ads
ads
भक्तांची श्रद्धा चिरडू देणार नाही : अमित शाह

भक्तांची श्रद्धा चिरडू देणार नाही : अमित शाह

नवी दिल्ली, २० नोव्हेंबर – स्वामी अय्यप्पांच्या भक्तांशी केरळ…

हिजबुलच्या चार अतिरेक्यांचा खातमा

हिजबुलच्या चार अतिरेक्यांचा खातमा

►एक जवान शहीद, चार जखमी, श्रीनगर, २० नोव्हेंबर –…

नक्षल समर्थकांच्या पत्रातील ‘तो’ क्रमांक दिग्विजयसिंहांचाच

नक्षल समर्थकांच्या पत्रातील ‘तो’ क्रमांक दिग्विजयसिंहांचाच

►पुणे पोलिसांची पुष्टी, चौकशी होणार, पुणे, १९ नोव्हेंबर –…

काश्मीर पाकिस्तानचेच शाहिद आफ्रिदीची सारवासारव

काश्मीर पाकिस्तानचेच शाहिद आफ्रिदीची सारवासारव

इस्लामाबाद, १८ नोव्हेंबर – पाकिस्तानमधील राज्यकर्त्यांना देशाचा भाग असलेले…

अमेरिका भारताला देणार २४ पाणबुडीभेदी हेलिकॉप्टर्स

अमेरिका भारताला देणार २४ पाणबुडीभेदी हेलिकॉप्टर्स

►२०० अब्ज डॉलर्सचा व्यवहार, वॉशिंग्टन, १७ नोव्हेंबर – चीन…

मल्ल्यासाठी तिहारच योग्य

मल्ल्यासाठी तिहारच योग्य

►ब्रिटनच्या न्यायालयाचे शिक्कामोर्तब, लंडन, १७ नोव्हेंबर – सार्वजनिक आणि…

विधानसभा कामकाजास ‘वंदे मातरम’ने सुरुवात

विधानसभा कामकाजास ‘वंदे मातरम’ने सुरुवात

मुंबई, १९ नोव्हेंबर – महाराष्ट्र विधानसभेच्या हिवाळी अधिवेशनाच्या कामकाजास…

मराठा आरक्षणावर उद्या हायकोर्टात सुनावणी

मराठा आरक्षणावर उद्या हायकोर्टात सुनावणी

मुंबई, १९ नोव्हेंबर – मराठा आरक्षणाचा प्रश्‍न तातडीने निघाली…

मराठा समाजाला स्वतंत्र प्रवर्गात आरक्षण

मराठा समाजाला स्वतंत्र प्रवर्गात आरक्षण

►अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला मुख्यमंत्री फडणवीस यांची घोषणा ►मागासवर्ग आयोगाच्या तिन्ही…

तापमानवाढीचा धोका वाढतोय

तापमानवाढीचा धोका वाढतोय

॥ विशेष : अ‍ॅड. गिरीश राऊत | विकास पृथ्वीची…

अपनी अकल लगाओ!

अपनी अकल लगाओ!

॥ मानसरंग : मयुरेश डंके | गेटवे ऑफ इंडिया,…

राफेल सुनावणी : अर्धे नुकसान, अर्धा फायदा

राफेल सुनावणी : अर्धे नुकसान, अर्धा फायदा

॥ सारांश : ल.त्र्यं. जोशी | एक बाब मात्र…

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

‘फोर्ब्स’ने नुकतीच सर्वाधिक कमाई करणार्‍या अभिनेत्यांच्या नावाची यादी जाहीर…

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

बॉलिवूडची बेबी डॉल म्हणजेच सनी लिओनीचे नाव इंटरनेटवर सर्वाधिक…

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

‘रेस- ३’ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये कमबॅक करणारा अभिनेता बॉबी देओल…

पंचांग
वार: | तिथी:
नक्षत्र: | राशी:
करण: | योग:
सूर्योदय: 06:36 | सूर्यास्त: 17:48
अयनांश:
Home » नागरी, राष्ट्रीय » आघाडीसाठी काँग्रेसचा भारताबाहेरही प्रयत्न

आघाडीसाठी काँग्रेसचा भारताबाहेरही प्रयत्न

►पाकिस्तानसोबत आघाडी करण्यासाठी व्यापक मोहीम
►लहान पक्षांसमोरही हात पसरणे सुरू
►पंतप्रधान मोदी यांचा जबरदस्त हल्ला
►जितका चिखल फेकाल तितके कमळ उगवेल,
भोपाळ, २५ सप्टेंबर –

Modi Amit Shivraj Bhopal Rally

Modi Amit Shivraj Bhopal Rally

विकासावर चर्चा करण्यापेक्षा सरकारवर चिखलफेक करणे काँगे्रसला अधिक सोयीस्कर वाटत आहे. राफेल मुद्यावरून काँगे्रसचा थयथयाट याचेच प्रतीक आहे. १२५ वर्षे जुना असलेल्या काँग्रेसला आता भिंग घेऊन देशाच्या कानाकोपर्‍यात सहयोगी शोधावे लागत आहे. इतके दारुण पराभव होऊनही या पक्षाने काहीच धडा घेतला नाही. आता तर, सत्तेसाठी लहान-लहान पक्षांपुढे भीक मारण्याची वेळ काँगे्रसवर आलेली आहे. भाजपाचा पराभव करण्यासाठी काँग्रेसने भारताबाहेरही आघाडीचा शोध सुरू केला आहे, असा जबरदस्त हल्ला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज मंगळवारी येथे चढवला.
भारतीय जनसंघाचे सहसंस्थापक पं. दीनदयाल उपाध्याय यांच्या १०२ व्या जयंतीनिमित्त येथे भाजपाच्या ‘कार्यकर्ता महाकुंभा’चे आयोजन करण्यात आले. या महाकुंभाला संबोधित करताना पंतप्रधान मोदी यांनी काँगे्रस आणि या पक्षाचे अध्यक्ष राहुल गांधी यांचा अतिशय खरपूस शब्दात समाचार घेतला.
देशावर सर्वाधिक काळ राज्य करणार्‍या काँगे्रसची स्थिती आज किती दयनीय झाली आहे. सत्तेसाठी व्याकूळ झालेला हा पक्ष देशभरात लहान-लहान पक्षांपुढे आघाडीसाठी अक्षरश: भीक मागत आहे, पण कोणीही या पक्षाचे विशेषत: राहुल गांधींचे नेतृत्व स्वीकारण्यास तयार नाही. देशाचा विकास व्हावा, या काळजीपोटी काँगे्रसची ही धडपड सुरू नसून, केवळ सत्ता प्राप्त करण्याचा त्यामागील उद्देश आहे. मात्र, ही आघाडी कधीच यशस्वी ठरणार नाही, असे पंतप्रधान मोदी यांनी सांगितले.
समाजातील सर्व घटकांना समान न्याय हाच भाजपा सरकारचा एकमेव मंत्र आहे. ‘सबका साथ सबका विकास’ हा केवळ नारा नसून, ते एक अभियान आहे, असे मोदी यांनी स्पष्ट केले.
विकासाचे वावडे असलेल्या काँगे्रसला चिखलफेक अधिक सोयीची वाटते. राफेलवरून आज ते सरकार आणि देशावर चिखलफेकच करीत आहे. यापूर्वीही काँगे्रसने अशीच चिखलफेक केली आहे; पण लक्षात ठेवा, तुम्ही जितका जास्त चिखल फेकाल, तितक्याच जास्त प्रमाणात कमळ उगवणार आहे, असा चिमटा मोदी यांनी काढला.
देशाबाहेरही आघाडीचा शोध
भारताचा पुढील पंतप्रधान कोण असावा, हे आता देशाबाहेर निश्‍चित केले जात आहे. राहुल गांधी आणि पक्षाच्या अन्य वरिष्ठ नेत्यांनी पाकिस्तानसोबत आघाडी करण्यासाठी व्यापक मोहीम सुरू केली आहे आणि म्हणून काँगे्रसचे नेते सध्या पाकचे गुणगान गात आाहेत, याकडे मोदी यांनी लक्ष वेधले.
शिव्याशाप वापरून झाले
काँग्रेस नेत्यांनी माझ्यावर चिखलफेक करताना, सर्व प्रकारचे अपशब्द वापरले. माझ्याविरोधात या पक्षाने सर्व शिव्याशाप वापरले. एकही अपशब्द शिल्लक ठेवला नाही. काही राहिले असेल तर तेही म्हणून टाका, त्याबद्दल तुमच्या सल्लागाराचा सल्ला घ्या, असाही टोला पंतप्रधानांनी हाणला.
तिहेरी तलाकला विरोध कशासाठी?
तिहेरी तलाकवर बंदी घालण्याच्या निर्णयावर काँग्रेसने टीका केली. इस्लाम स्वीकारलेल्या देशांमध्येही तिहेरी तलाकवर बंदी आहे, मग भारतात घालण्यात आलेल्या बंदीवर काँगे्रसचा विरोध कशासाठी? मुस्लिम महिला आणि त्यांच्या समस्यांशी काँग्रेसचा संबंध नाही का, असा प्रश्‍न पंतप्रधान मोदींनी उपस्थित केला आहे. व्होट बँकेचे राजकारण म्हणून काँग्रेस पक्ष प्रत्येक चांगल्या कामाला विरोध करीत असतो, असा आरोपही त्यांनी केला.

Posted by : | on : 26 Sep 2018
Filed under : नागरी, राष्ट्रीय.
You can follow any responses to this entry through the RSS 2.0You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Change Language: press Ctrl+g

    छायाचित्रातून

  • पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक
  • कोहली, मीराबाईला खेलरत्न कोहली, मीराबाईला खेलरत्न
  • अमित पांघळला बॉक्सिंगचे सुवर्ण अमित पांघळला बॉक्सिंगचे सुवर्ण
  • तेजिंदरपालला सुवर्णपदक तेजिंदरपालला सुवर्णपदक
  • महाराष्ट्राच्या राहीचा सुवर्णभेद महाराष्ट्राच्या राहीचा सुवर्णभेद

हवामान

दृष्टीक्षेपात

व्हिडीओ संग्रह

More in नागरी, राष्ट्रीय (256 of 1772 articles)


न्यायालयाचे निर्देश ►कलंकितांवरील बंदीसाठी कायदा करावा, नवी दिल्ली, २५ सप्टेंबर - जगातील सर्वात मोठी लोकशाही असलेल्या भारतात राजकारणाचे गुन्हेगारीकरण ही ...

×