ads
ads
जेकेएलएफवर बंदी

जेकेएलएफवर बंदी

•फुटीरतावाद्यांवर मोदी सरकारचा आणखी एक वार, नवी दिल्ली, २२…

नरेंद्र मोदी वाराणसी, गांधीनगरहून अमित शाह उमेदवार

नरेंद्र मोदी वाराणसी, गांधीनगरहून अमित शाह उमेदवार

•राजनाथसिंह लखनौ •नितीन गडकरी नागपुरातून लढणार •भाजपाच्या १८४ उमेदवारांची…

विक्रमी मतांनी निवडून येईल : गडकरी

विक्रमी मतांनी निवडून येईल : गडकरी

नवी दिल्ली, २२ मार्च – आगामी लोकसभा निवडणुकीत मी…

भारतावर पुन्हा हल्ला केला तर महागात पडेल

भारतावर पुन्हा हल्ला केला तर महागात पडेल

•अमेरिकेचा पाकिस्तानला इशारा, वॉशिंग्टन, २२ मार्च – पुलवामा हल्ला…

सहा महिन्यांत नीरवचे प्रत्यार्पण

सहा महिन्यांत नीरवचे प्रत्यार्पण

•भारतीय तपास यंत्रणांना विश्‍वास, लंडन, २२ मार्च – पंजाब…

नीरवला अटक; मोदी सरकारच्या प्रयत्नांना यश

नीरवला अटक; मोदी सरकारच्या प्रयत्नांना यश

•स्कॉटलंड यार्डची कारवाई, लंडन, २० मार्च – पंजाब नॅशनल…

रणजितसिंह मोहिते पाटील भाजपात

रणजितसिंह मोहिते पाटील भाजपात

•रणाआधीच भाजपाची जीत, मुंबई, २० मार्च – सोलापूर जिल्ह्यातील…

दाऊद शरण यायला तयार होता, पवारांनी दुर्लक्ष केले

दाऊद शरण यायला तयार होता, पवारांनी दुर्लक्ष केले

•प्रकाश आंबेडकरांचा गंभीर आरोप, मुंबई, १९ मार्च – कुख्यात…

शेतकर्‍यांना सर्वाधिक मदत युती सरकारच्या काळात

शेतकर्‍यांना सर्वाधिक मदत युती सरकारच्या काळात

•मुख्यमंत्री फडणवीस यांची स्पष्टोक्ती, औरंगाबाद, १७ मार्च – काँगे्रसप्रणित…

१७ व्या लोकसभेचा महाकुंभ!

१७ व्या लोकसभेचा महाकुंभ!

॥ विशेष : सुधीर पाठक | १७ व्या लोकसभेसाठीचा…

निवडणुकीपूर्वीच महागठबंधनाचा बँडबाजा

निवडणुकीपूर्वीच महागठबंधनाचा बँडबाजा

॥ सारांश : ल.त्र्यं. जोशी | महागठबंधन याचा अर्थच…

जबरदस्त तडाखा कसा द्यायचा आम्ही जाणतो!

जबरदस्त तडाखा कसा द्यायचा आम्ही जाणतो!

॥ रोखठोक : हितेश शंकर | पुलवामातील दहशतवादी हल्ल्यात…

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

‘फोर्ब्स’ने नुकतीच सर्वाधिक कमाई करणार्‍या अभिनेत्यांच्या नावाची यादी जाहीर…

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

बॉलिवूडची बेबी डॉल म्हणजेच सनी लिओनीचे नाव इंटरनेटवर सर्वाधिक…

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

‘रेस- ३’ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये कमबॅक करणारा अभिनेता बॉबी देओल…

पंचांग
वार: | तिथी:
नक्षत्र: | राशी:
करण: | योग:
सूर्योदय: 06:28 | सूर्यास्त: 18:36
अयनांश:
Home » नागरी, राष्ट्रीय » आंतरराष्ट्रीय कारणांमुळे इंधनाच्या किमतीत वाढ

आंतरराष्ट्रीय कारणांमुळे इंधनाच्या किमतीत वाढ

►रविशंकरप्रसाद यांचा खुलासा
►सरकारच्या धोरणाशी दरवाढीचा संबंध नाही,
तभा वृत्तसेवा
नवी दिल्ली, १० सप्टेंबर –

Ravishankar Prasad

Ravishankar Prasad

आंतरराष्ट्रीय कारणांमुळे पेट्रोल आणि डीझेलच्या किमती वाढत आहेत, त्याचा सरकारच्या धोरणांशी काहीच संबंध नाही, असा खुलासा केंद्रीय विधि आणि न्याय तसेच माहिती तंत्रज्ञान मंत्री रविशंकर प्रसाद यांनी आज सोमवारी केला. काँग्रेसच्या नेतृत्वातील विरोधी पक्षांच्या भारत बंदला जनतेने नाकारल्याचा दावाही प्रसाद यांनी केला.
भाजपा मुख्यालयात आयोजित पत्रपरिषदेत रविशंकर प्रसाद म्हणाले की, भारत बंदचा फज्जा उडाल्यामुळे काँग्रेस आणि अन्य पक्ष हिंसाचारावर उतरले आहे. आपले राजकारण आता हे पक्ष हिंसाचाराच्या भरोशावरच करणार का, अशी विचारणाही त्यांनी केली. बंदमध्ये हिंसाचाराला प्रोत्साहन दिल्याबद्दल काँग्रेस आणि अन्य विरोधी पक्षांवर हल्ला चढवताना प्रसाद म्हणाले की, लोकशाहीत विरोध करण्याचा विरोधकांना अधिकार आहे, मात्र त्यासाठी हिंसाचाराचा मार्ग निवडणे चुकीचे आहे.
बंददरम्यान बिहारमधील जेहानाबाद येथे एक रुग्णवाहिका काँग्रेस आणि अन्य विरोधी पक्षांच्या कार्यकत्यार्र्नी अडवली, त्यामुळे एका बालिकेचा मृत्यू झाला, या बालिकेच्या मृत्युला जबाबदार कोण, याचे उत्तर काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी दिले पाहिजे.
हिंंसाचाराचे हे तांडव आणि मृत्यूचा खेळ बंद झाला पाहिजे, असे आवाहन करत प्रसाद म्हणाले की, पेट्रोल आणि डीझेलच्या वाढत्या किमतीमुळे जनतेला थोडा त्रास होत असल्याची जाणीव आम्हाला आहे, त्यामुळे या समस्येतून मार्ग काढण्याचा प्रयत्न आम्ही करत आहे. मात्र विरोधकांचा हा बंद जनतेला मान्य नाही.
आंतरराष्ट्रीय बाजारातील परिस्थितीमुळे पेट्रोल आणि डीझेलच्या किमती वाढत आहेत, सरकारच्या धोरणाशी त्याचा काहीच संबंध नाही. पेट्रोल आणि डीझेलच्या किमती केंद्र सरकार ठरवत नाही. ते आपल्याला आयात करावे लागते. तेलउत्पादक राष्ट्रांच्या ओपेक या संघटनेने तेलाचे उत्पादन कमी करण्याचे बंधन आपल्या सदस्य देशांवर घातले आहे, त्याचबरोबर इराणवर अमेरिकेने घातलेल्या निर्बधांमुळे आंतरराष्ट्रीय बाजारात तेलाचे उत्पादन कमी होत आहे, त्याचा परिणाम भारतातील पेट्रोल आणि डीझेलच्या आयातीवर झाला, परिणामी किमती वाढल्या आहेत, असे ते म्हणाले.
पेट्रोल, डीझेलच्या किमतीत होणार्‍या वाढीशी केंद्राचा काहीच संबंध नाही, हे जनतेला समजले आहे, त्यामुळे विरोधी पक्षांच्या बंदपासून जनतेने आपल्याला बाजूला ठेवले आहे. या मुद्यावर जनतेला वस्तुस्थिती समजून सांगण्याचा आमचा हा प्रयत्न आहे. या मुद्यावर सार्थक चर्चा होण्याची आवश्यकता व्यक्त करत प्रसाद म्हणाले की, आमचे सरकार हे एका कुटुंबाचे सरकार नाही, तर देशातील गोरगरिबांच्या कल्याणाचा विचार करणारे सरकार आहे, असे त्यांनी सांगितले.
देशातील महागाई कमी करण्यात केंद्र सरकार यशस्वी झाल्याचा दावा करताना प्रसाद म्हणाले की, २००९ ते १४ या काळात महागाईचा दर १०.४ टक्के होता, तो आता ४.७ टक्क्यावर आला आहे. जीएसटी आणि आयकरात सरकारने खूप सवलती दिल्या आहेत, महागाई कमी करण्यासाठी जे जे करणे आवश्यक होते, ते सर्व सरकारने केले आहे आणि त्याचा परिणामही दिसून येत आहे.
मनमोहनसिंग यांना चर्चेचे आव्हान
नोटबंदी आणि जीएसटीच्या मुद्यावर संसदेत चर्चा करण्याचे आव्हान रविशंकर प्रसाद यांनी माजी पंतप्रधान डॉ. मनमोहनसिंग यांना दिले. मनमोहनसिंग प्रसिद्ध अर्थतज्ज्ञ आहेत, तर मी भाजपाचा साधा कार्यकर्ता आहे. त्यामुळे नोटबंदी तसेच जीएसटीच्या मुद्यावर त्यांनी वस्तुस्थितीच्या आधारे माझ्याशी चर्चा करावी, असे माझे त्यांना खुले आव्हान आहे, असे प्रसाद म्हणाले.

Posted by : | on : 11 Sep 2018
Filed under : नागरी, राष्ट्रीय.
You can follow any responses to this entry through the RSS 2.0You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Change Language: press Ctrl+g

    छायाचित्रातून

  • भारताने ऑस्ट्रेलियात रचला इतिहास भारताने ऑस्ट्रेलियात रचला इतिहास
  • हार्दिक पंड्या, लोकेश राहुलला बीसीसीआयची नोटीस हार्दिक पंड्या, लोकेश राहुलला बीसीसीआयची नोटीस
  • भारताचा ऑस्ट्रेलियात विक्रमी विजय भारताचा ऑस्ट्रेलियात विक्रमी विजय
  • पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक
  • कोहली, मीराबाईला खेलरत्न कोहली, मीराबाईला खेलरत्न

हवामान

दृष्टीक्षेपात

व्हिडीओ संग्रह

More in नागरी, राष्ट्रीय (1035 of 2226 articles)

Delhi High Court
न्यायालयाने फेटाळली याचिका, वृत्तसंस्था नवी दिल्ली, १० सप्टेंबर - २०११-१२ या आर्थिक वर्षातील करआढावा प्रकरण पुन्हा सुरू करण्याच्या आयकर विभागाच्या ...

×