ads
ads
राफेल करारात घोटाळा नाहीच : सर्वोच्च न्यायालय

राफेल करारात घोटाळा नाहीच : सर्वोच्च न्यायालय

►राफेल करारावर सर्वोच्च शिक्कामोर्तब ►निर्णय प्रक्रियाही संशयातीत • ►सर्व…

खोटारड्यांचा पराभव झाला : जेटली

खोटारड्यांचा पराभव झाला : जेटली

नवी दिल्ली, १४ डिसेंबर – राफेलवरून सातत्याने खोटे बोलणार्‍या…

अमिताव घोष यांना ज्ञानपीठ पुरस्कार

अमिताव घोष यांना ज्ञानपीठ पुरस्कार

नवी दिल्ली, १४ डिसेंबर – साहित्य क्षेत्रातील सर्वोच्च मानला…

अनिवासी भारतीयांमुळे वाढला परकीय चलनाचा ओघ

अनिवासी भारतीयांमुळे वाढला परकीय चलनाचा ओघ

वॉशिंग्टन, १३ डिसेंबर – विदेशी चलन भारतात पाठविण्यामध्ये पुन्हा…

मध्यम पल्ल्याच्या क्षेपणास्त्र चाचणीबाबत इराणचा दुजोरा

मध्यम पल्ल्याच्या क्षेपणास्त्र चाचणीबाबत इराणचा दुजोरा

तेहरान, ११ डिसेंबर – पाश्‍चात्त्य देशांनी व्यक्त केलेल्या तीव्र…

अफगाणमधील शांततेसाठी भारताची भूमिका महत्त्वाची

अफगाणमधील शांततेसाठी भारताची भूमिका महत्त्वाची

►पाकची प्रथमच जाहीर कबुली, इस्लामाबाद, ११ डिसेंबर – अफगाणिस्तानात…

राज्यात जानेवारीमध्ये शिक्षक मेगाभरती

राज्यात जानेवारीमध्ये शिक्षक मेगाभरती

►सरकारी हालचालींना वेग, मुंबई, १३ डिसेंबर – राज्यात येत्या…

कोल्हापूरच्या अंबाबाईची मूर्ती बदला

कोल्हापूरच्या अंबाबाईची मूर्ती बदला

►भाविकांचे जिल्हाधिकार्‍यांना निवेदन, कोल्हापूर,१३ डिसेंबर – करवीर निवासिनी श्री…

राज्यात गृहनिर्माण विकास महामंडळाची स्थापना

राज्यात गृहनिर्माण विकास महामंडळाची स्थापना

►३८४ शहरात १९.४० लाख घरकुलांचे निर्माण, मुंबई, १३ डिसेंबर…

हिंदूंनी कुठपर्यंत प्रतीक्षा करायची?

हिंदूंनी कुठपर्यंत प्रतीक्षा करायची?

॥ विशेष : आशुतोष अडोणी | श्रीरामजन्मभूमीवरील भव्य मंदिर…

काँग्रेसमुक्त भारत अंतीम टप्प्यात!

काँग्रेसमुक्त भारत अंतीम टप्प्यात!

॥ संवाद : सोमनाथ देशमाने | राहुल भोवती संशयाचे…

उथळ पाण्याचा खळखळाट

उथळ पाण्याचा खळखळाट

॥ जागता पहारा : भाऊ तोरसेकर | ही जागरुकता…

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

‘फोर्ब्स’ने नुकतीच सर्वाधिक कमाई करणार्‍या अभिनेत्यांच्या नावाची यादी जाहीर…

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

बॉलिवूडची बेबी डॉल म्हणजेच सनी लिओनीचे नाव इंटरनेटवर सर्वाधिक…

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

‘रेस- ३’ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये कमबॅक करणारा अभिनेता बॉबी देओल…

पंचांग
वार: | तिथी:
नक्षत्र: | राशी:
करण: | योग:
सूर्योदय: 06:51 | सूर्यास्त: 17:53
अयनांश:
Home » नागरी, राष्ट्रीय » अविरल, निर्मल गंगेसाठी कायदा करणार

अविरल, निर्मल गंगेसाठी कायदा करणार

►उमा भारती यांची घोषणा
►गंगाकिनारी लवकरच महास्वच्छता अभियान,
नवी दिल्ली, ४ ऑक्टोबर –

Umabharti

Umabharti

अविरल आणि निर्मल गंगेबाबत कायदा करण्यासाठी सरकार संसदेच्या हिवाळी अधिवेशनात विधेयक आणणार असल्याची घोषणा केंद्रीय स्वच्छता आणि पाणीपुरवठा मंत्री उमा भारती यांनी आज केली. गंगेच्या स्वच्छतेसाठी लवकरच गंगेच्या किनार्‍यावर महास्वच्छता अभियान राबवण्यात येणार असल्याचे उमा भारती यांनी सांगितले.
गंगा स्वच्छता मंचतर्फे डॉ. बाबासाहेब आंबेडकर इंटरनॅशनल सेंटरमध्ये आयोजित एका कार्यक्रमात उमा भारती बोलत होत्या. यावेळी गंगा स्वच्छता मंचचे राष्ट्रीय संयोजक संजय चतुर्वेदी आणि गंगा विचार मंचचे राष्ट्रीय संयोजक भरत पाठक उपस्थित होते. अविरल आणि निर्मल गंगेसाठी कायदा करण्याच्या दृष्टीने सरकारने पावले उचलली असून यासंदर्भातील विधेयकाला लवकरच केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत मान्यता दिली जाईल, असे स्पष्ट करत उमा भारती म्हणाल्या की, त्यानंतर हे विधेयक संसदेच्या हिवाळी अधिवेशनात मांडले जाईल. हे विधेयक एकमताने पारित करण्यासाठी विविध राजकीय पक्षांनी आम्हाला सहकार्याचे आश्‍वासन दिले आहे. त्यामुळे हे विधेयक एकमताने पारित होईल, असा आमचा विश्‍वास आहे.
गंगा नदीच्या स्वच्छतेसाठी कायदा बनवावा, या मागणीसाठी मला गुरूसमान असलेले जी. डी. अग्रवाल उपोषणाला बसले होते, त्यावेळी माझ्या मंत्रालयाच्या अधिकारात नसतांनाही जलसंसाधन, नदी विकास आणि गंगा संरक्षण मंत्री नितीन गडकरी यांची अनुमती घेऊन मी त्यांची भेट घेतली होती आणि असा कायदा बनवण्याचे आश्‍वासन त्यांना दिले होते, असे उमा भारती यांनी सांगितले. गंगेच्या स्वच्छतेबाबत नितीन गडकरी आणि माझ्या मंत्रालयात चांगला समन्वय आहे, त्यामुळे मार्च २०१९ पर्यंत गंगा स्वच्छ झालेली तुम्हाला दिसेल, असे त्या म्हणाल्या.
नुसता कायदा करून काही साध्य होणार नसले तरी कायद्याला सामाजिक चेतनेची जोड मिळाली तर बरेच काही साध्य होऊ शकते. कोणत्याही कायद्याचा अनुकूल परिणाम त्याला जनतेची साथ मिळाल्यावरच दिसत असतो. नव्या कायद्यात हिमालय, गंगेच्या उपनद्या, गंगेच्या किनार्‍यावरील शहरे आणि उद्योग यांचा तसेच गंगेला प्रदूषित करण्यात कोणाचा किती सहभाग आहे, याचा बारकाईने विचार करण्यात आला आहे. त्यानुसारच प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यात आली आहे, असे त्या म्हणाल्या.
नितीन गडकरींच्या जलसंसाधन नदी विकास तसेच गंगा संरक्षण मंत्रालयाच्या सहकार्याने गंगा नदीच्या किनार्‍यावरील गावात लवकरच महास्वच्छता अभियान राबवण्यात येणार असल्याचे उमा भारती यांनी सांगितले. खुल्यावरील शौच बंद झाल्यामुळे गंगा नदीच्या स्वच्छतेचा मार्ग मोकळा झाला असे नाही, कारण गंगा नदीला प्रदूषित करण्याची एक नाही तर अनेक कारणे आहे. या सगळ्या कारणांच्या मुळाशी आपल्याला जावे लागणार आहे, असे त्या म्हणाल्या.
गंगा नदीच्या स्वच्छतेसाठी पंतप्रधान मोदी यांनी २० हजार कोटींचा निधी दिला आहे, याकडे लक्ष वेधत उमा भारती म्हणाल्या की, फक्त निधी खर्च झाला म्हणजे गंगा स्वच्छ झाली असे नाही, तर खर्च केलेल्या निधीचा परिणाम जमिनीवर दिसला पाहिजे. गंगेचे पाणी पिता येईल, अशी गंगा आम्हाला तयार करायची आहे.

Posted by : | on : 5 Oct 2018
Filed under : नागरी, राष्ट्रीय.
You can follow any responses to this entry through the RSS 2.0You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Change Language: press Ctrl+g

    छायाचित्रातून

  • भारताचा ऑस्ट्रेलियात विक्रमी विजय भारताचा ऑस्ट्रेलियात विक्रमी विजय
  • पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक
  • कोहली, मीराबाईला खेलरत्न कोहली, मीराबाईला खेलरत्न
  • अमित पांघळला बॉक्सिंगचे सुवर्ण अमित पांघळला बॉक्सिंगचे सुवर्ण
  • तेजिंदरपालला सुवर्णपदक तेजिंदरपालला सुवर्णपदक

हवामान

दृष्टीक्षेपात

व्हिडीओ संग्रह

More in नागरी, राष्ट्रीय (334 of 1901 articles)


अवमूल्यनाचा परिणाम, मुंबई, ४ ऑक्टोबर - रुपयाचे विक्रमी अवमूल्यन आणि जागतिक बाजारात कच्च्या तेलाच्या किमतीत झालेली मोठी वाढ यामुळे शेअर ...

×