ads
ads
संघ सर्वाधिक लोकशाही संघटना

संघ सर्वाधिक लोकशाही संघटना

►सरसंघचालक डॉ. मोहनजी भागवत यांचे स्पष्ट प्रतिपादन, वृत्तसंस्था नवी…

पंतप्रधान मोदींवर अभिनंदनाचा वर्षाव

पंतप्रधान मोदींवर अभिनंदनाचा वर्षाव

वृत्तसंस्था नवी दिल्ली, १७ सप्टेंबर – पक्षभेद आणि राजकीय…

फुकटात काहीच मिळत नाही

फुकटात काहीच मिळत नाही

►चीनची मदत घेणार्‍या देशांना लष्करप्रमुखांचा इशारा, वृत्तसंस्था पुणे, १७…

पाकिस्तान व्यापारासाठी देणार भारत-अफगाणला भूमी

पाकिस्तान व्यापारासाठी देणार भारत-अफगाणला भूमी

वृत्तसंस्था मुंबई, १५ सप्टेंबर – भारत-अफगाणिस्तानने व्यापारासाठी पाकिस्तानची भूमी…

भारताचा सीपीईसीला कडाडून विरोध

भारताचा सीपीईसीला कडाडून विरोध

►चीनसह पाकला खडे बोल!, वृत्तसंस्था जीनिव्हा (स्वित्झर्लंड), १५ सप्टेंबर…

चिनी मालावर जास्तीचा कर लावण्याचे ट्रम्प यांचे निर्देश

चिनी मालावर जास्तीचा कर लावण्याचे ट्रम्प यांचे निर्देश

वृत्तसंस्था वॉशिंग्टन, १५ सप्टेंबर – अमेरिका आणि चीन या…

शेळ्या चारण्यासाठी गेलेल्या ३ भावंडाचा बंधाऱ्यात बुडून मृत्यू

शेळ्या चारण्यासाठी गेलेल्या ३ भावंडाचा बंधाऱ्यात बुडून मृत्यू

►मराठवाड्यातील उमरज येथील घटना, प्रतिनिधी कंधार, १७ सप्टेंबर –…

महाराष्ट्रात वेगाने भरणाऱ्या ट्रेन्स

महाराष्ट्रात वेगाने भरणाऱ्या ट्रेन्स

मुंबई, १८ सप्टेंबर – ट्रेनने दररोज २३ दशलक्षांहून अधिक…

विसर्जन मिरवणुकीत डीजे, डॉल्बीला परवानगी नाही

विसर्जन मिरवणुकीत डीजे, डॉल्बीला परवानगी नाही

►मुंबई उच्च न्यायालयाची तात्पुरती बंदी, मुंबई, १४ सप्टेंबर –…

रा.स्व.संघ : हिंदुबंधुत्वापासून विश्‍वबंधुत्वापर्यंत

रा.स्व.संघ : हिंदुबंधुत्वापासून विश्‍वबंधुत्वापर्यंत

॥ सारांश : ल.त्र्यं. जोशी | संघस्थापनेपासूनचा हा धावता…

साद समाजपुरुषाची!

साद समाजपुरुषाची!

॥ संवाद : सोमनाथ देशमाने | स्वातंत्र्यदिनाच्या दिवशी लाल…

गॉड आणि सैतान

गॉड आणि सैतान

॥ जागता पहारा : भाऊ तोरसेकर | कठुआ, उन्नाव…

मोरूच्या मावशीची ‘एक्झिट’

मोरूच्या मावशीची ‘एक्झिट’

मुंबईच्या गिरणगावाने अनेक कलाकार रंगभूमी आणि रुपेरी पडद्याला दिले,…

‘सिमरन’मधील नवीन गाणे प्रदर्शित

‘सिमरन’मधील नवीन गाणे प्रदर्शित

अभिनेत्री कंगना राणावत लवकरच सिमरन या चित्रपटाद्वारे प्रेक्षकांच्या भेटीला…

चिरंजीवीसोबत सिनेमा करण्यास ऐश्‍वर्याचा नकार?

चिरंजीवीसोबत सिनेमा करण्यास ऐश्‍वर्याचा नकार?

ऐश्‍वर्या राय बच्चनची सध्या बॉलीवूडमध्ये सेकंड इनिंग सुरू आहे.…

पंचांग
वार: | तिथी:
नक्षत्र: | राशी:
करण: | योग:
सूर्योदय: 06:15 | सूर्यास्त: 18:24
अयनांश:
Home » नागरी, राष्ट्रीय » अटलजींमुळेच दहशतवाद जगाच्या चर्चेत

अटलजींमुळेच दहशतवाद जगाच्या चर्चेत

►श्रद्धांजली सभेत नरेंद्र मोदींचे प्रतिपादन,
तभा वृत्तसेवा
नवी दिल्ली, २० ऑगस्ट –

Atalji Shoksabha

Atalji Shoksabha

अटलबिहारी वाजपेयी यांच्या दूरदृष्टीमुळे जगाचा भारताकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलला आणि जग काश्मीरवर नाही, तर दहशतवादाच्या मुद्यावर चर्चा करू लागले, असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोमवारी आज येथे केले.
माजी पंतप्रधान दिवंगत अटलबिहारी वाजपेयी यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी आज इंदिरा गांधी इनडोअर स्टेडियममध्ये सर्वपक्षीय प्रार्थनासभेचे आयोजन करण्यात आले होते. या सभेत पंतप्रधान मोदी बोलत होते.
रा. स्व. संघाचे सरसंघचालक डॉ. मोहनजी भागवत, भाजपाचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी, भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह, केंद्रीय गृहमंत्री राजनाथसिंह, मानव संसाधन मंत्री प्रकाश जावडेकर, राज्यसभेतील विरोधी पक्षनेते गुलाम नबी आझाद, उपनेते आनंद शर्मा, जम्मू-काश्मीरचे माजी मुख्यमंत्री डॉ. फारूक अब्दुल्ला, पीडीपीच्या नेत्या मेहबुबा मुफ्ती, योगगुरू बाबा रामदेव, द्रमुकचे ए. राजा यांच्यासह विविध राजकीय पक्षांचे नेते आणि खासदार यावेळी उपस्थित होते. अटलजींची मानसकन्या नमिता भट्टाचार्य तसेच त्यांचे कुटुंबीय यावेळी उपस्थित होते.
याआधी अनेक आंतरराष्ट्रीय व्यासपीठावर भारताला काश्मीरप्रश्‍नी आपली भूमिका स्पष्ट करावी लागत होती. ही अटलबिहारी वाजपेयी यांची दिव्यदृष्टीच म्हणावी लागेल की, पंतप्रधानपदाची जबाबदारी स्वीकारल्यावर वाजपेयी यांनी अतिशय कौशल्याने वारंवार उपस्थित होणारा काश्मीरचा मुद्दा जागतिक व्यासपीठावरून मागे करत दहशतवादाचा मुद्दा पुढे आणला आणि आज संपूर्ण जग, कोण दहशतवादाच्या सोबत आहे आणि कोण विरोधात याचीच चर्चा करू लागले, असे पंतप्रधान मोदी म्हणाले.
परराष्ट्र धोरणासह वाजपेयी यांनी सर्व क्षेत्रात भारताला पुढे आणले. वाजपेयी यांचे प्रत्येक पाऊल देशाला मजबूत करण्याच्या दिशेने पडत होते. देशाला मजबूत करण्यासाठी जे काही आवश्यक होते, ते सर्व वाजपेयी यांनी आपल्या पंतप्रधानपदाच्या कार्यकाळात केले. अणुचाचणीपासून काश्मीर प्रश्‍नावर घेतलेल्या निर्णयामुळे जगात शक्तिशाली देश अशी भारताची ओळख निर्माण झाली. तारुण्यावस्थेपासून तर आयुष्याच्या शेवटच्या क्षणापर्यंत जोपर्यंत त्यांच्या शरीराने साथ दिली, वाजपेयी देशासाठी जगले. देशातील सर्वसामान्य माणसाच्या कल्याणासाठी त्यांनी आपले सर्वस्व पणाला लावले. त्यांचे नावच केवळ अटल नव्हते, तर आपल्या कृतीतूनही
त्यांनी जगाला अटलभाव दाखवून दिला. याआधी अनेक वेळा अणुचाचणीची तयारी करण्यात आली, पण प्रत्यक्षात अणुचाचणी केली गेलीच नाही. मात्र अटलबिहारी वाजपेयी यांनी आपल्या अटलनिर्णयाने ११ मेला पोखरणची अणुचाचणी यशस्वीपणे करून दाखवली. एवढेच नाही तर याचे श्रेयही त्यांनी स्वत: न घेता, त्यासाठी अहोरात्र कष्ट घेणार्‍या वैज्ञानिकांच्या पारड्यात टाकले, याकडे मोदी यांनी लक्ष वेधले.
अणुचाचणी करू नये म्हणून भारतावर दबाब आणण्यात आला, जवळपास संपूर्ण जग भारताच्या विरोधात गेले होते, भारतावर प्रतिबंध लावण्यात आले होते, मात्र या दबावाला झुगायरून अटलबिहारी वाजपेयी यांनी दुसर्‍यांदा म्हणजे १३ मेला पुन्हा अणुचाचणी केली, यातून वाजपेयी यांनी भारत अटल आहे, कोणासमोर झुकणारा नाही, असा संदेश संपूर्ण जगाला दिला. हेच भारताचे सामर्थ्य होते.
कटुता आणि विद्वेष निर्माण होऊ न देता वाजपेयी यांनी उत्तराखंड, छत्तीसगड आणि झारखंड या तीन नव्या राज्यांची निर्मिती केली, सगळ्यांना विश्‍वासात घेऊन निर्णय कसे घेतले जातात, हे देशाला दाखवून दिले, आज ही तिन्ही राज्ये विकासाच्या वाटेवर यशस्वीपणे आगेकूच करत आहे, हेच अटलजींच्या दूरदृष्टीचे फळ आहे, असे मोदी यांनी सांगितले.
अडवाणी भारावले
अटलजींसोबतच्या आपल्या सहा दशकाच्या मैत्रीला उजाळा देताना या सभेत भाजपाचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणींना भरून आले होते. माझ्या आत्मचरित्राचे प्रकाशन झाले, त्यावेळी आपल्याला उपस्थित राहता आले नाही, याचे अटलबिहारी वाजपेयी यांना खूप दु:ख झाले होते. आज ते उपस्थित नाहीत तर मला किती दु:ख होते आहे, याची कल्पना आपण करू शकता, याकडे लक्ष वेधत अडवाणी म्हणाले की, आजपयर्र्ंत माझ्या आयुष्यात अनेक सभांना मी संबोधित केले, पण आज अशा सभेला संबोधित करण्याची वेळ माझ्यावर येईल, याची कल्पनाही मी कधी केली नव्हती. अटलजी नसलेल्या सभेला संबोधित करण्याची त्यांच्या लक्ष्मणाची ही पहिलीच वेळ आहे. आपण किती दिवस जगणार याची कल्पना नाही, असे ते कधीतरी म्हणत त्यावेळी मला अतिशय वेदना होत होत्या.
अटलजींसोबत माझी ६५ वर्षाची मैत्री होती, हे माझे भाग्य आहे. अटलजींसोबत काम करण्याची संधी मला मिळाली, काम करतांना अनेक अनुभव घेता आला, खूप काही शिकता आले. आज ते आपल्या सगळ्यांना सोडून निघून गेले. अटलजींनी आम्हाला जे काही शिकवले, दिले, ते ग्रहण करून आयुष्याची पुढची वाटचाल आम्हाला करावी लागणार आहे. रा. स्व. संघातून जे संस्कार आम्हाला मिळाले, ते प्रत्यक्षात आणण्यातच आमच्या जीवनाची इतिकर्तव्यता आहे. अटलजींना दाखवलेल्या मार्गावर चालता येईल, एवढी शक्ती मिळावी, हीच माझी आता परमेश्‍वरापाशी प्रार्थना आहे, असे अडवाणी म्हणाले.
या प्रार्थना सभेचे संचालन भाजपाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष खा. डॉ. विनय सहस्रबुद्धे यांनी केले.
मृत्यूनंतर अटलजींनी आम्हाला एकत्र आणले : आझाद
अटलबिहारी वाजपेयी यांनी आपल्या जिवंतपणी आम्हा सगळ्यांना एकत्र आणण्याचा वारंवार प्रयत्न केला, मात्र त्यांच्या मृत्यूनंतर त्यांचा तो प्रयत्न यशस्वी झाला. आपल्या श्रद्धांजली सभेच्या निमित्ताने त्यांनी आम्हा सर्वांना एकत्र आणले. हीच अटलजींची महानता आहे, असे राज्यसभेतील विरोधी पक्षनेते गुलाम नबी आझाद यांनी आपल्या भाषणात म्हटले.
जेव्हा मी मंत्री होतो आणि अटलजी विरोधी पक्षनेता होते, त्यावेळी आम्ही एकत्र जेवण करायचो. एक-दुसर्‍याच्या कार्यालयात चहा पिण्यासाठी जात असू. कारण तेव्हा ते शक्य होते, असे स्पष्ट करत आझाद म्हणाले की, अटलजींची भाषण आम्ही लक्षपूर्वक ऐकत असून. कठोर शब्दातील त्यांची टीकाही आम्हाला गोड वाटत होती.
या प्रार्थना सभेत भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह, केंद्रीय गृहमंत्री राजनाथसिंह, नागरी पुरवठा मंत्री रामविलास पासवान, जम्मू काश्मीरचे माजी मुख्यमंत्रिद्वय डॉ. फारुक अब्दुल्ला, मेहबुबा मुफ्ती यांच्यासह अनेक नेत्यांची भाषणे झालीत.
भाजपारूपी वटवृक्ष अटलजींनी घडवला : डॉ. मोहनजी भागवत
सार्वजनिक जीवनात सर्वोच्च पदावर पोहोचूनही अटलबिहारी वाजपेयी यांचे पाय जमिनीवर होते. सगळ्यांबद्दलच त्यांच्या मनात मित्रत्वाचा भाव होता, या शब्दात रा. स्व. संघाचे सरसंघचालक डॉ. मोहनजी भागवत यांनी आपली भावपूर्ण शब्दांजली वाहिली.
वाजपेयी यांनी मुळांना मजबूत करून भाजपारूपी विशाल वटवृक्ष निर्माण केला, याकडे लक्ष वेधत डॉ. भागवत म्हणाले की, काल पुस्तक वाचताना एक सुभाषित पाहण्यात आले, त्यात म्हटले की, सुंदर फुले आणि मधुर फळांनी एक वृक्ष सुसज्जित आहे. त्या वृक्षाच्या पानात औषधी गुण आहे, त्यामुळे लोक औषध म्हणून त्या वृक्षाची पाने तोडून नेतात, सुगंधासाठी फुल नेतात आणि स्वादिष्ट आहेत म्हणून फळेही नेतात. आज हा वृक्ष आम्हाला सावली देतो, फळ आणि फुले देतो; पण ज्यावेळी हे रोपटे होते, त्यावेळी याचे जतन आणि संवर्धन कोणी केले असेल? कोवळे रोपटे असताना त्याच्या मुळांना कोणी पाणी घातले असेल, असा विचार किती लोकांच्या मनात आला असेल? अटलजींनी असाच वटवृक्ष निर्माण केला, ज्याच्या मुळांना पाणी घालणारे अनेक जण निघून गेले, काही आजही आहेत. अशा रोपट्याला वटवृक्षाचे रूप देण्यात अटलजींचे मोठे योगदान आहे.

Posted by : | on : Aug 21 2018
Filed under : नागरी, राष्ट्रीय.
You can follow any responses to this entry through the RSS 2.0You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Change Language: press Ctrl+g

हवामान

दृष्टीक्षेपात

व्हिडीओ संग्रह

More in नागरी, राष्ट्रीय (171 of 2043 articles)

Dr V R Lalithambika Isro
►डॉ. ललितांबिका करणार नेतृत्व, वृत्तसंस्था नवी दिल्ली, २० ऑगस्ट - [caption id="attachment_60232" align="alignleft" width="300"] Dr V R Lalithambika Isro[/caption] पंतप्रधान ...

×