जम्मू-काश्मिरात राज्यपाल राजवट

जम्मू-काश्मिरात राज्यपाल राजवट

►राष्ट्रपतींची मंजुरी, वृत्तसंस्था नवी दिल्ली, २० जून – जम्मू-काश्मिरात…

पुरस्काराचा महाराष्ट्री ‘योग’

पुरस्काराचा महाराष्ट्री ‘योग’

►विश्‍वास मंडलिक, योगसंस्थेची पंतप्रधान योग पुरस्कारासाठी निवड, तभा वृत्तसेवा…

विरोधकांचे नेतृत्व राहुल गांधींकडेच हवे : शीला दीक्षित

विरोधकांचे नेतृत्व राहुल गांधींकडेच हवे : शीला दीक्षित

वृत्तसंस्था नवी दिल्ली, २० जून – आगामी सार्वत्रिक निवडणुकीत…

भारत-फ्रान्स उभारणार मजबूत भागीदारी

भारत-फ्रान्स उभारणार मजबूत भागीदारी

►परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांची माहिती, वृत्तसंस्था पॅरीस, १९ जून…

भारतच अमेरिकेचा मुख्य संरक्षण भागीदार

भारतच अमेरिकेचा मुख्य संरक्षण भागीदार

►७१६ अब्ज डॉलर्सच्या विधेयकाला सिनेटची मंजुरी, वृत्तसंस्था वॉशिंग्टन, १९…

जपानमध्ये शक्तिशाली भूकंप, तीन ठार

जपानमध्ये शक्तिशाली भूकंप, तीन ठार

►२०० पेक्षा जास्त जखमी, वृत्तसंस्था टोकयो, १८ जून –…

राज्यात नवीन फळबाग लागवड योजना

राज्यात नवीन फळबाग लागवड योजना

►अन्नप्रक्रिया उद्योगाला चालना ►राज्य मंत्रिमंडळाची मंजुरी, तभा वृत्तसेवा मुंबई,…

डीएसके प्रकरणी महाबँकेच्या एमडीला अटक

डीएसके प्रकरणी महाबँकेच्या एमडीला अटक

►आणखी सहा जण ताब्यात, वृत्तसंस्था पुणे, २० जून –…

पुढचा मुख्यमंत्री शिवसेनेचाच

पुढचा मुख्यमंत्री शिवसेनेचाच

►उद्धव ठाकरे यांची घोषणा, तभा वृत्तसेवा मुंबई, १९ जून…

आंबेडकरी चळवळीचे अपहरण

आंबेडकरी चळवळीचे अपहरण

॥ जागता पहारा : भाऊ तोरसेकर | पुण्याच्या पोलिसांनी…

वृत्तींवर विजय मिळवणारा योग

वृत्तींवर विजय मिळवणारा योग

॥ विशेष : वैद्य सुयोग दांडेकर | २१ जून…

कैरानाच्या पश्‍चात…

कैरानाच्या पश्‍चात…

॥ रोखठोक : हितेश शंकर | केरळमध्ये सुरू असलेले…

‘सिमरन’मधील नवीन गाणे प्रदर्शित

‘सिमरन’मधील नवीन गाणे प्रदर्शित

अभिनेत्री कंगना राणावत लवकरच सिमरन या चित्रपटाद्वारे प्रेक्षकांच्या भेटीला…

चिरंजीवीसोबत सिनेमा करण्यास ऐश्‍वर्याचा नकार?

चिरंजीवीसोबत सिनेमा करण्यास ऐश्‍वर्याचा नकार?

ऐश्‍वर्या राय बच्चनची सध्या बॉलीवूडमध्ये सेकंड इनिंग सुरू आहे.…

रणबीरच्या फिरण्यावर बंदी

रणबीरच्या फिरण्यावर बंदी

संजय दत्तच्या आयुष्यावर आधारित चित्रपटात रणबीर कपूर ६ वेगवेगळ्या…

पंचांग
वार: | तिथी:
नक्षत्र: | राशी:
करण: | योग:
सूर्योदय: 05:54 | सूर्यास्त: 19:03
अयनांश:
Home » अर्थ, राष्ट्रीय » आरबीआयने व्याजदरात केली पाव टक्क्याची वाढ

आरबीआयने व्याजदरात केली पाव टक्क्याची वाढ

►गृहकर्जे, वाहनकर्जे महागण्याची शक्यता,
वृत्तसंस्था
नवी दिल्ली, ६ जून –
रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने २०१८-१९या आर्थिक वर्षातील पहिले पतधोरण आज जाहीर केले असून, यात रेपो रेट, रिव्हर्स रेपोमध्ये वाढ करण्यात आली आहे. व्याजदर वाढवल्यामुळे ग्राहकांनाही याचा फटका बसणार आहे. रेपो रेटमध्ये ०.२५ टक्क्यांनी वाढ करून तो ६.२५ टक्क्यांवर नेण्यात आला आहे, तर रिव्हर्स रेपो रेट ०.२५ टक्क्यांची वाढ नोंदवून तो ६ टक्क्यांपर्यंत गेला आहे. आर्थिक विकासाला गती देण्याचे कारण देत व्याजदरात वाढ करण्यात आली असून, रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर ऊर्जित पटेल यांनी हे पतधोरण जाहीर केले आहे. इंधन दर आधीच भडकलेले असताना रेपो रेट वाढवल्यामुळे बँकांची कर्जे महागणार असून, याचा ग्राहकांना फटका बसणार आहे.
भारतीय रिझर्व्ह बँकेने साडे चार वर्षांनी व्याजदरांमध्ये वाढ केली आहे. आरबीआयचे गव्हर्नर उर्जित पटेल यांच्या अध्यक्षतेखालील सहा सदस्यीय समितीने आरबीआय ज्या दरानं बँकांना वित्तपुरवठा करते त्या व्याजाचे दर किंवा रेपो रेट पाव टक्क्यांनी वाढवून ६.२५ टक्के केला आहे.
बँका ज्या दराने आपल्याकडे असलेला अतिरिक्त निधी रिझर्व्ह बँकेकडे जमा करतात त्यावर म्हणजे रिव्हर्स रेपो त्यांना ६ टक्के व्याज मिळेल. एप्रिल महिन्यामध्येच दोन सदस्यांनी पाव टक्के दरवाढीची शिफारस केली होती. आजच्या बैठकीमध्ये सर्वच्या सर्व सदस्यांनी दरवाढीच्या प्रस्तावाला समर्थन दिले व एकमताने ही वाढ करण्यात आली आहे.
या दरवाढीमुळे भविष्यातील सर्व कर्जांचे दर वाढू शकतात. परिणामी गृहकर्ज, वाहन कर्ज, वैयक्तिक कर्जे यांचे दर वाढण्याची शक्यता आहे. साधारणपणे रिझर्व्ह बँकेने व्याजदरांमध्ये वाढ केली की बँका हा वाढीव बोजा ग्राहकांकडे सरकवतात. असा अनुभव आहे की सगळ्यात मोठी सरकारी बँक प्रथम व्याजदरात वाढ करते मग मागोमाग सगळ्या बँकांचे कर्जही महागते. जर का आतापर्यंतची ही प्रथा सुरू राहिली तर गृहकर्ज, वाहन कर्ज, वैयक्तिक कर्ज व अन्य प्रकारची कर्जेही महागण्याची शक्यता आहे.
अर्थात्, गेल्या आठवड्यातच स्टेट बँक, पंजाब नॅशनल व आयसीआयसीआय बँकेने प्रमाण कर्जाचा दर किंवा एमसीएलआर ०.१ टक्क्यांनी वाढवला होता व कर्ज महागत असल्याचे सूतोवाच केले होते. बहुतेक सर्व प्रकारची कर्जे या एमसीएलआरशी जोडलेली असतात व त्यात होणारे बदल कर्जाच्या व्याजात किंवा हप्त्यात उमटतात. त्यामुळे एमसीएलआर किंवा प्रमाण दर वाढला की ईएमआय वाढतो. बुधवारच्या व्याजदर वाढीनंतर किती बँका हा प्रमाण दर वाढवतात व किती वाढवतात यावर कर्जे महाग होतील का व किती होतील हे ठरणार आहे.

Posted by : | on : Jun 7 2018 | Filed under : अर्थ, राष्ट्रीय.
You can follow any responses to this entry through the RSS 2.0.
Both comments and pings are currently closed.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Marathi/English, press Ctrl+g  

हवामान

दृष्टीक्षेपात

व्हिडीओ संग्रह

More in अर्थ, राष्ट्रीय (67 of 2430 articles)


►इफ्तार पार्टीही रद्द, नवी दिल्ली, ६ जून - राष्ट्रपती भवनात कोणत्याही प्रकारचा धार्मिक कार्यक्रम यापुढे आयोजित केला जाणार नाही. २५ ...

×