सोमनाथ चॅटर्जी कालवश

सोमनाथ चॅटर्जी कालवश

कोलकाता, १३ ऑगस्ट – लोकसभेचे माजी सभापती आणि माकपचे…

‘एक देश, एक निवडणूक’

‘एक देश, एक निवडणूक’

►कायदा आयोगासमोर अमित शाह यांनी मांडली भाजपाची भूमिका, तभा…

उच्च न्यायालयात नियुक्तीसाठी अर्धेन्यायाधीश अपात्र

उच्च न्यायालयात नियुक्तीसाठी अर्धेन्यायाधीश अपात्र

वृत्तसंस्था नवी दिल्ली, १३ ऑगस्ट – देशातील उच्च न्यायालयांमध्ये…

नासाची सूर्याकडे झेप

नासाची सूर्याकडे झेप

►पार्कर सोलर प्रोबचे यशस्वी प्रक्षेपण, वृत्तसंस्था वॉशिंग्टन, १२ ऑगस्ट…

नोबेल विजेते लेखक विद्याधर नायपॉल यांचे निधन

नोबेल विजेते लेखक विद्याधर नायपॉल यांचे निधन

वृत्तसंस्था लंडन, १२ ऑगस्ट – प्रसिद्ध साहित्यिक आणि नोबेल…

पाकिस्तानच्या संरक्षण निधीत कपात

पाकिस्तानच्या संरक्षण निधीत कपात

►ट्रम्प प्रशासनाचा झटका, वृत्तसंस्था वॉशिंग्टन, ११ ऑगस्ट – ट्रम्प…

मुंबई आयआयटीला केंद्राकडून एक हजार कोटी

मुंबई आयआयटीला केंद्राकडून एक हजार कोटी

►५६ व्या दीक्षांत समारंभात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची घोषणा…

राज्यात घातपाताचा कट एटीएसकडून उघड

राज्यात घातपाताचा कट एटीएसकडून उघड

►वैभव राऊतसह तिघांना अटक, संशयास्पद साहित्य जप्त ►पुणे, सोलापूर,…

मराठा आरक्षण आंदोलनात पुन्हा हिंसाचार

मराठा आरक्षण आंदोलनात पुन्हा हिंसाचार

►उच्च न्यायालयात याचिका दाखल, तभा वृत्तसेवा मुंबई, ९ ऑगस्ट…

तेरा वैभव अमर रहे माँ!

तेरा वैभव अमर रहे माँ!

॥ संवाद : सोमनाथ देशमाने | आंतरराष्ट्रीय समुदायाचा भारताकडे…

ममतांच्या उलट्या बोंबा!

ममतांच्या उलट्या बोंबा!

॥ जागता पहारा : भाऊ तोरसेकर | व्यवहारत: ममतांच्या…

हिंदूंच्या अस्तित्वाची लढाई…

हिंदूंच्या अस्तित्वाची लढाई…

॥ विशेष : सृ. गौ. देवधर | ‘‘जे जे…

‘सिमरन’मधील नवीन गाणे प्रदर्शित

‘सिमरन’मधील नवीन गाणे प्रदर्शित

अभिनेत्री कंगना राणावत लवकरच सिमरन या चित्रपटाद्वारे प्रेक्षकांच्या भेटीला…

चिरंजीवीसोबत सिनेमा करण्यास ऐश्‍वर्याचा नकार?

चिरंजीवीसोबत सिनेमा करण्यास ऐश्‍वर्याचा नकार?

ऐश्‍वर्या राय बच्चनची सध्या बॉलीवूडमध्ये सेकंड इनिंग सुरू आहे.…

रणबीरच्या फिरण्यावर बंदी

रणबीरच्या फिरण्यावर बंदी

संजय दत्तच्या आयुष्यावर आधारित चित्रपटात रणबीर कपूर ६ वेगवेगळ्या…

पंचांग
वार: | तिथी:
नक्षत्र: | राशी:
करण: | योग:
सूर्योदय: 06:10 | सूर्यास्त: 18:51
अयनांश:
Home » मध्य प्रदेश-छत्तीसगड, राज्य » १५ नक्षलवाद्यांचा खातमा

१५ नक्षलवाद्यांचा खातमा

►छत्तीसगडच्या सुकमा जिल्ह्यात सुरक्षा दलाची मोठी कामगिरी
►मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठा जप्त,
वृत्तसंस्था
रायपूर, ६ ऑगस्ट –

Army In Dandakaranya

छत्तीसगडच्या सुकमा जिल्ह्यात सुरक्षा दलाच्या जवानांनी आज सोमवारी सकाळी भीषण चकमकीत १५ नक्षलवाद्यांचा खातमा केला. चकमकस्थळावरून शस्त्र व स्फोटकांचा प्रचंड मोठा साठा ताब्यात घेण्यात आला आहे.
दक्षिण सुकमाच्या गोलापल्ली आणि कोटा भागातील नुलकातुंग गावाजवळ असलेल्या जंगलात काही नक्षलवादी आले असल्याची माहिती मिळाल्यानंतर सीआरपीएफ, विशेष कृती दल, राज्य राखीव दल आणि जिल्हा पोलिसांच्या दोन विशेष पथकांनी रविवारी सायंकाळीच मोहीम हाती घेतली होती.
सुमारे २०० जवानांच्या एका पथकाला जंगलातील एका ठिकाणी नक्षलवादी जमलेले दिसले. त्यांनी जवानांच्या दुसर्‍या पथकाला याबाबतची माहिती इशार्‍याने दिली. दोन्ही पथके त्या भागात पोहोचल्यानंतर जवानांनी सावध आणि तितकाच आक्रमक पवित्रा घेतला आणि संपूर्ण रात्रभर वेढा कायम ठेवला. आज सोमवारी सकाळी जवानांना पाहताच नक्षल्यांनी गोळीबार सुरू केला. पण, आधीपासूनच सज्ज असलेल्या जवानांनी नक्षल्यांचा हल्ला परतावून लावताना सडेतोड प्रत्युत्तर दिले. या कारवाईत १५ नक्षलवादी ठार झाले, अशी माहिती नक्षलविरोधी मोहिमेचे विशेष पोलिस महासंचालक डी. एम. अवस्थी यांनी पत्रकारांशी बोलताना दिली.
१५ नक्षल्यांचे मृतदेह ताब्यात घेण्यात आले असून, त्यांच्याजवळील अत्याधुनिक रायफल्स, विदेशी बनावटीच्या रिव्हॉल्वर आणि स्फोटकांचा मोठा साठाही जप्त करण्यात आला आहे, असे त्यांनी सांगितले.
२०० पेक्षा जास्त नक्षलवादी या जंगलात जमणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. सध्या शहीद सप्ताह सुरू असल्याने मोठ्या घातपाताच्या तयारीसाठी त्यांची बैठक होणार होती. काही नक्षल्यांनी पळ काढला असून, चकमकीत जखमी झालेल्या आपल्या अनेक साथीदारांनाही त्यांनी सोबत नेले असल्याची माहिती आहे.
नक्षली नेता देवाला अटक
या चकमकीनंतर जंगलात राबविण्यात आलेल्या शोधमोहिमेच्या काळात कुख्यात नक्षली नेत्यासह दोघांना अटक करण्यात आली. यात एका महिलेचा समावेश आहे. चकमकीत हे दोघेही जखमी झाले होते आणि पळ काढण्याच्या तयारीत होते. देवा असे या नक्षल्याचे नाव असून, त्याच्या डोक्यावर पोलिसांनी पाच लाख रुपयांचे बक्षीस जाहीर केले आहे. गेल्या महिन्यात जवानांनी पाच लाखांचे बक्षीस असलेली महिला नक्षली जरिनाचा खातमा केला होता. तिने राजनांदगाव जिल्ह्यातील अनेक मोठ्या हल्ल्यांचे नेतृत्व केले होते.

Posted by : | on : Aug 7 2018
Filed under : मध्य प्रदेश-छत्तीसगड, राज्य.
You can follow any responses to this entry through the RSS 2.0You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Change Language: press Ctrl+g

हवामान

दृष्टीक्षेपात

व्हिडीओ संग्रह

More in मध्य प्रदेश-छत्तीसगड, राज्य (13 of 736 articles)

Ramnath Kovind3
►राष्ट्रपतींनी व्यक्त केली चिंता, वृत्तसंस्था तिरुवनंतपुरम्, ६ ऑगस्ट - [caption id="attachment_36748" align="alignleft" width="289"] Ramnath Kovind3[/caption] आपल्या राज्यघटनेत हिंसाचाराला मुळीच थारा ...

×