ads
ads
स्वच्छता मोहिमेमुळे भारत सुंदर दिसतो

स्वच्छता मोहिमेमुळे भारत सुंदर दिसतो

►प्रख्यात लेखक रस्किन बॉण्ड यांचे प्रतिपादन, रांची, ९ डिसेंबर…

भाजपा आणि देशाला मोदींशिवाय पर्याय नाही : उमा भारती

भाजपा आणि देशाला मोदींशिवाय पर्याय नाही : उमा भारती

नवी दिल्ली, ९ डिसेंबर – भाजपा आणि देशात पंतप्रधान…

वढेरांची विदेशातही संपत्ती; ईडीला आढळले पुरावे

वढेरांची विदेशातही संपत्ती; ईडीला आढळले पुरावे

►काँग्रेसला जोरदार दणका, नवी दिल्ली, ८ डिसेंबर – काँग्रेसच्या…

भारत-चीनमध्ये उद्यापासून संयुक्त युद्धाभ्यास

भारत-चीनमध्ये उद्यापासून संयुक्त युद्धाभ्यास

बीजिंग, ९ डिसेंबर – परस्पर विश्‍वासास चालना देतानाच दहशतवादविरोधी…

फ्रान्समधील आंदोलन पॅरिस हवामान कराराचीच परिणती

फ्रान्समधील आंदोलन पॅरिस हवामान कराराचीच परिणती

►डोनाल्ड ट्रम्प यांचा हल्ला, वॉशिंग्टन, ९ डिसेंबर – अमेरिकेचे…

भारत, अमेरिका संरक्षण क्षेत्रात जागतिक भागीदार

भारत, अमेरिका संरक्षण क्षेत्रात जागतिक भागीदार

►निर्मला सीतारामन यांच्या पाच दिवसांच्या दौर्‍याची सांगता, वॉशिंग्टन, ८…

दुष्काळ निवारणासाठी आठ हजार कोटी हवे

दुष्काळ निवारणासाठी आठ हजार कोटी हवे

►मुख्यमंत्री फडणवीस यांची केंद्राकडे मागणी, नवी दिल्ली, ७ डिसेंबर…

भाजपा-सेनेत ‘मिले सूर मेरा तुम्हारा’

भाजपा-सेनेत ‘मिले सूर मेरा तुम्हारा’

►मुख्यमंत्र्यांचा उद्धव ठाकरे यांच्या गाडीतून प्रवास •►दोन्ही नेत्यांचे नगारा…

मराठा आरक्षण कायद्याला स्थगिती नाही : उच्च न्यायालय

मराठा आरक्षण कायद्याला स्थगिती नाही : उच्च न्यायालय

►पुढील सुनावणी १० डिसेंबरला, मुंबई, ५ डिसेंबर – राज्यपालांच्या…

हिंदूंनी कुठपर्यंत प्रतीक्षा करायची?

हिंदूंनी कुठपर्यंत प्रतीक्षा करायची?

॥ विशेष : आशुतोष अडोणी | श्रीरामजन्मभूमीवरील भव्य मंदिर…

काँग्रेसमुक्त भारत अंतीम टप्प्यात!

काँग्रेसमुक्त भारत अंतीम टप्प्यात!

॥ संवाद : सोमनाथ देशमाने | राहुल भोवती संशयाचे…

उथळ पाण्याचा खळखळाट

उथळ पाण्याचा खळखळाट

॥ जागता पहारा : भाऊ तोरसेकर | ही जागरुकता…

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

‘फोर्ब्स’ने नुकतीच सर्वाधिक कमाई करणार्‍या अभिनेत्यांच्या नावाची यादी जाहीर…

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

बॉलिवूडची बेबी डॉल म्हणजेच सनी लिओनीचे नाव इंटरनेटवर सर्वाधिक…

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

‘रेस- ३’ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये कमबॅक करणारा अभिनेता बॉबी देओल…

पंचांग
वार: | तिथी:
नक्षत्र: | राशी:
करण: | योग:
सूर्योदय: 06:48 | सूर्यास्त: 17:51
अयनांश:
Home » अर्थ, राष्ट्रीय » अर्थसंकल्प गरीब व शेतकर्‍यांना समर्पित

अर्थसंकल्प गरीब व शेतकर्‍यांना समर्पित

►अर्थमंत्री जेटली यांचे प्रतिपादन,
नवी दिल्ली, ४ फेब्रुवारी –
यंदाचा अर्थसंकल्प हा देशभरातील गरीब व्यक्ती आणि कृषीप्रधान भारताचा कणा असलेल्या शेतकर्‍यांना समर्पित करण्यात आला आहे, असे प्रतिपादन केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी आज रविवारी केले.
एका मराठी वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत जेटली बोलत होते. आपल्या सरकारने मागील चार अर्थसंकल्पातून मध्यमवर्गियांना बरेच काही दिले आहे. त्यामुळे आता गरीब आणि शेतकर्‍यांचा विचार करण्यात आला. मध्यमवर्गियांनी देशाच्या विकासात योगदान देण्याची गरज आहे. तसेच कर प्रणालीत शिस्त निर्माण होणे आवश्यक आहे, असे जेटली म्हणाले.
जितकी कमाई आहे, तेवढाच खर्च अर्थसंकल्पात करता येतो. कायम कर्ज घेत राहिले आणि देशाचा कारभार कर्जावर चालवला, तर आपली आगामी पिढी कर्जात बुडेल. जास्त कर्जाचा आर्थिक स्थितीवर परिणाम होतो. आपल्याकडे साधन असले तर गरिबी कमी करता येते आणि राष्ट्रीय सुरक्षाही मजबूत करता येते, असे जेटली यांनी स्पष्ट केले.
आपल्या सरकारने अर्थसंकल्पात खरीप पिकाच्या लागवडीपूर्वी शेतकर्‍यांना हमीभावात दीडपट वाढ जाहीर केली, पण ती पुरेशी नाही. यात आणखी वाढ होणार आहे. देशातील आर्थिक विषमता कमी करायची असेल, तर त्याची सुरुवात शेतकर्‍यांपासून करावी लागेल. शेतकर्‍यांचं उत्पन्न वाढवणे, हे त्यातील एक मोठे पाऊल आहे, असे ते म्हणाले.
आतापर्यंत सादर करण्यात आलेल्या अर्थसंकल्पात मध्यमवर्गियांना दिलासा दिलेला आहे. यावेळीही तीन फायदेशीर गोष्टी जाहीर केल्या. वेतनधारकांना ८ हजार कोटी व पेन्शनधारकांना ४ हजार कोटी दिले. सोबतच, जगातील सर्वात मोठी आरोग्य योजना जाहीर केली, याकडे जेटली यांनी लक्ष वेधले.
गरिबांसाठी योगदान द्या
शिक्षण आणि आरोग्य क्षेत्रात एक टक्का अधिभार वाढविण्यात आला. देशातील गरिबी दूर करायची असेल, तर वेतनधारकांना त्यात योगदान द्यावेच लागेल. गरिबांना आरोग्याच्या सुविधा द्यायच्या असेल तर मध्यमवर्गीय त्यात आपले योगदान देणार नाही का, गरिबांवर यातून आपण उपकार करीत नाही, ती आपली जबाबदारीच आहे, असे जेटली यांनी सांगितले.
मी अर्थमंत्रिपदाची सूत्रे हाती घेतली, तेव्हा आयकर सवलतीची मर्यादा दोन लाख रुपये होती. पहिल्याच अर्थसंकल्पात ती अडीच लाख करण्यात आली. ईटीसीची मर्यादा एक लाख रुपये होती, ती दीड लाख केली. गृहकर्जाची मर्यादा दीड लाखावरून दोन लाख केली. पहिल्याच वर्षात तीन महत्त्वाची कामे केली. दुसर्‍या वर्षात छोट्या करदात्यांसाठीची मर्यादा तीन लाखापर्यंत वाढवली, याकडे जेटली यांनी लक्ष वेधले.
एक टक्का अधिभार कशासाठी?
सामाजिक कामांसाठी अधिभार लावण्यात आला आहे. यातून ११ हजार कोटी रुपये येतील, ते ४० टक्के गरीब कुटुंबांच्या आरोग्यासाठी खर्च केले जातील. एक व्यक्ती दहा हजार रुपयांवर एक हजार रुपये कर देत असेल, तर त्याला यावर १०० रुपये अधिभार द्यावा लागेल. या १०० रुपयांत देशातील ४० टक्के गरिबांच्या आरोग्याची काळजी घेता येत असेल तर यात वाईट काय? असा सवाल जेटली यांनी केला.

Posted by : | on : 5 Feb 2018
Filed under : अर्थ, राष्ट्रीय.
You can follow any responses to this entry through the RSS 2.0You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Change Language: press Ctrl+g

    छायाचित्रातून

  • पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक
  • कोहली, मीराबाईला खेलरत्न कोहली, मीराबाईला खेलरत्न
  • अमित पांघळला बॉक्सिंगचे सुवर्ण अमित पांघळला बॉक्सिंगचे सुवर्ण
  • तेजिंदरपालला सुवर्णपदक तेजिंदरपालला सुवर्णपदक
  • महाराष्ट्राच्या राहीचा सुवर्णभेद महाराष्ट्राच्या राहीचा सुवर्णभेद

हवामान

दृष्टीक्षेपात

व्हिडीओ संग्रह

More in अर्थ, राष्ट्रीय (1455 of 1864 articles)


निश्‍चित केली जागा, बंगळुरू, ४ फेब्रुवारी - याचवर्षी साकार होण्याच्या स्थितीत असलेल्या आपल्या चांद्रयान-२ मोहिमेसाठी भारतीय अंतराळ संशोधन संस्थेने हे ...

×