ads
ads
संघ सर्वाधिक लोकशाही संघटना

संघ सर्वाधिक लोकशाही संघटना

►सरसंघचालक डॉ. मोहनजी भागवत यांचे स्पष्ट प्रतिपादन, वृत्तसंस्था नवी…

पंतप्रधान मोदींवर अभिनंदनाचा वर्षाव

पंतप्रधान मोदींवर अभिनंदनाचा वर्षाव

वृत्तसंस्था नवी दिल्ली, १७ सप्टेंबर – पक्षभेद आणि राजकीय…

फुकटात काहीच मिळत नाही

फुकटात काहीच मिळत नाही

►चीनची मदत घेणार्‍या देशांना लष्करप्रमुखांचा इशारा, वृत्तसंस्था पुणे, १७…

पाकिस्तान व्यापारासाठी देणार भारत-अफगाणला भूमी

पाकिस्तान व्यापारासाठी देणार भारत-अफगाणला भूमी

वृत्तसंस्था मुंबई, १५ सप्टेंबर – भारत-अफगाणिस्तानने व्यापारासाठी पाकिस्तानची भूमी…

भारताचा सीपीईसीला कडाडून विरोध

भारताचा सीपीईसीला कडाडून विरोध

►चीनसह पाकला खडे बोल!, वृत्तसंस्था जीनिव्हा (स्वित्झर्लंड), १५ सप्टेंबर…

चिनी मालावर जास्तीचा कर लावण्याचे ट्रम्प यांचे निर्देश

चिनी मालावर जास्तीचा कर लावण्याचे ट्रम्प यांचे निर्देश

वृत्तसंस्था वॉशिंग्टन, १५ सप्टेंबर – अमेरिका आणि चीन या…

शेळ्या चारण्यासाठी गेलेल्या ३ भावंडाचा बंधाऱ्यात बुडून मृत्यू

शेळ्या चारण्यासाठी गेलेल्या ३ भावंडाचा बंधाऱ्यात बुडून मृत्यू

►मराठवाड्यातील उमरज येथील घटना, प्रतिनिधी कंधार, १७ सप्टेंबर –…

महाराष्ट्रात वेगाने भरणाऱ्या ट्रेन्स

महाराष्ट्रात वेगाने भरणाऱ्या ट्रेन्स

मुंबई, १८ सप्टेंबर – ट्रेनने दररोज २३ दशलक्षांहून अधिक…

विसर्जन मिरवणुकीत डीजे, डॉल्बीला परवानगी नाही

विसर्जन मिरवणुकीत डीजे, डॉल्बीला परवानगी नाही

►मुंबई उच्च न्यायालयाची तात्पुरती बंदी, मुंबई, १४ सप्टेंबर –…

रा.स्व.संघ : हिंदुबंधुत्वापासून विश्‍वबंधुत्वापर्यंत

रा.स्व.संघ : हिंदुबंधुत्वापासून विश्‍वबंधुत्वापर्यंत

॥ सारांश : ल.त्र्यं. जोशी | संघस्थापनेपासूनचा हा धावता…

साद समाजपुरुषाची!

साद समाजपुरुषाची!

॥ संवाद : सोमनाथ देशमाने | स्वातंत्र्यदिनाच्या दिवशी लाल…

गॉड आणि सैतान

गॉड आणि सैतान

॥ जागता पहारा : भाऊ तोरसेकर | कठुआ, उन्नाव…

मोरूच्या मावशीची ‘एक्झिट’

मोरूच्या मावशीची ‘एक्झिट’

मुंबईच्या गिरणगावाने अनेक कलाकार रंगभूमी आणि रुपेरी पडद्याला दिले,…

‘सिमरन’मधील नवीन गाणे प्रदर्शित

‘सिमरन’मधील नवीन गाणे प्रदर्शित

अभिनेत्री कंगना राणावत लवकरच सिमरन या चित्रपटाद्वारे प्रेक्षकांच्या भेटीला…

चिरंजीवीसोबत सिनेमा करण्यास ऐश्‍वर्याचा नकार?

चिरंजीवीसोबत सिनेमा करण्यास ऐश्‍वर्याचा नकार?

ऐश्‍वर्या राय बच्चनची सध्या बॉलीवूडमध्ये सेकंड इनिंग सुरू आहे.…

पंचांग
वार: | तिथी:
नक्षत्र: | राशी:
करण: | योग:
सूर्योदय: 06:15 | सूर्यास्त: 18:24
अयनांश:
Home » न्यायालय-गुन्हे, राष्ट्रीय » अनु. जाती/जमातीच्या उमेदवाराला दुसर्‍या राज्यात आरक्षण नाही

अनु. जाती/जमातीच्या उमेदवाराला दुसर्‍या राज्यात आरक्षण नाही

सर्वोच्च न्यायालयाचा निर्वाळा,
वृत्तसंस्था
नवी दिल्ली, ३० ऑगस्ट –

Supreme Court 2

Supreme Court 2

एका राज्यातील अनुसूचित जाती व जमातीचा उमेदवार दुसर्‍या राज्यात, जर त्याची जात तिथे अधिसूचित नसेल, तर आरक्षणाच्या लाभावर दावा करू शकत नाही, असा स्पष्ट निर्वाळा सर्वोच्च न्यायालयाने आज गुरुवारी दिला.
या समुदायातील एखादी व्यक्ती नोकरीच्या उद्देशाने आपले राज्य सोडून दुसर्‍या राज्यात जात असेल, तर ती व्यक्ती त्या राज्यात त्याच्या जातीला मिळणारे आरक्षणाचे फायदे मागू शकत नाही. कारण, त्या राज्यात त्याची जात अधिसूचित असेलच, असे मुळीच नाही, असे न्या. रंजन गोगोई, न्या. एन. व्ही. रमण, न्या. आर. बानुमती, न्या. एम. शंतनगौडा आणि न्या. एस. ए. नाझीर यांच्या पाच सदस्यीय घटनापीठाने आपल्या निकालात स्पष्ट केले.
माझ्या जातीला, मी जिथे राहात आहे, त्या राज्यात आरक्षणाचा फायदा मिळण्यासाठी अधिसूचित केले आहे, म्हणून दुसर्‍या राज्यातही मला तसेच फायदे मिळायला हवे, असे तो कसे काय सांगू शकतो? ज्या राज्यात तो नोकरीसाठी गेला आहे, तिथेही त्याच्या जातीला आरक्षणाच्या फायद्यासाठी अधिसूचित केले आहे काय, हे त्या व्यक्तीने आधी तपासायला हवे.
न्या. बानुमती यांची विरोधी भूमिका
या घटनापीठातील एक सदस्य असलेल्या न्या. बानुमती यांनी मात्र विरोधी भूमिका घेतली. केंद्र सरकारच्या अनु. जाती, जमातीसाठी असलेले धोरण केंद्रशासित प्रदेश असलेल्या दिल्लीबाबत लागू होईल, असे मत घटनापीठातील चार न्यायमूर्तींनी व्यक्त केले असताना, न्या. बानुमती यांनी मात्र विरोध दर्शविला.
या समुदायातील व्यक्ती दुसर्‍या अशा राज्यात जिथे त्याची जात आरक्षण फायद्याच्या यादीत अधिसूचित नाही, तिथे ती व्यक्ती आरक्षणावर दावा करू शकतो काय, तसेच अन्य राज्यातील या समाजाचे लोक राजधानी दिल्लीत आरक्षणाचा फायदा प्राप्त करू शकतात काय, असा महत्त्वाचा मुद्दा उपस्थित करणार्‍या अनेक याचिका न्यायालयात दाखल झाल्या आहेत. त्यावर घटनापीठात सुनावणी सुरू आहे.
पदोन्नतीतील आरक्षणावर निर्णय सुरक्षित
अनुसूचित जाती व जमातीतील उमेदवारांना पदोन्नतीत आरक्षणाचे फायदे देण्याच्या संदर्भात काही अटी लादण्याच्या २००६ मधील पाच सदस्यीय घटनापीठाच्या निकालावर, सात सदस्यीय घटनापीठातर्फे पुनर्विचार करण्यात यावा, अशी विनंती करणार्‍या याचिकांवरील निकाल सर्वोच्च न्यायालयाने आज सुरक्षित ठेवला.
पाच सदस्यीय घटनापीठाने २००६ मध्ये एम. नागराज प्रकरणात असा निकाल दिला होता की, अनु. जाती, जमातीतील उमेदवारांना पदोन्नतीत आरक्षणाचा फायदा देण्यापूर्वी या समाजाचा मागासलेपणा, सरकारी नोकर्‍यांमधील त्यांचे अपुरे प्रतिनिधित्व आणि त्यांच्या एकूणच प्रशासकीय कौशल्याबाबत सविस्तर माहिती राज्यांनी केंद्र सरकारकडे सादर करायला हवी.
या निर्णयाला केंद्रासोबतच विविध राज्यांनी आव्हान दिले आहे. अनु. जाती, जमातीतील लोक तसेही मागासवर्गीय म्हणूनच गणले जातात. ही जात म्हणजे त्यांच्यावर एक प्रकारचा ठपकाच असल्यामुळे त्यांना सरकारी नोकर्‍यांमध्ये पदोन्नतीत आरक्षण दिल्यास बर्‍याच प्रमाणात न्याय मिळू शकतो, असा युक्तिवादही केंद्र व राज्यांनी आपल्या आव्हान याचिकेत केला आहे. त्यांची भूमिका ऐकून घेतल्यानंतर सरन्यायाधीश दीपक मिश्रा यांच्या अध्यक्षतेखालील पाच सदस्यीय घटनापीठाने आपला निकाल सुरक्षित ठेवला.

Posted by : | on : Aug 31 2018
Filed under : न्यायालय-गुन्हे, राष्ट्रीय.
You can follow any responses to this entry through the RSS 2.0You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Change Language: press Ctrl+g

हवामान

दृष्टीक्षेपात

व्हिडीओ संग्रह

More in न्यायालय-गुन्हे, राष्ट्रीय (120 of 2043 articles)

Vernon Gonsalves Arun Ferreira Gautam Navlakha Sudha Bharadwaj Varavara Rao
►सर्वोच्च न्यायालयाचा हस्तक्षेप ►भीमा कोरेगाव दंगल व पंतप्रधान मोदी हत्या कट प्रकरण, वृत्तसंस्था नवी दिल्ली, २९ ऑगस्ट - [caption id="attachment_60842" ...

×