ads
ads
राफेल करारात घोटाळा नाहीच : सर्वोच्च न्यायालय

राफेल करारात घोटाळा नाहीच : सर्वोच्च न्यायालय

►राफेल करारावर सर्वोच्च शिक्कामोर्तब ►निर्णय प्रक्रियाही संशयातीत • ►सर्व…

खोटारड्यांचा पराभव झाला : जेटली

खोटारड्यांचा पराभव झाला : जेटली

नवी दिल्ली, १४ डिसेंबर – राफेलवरून सातत्याने खोटे बोलणार्‍या…

अमिताव घोष यांना ज्ञानपीठ पुरस्कार

अमिताव घोष यांना ज्ञानपीठ पुरस्कार

नवी दिल्ली, १४ डिसेंबर – साहित्य क्षेत्रातील सर्वोच्च मानला…

अनिवासी भारतीयांमुळे वाढला परकीय चलनाचा ओघ

अनिवासी भारतीयांमुळे वाढला परकीय चलनाचा ओघ

वॉशिंग्टन, १३ डिसेंबर – विदेशी चलन भारतात पाठविण्यामध्ये पुन्हा…

मध्यम पल्ल्याच्या क्षेपणास्त्र चाचणीबाबत इराणचा दुजोरा

मध्यम पल्ल्याच्या क्षेपणास्त्र चाचणीबाबत इराणचा दुजोरा

तेहरान, ११ डिसेंबर – पाश्‍चात्त्य देशांनी व्यक्त केलेल्या तीव्र…

अफगाणमधील शांततेसाठी भारताची भूमिका महत्त्वाची

अफगाणमधील शांततेसाठी भारताची भूमिका महत्त्वाची

►पाकची प्रथमच जाहीर कबुली, इस्लामाबाद, ११ डिसेंबर – अफगाणिस्तानात…

राज्यात जानेवारीमध्ये शिक्षक मेगाभरती

राज्यात जानेवारीमध्ये शिक्षक मेगाभरती

►सरकारी हालचालींना वेग, मुंबई, १३ डिसेंबर – राज्यात येत्या…

कोल्हापूरच्या अंबाबाईची मूर्ती बदला

कोल्हापूरच्या अंबाबाईची मूर्ती बदला

►भाविकांचे जिल्हाधिकार्‍यांना निवेदन, कोल्हापूर,१३ डिसेंबर – करवीर निवासिनी श्री…

राज्यात गृहनिर्माण विकास महामंडळाची स्थापना

राज्यात गृहनिर्माण विकास महामंडळाची स्थापना

►३८४ शहरात १९.४० लाख घरकुलांचे निर्माण, मुंबई, १३ डिसेंबर…

हिंदूंनी कुठपर्यंत प्रतीक्षा करायची?

हिंदूंनी कुठपर्यंत प्रतीक्षा करायची?

॥ विशेष : आशुतोष अडोणी | श्रीरामजन्मभूमीवरील भव्य मंदिर…

काँग्रेसमुक्त भारत अंतीम टप्प्यात!

काँग्रेसमुक्त भारत अंतीम टप्प्यात!

॥ संवाद : सोमनाथ देशमाने | राहुल भोवती संशयाचे…

उथळ पाण्याचा खळखळाट

उथळ पाण्याचा खळखळाट

॥ जागता पहारा : भाऊ तोरसेकर | ही जागरुकता…

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

‘फोर्ब्स’ने नुकतीच सर्वाधिक कमाई करणार्‍या अभिनेत्यांच्या नावाची यादी जाहीर…

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

बॉलिवूडची बेबी डॉल म्हणजेच सनी लिओनीचे नाव इंटरनेटवर सर्वाधिक…

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

‘रेस- ३’ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये कमबॅक करणारा अभिनेता बॉबी देओल…

पंचांग
वार: | तिथी:
नक्षत्र: | राशी:
करण: | योग:
सूर्योदय: 06:51 | सूर्यास्त: 17:53
अयनांश:
Home » परराष्ट्र, राष्ट्रीय » अमेरिकेचा दबाव झुगारून भारत-रशिया शस्त्रास्त्र करार

अमेरिकेचा दबाव झुगारून भारत-रशिया शस्त्रास्त्र करार

►एस-४०० क्षेपणास्त्र यंत्रणा मिळणार,
नवी दिल्ली, ५ ऑक्टोबर –

Modi Putin India Russia Sign $5 Billion S 400 Deal

Modi Putin India Russia Sign $5 Billion S 400 Deal

देशाच्या सुरक्षा व्यवस्थेला प्राधान्य देत, अमेरिकेचा दबाव झुगारून लावत भारताने आज शुक्रवारी रशियासोबत जगातील सर्वांत अत्याधुनिक अशी एस-४०० क्षेपणास्त्र यंत्रणा खरेदी करण्याचा निर्णय घेतला. ५४३ कोटी डॉलर्स म्हणजे ४० हजार कोटी रुपयांच्या एस-४०० क्षेपणास्त्र यंत्रणा खरेदी करण्याच्या करारावर पंतप्रधान नरेंद्र मोदी तसेच भारताच्या दौर्‍यावर असलेले रशियाचे राष्ट्रपती ब्लादिमिर पुतिन यांनी आज स्वाक्षर्‍या केल्या. यासोबतच अंतराळ, अणुऊर्जा आणि रेल्वेसह अन्य ८ करारांवरही दोन्ही देशात स्वाक्षर्‍या करण्यात आल्या. यामुळे भारत व रशियातील मैत्रीच्या एका नव्या युगाला पुन्हा प्रारंभ झाला आहे.
हैदराबाद हाऊसमध्ये झालेल्या एका समारंभात एस-४०० क्षेपणास्त्र यंत्रणा खरेदी करण्याच्या करारावर स्वाक्षर्‍या झाल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि ब्लादिमिर पुतिन यांनी एक संयुक्त निवेदन जारी केले. संरक्षणमंत्री निर्मला सीतारामन्, तसेच रशियाचे संरक्षण मंत्री यावेळी उपस्थित होते. भारताने रशियासोबतच्या आपल्या संबंधांना नेहमीच प्राधान्य दिले आहे, त्याचप्रमाणे रशियाचेही भारताच्या प्रगतीत नेहमीच योगदान राहिले आहे, असा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या निवेदनात म्हटले म्हटले. दहशतवादाविरुद्ध दोन्ही देशांचा संघर्षही सुरूच राहील, असा निर्वाळा मोदी यांनी दिला. अफगाणिस्तान, प्रशांत महासागर, जलवायु परिवर्तन त्याचप्रमाणे एससीओ, जी-२०, ब्रिक्स आणि आसियान या संघटनाबाबतही आमच्यात मनमोकळी चर्चा झाली, असे मोदी म्हणाले. या संघटनांना दोन्ही देशांचे सहकार्य नियमितपणे मिळेल, असे मोदी म्हणाले.
मला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पुढच्या व्लादिवोस्तोक फोरममध्ये प्रमुख पाहुणे पुन्हा एक़दा आमंत्रित करण्यात अतिशय आनंद होत आहे, असे रशियाचे राष्ट्रपती ब्लादिमिर पुतिन यांनी म्हटले आहे. सीरियामधील ताज्या परिस्थितीबाबत मी पंतप्रधान मोदी यांना माहिती दिली आहे, त्याचप्रमाणे इराणसोबत केलेल्या कराराला अमेरिकेने केलेल्या विरोधानंतर उद्भवलेल्या परिस्थितीबाबतही आमची चर्चा झाली आहे, असे पुतिन यांनी म्हटले.
२०१४ मध्ये चीनने रशियाकडूनच ही एस-४०० क्षेपणास्त्र प्रणाली विकत घेतली होती. त्यावेळी चीन आणि रशिया यांच्यात सरकारी पातळीवर असा करार झाला होता. रशियाने चीनला एस-४०० क्षेपणास्त्र पुरवलीही आहेत. मात्र त्यांची संख्या समजू शकली नाही. त्यानंतर रशियाने भारतालाच ही क्षेपणास्त्र यंत्रणा दिली आहे.
४ हजार किमीच्या भारत-चीन सीमेच्या सुरक्षेच्या दृष्टीने लांबपयर्र्त मारा करण्याची क्षमता असलेली एस-४०० क्षेपणास्त्र यंत्रणा भारतासाठी अतिशय आवश्यक होती. रशियाकडून कोणतीही संरक्षणसामग्री खरेदी करू नये, असे निर्बंध अमेरिकेने आपल्या सहकारी आणि मित्रदेशांवर घातले होते. यानंतरही कोणी रशियाकडून संरक्षण सामग्रीची खरेदी केली तर त्या देशावर काऊंटरिंग अमेरिकाज एडवर्सरीज थ्रू सॅक्शन अ‍ॅक्ट (सीएसएसटीएसए) अंतर्गत बंदी घालण्याचा इशाराही अमेरिकेने दिला होता. मात्र पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अमेरिकेचा दबाव झुगारून रशियासोबत क्षेपणास्त्र यंत्रणा खरेदी करण्याचा निर्णय घेत देशाची सुरक्षा व्यवस्था आपल्यासाठी सर्वतोपरी असल्याचा निर्वाळा दिला. रशियासोबतच्या करारामुळे अमेरिका भारतावर पुन्हा एकदा निर्बंध घालण्याची शक्यता नाकारता येत नाही.
असे आहेत आठ करार
एस-४०० क्षेपणास्त्र प्रणाली खरेदीचा करार
गगनयान मानवी मोहिमेत सहकार्याचा करार
अणुऊर्जा, रेल्वे आणि अंतराळ सहकार्य करार
दहशतवादविरोधी लढ्यात सहकार्य
करारानंतर ट्रम्प यांचे घूमजाव
वॉशिंग्टन – भारत आणि रशियादरम्यान आज शुक्रवारी झालेल्या एस-४०० या कराराला काही दिवसांपूर्वी विरोध करणार्‍या अमेरिकेने आता मवाळ भूमिका घेतली आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी घूमजाव करीत, रशियाच्या आडमुठ्या भूमिकेला पायबंद घालण्यासाठी, तसेच रशियातील संरक्षण क्षेत्रातील पैशांचा प्रवाह रोखण्यासाठी प्रतिबंध लादण्यात आला होता. मित्र देश आणि भागीदारांच्या सैन्य क्षमतेचे नुकसान करण्याचा उद्देश यामागे नव्हता. आमचे कोणतेही प्रतिबंध पूर्वग्रहदूषित नसतात, असे स्पष्ट केले आहे.
गेल्या काही दिवसांपासून अमेरिका मित्र देशांना रशियाकडून शस्त्रास्त्र खरेदी केल्यास बंदी घालण्याची धमकी देत आहे. तरीही भारत आणि रशियाने एस-४०० क्षेपणास्त्र प्रणाली खरेदीच्या करारावर स्वाक्षरी केल्यानंतर अमेरिकेने स्वतःच्या भूमिकेत बदल केला. भारताने रशियासोबत हा करार केल्यास अमेरिका नाराज होईल, अशी चर्चा काही दिवसांपूर्वी होती. अमेरिका शस्त्रास्त्र बंदीच्या कायद्याचा वापर करून रशियाकडून इतर देशांना शस्त्रास्त्र खरेदी करण्यावर बंदी घालू शकते, असेही सांगितले जात होते. उलट अमेरिकेच्या स्वतःच्या भूमिकेवरून घूमजाव केले.

Posted by : | on : 6 Oct 2018
Filed under : परराष्ट्र, राष्ट्रीय.
You can follow any responses to this entry through the RSS 2.0You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Change Language: press Ctrl+g

    छायाचित्रातून

  • भारताचा ऑस्ट्रेलियात विक्रमी विजय भारताचा ऑस्ट्रेलियात विक्रमी विजय
  • पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक
  • कोहली, मीराबाईला खेलरत्न कोहली, मीराबाईला खेलरत्न
  • अमित पांघळला बॉक्सिंगचे सुवर्ण अमित पांघळला बॉक्सिंगचे सुवर्ण
  • तेजिंदरपालला सुवर्णपदक तेजिंदरपालला सुवर्णपदक

हवामान

दृष्टीक्षेपात

व्हिडीओ संग्रह

More in परराष्ट्र, राष्ट्रीय (325 of 1901 articles)

Mahant Nrutyagopal Das
काळात बनणार नाही तर केव्हा? ►साधुसंताच्या उच्चाधिकार समितीची एकमुखी मागणी ►राष्ट्रपतींना दिले निवेदन, नवी दिल्ली, ५ ऑक्टोबर - अयोध्येतील रामजन्मभूमीवर ...

×