जम्मू-काश्मिरात राज्यपाल राजवट

जम्मू-काश्मिरात राज्यपाल राजवट

►राष्ट्रपतींची मंजुरी, वृत्तसंस्था नवी दिल्ली, २० जून – जम्मू-काश्मिरात…

पुरस्काराचा महाराष्ट्री ‘योग’

पुरस्काराचा महाराष्ट्री ‘योग’

►विश्‍वास मंडलिक, योगसंस्थेची पंतप्रधान योग पुरस्कारासाठी निवड, तभा वृत्तसेवा…

विरोधकांचे नेतृत्व राहुल गांधींकडेच हवे : शीला दीक्षित

विरोधकांचे नेतृत्व राहुल गांधींकडेच हवे : शीला दीक्षित

वृत्तसंस्था नवी दिल्ली, २० जून – आगामी सार्वत्रिक निवडणुकीत…

भारत-फ्रान्स उभारणार मजबूत भागीदारी

भारत-फ्रान्स उभारणार मजबूत भागीदारी

►परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांची माहिती, वृत्तसंस्था पॅरीस, १९ जून…

भारतच अमेरिकेचा मुख्य संरक्षण भागीदार

भारतच अमेरिकेचा मुख्य संरक्षण भागीदार

►७१६ अब्ज डॉलर्सच्या विधेयकाला सिनेटची मंजुरी, वृत्तसंस्था वॉशिंग्टन, १९…

जपानमध्ये शक्तिशाली भूकंप, तीन ठार

जपानमध्ये शक्तिशाली भूकंप, तीन ठार

►२०० पेक्षा जास्त जखमी, वृत्तसंस्था टोकयो, १८ जून –…

राज्यात नवीन फळबाग लागवड योजना

राज्यात नवीन फळबाग लागवड योजना

►अन्नप्रक्रिया उद्योगाला चालना ►राज्य मंत्रिमंडळाची मंजुरी, तभा वृत्तसेवा मुंबई,…

डीएसके प्रकरणी महाबँकेच्या एमडीला अटक

डीएसके प्रकरणी महाबँकेच्या एमडीला अटक

►आणखी सहा जण ताब्यात, वृत्तसंस्था पुणे, २० जून –…

पुढचा मुख्यमंत्री शिवसेनेचाच

पुढचा मुख्यमंत्री शिवसेनेचाच

►उद्धव ठाकरे यांची घोषणा, तभा वृत्तसेवा मुंबई, १९ जून…

आंबेडकरी चळवळीचे अपहरण

आंबेडकरी चळवळीचे अपहरण

॥ जागता पहारा : भाऊ तोरसेकर | पुण्याच्या पोलिसांनी…

वृत्तींवर विजय मिळवणारा योग

वृत्तींवर विजय मिळवणारा योग

॥ विशेष : वैद्य सुयोग दांडेकर | २१ जून…

कैरानाच्या पश्‍चात…

कैरानाच्या पश्‍चात…

॥ रोखठोक : हितेश शंकर | केरळमध्ये सुरू असलेले…

‘सिमरन’मधील नवीन गाणे प्रदर्शित

‘सिमरन’मधील नवीन गाणे प्रदर्शित

अभिनेत्री कंगना राणावत लवकरच सिमरन या चित्रपटाद्वारे प्रेक्षकांच्या भेटीला…

चिरंजीवीसोबत सिनेमा करण्यास ऐश्‍वर्याचा नकार?

चिरंजीवीसोबत सिनेमा करण्यास ऐश्‍वर्याचा नकार?

ऐश्‍वर्या राय बच्चनची सध्या बॉलीवूडमध्ये सेकंड इनिंग सुरू आहे.…

रणबीरच्या फिरण्यावर बंदी

रणबीरच्या फिरण्यावर बंदी

संजय दत्तच्या आयुष्यावर आधारित चित्रपटात रणबीर कपूर ६ वेगवेगळ्या…

पंचांग
वार: | तिथी:
नक्षत्र: | राशी:
करण: | योग:
सूर्योदय: 05:54 | सूर्यास्त: 19:03
अयनांश:
Home » नागरी, राष्ट्रीय » आर्थिक व्यवहार सेवकाकडे द्या!

आर्थिक व्यवहार सेवकाकडे द्या!

►भय्यू महाराजांची नोंद,
वृत्तसंस्था
इंदूर, १३ जून –

Bhaiyyu Maharaj

Bhaiyyu Maharaj

माझ्या पश्‍चात माझे आणि आश्रमाचे सर्व आर्थिक व्यवहार सेवक विनायकने पाहावेत, अशी नोंद भय्यू महाराज यांच्या सुसाईड नोटमध्ये असल्याचे पोलिस उपमहासंचालक हरिनारायणचारी मिश्रा यांनी सांगितले.
भय्यू महाराज यांच्या आत्महत्येनंतर त्यांची सुसाईड नोट सापडली होती. त्यातील दुसर्‍या पानावर हा उल्लेख असल्याचे मिश्रा यांनी सांगितले.
भय्यू महाराजांचा कुटुंब-कबिला इतका मोठा असूनही, त्यांनी सुसाईड नोटमध्ये सर्व संपत्तीची जबाबदारी नोकराकडे का दिली, असा प्रश्‍न आता उपस्थित केला जात आहे. भय्यू महाराज यांच्या सुसाईड नोटच्या पहिल्या पानावर आपण तणावामुळे आत्महत्या करीत असून त्यासाठी कोणालाही जबाबदारी धरू नये, असे म्हटले होते. मात्र, आता दुसर्‍या पानावर संपत्तीचा उल्लेख असल्याने अनेक तर्कवितर्क लढवले जात आहेत.
कोण आहे विनायक?
विनायक हा मूळचा महाराष्ट्रातील अहमदनगर जिल्ह्यातील आहे. विनायक नेहमी भय्यू महाराजांसोबतच राहात असे. भय्यू महाराजांच्या प्रत्येक निर्णय प्रक्रियेत विनायक सहभागी राहात असे. विनायकचा शब्द हा भय्यू महाराजांचाच शब्द मानला जात असे. विनायक काल भय्यू महाराजांच्या मुलीला आणण्यासाठी पुण्याला गेला होता, त्या दरम्यान भय्यू महाराजांनी आत्महत्या केल्याची माहिती सूत्राने दिली.
भय्यूजींच्या पश्‍चात पत्नी आयुषी, मुलगी कुहू आणि आई कुमुदिनी असा परिवार आहे. या तिघांपैकी कुणालाही संपत्तीचे अधिकार दिले नाहीत, तर सेवेकरी असलेल्या विनायक यांना आश्रमाचं सर्व कामकाज आणि आर्थिक व्यवहार करण्याचे अधिकार दिले आहेत. त्यामुळे भय्यू महाराजांनी असं का केलं हा प्रश्‍न पडलाय.
भय्यू महाराज यांची संपत्ती
भय्यू महाराजांच्या संस्थेचे सचिव उस्मानाबादचे आहेत. त्यांच्याकडून घेतलेल्या माहितीनुसार अधिकृत संपत्ती अशी आहे –
>गेल्या काही वर्षांमध्ये भय्यू महाराजांनी एकूण १२०० एकर शेती विकली. आता भय्यू महाराजांकडे फक्त ८० एकर शेती शिल्लक आहे.
>खामगाव जिल्हा बुलढाणा येथील शंभर एकर शेती विकली त्यातून एक कोटी एंशी लाख मिळाले.
>त्याआधी बार्शी टाकळी जिल्हा अकोला येथील ८० एकर शेती विकली.
>तुळजापूर शहरामध्ये संभाजी महाराजांचा पुतळा बसवला. त्यासाठी पाच एकर जमीन विकून बावीस लाख रुपये दिले.
>सध्या सुजालपूर मध्यप्रदेश येथे ८० एकर शेती शिल्लक आहे.
>महाराष्ट्रात सध्या बुलडाण्यात पारधी समाजाच्या मुलांसाठीच्या दोन आश्रमशाळा आहेत, त्या अनुदानित असून येथे दीड हजार विद्यार्थी शिक्षण घेतात.
>पुणे आणि अकोला येथेही ग्रस्त मुलांसाठी विनाअनुदानित आश्रमशाळा आहे.
>सोलापूर जिल्ह्यातील सांगोला तालुक्यातल्या एकतपूर येथे पाचवी ते बारावीपर्यंतचे कनिष्ठ महाविद्यालय आहे. या विनाअनुदानित संस्थेत साडेतीनशे मुले शिकतात.
>तुळजापूर तालुक्यातल्या मुरता येथे पाचवी ते बारावीच्या मुलांसाठी विनाअनुदानीत शाळा आहे. येथेही साडेतीनशे मुले शिकतात.
>अधिकृतपणे संस्थेच्या ऑडिटनुसार दरवर्षी दहा कोटी रुपयांची उलाढाल चालते.
>संस्थेला ८० सी मध्ये देणगी मिळाल्यानंतर कर सवलत होती. त्यातून मोठ्या प्रमाणात देणग्या येत. घ(वृत्तसंस्था)
भय्यू महाराजांच्या मुलीचे सावत्र आईवर गंभीर आरोप
भय्यू महाराज यांनी सुसाईड नोटमध्ये तणावामुळे आत्महत्या करत असल्याचा उल्लेख केला आहे. मात्र, त्यांच्या आत्महत्येबाबत विविध तर्कवितर्क लढवले जात आहेत. अशातच दुसरी पत्नी आणि पहिल्या पत्नीची मुलगी यांच्यातील वादामुळे भय्यू महाराजांनी टोकाचे पाऊल उचलल्याची शक्यता वर्तविली जात आहे.
भय्यू महाराजांच्या पहिल्या पत्नीची मुलगी असलेल्या कुहू हिने सावत्र आईवर भय्यूजींना आत्महत्येसाठी प्रेरित केल्याचा गंभीर आरोप केला आहेत. कुहू ही भय्यू महाराजांची पहिली पत्नी माधवीची मुलगी आहे. त्यांची दुसरी पत्नी डॉ. आयुषी आणि कुहू यांच्यात आलबेल नव्हते. भय्यू महाराजांच्या आत्महत्येनंतर कुहूने आयुषी यांच्यावर आरोप केले आहेत. या सावत्र आईमुळेच माझ्या वडिलांनी आत्महत्या केली, असा आरोप कुहूने केला आहे. तर कुहूला मी आवडत नसल्याने ती असे आरोप करत आहे, असे आयुषी यांचे म्हणणे आहे. कुहू पुण्यात शिकते. त्यामुळे भय्यू महाराजांचे पुण्यात येणे-जाणे होत असे. पहिली पत्नी माधवी यांच्या निधनानंतर गेल्या वर्षी ४९ वर्षीय भय्यू महाराज यांनी ग्वाल्हेरमधील डॉ. आयुषी यांच्यासोबत दुसरे लग्न केले होते. काल मंगळवारी इंदूर येथील आपल्या निवासस्थानी भय्यू महाराज यांनी डोक्यात गोळी घालून आत्महत्या केली होती.

Posted by : | on : Jun 14 2018 | Filed under : नागरी, राष्ट्रीय.
You can follow any responses to this entry through the RSS 2.0.
Both comments and pings are currently closed.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Marathi/English, press Ctrl+g  

हवामान

दृष्टीक्षेपात

व्हिडीओ संग्रह

More in नागरी, राष्ट्रीय (35 of 2430 articles)


►केंद्र सरकारचा महत्त्वपूर्ण निर्णय, वृत्तसंस्था नवी दिल्ली, १० जून - केंद्रीय लोकसेवा आयोगाची (युपीएससी) परीक्षा न देताही आता संयुक्त सचिव ...

×