्ते प्रकाशन

मुंबई, ९ ऑक्टोबर – नामवंत लेखक आणि व्याख्याते डॉ.सच्चिदानंद…

केंद्राच्या अहवालानंतर मराठवाड्यात दुष्काळ जाहीर करणार : मुख्यमंत्री

केंद्राच्या अहवालानंतर मराठवाड्यात दुष्काळ जाहीर करणार : मुख्यमंत्री

लातूर, ७ ऑक्टोबर – निसर्ग आमची परीक्षा घेत आहे.…

३७० पेक्षाही घातक कलम ३५-ए!

३७० पेक्षाही घातक कलम ३५-ए!

॥ कटाक्ष : गजानन निमदेव | कलम ३५-ए हा…

न्यायपालिका संकटमुक्त

न्यायपालिका संकटमुक्त

॥ सारांश : ल.त्र्यं. जोशी | एवढ्या उच्च पातळीवरुन…

सभेत सोडलेला उंदीर

सभेत सोडलेला उंदीर

॥ जागता पहारा : भाऊ तोरसेकर | अडचणीतली काँग्रेस…

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

‘फोर्ब्स’ने नुकतीच सर्वाधिक कमाई करणार्‍या अभिनेत्यांच्या नावाची यादी जाहीर…

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

बॉलिवूडची बेबी डॉल म्हणजेच सनी लिओनीचे नाव इंटरनेटवर सर्वाधिक…

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

‘रेस- ३’ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये कमबॅक करणारा अभिनेता बॉबी देओल…

पंचांग
वार: | तिथी:
नक्षत्र: | राशी:
करण: | योग:
सूर्योदय: 06:20 | सूर्यास्त: 18:03
अयनांश:
Home » जम्मू-काश्मीर, राज्य » हिजबुल कमांडरसाठी शोकसभा, तीन काश्मिरी विद्यार्थी निलंबित

हिजबुल कमांडरसाठी शोकसभा, तीन काश्मिरी विद्यार्थी निलंबित

अलिगड मुस्लिम विद्यापीठातील खळबळजनक प्रकार,
अलिगड, १२ ऑक्टोबर –

Aligarh Muslim University

Aligarh Muslim University

लष्करी जवानांनी गुरुवारी सकाळी काश्मीर खोर्‍यात खातमा केलेल्या हिजबुल मुजाहिदिनचा कमांडर मन्नान बशीर वाणीसाठी शोकसभेचे आयोजन करणार्‍या अलिगड मुस्लिम विद्यापीठातील तीन काश्मिरी विद्यार्थ्यांना प्रशासनाने आज शुक्रवारी निलंबित केले, तर चार विद्यार्थ्यांना कारणे दाखवा नोटीस बजावली आहे.
मन्नान वाणी हा या विद्यापीठात रिसर्च स्कॉलर होता. शिक्षण अर्धवट सोडून तो हिजबुलमध्ये सामील झाला होता. दहशतवादी संघटनेत सामील झाल्यानंतर विद्यापीठाने त्याला विद्यापीठातून काढून टाकले होते. जम्मू-काश्मीरच्या कुपवाडा जिल्ह्यातील हंदवाडा येथे बुधवारी लष्करी जवानांनी मन्नानसह तीन अतिरेक्यांना ठार केले होते. मन्नान मारला गेल्याचे कळताच अलिगड मुस्लिम विद्यापीठातील केनेडी सभागृहात १२ विद्यार्थी एकत्र जमले. त्यांनी वाणीसाठी नमाज अदा करण्यास सुरुवात केली. विद्यापीठाचे वरिष्ठ प्राध्यापक मोहसिन खान यांनी सांगितले की, या विद्यार्थ्यांनी नियमाचे उल्लंघन करून बेकायदेशीरपणे शोकसभा सभा घेतली.
हा खळबळजनक प्रकार उघडकीस आल्यानंतर विद्यापीठ प्रशासनाने तीन विद्यार्थ्यांना निलंबित केले, तर अन्य चार विद्यार्थ्यांना कारणे दाखवा नोटीस बजावली. या विद्यार्थ्यांचा शैक्षणिक रेकॉर्ड तपासला जाणार आहे. अलिगड मुस्लिम विद्यापीठ विद्यार्थी परिषदेनेही या विद्यार्थ्यांना नमाज अदा करण्यापासून रोखले होते. विद्यार्थी परिषदेचे माजी अध्यक्ष फैजुल हसन यांनी सभेच्या ठिकाणी पोहोचून अतिरेक्यांसाठी नमाज अदा करणे योग्य नाही, असे सांगत विद्यार्थ्यांना रोखण्याचा प्रयत्न केला.
घरी जाण्याऐवजी हिजबुलमध्ये गेला
२६ वर्षीय मन्नन बशीर वाणी उच्चशिक्षित कुटुंबातील आहे. त्याचे वडील प्राध्यापक, तर भाऊ अभियंता आहे. जानेवारी महिन्यात त्याने विद्यापीठातून सुटी घेतली होती, मात्र घरी जाण्याऐवजी त्याने हिजबुलमध्ये प्रवेश केला. दहशतवादी संघटनेत प्रवेश करणारा तो पहिलाच पीएचडी शिक्षण घेणारा काश्मिरी विद्यार्थी होता. हातात रायफल घेतलेला फोटो ५ जानेवारीला सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर त्याच्या कुटुंबीयांना माहिती मिळाली. हादरलेल्या कुटुंबाने त्याला घरी परतण्याचे आवाहन केले होते.
मेहमुबा मुफ्तींचे ट्विट : मन्ननचा खातमा झाल्यानंतर माजी मुख्यमंत्री मेहबुबा मुफ्ती यांनी, एका पीएचडी स्कॉलरने जगण्याऐवजी मृत्युची निवड केली. दररोज सुशिक्षित विद्यार्थी गमवावे लागणे आमचे नुकसान आहे, असे ट्विट केले.

Posted by : | on : 13 Oct 2018
Filed under : जम्मू-काश्मीर, राज्य.
You can follow any responses to this entry through the RSS 2.0You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Change Language: press Ctrl+g

    छायाचित्रातून

  • पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक
  • कोहली, मीराबाईला खेलरत्न कोहली, मीराबाईला खेलरत्न
  • अमित पांघळला बॉक्सिंगचे सुवर्ण अमित पांघळला बॉक्सिंगचे सुवर्ण
  • तेजिंदरपालला सुवर्णपदक तेजिंदरपालला सुवर्णपदक
  • महाराष्ट्राच्या राहीचा सुवर्णभेद महाराष्ट्राच्या राहीचा सुवर्णभेद

हवामान

दृष्टीक्षेपात

व्हिडीओ संग्रह

More in जम्मू-काश्मीर, राज्य (9 of 593 articles)

Mamata Banerjee Addresses A Press Conference
न्यायालयाचा हस्तक्षेपास मात्र नकार, नवी दिल्ली, १२ ऑक्टोबर - बंगालमधील २८ हजार दुर्गा पूजा समित्यांना प्रत्येकी १० हजार रुपयांचा निधी ...

×