ads
ads
दहशतवादाचा पाडाव करण्यास भारतीय नेतृत्व सक्षम

दहशतवादाचा पाडाव करण्यास भारतीय नेतृत्व सक्षम

•अजित डोवाल यांचे प्रतिपादन •पुलवामा हल्ला कधीच विसरणार नाही,…

सात अतिरेक्यांच्या १३ मालमत्ता जप्त

सात अतिरेक्यांच्या १३ मालमत्ता जप्त

•टेरर फंडिंगप्रकरणी ईडीची धडक कारवाई, नवी दिल्ली, १९ मार्च…

इतरांना त्रास होत असल्यास पक्ष्यांसाठी दाणे ठेवणे चूकच

इतरांना त्रास होत असल्यास पक्ष्यांसाठी दाणे ठेवणे चूकच

•सर्वोच्च न्यायालयाचा निर्वाळा, नवी दिल्ली, १९ मार्च – इमारतीच्या…

दलाई लामांचा उत्तराधिकारी चीनच्या मंजुरीनेच

दलाई लामांचा उत्तराधिकारी चीनच्या मंजुरीनेच

•चिनी परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाची माहिती, बीजिंग, १९ मार्च –…

नीरव मोदीविरोधात अटक वॉरंट जारी

नीरव मोदीविरोधात अटक वॉरंट जारी

लंडन, १८ मार्च – पंजाब नॅशनल बँकेत सुमारे १४…

डेटा चोरी प्रकरणी झुकेरबर्ग यांचा खोटारडेपणा उघड

डेटा चोरी प्रकरणी झुकेरबर्ग यांचा खोटारडेपणा उघड

•फेसबूकला होती संपूर्ण माहिती, लंडन, १८ मार्च – कॅम्ब्रिज…

दाऊद शरण यायला तयार होता, पवारांनी दुर्लक्ष केले

दाऊद शरण यायला तयार होता, पवारांनी दुर्लक्ष केले

•प्रकाश आंबेडकरांचा गंभीर आरोप, मुंबई, १९ मार्च – कुख्यात…

शेतकर्‍यांना सर्वाधिक मदत युती सरकारच्या काळात

शेतकर्‍यांना सर्वाधिक मदत युती सरकारच्या काळात

•मुख्यमंत्री फडणवीस यांची स्पष्टोक्ती, औरंगाबाद, १७ मार्च – काँगे्रसप्रणित…

काटोलमध्ये पोटनिवडणूक नको

काटोलमध्ये पोटनिवडणूक नको

•शरद पवार यांची मागणी •कुणीच अर्ज भरू नये, मुंबई,…

१७ व्या लोकसभेचा महाकुंभ!

१७ व्या लोकसभेचा महाकुंभ!

॥ विशेष : सुधीर पाठक | १७ व्या लोकसभेसाठीचा…

निवडणुकीपूर्वीच महागठबंधनाचा बँडबाजा

निवडणुकीपूर्वीच महागठबंधनाचा बँडबाजा

॥ सारांश : ल.त्र्यं. जोशी | महागठबंधन याचा अर्थच…

जबरदस्त तडाखा कसा द्यायचा आम्ही जाणतो!

जबरदस्त तडाखा कसा द्यायचा आम्ही जाणतो!

॥ रोखठोक : हितेश शंकर | पुलवामातील दहशतवादी हल्ल्यात…

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

‘फोर्ब्स’ने नुकतीच सर्वाधिक कमाई करणार्‍या अभिनेत्यांच्या नावाची यादी जाहीर…

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

बॉलिवूडची बेबी डॉल म्हणजेच सनी लिओनीचे नाव इंटरनेटवर सर्वाधिक…

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

‘रेस- ३’ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये कमबॅक करणारा अभिनेता बॉबी देओल…

पंचांग
वार: | तिथी:
नक्षत्र: | राशी:
करण: | योग:
सूर्योदय: 06:31 | सूर्यास्त: 18:35
अयनांश:
Home » नागरी, राष्ट्रीय » अटलबिहारी वाजपेयी अनंतात विलीन

अटलबिहारी वाजपेयी अनंतात विलीन

Atal Bihari Vajpayee Antyayatra18

Atal Bihari Vajpayee Antyayatra17

Atal Bihari Vajpayee Antyayatra16

Atal Bihari Vajpayee Antyayatra15

Atal Bihari Vajpayee Antyayatra13

Atal Bihari Vajpayee Antyayatra14

Atal Bihari Vajpayee Antyayatra12

Atal Bihari Vajpayee Antyayatra11

Atal Bihari Vajpayee Antyayatra10

Atal Bihari Vajpayee Antyayatra9

Atal Bihari Vajpayee Antyayatra8

Atal Bihari Vajpayee Antyayatra7

Atal Bihari Vajpayee Antyayatra6

Atal Bihari Vajpayee Antyayatra5

Atal Bihari Vajpayee Antyayatra4

Atal Bihari Vajpayee Antyayatra0

Atal Bihari Vajpayee Antyayatra3

Atal Bihari Vajpayee Antyayatra2

Atal Bihari Vajpayee Antyayatra1

Atal Bihari Vajpayee Antyayatra

Atal Bihari Vajpayee Antyayatra19

►शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार
►मानसकन्या नमिता यांनी दिला पार्थिवाला मुखाग्नी,
श्यामकांत जहागीरदार
नवी दिल्ली, १७ ऑगस्ट –

भाजपाचे ज्येष्ठ नेते, माजी पंतप्रधान, प्रखर वक्ता आणि ओजस्वी कवी ‘भारतरत्न’ अटलबिहारी वाजपेयी यांच्या पार्थिवावर आज शुक्रवारी संपूर्ण शासकीय इतमामात आणि शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आला. राजघाट परिसरातील स्मृतिस्थळ येथे वाजपेयी यांची मानस कन्या नमिता भट्टाचार्य यांनी वाजपेयी यांच्या पार्थिवाला मुखाग्नी दिला. यावेळी उपस्थितांना शोकावेग अनावर झाला होता. आपल्या कोट्यवधी चाहत्यांना दु:खसागरात लोटून अटलबिहारी वाजपेयी अनंतात विलीन झाले; कधीच परत न येणार्‍या प्रवासाला निघून गेले.
यावेळी राष्ट्रपती रामनाथ कोविंद, उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू, लोकसभेच्या अध्यक्ष सुमित्रा महाजन, पंतप्रधान नरेंद्र मोदी, सरन्यायाधीश दीपक मिश्रा, रा. स्व. संघाचे सरसंघचालक डॉ. मोहनजी भागवत, सरकार्यवाह भय्याजी जोशी, भाजपाचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी, डॉ. मुरलीमनोहर जोशी, भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह, माजी पंतप्रधान डॉ. मनमोहनसिंग, काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी, केंद्रीय गृहमंत्री राजनाथसिंह, परराष्ट्र व्यवहार मंत्री सुषमा स्वराज, भूपृष्ठ परिवहन आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी, संरक्षण मंत्री निर्मला सीतारामन्, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह अनेक केंद्रीय मंत्री, उत्तरप्रदेशचे राज्यपाल राम नाईक, भाजपाशासित विविध राज्यांचे मुख्यमंत्री, खासदार तसेच विविध पक्षांचे नेते उपस्थित होते.
अटलबिहारी वाजपेयी यांचे गुरुवारी सायंकाळी निधन झाले होते. आज दुपारी २ च्या सुमारास दीनदयाल उपाध्याय मार्गावरील भाजपा मुख्यालयातून त्यांची अंत्ययात्रा निघाली. या अंत्ययात्रेत हजारोच्या संख्येत लोक सहभागी झाले होते. नजीकच्या काळातील राजधानी दिल्लीतील सर्वात मोठी अंत्ययात्रा असे याचे वर्णन करावे लागेल. लष्करी इतमामाप्रमाणे फुलांनी सुशोभित अशा तोफगाडीवर अटलबिहारी वाजपेयी यांचे पार्थिव ठेवण्यात आले होते. उन्हापासून रक्षण करण्यासाठी या तोफगाडीवर तीन मोठ्या छत्र्याही लावण्यात आल्या होत्या. त्याच्या समोरील लष्कराच्या ट्रकवर वाजपेयी यांचे जावई रंजन भट्टाचार्य आणि भाचे अनुप मिश्रा बसले होते. समोर लष्कराच्या तिन्ही सेनादलाचे बॅण्डपथक होते. मागील लष्कराच्या तीन ट्रकवर भूदल, वायुदल आणि नौदलाचे जवान विराजमान होते.
दीनदयाल उपाध्याय मार्ग, आयटीओ चौक, बहादूरशाह जफर मार्ग, दिल्ली गेट, नेताजी सुभाष मार्ग, निषाद राज मार्ग, शांतिवन चौकमार्गे अंत्ययात्रा राजघाट परिसरातील स्मृतिस्थळ येथे पोहोचली. या जवळपास सहा किमीच्या मार्गात रस्त्यांच्या दुतर्फा हजारो लोक आपल्या लाडक्या नेत्याला अखेरचा निरोप देण्यासाठी उपस्थित होेते. उपस्थित लोक ‘जब तक सूरज चांद रहेंगा अटलजी तुम्हारा नाम रहेगा’, अशा घोषणा देत अटलजींच्या अंत्ययात्रेवर फुलांचा वर्षाव करत होते. सहा किमीचे अंतर कापण्यसाठी अंत्ययात्रेला जवळपास दोन तास लागले.
हजारो लोकांचा सहभाग असलेली ही अंत्ययात्रा चार वाजता स्मृतिस्थळ येथे पोहोचली. अंत्ययात्रेच्या मार्गात ठिकठिकाणी अटलबिहारी वाजपेयी यांचे मोठमोठे होर्डिंग्ज लावण्यात आले होते. अंत्ययात्रेच्या मार्गात पांढर्‍या कापडातील द्वार उभारण्यात आले होते.
स्मृतिस्थळ येथे उभारण्यात आलेल्या सुशोभित चौथर्‍यावर अटलबिहारी वाजपेयी यांचे पार्थिव ठेवण्यात आले. याठिकाणी लष्करप्रमुख जन. बिपिन रावत, नौदल प्रमुख अ‍ॅडमिरल सुनील लांबा, एअर चीफ मार्शल बिरेंदरसिंह धनोआ, संरक्षण राज्यमंत्री डॉ, सुभाष भामरे, संरक्षण मंत्री निर्मला सीतारामन, लोकसभेच्या अध्यक्ष सुमित्रा महाजन, पंतप्रधान नरेंद्र मोदी, उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू, राष्ट्रपती रामनाथ कोविंद, माजी पंतप्रधान डॉ. मनमोहनसिंग, भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह, भाजपाचे ज्येेष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी यांच्यासह काही मान्यवरांनी वाजपेयी यांना पुष्पांजली वाहिली.
प्रथेप्रमाणे अटलबिहारी वाजपेयी यांचे पार्थिव गुंडाळलेला राष्ट्रध्वज त्यांची नात निहारिका हिला सन्मानपूर्वक देण्यात आला. यावेळी निहारिका हिच्या भावना दाटून आल्या. लष्करी जवानांनी वाजपेयी यांचे पार्थिव शवपेटीतून बाहेर काढून तिरडीवर ठेवले. यानंतरची अंत्यसंस्काराची सर्व प्रक्रिया वाजपेयी यांच्या नातलगांनी पूर्ण केली. वाजपेयी यांचे पार्थिव असलेली तिरडी उचलून ज्याठिकाणी अंत्यसंस्कार करण्यात येणार होते, तेथे आणण्यात आली. तिथे काही धार्मिक विधी करण्यात आले. नंतर वाजपेयी यांचे पार्थिव चितेवर ठेवण्यात आले. मंत्रोच्चारात मानसकन्या नमिता यांनी वाजपेयी यांच्या पार्थिवाला मुखाग्नी देताच उपस्थित मान्यवरांसह हजारो लोक आपल्या जागेवर हात जोडून उभे झाले. सवार्र्नाच शोकावेग अनावर झाला होता. डोळ्यात अश्रूंनी गर्दी केली होती. अनेकांना हुंदके आवरत नव्हते. नात निहारिकाचे दु:ख तर पाहवले जात नव्हते. २१ तोफांची सलामी वाजपेयी यांना यावेळी देण्यात आली. ‘अटलजी अमर रहे’ च्या घोषणा सुरू झाल्या, संपूर्ण आसमंत घोषणांनी निनादून गेला. आगीच्या ज्वाळा आकाशात उंच उठल्या. अग्निनारायणाने जननायक असलेल्या वाजपेयी यांना आपल्या कवेत घेतले होते. वाजपेयी अनंतात विलीन झाले होते. एका महान युगाचा अस्त झाला होता.
विदेशातील पाहुणे उपस्थित
माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांना शेवटचा निरोप देण्यासाठी भारतातील मान्यवरांसोबत परदेशातील प्रतिनिधीही अंत्यसंस्काराला उपस्थित होते. यात भूतानचे नरेश जिग्मे खेसर नामग्येल, अफगाणिस्तानचे माजी राष्ट्रपती हमीद करझई, बांगला देशचे परराष्ट्र मंत्री अबुल हसन महमूद अली, नेपाळचे परराष्ट्र मंत्री प्रदीपकुमार ग्यावाली, श्रीलंकेचे परराष्ट्र मंत्री लक्ष्मण किरिला, पाकिस्तानचे कायदा मंत्री अली जाफर वाजपेयी यांच्या समावेश होता. या सर्व मान्यवरांनी वाजपेयी यांच्या पार्थिवावर पुष्पचक्र अर्पण करून त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहिली. परराष्ट्र व्यवहार मंत्री सुषमा स्वराज यांनी या सर्व परदेशी पाहुण्यांना स्मृतिस्थळ येथे सन्मानपूर्वक आणले. वाजपेयी यांच्या सन्मानार्थ दिल्लीतील ब्रिटनच्या उच्चायुक्ताने आपल्या कार्यालयावरील राष्ट्र ध्वज अर्ध्यावर उतरवला होता.
मान्यवरांची उपस्थिती
अटलबिहारी वाजपेयी यांच्या अंत्यसंस्काराला विविध पक्षांच्या मान्यवरांनी उपस्थिती लावत त्यांच्याबद्दलचा आदर व्यक्त केला. संघाचे सहसरकार्यवाह डॉ. कृष्णगोपाल व सुरेश सोनी, गोपाल आर्य, कायदा मंत्री रविशंकर प्रसाद, संसदीय कामकाज मंत्री अनंतकुमार, वन आणि पर्यावरण मंत्री डॉ. हर्षवर्धन, मानव संसाधन मंत्री प्रकाश जावडेकर, रेल्वेमंत्री पीयूष गोयल, पेट्रोलियम मंत्री धर्मेद्र प्रधान, वस्त्रोद्योग मंत्री स्मृती इराणी, नागरी पुरवठा मंत्री रामविलास पासवान, उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, उपमुख्यमंत्री दिनेश शर्मा व केशवप्रसाद मौर्य, मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान, हरयाणाचे मुख्यमंत्री मनोहर खट्टर, आसामचे मुख्यमंत्री सर्बानंद सोनोवाल, छत्तीसगडचे मुख्यमंत्री डॉ. रमणसिंह, झारखंडचे मुख्यमंत्री रघुवरदास, बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार, उपमुख्यमंत्री सुशीलकुमार मोदी, त्रिपुराचे मुख्यमंत्री विप्लवकुमार देव, दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल, उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया, लोकसभेतील काँग्रेस पक्षाचे गटनेते मल्लिकार्जुन खडगे, राज्यसभेतील विरोधी पक्षनेते गुलाम नबी आझाद, उपनेते आनंद शर्मा, काँग्रेस महासचिव अशोक गहलोत, राज बब्बर, यांच्यासह अनेक अनेक मान्यवर उपस्थित होते.
पंतप्रधान मोदी पायी चालले
पंतप्रधान नरेंद्र मोदी पायी चालत अंत्ययात्रेत सहभागी झाले. सुरुवातीला मोदी कारमध्ये होते, पण कारमध्ये बसून अंत्ययात्रेत सहभागी होणे, त्यांना पटले नाही. त्यामुळे भाजपा मुख्यालयापासून थोड्याच अंतरावर मोदी कारमधून उतरून अंत्ययात्रेत पायी चालू लागले. पंतप्रधान म्हणून आपल्या जिवाला असलेल्या धोक्याचीही त्यांनी पर्वा केली नाही. मोदी पायी चालू लागल्यामुळे एसपीजीच्या जवानांची तारांबळ उडाली. स्मृतिस्थळापर्यंतचे सहा किमी अंतर मोदी यांनी पायी चालत कापले. मोदी यांच्यासोबत अमित शाह, धर्मेद्र प्रधान, पीयूष गोयल, देवेंद्र फडणवीस, शिवराजसिंह चौहान अंत्ययात्रेत पूर्णवेळ पायी चालत होते.

Posted by : | on : 18 Aug 2018
Filed under : नागरी, राष्ट्रीय.
You can follow any responses to this entry through the RSS 2.0You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Change Language: press Ctrl+g

    छायाचित्रातून

  • भारताने ऑस्ट्रेलियात रचला इतिहास भारताने ऑस्ट्रेलियात रचला इतिहास
  • हार्दिक पंड्या, लोकेश राहुलला बीसीसीआयची नोटीस हार्दिक पंड्या, लोकेश राहुलला बीसीसीआयची नोटीस
  • भारताचा ऑस्ट्रेलियात विक्रमी विजय भारताचा ऑस्ट्रेलियात विक्रमी विजय
  • पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक
  • कोहली, मीराबाईला खेलरत्न कोहली, मीराबाईला खेलरत्न

हवामान

दृष्टीक्षेपात

व्हिडीओ संग्रह

More in नागरी, राष्ट्रीय (1156 of 2213 articles)

Atal Bihari Vajpayee File
नवी दिल्ली, १७ ऑगस्ट - आयुष्यभर जोडलेली माणसे, वाचलेली पुस्तके, रचलेल्या कविता ही माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांची खरी ...

×