ads
ads
ओडिशा पोलिस अधिकार्‍याला मरणोत्तर अशोकचक्र

ओडिशा पोलिस अधिकार्‍याला मरणोत्तर अशोकचक्र

►केंद्रीय गृहमंत्रालयाची माहिती, नवी दिल्ली, १४ ऑक्टोबर – नक्षलवाद्यांशी…

पंतप्रधानांना ठार मारण्याची धमकी

पंतप्रधानांना ठार मारण्याची धमकी

►दिल्लीच्या पोलिस आयुक्तांना आला मेल, नवी दिल्ली, १३ ऑक्टोबर…

आता देशभरात समान मुद्रांक शुल्क

आता देशभरात समान मुद्रांक शुल्क

►हिवाळी अधिवेशनात विधेयक मांडणार, नवी दिल्ली, १३ ऑक्टोबर –…

संयुक्त राष्ट्र मानवाधिकार परिषदेवर भारताचा मोठा विजय

संयुक्त राष्ट्र मानवाधिकार परिषदेवर भारताचा मोठा विजय

►तीन वर्षांचा राहणार कार्यकाळ, संयुक्त राष्ट्रसंघ, १३ ऑक्टोबर –…

भारतीय चित्रपटांवर पूर्णपणे बंदी घाला

भारतीय चित्रपटांवर पूर्णपणे बंदी घाला

►पाकिस्तानी निर्मात्यांची मागणी, कराची, १३ ऑक्टोबर – भारतीय चित्रपटांवर…

रिलायन्ससोबत फक्त १० टक्के ऑफसेट करार

रिलायन्ससोबत फक्त १० टक्के ऑफसेट करार

►दसाँ एव्हिएशनच्या अधिकार्‍याची माहिती, पॅरिस, १२ ऑक्टोबर – राफेल…

विजय फणशीकर, रमेश पतंगे यांना लोकमान्य टिळक जीवनगौरव पुरस्कार

विजय फणशीकर, रमेश पतंगे यांना लोकमान्य टिळक जीवनगौरव पुरस्कार

►महाराष्ट्र शासनाचे उत्कृष्ट पत्रकारिता पुरस्कार जाहीर, मुंबई, १० ऑक्टोबर…

‘जमात ए पुरोगामी’ पुस्तकाचे भाऊ तोरसेकर यांच्या हस्ते प्रकाशन

‘जमात ए पुरोगामी’ पुस्तकाचे भाऊ तोरसेकर यांच्या हस्ते प्रकाशन

मुंबई, ९ ऑक्टोबर – नामवंत लेखक आणि व्याख्याते डॉ.सच्चिदानंद…

केंद्राच्या अहवालानंतर मराठवाड्यात दुष्काळ जाहीर करणार : मुख्यमंत्री

केंद्राच्या अहवालानंतर मराठवाड्यात दुष्काळ जाहीर करणार : मुख्यमंत्री

लातूर, ७ ऑक्टोबर – निसर्ग आमची परीक्षा घेत आहे.…

३७० पेक्षाही घातक कलम ३५-ए!

३७० पेक्षाही घातक कलम ३५-ए!

॥ कटाक्ष : गजानन निमदेव | कलम ३५-ए हा…

न्यायपालिका संकटमुक्त

न्यायपालिका संकटमुक्त

॥ सारांश : ल.त्र्यं. जोशी | एवढ्या उच्च पातळीवरुन…

सभेत सोडलेला उंदीर

सभेत सोडलेला उंदीर

॥ जागता पहारा : भाऊ तोरसेकर | अडचणीतली काँग्रेस…

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

‘फोर्ब्स’ने नुकतीच सर्वाधिक कमाई करणार्‍या अभिनेत्यांच्या नावाची यादी जाहीर…

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

बॉलिवूडची बेबी डॉल म्हणजेच सनी लिओनीचे नाव इंटरनेटवर सर्वाधिक…

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

‘रेस- ३’ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये कमबॅक करणारा अभिनेता बॉबी देओल…

पंचांग
वार: | तिथी:
नक्षत्र: | राशी:
करण: | योग:
सूर्योदय: 06:20 | सूर्यास्त: 18:03
अयनांश:
Home » राष्ट्रीय, संरक्षण » अजित डोवाल यांचे सरकारमधील महत्त्व वाढले

अजित डोवाल यांचे सरकारमधील महत्त्व वाढले

सर्वोच्च धोरणात्मक समिती एसपीजीचे नेतृत्व करणार,
तभा वृत्तसेवा
नवी दिल्ली, ९ ऑक्टोबर –

Ajit Doval0

Ajit Doval0

राष्ट्रीय सुरक्षा आणि धोरणात्मक मुद्यांवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना सल्ला देण्यासाठी असलेल्या राष्ट्रीय सुरक्षा परिषदेला मदत करण्यासाठी केंद्र सरकारने आज मंगळवारी राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांच्या नेतृत्वात एका विशेष समितीची स्थापना केली आहे. विशेष म्हणजे सरकारच्या या निर्णयामुळे अजित डोवाल देशातील सर्वांत शक्तिशाली असे नोकरशाह झाले आहेत.
राष्ट्रीय सुरक्षा परिषदेला सल्ला देण्यासाठी पंतप्रधान मोदी यांनी स्ट्रॅटेजिक पॉलिसी ग्रुप (एसपीजी) म्हणून ओळखल्या जाणार्‍या नव्या समितीची स्थापना करण्याचा निर्णय घेतला आणि याचे नेतृत्व आपले अतिशय जवळचे असे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांच्याकडे सोपवले. यामुळे सरकारच्या धोरणात्मक निर्णय घेण्याच्या प्रक्रियेत अजित डोवाल यांचे महत्त्व आणखी वाढले आहे. आतापर्यंत देशातील सर्वाधिक शक्तिशाली नोकरशाह म्हणून मंत्रिमंडळ सचिवाकडे (कॅबिनेट सचिव) पाहिले जात होते.
अजित डोवाल यांच्या नेतृत्वातील स्ट्रॅटेजिक पॉलिसी ग्रुपमध्ये (एसपीजी)े मंत्रिमंडळ सचिव, नीती आयोगाचे उपाध्यक्ष, तिन्ही सैन्यदलांचे प्रमुख, गृहसचिव, परराष्ट्र सचिव, संरक्षण सचिव, अर्थ सचिव आणि रिझर्व्ह बँकेच्या गव्हर्नरचा समावेश राहणार आहे. डोवाल यांच्याकडे या समितीचे नेतृत्व आल्यामुळे अन्य सर्व अधिकार्‍यांपेक्षा त्यांच्याकडे जास्त अधिकार आले आहेत आणि त्यांचे महत्त्व वाढले आहे. आवश्यकेतप्रमाणे या समितीच्या बैठकीसाठी अन्य विभागाच्या वरिष्ठ अधिकार्‍यांनाही आमंत्रित केले जाऊ शकते.
अटलबिहारी वाजपेयी यांच्या कार्यकाळात राष्ट्रीय सुरक्षा सल्लागाराचे नवे पद निर्माण करण्यात आले होते. गुप्तचर खात्याचे संचालक म्हणून अजित डोवाल २००५ मध्ये निवृत्त झाले होते. केरळ कॅडरचे असलेल्या अजित डोवाल यांनी पाकिस्तानात गुप्तचर अधिकारी म्हणून ७ वर्षे काम केले होते. मोदी यांनी पंतप्रधान झाल्यानंतर अजित डोवाल यांची राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार म्हणून नियुक्ती केली होती.

Posted by : | on : 10 Oct 2018
Filed under : राष्ट्रीय, संरक्षण.
You can follow any responses to this entry through the RSS 2.0You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Change Language: press Ctrl+g

    छायाचित्रातून

  • पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक
  • कोहली, मीराबाईला खेलरत्न कोहली, मीराबाईला खेलरत्न
  • अमित पांघळला बॉक्सिंगचे सुवर्ण अमित पांघळला बॉक्सिंगचे सुवर्ण
  • तेजिंदरपालला सुवर्णपदक तेजिंदरपालला सुवर्णपदक
  • महाराष्ट्राच्या राहीचा सुवर्णभेद महाराष्ट्राच्या राहीचा सुवर्णभेद

हवामान

दृष्टीक्षेपात

व्हिडीओ संग्रह

More in राष्ट्रीय, संरक्षण (29 of 1621 articles)

Google Plus
लाख लोकांचा डेटा धोक्यात, नवी दिल्ली, ९ ऑक्टोबर - गुगल प्लस बंद करण्याचा निर्णय गुगल कंपनीने घेतला आहे. सोमवारी कंपनीने ...

×