ads
ads
कायद्याने राममंदिर मान्य!

कायद्याने राममंदिर मान्य!

►मुस्लिम पक्षकार अन्सारीची भूमिका, अयोध्या, २० नोव्हेंबर – अयोध्येतील…

एकाला फाशी, दुसर्‍याला जन्मठेप

एकाला फाशी, दुसर्‍याला जन्मठेप

►१९८४ मधील शीखनरसंहार; ३४ वर्षांनंतर निकाल, नवी दिल्ली, २०…

भक्तांची श्रद्धा चिरडू देणार नाही : अमित शाह

भक्तांची श्रद्धा चिरडू देणार नाही : अमित शाह

नवी दिल्ली, २० नोव्हेंबर – स्वामी अय्यप्पांच्या भक्तांशी केरळ…

काश्मीर पाकिस्तानचेच शाहिद आफ्रिदीची सारवासारव

काश्मीर पाकिस्तानचेच शाहिद आफ्रिदीची सारवासारव

इस्लामाबाद, १८ नोव्हेंबर – पाकिस्तानमधील राज्यकर्त्यांना देशाचा भाग असलेले…

अमेरिका भारताला देणार २४ पाणबुडीभेदी हेलिकॉप्टर्स

अमेरिका भारताला देणार २४ पाणबुडीभेदी हेलिकॉप्टर्स

►२०० अब्ज डॉलर्सचा व्यवहार, वॉशिंग्टन, १७ नोव्हेंबर – चीन…

मल्ल्यासाठी तिहारच योग्य

मल्ल्यासाठी तिहारच योग्य

►ब्रिटनच्या न्यायालयाचे शिक्कामोर्तब, लंडन, १७ नोव्हेंबर – सार्वजनिक आणि…

मराठा आरक्षणावरून विरोधकांमध्ये फूट

मराठा आरक्षणावरून विरोधकांमध्ये फूट

मुस्लिम आरक्षणावरून सभागृहात गदारोळ, राजदंड पळवला, मुंबई, २० नोव्हेंबर…

विधानसभा कामकाजास ‘वंदे मातरम’ने सुरुवात

विधानसभा कामकाजास ‘वंदे मातरम’ने सुरुवात

मुंबई, १९ नोव्हेंबर – महाराष्ट्र विधानसभेच्या हिवाळी अधिवेशनाच्या कामकाजास…

मराठा आरक्षणावर उद्या हायकोर्टात सुनावणी

मराठा आरक्षणावर उद्या हायकोर्टात सुनावणी

मुंबई, १९ नोव्हेंबर – मराठा आरक्षणाचा प्रश्‍न तातडीने निघाली…

तापमानवाढीचा धोका वाढतोय

तापमानवाढीचा धोका वाढतोय

॥ विशेष : अ‍ॅड. गिरीश राऊत | विकास पृथ्वीची…

अपनी अकल लगाओ!

अपनी अकल लगाओ!

॥ मानसरंग : मयुरेश डंके | गेटवे ऑफ इंडिया,…

राफेल सुनावणी : अर्धे नुकसान, अर्धा फायदा

राफेल सुनावणी : अर्धे नुकसान, अर्धा फायदा

॥ सारांश : ल.त्र्यं. जोशी | एक बाब मात्र…

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

‘फोर्ब्स’ने नुकतीच सर्वाधिक कमाई करणार्‍या अभिनेत्यांच्या नावाची यादी जाहीर…

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

बॉलिवूडची बेबी डॉल म्हणजेच सनी लिओनीचे नाव इंटरनेटवर सर्वाधिक…

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

‘रेस- ३’ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये कमबॅक करणारा अभिनेता बॉबी देओल…

पंचांग
वार: | तिथी:
नक्षत्र: | राशी:
करण: | योग:
सूर्योदय: 06:36 | सूर्यास्त: 17:48
अयनांश:
Home » राष्ट्रीय, सांस्कृतिक » आर्य हे भारतातलेच, वैदिक संस्कृतीही भारताचीच

आर्य हे भारतातलेच, वैदिक संस्कृतीही भारताचीच

►अत्याधुनिक पुराव्यांसह संशोधन
►आक्रमणाचा सिद्धांत धुडकावला,
वृत्तसंस्था
नवी दिल्ली, १४ जून –

Arya

Arya

‘आर्य हे बाहेरून आले असून त्यांनी येथील एतद्देशीयांवर आक्रमण करून त्यांच्यावर वैदिक संस्कृती लादली’ हा पाश्‍चात्त्यांनी रुजविलेल्या सिद्धांताच्या अक्षरश: चिंधड्या उडविणारे अत्याधुनिक संशोधन पुराव्यांसकट समोर आले आहे. या नव्या संशोधनामुळे भारतीय इतिहासाची व विचारविश्‍वाची एकूण दिशाच पूर्णपणे बदलणार असून आर्य हे भारतातीलच होते व त्यांनी संपूर्ण विश्‍वात संचार करून वैदिक संस्कृतीचा प्रसार केला, ही बाब नव्याने अधोरेखित झाली आहे. भारताच्या सांस्कृतिक व पुरातत्त्व क्षेत्रातील ही अतिशय महत्त्वपूर्ण घडामोड आहे.
हरयाणातल्या राखीगडी येथील हडप्पा संस्कृतीच्या पुरातत्वखात्याच्या संशोधनात वरील बाब पुढे आली आहे. ‘आर्य हे भारतातले नसून ते बाहेरचे होते आणि त्यांनी भारतावर आक्रमण केले हा सिद्धांतच पार चुकीचा ठरवणारे हे संशोधन आहे. या ठिकाणी आढळलेल्या मानवी अवशेषांच्या संशोधनातून आर्य हे मूळचे भारतातलेच होते व वैदिक ‘क्रांती’ही भारतातच झाली असे या संशोधनातून सिद्ध होत आहे.
पुण्याच्या डेक्कन महाविद्यालयाचे कुलगुरू वसंत शिंदे व लखनौच्या बिरबल साहनी संस्थेच्या डीएनए प्रयोगशाळेचे प्रमुख नीरज राय यांनी यासंदर्भात संशोधन केले आहे. लवकरच या संशोधनाचा सविस्तर अहवाल प्रसिद्ध करणार असल्याचे वृत्त एका दैनिकाने दिले आहे. राखीगडी येथे सापडलेल्या मानवी अवशेषांच्या डीएनएवरून ते स्थानिक नागरिकांचेच असल्याचे खात्रीलायकपणे सांगता येते. विदेशी नागरिकांचा काही प्रमाणात अंश आढळला असला तरी हे लोक मुख्यत: स्थानिकच असल्याचे स्पष्ट दिसत आहे. हे डीएनए ज्या काळातल्या लोकांचे आहेत त्यानंतरचा काळ वैदिक आहे, त्यामुळेच वैदिक पर्व हे संपूर्णपणे भारतीय असून विदेशी सहभाग अत्यल्प आहे, असे शिंदे यांनी स्पष्ट केले.
वैदिक किंवा ऋग्वेदाचा काळ, अंत्यविधीच्या पद्धती, भांडी, बांधकामासाठी वापरलेल्या विटा, मानवी सांगाड्यावरून समजत असलेली चांगली आरोग्यशैली हे सगळे वैदिक काळ व त्याचे प्रणेते आर्य हे अस्सल भारतीय असल्याचेच सांगतात असे या संशोधनातून पुढे आले आहे. अंत्यविधीच्या काही तत्कालीन पद्धती हजारो वर्षांनंतर आजही काही समुदायांमध्ये आढळून येत असल्याचे या अभ्यासातून समोर आले आहे.
राखीगड ही हरयाणामधल्या हिस्सार येथे ३०० एकरांमध्ये पुरातत्त्व खात्याची जागा आहे. जवळपास ६००० वर्षांपूर्वीची ती अत्यंत प्रगल्भ संस्कृती होती असे हे संशोधन सांगते. या संशोधनामुळे आर्य हे मध्य आशियातले किंवा बाहेरचे होते, त्यांनी भारतातल्या तत्कालीन कथित मागास समाजावर आक्रमण केले व त्यांना दक्षिणेकडे ढकलले, नागरीकरण म्हणजे काय हे भारताला शिकविले या आतापर्यंत ब्रिटिश व अन्य पाश्‍चात्त्य राष्ट्रांनी रुजविलेल्या सिद्धांताला जोरदार झटका बसणार आहे. परिणामी वैदिक संस्कृती व तिचे प्रणेते आर्य हे मूळचे स्थानिक भारतीयच होते व ते अतिशय प्रगत होते आणि त्यांनी प्रगल्भ सांस्कृतिक मूल्ये रुजविली होती, या विचारधारेस मान्यता मिळण्याची शक्यता आहे.

Posted by : | on : 15 Jun 2018
Filed under : राष्ट्रीय, सांस्कृतिक.
You can follow any responses to this entry through the RSS 2.0You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Change Language: press Ctrl+g

    छायाचित्रातून

  • पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक
  • कोहली, मीराबाईला खेलरत्न कोहली, मीराबाईला खेलरत्न
  • अमित पांघळला बॉक्सिंगचे सुवर्ण अमित पांघळला बॉक्सिंगचे सुवर्ण
  • तेजिंदरपालला सुवर्णपदक तेजिंदरपालला सुवर्णपदक
  • महाराष्ट्राच्या राहीचा सुवर्णभेद महाराष्ट्राच्या राहीचा सुवर्णभेद

हवामान

दृष्टीक्षेपात

व्हिडीओ संग्रह

More in राष्ट्रीय, सांस्कृतिक (796 of 1774 articles)


सरकारचा महत्त्वपूर्ण निर्णय, तभा वृत्तसेवा नवी दिल्ली, १४ जून - पंतप्रधान आवास योजनेत व्याज अनुदान मिळण्यासाठी पात्र ठरणार्‍या मध्यम उत्पन्न ...

×