ads
ads
एम. जे. अकबर यांचा राजीनामा

एम. जे. अकबर यांचा राजीनामा

►आरोपांचा केला इन्कार ►न्यायालयीन लढाई लढण्याचा निर्धार, नवी दिल्ली,…

नोटाबंदीवरून जागतिक अहवालात मोदी सरकारचे कौतुक

नोटाबंदीवरून जागतिक अहवालात मोदी सरकारचे कौतुक

नवी दिल्ली, १७ ऑक्टोबर – मोदी सरकारने घेतलेल्या नोटाबंदी…

केवायसी पूर्ण करणार्‍या मोबाईल वॉलेट कंपन्यांच्या आंतरक्रियाशीलतेला मान्यता

केवायसी पूर्ण करणार्‍या मोबाईल वॉलेट कंपन्यांच्या आंतरक्रियाशीलतेला मान्यता

►रिझर्व्ह बँकेचे आदेश, बंगळुरू, १७ ऑक्टोबर – केवायसी प्रक्रिया…

संयुक्त राष्ट्र मानवाधिकार परिषदेवर भारताचा मोठा विजय

संयुक्त राष्ट्र मानवाधिकार परिषदेवर भारताचा मोठा विजय

►तीन वर्षांचा राहणार कार्यकाळ, संयुक्त राष्ट्रसंघ, १३ ऑक्टोबर –…

भारतीय चित्रपटांवर पूर्णपणे बंदी घाला

भारतीय चित्रपटांवर पूर्णपणे बंदी घाला

►पाकिस्तानी निर्मात्यांची मागणी, कराची, १३ ऑक्टोबर – भारतीय चित्रपटांवर…

रिलायन्ससोबत फक्त १० टक्के ऑफसेट करार

रिलायन्ससोबत फक्त १० टक्के ऑफसेट करार

►दसाँ एव्हिएशनच्या अधिकार्‍याची माहिती, पॅरिस, १२ ऑक्टोबर – राफेल…

विजयादशमीनंतर राज्य मंत्रिमंडळ विस्तार?

विजयादशमीनंतर राज्य मंत्रिमंडळ विस्तार?

नवी दिल्ली, १६ ऑक्टोबर – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या…

विद्यमान संमेलनाध्यक्षांचा महिना उलटल्यावर आक्षेप

विद्यमान संमेलनाध्यक्षांचा महिना उलटल्यावर आक्षेप

►साहित्य संमेलनाध्यक्ष निवड प्रकरण, नागपूर, १६ ऑक्टोबर – अखिल…

विजय फणशीकर, रमेश पतंगे यांना लोकमान्य टिळक जीवनगौरव पुरस्कार

विजय फणशीकर, रमेश पतंगे यांना लोकमान्य टिळक जीवनगौरव पुरस्कार

►महाराष्ट्र शासनाचे उत्कृष्ट पत्रकारिता पुरस्कार जाहीर, मुंबई, १० ऑक्टोबर…

३७० पेक्षाही घातक कलम ३५-ए!

३७० पेक्षाही घातक कलम ३५-ए!

॥ कटाक्ष : गजानन निमदेव | कलम ३५-ए हा…

न्यायपालिका संकटमुक्त

न्यायपालिका संकटमुक्त

॥ सारांश : ल.त्र्यं. जोशी | एवढ्या उच्च पातळीवरुन…

सभेत सोडलेला उंदीर

सभेत सोडलेला उंदीर

॥ जागता पहारा : भाऊ तोरसेकर | अडचणीतली काँग्रेस…

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

‘फोर्ब्स’ने नुकतीच सर्वाधिक कमाई करणार्‍या अभिनेत्यांच्या नावाची यादी जाहीर…

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

बॉलिवूडची बेबी डॉल म्हणजेच सनी लिओनीचे नाव इंटरनेटवर सर्वाधिक…

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

‘रेस- ३’ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये कमबॅक करणारा अभिनेता बॉबी देओल…

पंचांग
वार: | तिथी:
नक्षत्र: | राशी:
करण: | योग:
सूर्योदय: 06:21 | सूर्यास्त: 18:00
अयनांश:
Home » नागरी, राष्ट्रीय » अटलबिहारी वाजपेयी रुग्णालयात, प्रकृती स्थिर

अटलबिहारी वाजपेयी रुग्णालयात, प्रकृती स्थिर

वृत्तसंस्था
नवी दिल्ली, ११ जून –

Atal Bihari Vajpayee After Stroke

Atal Bihari Vajpayee After Stroke

माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांना आज सोमवारी अ. भा. आयुर्विज्ञान संस्थेत (एम्स) दाखल करण्यात आले. वाजपेयी यांची प्रकृती स्थिर असल्याचे एम्सने जारी केलेल्या पत्रकात म्हटले आहे. डॉक्टरांच्या सल्ल्यावरून वाजपेयी यांना आज सकाळी नियमित तपासणीसाठी एम्समध्ये दाखल करण्यात आले. एम्सचे संचालक डॉ. रणदीप गुलेरिया यांच्या नेतृत्वात डॉक्टरांचे पथक वाजपेयी यांच्या प्रकृतीवर लक्ष ठेऊन आहेत. डॉ. गुलेरिया यांच्या नेतृत्वात डॉक्टरांची चमू वाजपेयी यांच्या विविध प्रकारच्या वैद्यकीय चाचण्या करीत असल्याचे एम्सने जारी केलेल्या पत्रकात म्हटले आहे. वाजपेयी यांची प्रकृती गेल्या काही वर्षापासून समाधानकारक नाही. त्यांचे हिंडणे-फिरणे पूर्णपणे बंद झाले आहे. आतापर्यंत डॉक्टर त्यांच्या निवासस्थानी जाऊनच त्यांच्यावर उपचार करत होते. गेल्या आठ वर्षांच्या काळात आज प्रथमच त्यांना एम्समध्ये दाखल करण्यात आले. याआधी २००७, २००९ आणि २०१० मध्ये त्यांना एम्समध्ये दाखल करण्यात आले होते. भाजपानेही त्यांच्या प्रकृतीविषयी माहिती देणारे पत्रक काढले आहे. तीन वेळा भारताचे पंतप्रधानपद भूषवणार्‍या वाजपेयी यांना भारतरत्न या सर्वोच्च नागरी पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.
मोदींसह अनेकांनी घेतली भेट
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘एम्स’मध्ये जाऊन अटलबिहारी वाजपेयींच्या प्रकृतीची विचारपूस तसेच डॉक्टरांशी चर्चा केली. यानंतर मोदींनी अटलजींच्या परिवारातील सदस्यांची भेट घेतली. मोदींच्या आधी काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी, भाजपाध्यक्ष अमित शाह, केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह, केंद्रीय आरोग्य मंत्री जे. पी. नड्डा, केंद्रीय मंत्री विजय गोयल आणि मुख्तार अब्बास नकवी यांच्यासह अनेक नेत्यांनी रुग्णालयात जाऊन त्यांची भेट घेतली. ‘एम्स’मध्ये वाजपेयींच्या तपासणीसाठी डॉक्टरांच्या विशेष पथकाची नियुक्ती करण्यात आली आहे.

Posted by : | on : 12 Jun 2018
Filed under : नागरी, राष्ट्रीय.
You can follow any responses to this entry through the RSS 2.0You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Change Language: press Ctrl+g

    छायाचित्रातून

  • पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक
  • कोहली, मीराबाईला खेलरत्न कोहली, मीराबाईला खेलरत्न
  • अमित पांघळला बॉक्सिंगचे सुवर्ण अमित पांघळला बॉक्सिंगचे सुवर्ण
  • तेजिंदरपालला सुवर्णपदक तेजिंदरपालला सुवर्णपदक
  • महाराष्ट्राच्या राहीचा सुवर्णभेद महाराष्ट्राच्या राहीचा सुवर्णभेद

हवामान

दृष्टीक्षेपात

व्हिडीओ संग्रह

More in नागरी, राष्ट्रीय (667 of 1632 articles)


विरोधकांची भूमिका महत्त्वाची ►अमित शाह यांचे प्रतिपादन, वृत्तसंस्था रायपूर, ११ जून - लोकशाहीत विरोधकांची भूमिका अतिशय महत्त्वाची असते. त्यांच्याशिवाय लोकशाही ...

×