ads
ads
कायद्याने राममंदिर मान्य!

कायद्याने राममंदिर मान्य!

►मुस्लिम पक्षकार अन्सारीची भूमिका, अयोध्या, २० नोव्हेंबर – अयोध्येतील…

एकाला फाशी, दुसर्‍याला जन्मठेप

एकाला फाशी, दुसर्‍याला जन्मठेप

►१९८४ मधील शीखनरसंहार; ३४ वर्षांनंतर निकाल, नवी दिल्ली, २०…

भक्तांची श्रद्धा चिरडू देणार नाही : अमित शाह

भक्तांची श्रद्धा चिरडू देणार नाही : अमित शाह

नवी दिल्ली, २० नोव्हेंबर – स्वामी अय्यप्पांच्या भक्तांशी केरळ…

काश्मीर पाकिस्तानचेच शाहिद आफ्रिदीची सारवासारव

काश्मीर पाकिस्तानचेच शाहिद आफ्रिदीची सारवासारव

इस्लामाबाद, १८ नोव्हेंबर – पाकिस्तानमधील राज्यकर्त्यांना देशाचा भाग असलेले…

अमेरिका भारताला देणार २४ पाणबुडीभेदी हेलिकॉप्टर्स

अमेरिका भारताला देणार २४ पाणबुडीभेदी हेलिकॉप्टर्स

►२०० अब्ज डॉलर्सचा व्यवहार, वॉशिंग्टन, १७ नोव्हेंबर – चीन…

मल्ल्यासाठी तिहारच योग्य

मल्ल्यासाठी तिहारच योग्य

►ब्रिटनच्या न्यायालयाचे शिक्कामोर्तब, लंडन, १७ नोव्हेंबर – सार्वजनिक आणि…

मराठा आरक्षणावरून विरोधकांमध्ये फूट

मराठा आरक्षणावरून विरोधकांमध्ये फूट

मुस्लिम आरक्षणावरून सभागृहात गदारोळ, राजदंड पळवला, मुंबई, २० नोव्हेंबर…

विधानसभा कामकाजास ‘वंदे मातरम’ने सुरुवात

विधानसभा कामकाजास ‘वंदे मातरम’ने सुरुवात

मुंबई, १९ नोव्हेंबर – महाराष्ट्र विधानसभेच्या हिवाळी अधिवेशनाच्या कामकाजास…

मराठा आरक्षणावर उद्या हायकोर्टात सुनावणी

मराठा आरक्षणावर उद्या हायकोर्टात सुनावणी

मुंबई, १९ नोव्हेंबर – मराठा आरक्षणाचा प्रश्‍न तातडीने निघाली…

तापमानवाढीचा धोका वाढतोय

तापमानवाढीचा धोका वाढतोय

॥ विशेष : अ‍ॅड. गिरीश राऊत | विकास पृथ्वीची…

अपनी अकल लगाओ!

अपनी अकल लगाओ!

॥ मानसरंग : मयुरेश डंके | गेटवे ऑफ इंडिया,…

राफेल सुनावणी : अर्धे नुकसान, अर्धा फायदा

राफेल सुनावणी : अर्धे नुकसान, अर्धा फायदा

॥ सारांश : ल.त्र्यं. जोशी | एक बाब मात्र…

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

‘फोर्ब्स’ने नुकतीच सर्वाधिक कमाई करणार्‍या अभिनेत्यांच्या नावाची यादी जाहीर…

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

बॉलिवूडची बेबी डॉल म्हणजेच सनी लिओनीचे नाव इंटरनेटवर सर्वाधिक…

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

‘रेस- ३’ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये कमबॅक करणारा अभिनेता बॉबी देओल…

पंचांग
वार: | तिथी:
नक्षत्र: | राशी:
करण: | योग:
सूर्योदय: 06:36 | सूर्यास्त: 17:48
अयनांश:
Home » नागरी, राष्ट्रीय » आता अध्यादेश नाही, तर कायदा!

आता अध्यादेश नाही, तर कायदा!

►राममंदिरासाठी साधुसंतांचा केंद्र सरकारला ‘धर्मादेश’
►दिवाळीत राममंदिरासाठी हिंदूंनी पणत्या लावाव्या,
नवी दिल्ली, ४ नोव्हेंबर –

Srisriravishankar Dharmadesh Sabha

Srisriravishankar Dharmadesh Sabha

अयोध्येत राममंदिर उभारण्यासाठी सरकारने एक तर अध्यादेश काढावा किंवा कायदा करावा. या मुद्यावर यापुढे कोणतीही चर्चा आणि तडजोड केली जाणार नाही, असा धर्मादेश आज रविवारी देण्यात आला. राममंदिराच्या उभारणीसाठी साधुसंत जो कार्यक्रम जाहीर करतील, त्यात देशातील जनतेने सहभागी होण्याचे तसेच दिवाळीत राममंदिरासाठी हिंदूंनी आपल्या घरात पणत्या लावाव्या, असे आवाहनही यावेळी करण्यात आले.
राजधानी दिल्लीतील तालकटोरा स्टेडियममध्ये झालेल्या द्विदिवसीय संत संमेलनातून हा खणखणीत इशारा देतानाच एक प्रस्तावही पारित करण्यात आला.
अयोध्येतील रामजन्मभूमीवर भव्य मंदिर उभारण्यासाठी सरकारने एकतर अध्यादेश काढावा वा कायदा करावा, यापेक्षा काहीही कमी आम्हाला मान्य नाही, या मुद्यावर आता कोणतीही चर्चा तसेच तडजोडही केली जाणार नाही, असा इशारा पारित करण्यात आलेल्या प्रस्तावातून देण्यात आला. धर्मादेश नावाने झालेल्या या संमेलनात देशभरातील तीन हजार संत सहभागी झाले होते.
राममंदिरासाठी आंदोलनाच्या कार्यक्रमाची घोषणा करताना म्हटले की, २५ नोव्हेंबर २०१८ ला अयोध्या, बंगळुरू आणि नागपूरला विशाल धर्मसभांचे आयोजन करण्यात येणार आहे. ९ डिसेंबरला ५ लाख रामभक्त आणि हजारो संत राजधानी दिल्लीत एकत्र येतील, याचदिवशी देशातील ५०० जिल्ह्यात अशाच प्रकारच्या कार्यक्रमाचेही आयोजन केले जाणार आहे.
आजपर्यंत मुस्लिम आणि ख्रिश्‍चन धर्मातून फतवे जारी केले जात होते. यावेळी प्रथमच हिंदूंनी अयोध्येतील राममंदिरासाठी धर्मादेश दिला असल्याचे अ. भा. संत समाजाचे अध्यक्ष जगद्गुरू रामानंदाचार्य स्वामी हंसदेवाचार्य महाराज यांनी सांगितले. देशातील समस्त हिंदूंना आपल्याला एकत्र करायचे आहे, मग ते बौद्ध असो, जैन असो की कबीर पंथी, असे महाराज म्हणाले.
मंदिर आवश्यकच : श्रीश्री रविशंकर
अयोध्येतील रामजन्मभूमीवर भगवान रामाचे मंदिर उभारावे, अशी देशातील कोट्यवधी लोकांची इच्छा असल्याचे श्रीश्री रविशंकर यांनी म्हटले. साधुसंतांना कोणत्याच मंदिराची गरज नसते. साधुसंत जिथे असतात, तिथेच मंदिर असते, मात्र देशातील जनतेसाठी मंदिर आवश्यक असते, असे रविशंकर म्हणाले. सर्वोच्च न्यायालयाच्या भूमिकेमुळे देशातील जनता नाराज झाली. शबरीमलै प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या, तसेच रामजन्मभूमीप्रकरणी न दिलेल्या निर्णयाने देशातील जनता दुखावल्या गेली आहे. शबरीमलैप्रकरणी पुनर्विचार याचिका सर्वोच्च न्यायालय स्वीकारेल, असा विश्‍वासही त्यांनी व्यक्त केला.
बांगलादेश सीमेवरून होणारी घुसखोरी थांबवली पाहिजे, आसाममधील एनआरसीच्या धर्तीवर संपूर्ण देशातील घुसखोरांची ओळख पटवून त्यांना देशाबाहेर काढले पाहिजे, त्याचप्रमाणे लोकसंख्या नियंत्रणासाठी कठोर कायदा बनवला पाहिजे, अशा मागण्याही या संमेलनातून करण्यात आल्या.
गोपालन् तसेच तीर्थयात्रा मंत्रालयाची स्थापना करण्याची गंगा-यमुनेसह देशातील सर्व नद्यांच्या स्वच्छतेसाठी कायदा करण्याची मागणीही यावेळी करण्यात आली. हिंदूनी देशातील कोणत्याही नदीत निर्माल्य वा अन्य कचरा टाकू नये, असे आवाहन यावेळी करण्यात आले. घरात कुत्रे नाही तर गायी पाळण्यासाठी जनतेने पुढाकार घेतला पाहिजे, जेणेकरून गायींची कत्तल आपल्याला टाळता येईल, असे आवाहन करण्यात आले.

Posted by : | on : 5 Nov 2018
Filed under : नागरी, राष्ट्रीय.
You can follow any responses to this entry through the RSS 2.0You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Change Language: press Ctrl+g

    छायाचित्रातून

  • पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक
  • कोहली, मीराबाईला खेलरत्न कोहली, मीराबाईला खेलरत्न
  • अमित पांघळला बॉक्सिंगचे सुवर्ण अमित पांघळला बॉक्सिंगचे सुवर्ण
  • तेजिंदरपालला सुवर्णपदक तेजिंदरपालला सुवर्णपदक
  • महाराष्ट्राच्या राहीचा सुवर्णभेद महाराष्ट्राच्या राहीचा सुवर्णभेद

हवामान

दृष्टीक्षेपात

व्हिडीओ संग्रह

More in नागरी, राष्ट्रीय (59 of 1774 articles)

Modi Sarkar
दिल्ली, ४ नोव्हेंबर - पुढील तीन ते चार महिन्यात दोन लाख पदांची भरती करण्यास मोदी सरकारने हिरवा कंदील दाखवला आहे. ...

×