ads
ads
पीक विमा योजनेसाठी राज्यात विक्रमी नोंदणी

पीक विमा योजनेसाठी राज्यात विक्रमी नोंदणी

नवी दिल्ली, १२ डिसेंबर – प्रधानमंत्री पीक विमा योजनेअंतर्गत…

आरोग्यावर जीडीपीच्या २.५ टक्के खर्च करणार

आरोग्यावर जीडीपीच्या २.५ टक्के खर्च करणार

►पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची माहिती, नवी दिल्ली, १२ डिसेंबर…

आरबीआयची स्वायत्तता जपणार : शक्तिकांत दास

आरबीआयची स्वायत्तता जपणार : शक्तिकांत दास

नवी दिल्ली, १२ डिसेंबर – रिझर्व्ह बँकेची विश्‍वासार्हता, मूलतत्त्वे,…

मध्यम पल्ल्याच्या क्षेपणास्त्र चाचणीबाबत इराणचा दुजोरा

मध्यम पल्ल्याच्या क्षेपणास्त्र चाचणीबाबत इराणचा दुजोरा

तेहरान, ११ डिसेंबर – पाश्‍चात्त्य देशांनी व्यक्त केलेल्या तीव्र…

अफगाणमधील शांततेसाठी भारताची भूमिका महत्त्वाची

अफगाणमधील शांततेसाठी भारताची भूमिका महत्त्वाची

►पाकची प्रथमच जाहीर कबुली, इस्लामाबाद, ११ डिसेंबर – अफगाणिस्तानात…

मल्ल्यार्पण होणार लंडन न्यायालयाचा आदेश

मल्ल्यार्पण होणार लंडन न्यायालयाचा आदेश

►मोदी सरकारचा आणखी एक विजय, लंडन, १० डिसेंबर –…

मोकाट कुत्र्यांपासून जनतेच्या रक्षणाची जबाबदारी प्रशासनाचीच

मोकाट कुत्र्यांपासून जनतेच्या रक्षणाची जबाबदारी प्रशासनाचीच

मुंबई, १२ डिसेंबर – मोकाट कुत्र्यांपासून जनतेचे रक्षण करण्याची…

धुळ्यात भाजपाला स्पष्ट बहुमत; अनिल गोटे धुळीत!

धुळ्यात भाजपाला स्पष्ट बहुमत; अनिल गोटे धुळीत!

►महापालिकेत ५० जागांवर विजय, धुळे, १० डिसेंबर – पोल…

दुष्काळ निवारणासाठी आठ हजार कोटी हवे

दुष्काळ निवारणासाठी आठ हजार कोटी हवे

►मुख्यमंत्री फडणवीस यांची केंद्राकडे मागणी, नवी दिल्ली, ७ डिसेंबर…

हिंदूंनी कुठपर्यंत प्रतीक्षा करायची?

हिंदूंनी कुठपर्यंत प्रतीक्षा करायची?

॥ विशेष : आशुतोष अडोणी | श्रीरामजन्मभूमीवरील भव्य मंदिर…

काँग्रेसमुक्त भारत अंतीम टप्प्यात!

काँग्रेसमुक्त भारत अंतीम टप्प्यात!

॥ संवाद : सोमनाथ देशमाने | राहुल भोवती संशयाचे…

उथळ पाण्याचा खळखळाट

उथळ पाण्याचा खळखळाट

॥ जागता पहारा : भाऊ तोरसेकर | ही जागरुकता…

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

‘फोर्ब्स’ने नुकतीच सर्वाधिक कमाई करणार्‍या अभिनेत्यांच्या नावाची यादी जाहीर…

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

बॉलिवूडची बेबी डॉल म्हणजेच सनी लिओनीचे नाव इंटरनेटवर सर्वाधिक…

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

‘रेस- ३’ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये कमबॅक करणारा अभिनेता बॉबी देओल…

पंचांग
वार: | तिथी:
नक्षत्र: | राशी:
करण: | योग:
सूर्योदय: 06:50 | सूर्यास्त: 17:52
अयनांश:
Home » राष्ट्रीय, संरक्षण » आधुनिकीकरणामुळे मिग-२९ झाले घातक

आधुनिकीकरणामुळे मिग-२९ झाले घातक

►आज वायुदल दिवस,
जालंधर, ७ ऑक्टोबर –

Mig 29

Mig 29

भारतीय वायुदलातील मिग-२९ विमानाचे आधुनिकीकरण करण्यात आल्यानंतर ते अत्यंत घातक झाले आहे, अशी माहिती वायुदलातील अधिकार्‍यांनी दिली आहे. वायुदल सध्या विमानांच्या कमतरतेसोबत झुंजत असून, अशा परिस्थितीत आधुनिकीकरण करण्यात आलेल्या मिग-२९ विमानाचा आधार मिळत आहे.
रशियन बनावटीचे हे विमान आता हवेतच इंधन भरण्यास सक्षम झाले आहे.
अत्याधुनिक क्षेपणास्त्रांच्या माध्यमातून मिग-२९ विमानातून वेगवेगळ्या लक्ष्यांवर एकाचवेळी हल्ला करणे शक्य असल्याची माहिती आदमपूर वायुदल तळाचे फ्लाईट लेफ्टनंट करण कोहली यांनी दिली.
जुन्या मिग-२९ विमानाने भारतीय वायुदलात महत्त्वपूर्ण भूमिका बजावली. या विमानाने १९९९ मध्ये झालेल्या कारगिल युद्धात घातकतेची मोहोर उमटवली होती.
मागील आठवड्यात आधुनिकीकरण करण्यात आलेले मिग-२९ विमानाच्या लढाऊ क्षमतेचे आदमपूर येथे प्रदर्शन करण्यात आले. उद्या सोमवारी देश वायुदल दिवस साजरा करणार असून, त्यानिमित्त या विमानाच्या क्षमतेचे प्रदर्शन करण्यात आले.
हे विमान एकाच वेळी पाकिस्तान आणि चीन अशा दोन आघाड्यांवर तोंड देण्यास सज्ज आहे का, या प्रश्‍नाला उत्तर देताना वायुदलाच्या एका अधिकार्‍याने सांगितले की, १९८० मध्ये निर्माण झालेल्या आपात्कालीन परिस्थितीत मिग-२९ विमानाची खरेदी करण्यात आली होती. आता आधुनिकीकरणातून हे विमान अत्यंत घातक झाले आहे. मिग-२९ विमानात आता मल्टी फंक्शनल डिस्प्ले स्क्रीन बसवण्यात आली आहे, अशी माहिती करण कोहली यांनी दिली.
देशाला लढाऊ विमानांची कमतरता भासत आहे, असे वायुदलप्रमुख बी. एस. धनोआ यांनी १२ सप्टेंबर रोजी सांगितले होते. ४२ स्क्वाड्रन्सची गरज असताना वायुदलाकडे लढाऊ विमानांच्या केवळ ३१ स्क्वाड्रन्स सद्यपरिस्थितीत आहेत, असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले होते. आपल्याकडे ४२ स्क्वाड्रन्स उभारण्यात आल्या तरी आपल्या दोन्ही शेजार्‍यांच्या तुलनेत ही संख्या कमीच राहील, असेही त्यांनी सांगितले होते.
पाकिस्तानचे अंतर १०० किलोमीटर, तर चिनी सीमेचे अंतर २५० किलोमीटर असल्याने धोरणात्मक दृष्टीने महत्त्वपूर्ण असलेल्या आदमपूर हवाईतळावर आधुनिकीकरण केलेल्या मिग-२९ विमानांची भर पडली आहे.
भारतीय वायुदलाकडे मिग-२९ च्या तीन स्क्वाड्रन्स आहेत. त्यापैकी दोन स्क्वाड्रन्स आदमपूर हवाईतळावर तैनात करण्यात आल्या आहेत. एका स्क्वाड्रन्स कंपनीमध्ये १६-१८ विमानांचा समावेश असतो.
प्रत्येक स्थितीला तोंड देण्यास सक्षम असलेले विमान आता वायुदलाकडे आहे. त्यामुळे वायुदलाच्या वैमानिकांची स्थिती बदलली आहे. ते हल्ला चढवण्यास सक्षम झाले आहेत. या मिग-२९ विमानांमध्ये थेट उड्डाण घेण्याची क्षमता आहे. त्यामुळे हवाई दलाची ताकद वाढली, असे कोहली यांनी सांगितले.
शत्रूचे विमान भारतीय हद्दीत पोहोचताच पाच मिनिटांत उड्डाण करून ते नष्ट करण्याची क्षमता मिग-२९ मध्ये आहे. आता या विमानामध्ये हवेतच इंधन भरण्याची क्षमताही विकसित करण्यात आली आहे. त्यामुळे हे विमान लांबचा पल्ला गाठण्यास सक्षम झाले आहे.
राफेलमुळे क्षमतेत भर : एअर मार्शल नाम्बियार
शिलाँग ः राफेल लढाऊ विमाने उच्च क्षमतेची असून, या विमानांमुळे वायुदलाची क्षमता वाढेल, असे इस्टर्न एयर कमांडचे प्रमुख एअर मार्शल आर. नाम्बियार यांनी स्पष्ट केले आहे. बंगाल वगळता वायुदलाच्या सर्वच तळांवर राफेल, चिनूक आणि अपाचे हेलिकॉप्टरचा समावेश केला जाणार असल्याची माहिती त्यांनी दिली. त्यांनी मागील आठवड्यात राफेलची चाचणी घेतली आहे.

Posted by : | on : 8 Oct 2018
Filed under : राष्ट्रीय, संरक्षण.
You can follow any responses to this entry through the RSS 2.0You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Change Language: press Ctrl+g

    छायाचित्रातून

  • भारताचा ऑस्ट्रेलियात विक्रमी विजय भारताचा ऑस्ट्रेलियात विक्रमी विजय
  • पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक
  • कोहली, मीराबाईला खेलरत्न कोहली, मीराबाईला खेलरत्न
  • अमित पांघळला बॉक्सिंगचे सुवर्ण अमित पांघळला बॉक्सिंगचे सुवर्ण
  • तेजिंदरपालला सुवर्णपदक तेजिंदरपालला सुवर्णपदक

हवामान

दृष्टीक्षेपात

व्हिडीओ संग्रह

More in राष्ट्रीय, संरक्षण (302 of 1886 articles)

Amit Shah 03
शाह यांचे प्रतिपादन, जावरा, ७ ऑक्टोबर - भाजपाच्या नेतृत्वाखालील केंद्रातील रालोआ सरकार शेतकर्‍यांच्या उत्पन्नात दुप्पट वाढ होण्याच्या दृष्टीने काम करीत ...

×